Vatsaru Ecotourism

Vatsaru Ecotourism explore the rural & eco tourism ( before 50 years ago rural lifestyle in sindhudurg)

नारळाची झाडा लावली हूनान झाला नाय तेंची निगा राकाक व्हयी.तरच नारळीक नारळ भरान लागतले. अळी करून उकरड बिकरड मिरगाक नारळींक...
14/12/2020

नारळाची झाडा लावली हूनान झाला नाय तेंची निगा राकाक व्हयी.तरच नारळीक नारळ भरान लागतले. अळी करून उकरड बिकरड मिरगाक नारळींका घालूचो लागता. आडसारा झाली काय मतर माकडांपासून जपाचा लागता नाय तर आडसारा खावन वाट लावतली.

अननसात औषधी गुण आसतत.अननसाची कापा काडून तेच्यार थोडी साकार टाकून खावक गोड लागता.Photo Credit : Kaivalya Phansalkar      ...
04/12/2020

अननसात औषधी गुण आसतत.अननसाची कापा काडून तेच्यार थोडी साकार टाकून खावक गोड लागता.

Photo Credit : Kaivalya Phansalkar

 #हरडे हरडे ब-याच आजारांवर गुणकारी आसत.बाळ हरडे लहान पोरग्याच्या झरवणेच्या औषदात देतत.सुको हरडो झरवून कदीतरी पोटात घेवचो...
28/11/2020

#हरडे
हरडे ब-याच आजारांवर गुणकारी आसत.बाळ हरडे लहान पोरग्याच्या झरवणेच्या औषदात देतत.सुको हरडो झरवून कदीतरी पोटात घेवचो किवा तेची पावडर करुन खावची तेनी माणसाक व्याधी जडनत नाय.पयली व्हाळातल्या सपाट गुंड्यावर झरवून लहान पोरग्याक औषद देयत आता बाळगुटी बाजारात तयार मिळता.
आजी,आजोबा,पनजी,पनजोबा कडसून औषदी झाडपाल्याची म्हायती घेवन ठेवक व्हयी.तेचो नक्कीच कदीतरी उपयोग होतलो.

जंगली औषदी झाडपाल्याच्या अभ्यासासाठी फिरा : वाटसरु इकोटुरिझम 9769920295

 #भिंबर्टीहिंबरात भिंबर्ट्यो जास्त फिरतत.एकापेक्षा एक येगयेगळ्या रंगाच्यो बगूक भारीच वाटतत.
06/11/2020

#भिंबर्टी
हिंबरात भिंबर्ट्यो जास्त फिरतत.एकापेक्षा एक येगयेगळ्या रंगाच्यो बगूक भारीच वाटतत.

 #देवूळपरतेक गावात ग्रामदेवतेचा याक देवूळ दिसतला.धयकालो,दसरो,होळी ह्ये देवळातले सण पोरग्या टोरग्यांपासून सगळ्यांका आनंद ...
05/11/2020

#देवूळ
परतेक गावात ग्रामदेवतेचा याक देवूळ दिसतला.धयकालो,दसरो,होळी ह्ये देवळातले सण पोरग्या टोरग्यांपासून सगळ्यांका आनंद देतत.जुन्या काळातली लाकडी,दगडी,कौलारू देवळा बगूनच सुक आणि समादान मिळता.हीसून फुडे सुदा अशीच देवळा जपाक व्हयी.आणि भोवतारची झाडा सुदा.

देवाक काळजी रे,माज्या देवाक काळजी रे.

 #चोपाळोआज्या,पंज्याच्या कारकीर्दीचो चोपाळो आजुनव दनकट आसा.फणसाच्या लाकडाचो ह्यो चोपाळो साधारण दीड-दोनसे वर्सापुर्वीचो त...
04/11/2020

#चोपाळो
आज्या,पंज्याच्या कारकीर्दीचो चोपाळो आजुनव दनकट आसा.फणसाच्या लाकडाचो ह्यो चोपाळो साधारण दीड-दोनसे वर्सापुर्वीचो तरी आसतलो.

