29/05/2023
बीड ते मुंबई एक वास्तववादी संघर्ष ...
बीड म्हटलं की, 'ऊसतोड कामगारां'चा जिल्हा अशी ओळख आहे. पण, त्यापलीकडे जाऊन विचार केला तर, तोच बीड जिल्हा जेथे तो 'प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर' आहे. मग ते राजकारण, समाजकारण, कला, शिक्षण, नोकरी, उद्योग, वाड़मय काहीही असो. कुठचं कमी नाही... 'बस का भावा' इथपर्यंत...
आयुष्यात कितीही वळणे आली. तरी त्या वळणावर कधीचं थांबायचं नाही, हे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यामुळे पडेल ती कामे केली... पण, कधीच माघार घेतली नाही. अन् यश मिळवलं...असं अण्णा सांगत होते.
माननीय श्री. 'हरीदास (अण्णा) आसाराम शेंद्रे'. सध्या ते मंत्रालयात 'स्वीय सहायक' हुद्यावर आहेत.
प्रथम त्यांचं अभिनंदन... आणि विशेष म्हणजे त्यांचा आज वाढदिवस... त्याबद्दल त्यांना उदंड आयुष्य लाभो....
आणि हो, इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे नुकताच अण्णांच्या लहान (मा.श्री.संदीप शेंद्रे) भावाची सुध्दा गेल्या महिन्यात "भारतीय रेल्वे खात्यात निवड" झाली. त्यांचं सुध्दा अभिनंदन...
अभिमानाची गोष्ट अशी की, अण्णा 'मंत्रालयात अधिकारी' म्हणून काम पाहतात. यावेळी त्यांना हिवाळी अधिवेशनातही काम करायची संधी मिळाली. खरोखर त्यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा आतापर्यंतचा झालेला प्रवास बऱ्याच कडू गोड आठवणीने ओतपोत भरलेला आहे. त्यांच्या वाट्याला आलेलं आणि प्रत्यक्ष भोगलेलं दुःख सांगताना मात्र, ते भावूक होतात.
अण्णा, व्यक्ती म्हणून खरोखर 'आदर्श' आहेत...
संघर्ष कोणाला चुकला हो. तो कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. फक्त व्यक्तिनुसार त्यात बदल होत असतो.
पण, त्याला कुरवाळत बसायचं, की त्यावर स्वार व्हायचं. हे ठरवण्याचं पुर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं...
त्यामुळे बिनधास्त ठरवा, आयुष्य कसं घडवायचं...
मात्र, एक गोष्ट लक्षात असायला हवी, की त्याचे नायक अन् खलनायक तुम्हीच आहात. असो.
संघर्ष करत असताना, त्या कालावधीत तुमच्या जीवनाच्या "पास बुकात हमखास संकटांचा बॅलन्स" जमा होणार. आणि त्यावर "दुःख स्वरुपात व्याज" मिळणार.
पण ते उगाळत न बसता, जो त्यावर स्वार होत, मांड ठोकून 'परिस्थितीचा लगाम' हातात घेत, घोडदौड करतो. तोच खरा यशाचा वाटेकरी होतो...
२०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेतून अण्णांची थेट मंत्रालयात निवड झाली...
इथपर्यंतचा खडतर प्रवास आणि आयुष्याने घेतलेली जबरदस्त वळणे अक्षरशः अंगावर काटा उभा करतात... पण, त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.
माघार घेणे हे त्यांच्या आयुष्याच्या शब्द संग्राहातच नव्हतं... आणि आजही नाही.
'प्रचंड आशावादी' आणि स्वतः वर असलेला 'विश्वास' हे त्यांच्या यशाचं खरं गुपीत...
क्रमशः