20/05/2022
🌳 ९५० वर्ष वयाचे झाड - वडोदरा 🌳
जवळपास सगळ्यांना हे माहित आहेच की "वडोदरा" हे नाव येथे असलेल्या अनंत वटवृक्षांचे वास्तव्य सुचित करते. परंतु आज एक वेगळी ओळख असलेला महावृक्ष आपण बघणार आहोत. बडोदा शहरापासुन साधारण १५-२० किमी लांब "गणपतपुर" गावात एक “आफ्रिकन" ओरिजिन असलेले झाड आहे. जगातील सर्वात जुन्या नैसर्गिक स्मारकांपैकी एक असे भव्य "Baobab" वृक्ष - ९५० वर्षांचे असुन भारतातील सर्वात जुने "बाओबाब" वृक्ष असल्याचे सांगितले जाते. मोकळ्या मैदानात उंच उभ्या असलेल्या या विशाल बाओबाब वृक्षाची वनविभागाने " #हेरिटेज_ट्री" म्हणून नोंद केली आहे. हे झाड मूळचे आफ्रिकन आहे पण ते इथे कसे आले ते माहीत नाही. गुजराती लोक व्यापारासाठी परदेशात जात असत आणि त्यांनी बाओबाब झाडाची रोपे आणली असावीत आणि इथे पेरले असावेत, असे मत नेचर वॉकचे सदस्य "अरुण मुझुमदार यांचे आहे. (Ref - Article Times of India, 25/03/2019). गुजराती भाषेत यास "घेलू" असे नाव आहे.
श्री अरुण मजुमदार यांच्या ISRO मधील एका मित्राने Carbon Dating च्या आधारे ह्या महावृक्षाचे वय ९५० वर्षे असल्याचे सांगितले आहे. ह्या झाडात ५०००० लिटर पाणी साठलेले असण्याची शक्यता आहे असे वनस्पती तज्ञ मानतात.
अशाच प्रकारची अजुन २ झाडे जवळच असलेल्या "लक्ष्मीपुरा" व "समियाला" या गावांमध्ये आहेत. शोधायला थोडे कठिन गेले परंतु सुदेवाने तिनही झाडे गावकर्यांना विचारुन आम्हास पहायला मिळाली. या तिघांपैकी गणपतपुरा येथील झाड हे अतिशय पुरातन, भव्य व दिव्य आहे. तसेच ह्या झाडावर अनेक पोपट व इतर पक्षांचा किलकिलाट आहे. त्या मानाने इतर २ झाडे आकाराने लहान व इतकी पुरातन वाटत नाहीत. अजुन एक चौथे झाड सुभानपुरा येथे होते, परंतु २०२० मध्ये ते स्वतःचेच वजन न पेलवल्याने पडले. (Ref - Article, Times of India, 15/07/2020 )
गणपतपुरा येथील झाडाचे खोड आम्ही मोजुन बघितले, ते 53 फुट रुंद आहे. यातील लक्ष्मीपुरा येथील झाडाचे खोड २७ फुट इतके रुंद आहे व सामियाला येथील झाडाचे खोड २५ फुट इतके रुंद आहे. ह्या तिनही झाडांचे Locations व photos शेअर करीत आहे.
Common name – Baobab Tree
Scientific name - Adansonia digitata L. (Malvaceae)
Locations :-
1) Ganpatpura - https://maps.app.goo.gl/3ZcSnfNif7PtgypXA
2) Laxmipura - https://maps.app.goo.gl/UrrShbWgHEGLUWAc6
3) Samiyala - https://maps.app.goo.gl/qW5MTKCLEcMUpGt38
950 year old tree -- Vadodara
Almost everyone knows that the name "Vadodara" indicates the presence of endless banyan trees here. But today we are going to see a different tree with a different identity. Ganapatpur, a village about 15-20 km from Baroda, has a tree of “African” origin. The forest department has listed this tall Baobab tree as " ". The tree is of African descent but it is not known how it came to be here. Gujarati people used to go abroad for trade and they might have brought that progeny here, this opinion belongs to Mr Arun Muzumdar, a member of Nature Walk. (Ref - Article Times of India, 25/03/2019)
According to a friend of Mr. Arun Majumdar in ISRO, based on Carbon Dating, this tree is 950 years old. Botanists estimate that this plant may have stored up to 50,000 liters of water.
There are two more such trees in the nearby villages of Laxmipura and Samiyala. It was a little difficult to us to these trees but we asked the villagers for these trees and we got to see them. Out of these three, the tree at Ganapatpura is very ancient, magnificent and divine. Also, there are many parrots and other birds chirping on this tree. The other two trees do not look that small and so old. A fourth tree was at Subhanpura, but it fell in 2020 due to lack of weight. (Ref - Article, Times of India, 15/07/2020)
The trunk of the tree at Ganapatpura we measured is 53 feet wide. The trunk of the tree at Laxmipura is 27 feet wide and the trunk of the tree at Samiala is 25 feet wide. You can spend a Sunday evening at this wonderful place. Sharing locations and photos of all three trees.
Common name – Baobab Tree
Scientific name - Adansonia digitata L. (Malvaceae)
Locations :-
1) Ganpatpura - https://maps.app.goo.gl/3ZcSnfNif7PtgypXA
2) Laxmipura - https://maps.app.goo.gl/UrrShbWgHEGLUWAc6
3) Samiyala - https://maps.app.goo.gl/qW5MTKCLEcMUpGt38