18/02/2024
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? कवी गोविंद दरेकरांची ही ओळ प्रत्येक स्वातंत्र्य प्रेमी व्यक्तीच्या धमनीतील रक्त सळसळविते. या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यांच्या प्रेरणास्थानी जी काही मोजकी नवे होती त्यापैकी एक या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जन्म दिवशी आज आम्हाला नवीन प्रकल्प सादर करताना आनंद होत आहे. ज्या युद्धकलांनी या मायभूमीसाठी अगणीत स्त्री आणि पुरुष योध्ये घडविले त्यापैकी महत्वाची एक कला म्हणजे कलरीपयटु. जागतिक कीर्तीचे कलरीपयटु कलाकार, अभिनेते आणी एकवीरा कलरी अकॅडमीचे संस्थापक हरी कृष्णन आणि त्यांचे सहकारी यांच्या सोबत केलेला हा प्रयोग ( आलेप्पी, केरळ येथे ) छायाचित्रांच्या माध्यमातून पुढे सादर करीत आहोत. भारतीय युद्धकलांमध्ये कलरी, शिख, मराठा आणि इतर राज्यांच्या युद्ध कला ज्यांनी आपला देश सुरक्षित केला त्यांना त्या जागी तेथील परंपरागत गुरुकुलांमध्ये जाऊन समजून घेण्याचा हा एक कलात्मक प्रयत्न. जेणेकरून तरुण पिढीत आपल्या युद्धकलांबद्दल आत्मीयता आणी शिकण्याची इच्छा जागृत होईल. लवकरच पुढील छायाचित्रे सादर करू. 🙏🏻 पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्या. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय ! हर हर महादेव !!!
🚩🕉🚩
Write up and photography Yogesh K
In frame Guinness HariKrishnan Gurukkal
K Raginee Yogesh
Location: Alleppy, Kerala