03/11/2020

#चला आणि निरोगी रवा
झपझप चलल्यामुळे शरीरातले बरेच आजार बरे होतत.माणूस सडसडीत रवता.हूनान रिकाम्या येळात चलाकच व्हया.

 #केळीचा बॉन्ड केळीच्या बोंडाची भाजी करतत.बॉन्ड रात्री चिरून पाणयात भिजत ठेवचा लागता.तेच्यात काळे वटाणे,हीरये वटाणे किवा...
01/11/2020

#केळीचा बॉन्ड
केळीच्या बोंडाची भाजी करतत.बॉन्ड रात्री चिरून पाणयात भिजत ठेवचा लागता.तेच्यात काळे वटाणे,हीरये वटाणे किवा चवळी घालून भाजी भारीच लागता.
केळीचा बॉन्ड आरोग्याक चांगला आसा.डायबिटीज लोकांच्या रक्तातल्या साकरेची पातळी कमी करता,हिमोग्लोबिन वाढवता, तेच्यात फायबर आणि लोह असता हूनान तांबड्यो रक्त पेशी तयार करूक उपयोगाक येता.हृदयरोगाचो आजार असणाऱ्यान तर केळीच्या बोंडाची भाजी खावकच व्हयी.

येवा अस्सल मालवणी lifestyle बगूक - 9769920295

#

 #मर्गजबुरटात थंडाय्क मर्गज झाडावरनी लोंबत आसता.सुकललो आसलो तरी पानयात ठेवल्यार हीरवोगार होता.मर्गज डेकोरेशनाक सुदा वापा...
31/10/2020

#मर्गज
बुरटात थंडाय्क मर्गज झाडावरनी लोंबत आसता.सुकललो आसलो तरी पानयात ठेवल्यार हीरवोगार होता.मर्गज डेकोरेशनाक सुदा वापारतत.

 #दोपारनासकाळची न्हेरी,दोपारचा,रातचा जेवान जमनीर बसान जेवलला बरा.तितकीच शरीराची हालचाल होता.मानसान निरोगी आणि समादानी आस...
30/10/2020

#दोपारना
सकाळची न्हेरी,दोपारचा,रातचा जेवान जमनीर बसान जेवलला बरा.तितकीच शरीराची हालचाल होता.मानसान निरोगी आणि समादानी आसाचा असा तेवा आज्जी,आज्जो सांगत.निरोगी रवाचा हूनजे शरीराची हालचाल करुकच व्हयी.आणि आसात तेच्यातच समादानी रवाक व्हया.

वाटसरू बरबर फिरा - 9769920295

28/10/2020

#गडावरची बावडी
मनोहर मनसंतोष गडावरच्या बावडेक बाराय म्हयने पाणी अासता.कीती भारी ना! गडावर फिराक मज्या येता.

Trekking करुक येवा. 9769920295

 #दसरो कोकणात दसरो येगयेगळ्या पध्दतीन साजरो करतत.पूर्वीपासून चलत इलली परंपरा हा.वाडवडिलांनी जपलेली परंपरा आमी टीकवतव ह्य...
27/10/2020

#दसरो
कोकणात दसरो येगयेगळ्या पध्दतीन साजरो करतत.पूर्वीपासून चलत इलली परंपरा हा.वाडवडिलांनी जपलेली परंपरा आमी टीकवतव ह्येचा समादान मिळता.

Vijayadashami also known as Dasara is a major hindu festival celebrated at the end of Navaratri every year

 #कोंडव्हाळातल्या कोंडीत म्हशी पाणयात घातल्यो की वाड्यात दायावर पाणी देवक नूको आणि धुव्क पण गावतत.
24/10/2020

#कोंड
व्हाळातल्या कोंडीत म्हशी पाणयात घातल्यो की वाड्यात दायावर पाणी देवक नूको आणि धुव्क पण गावतत.

 #बेडे | Betel nutsगुदस्ता परास यंदा बेडणीक बेडे मोठे लागले.बेड्यांची चव मातर अस्सल मालवणी.बेडणी उंच आसतत हूनान बेडे चडा...
19/10/2020

#बेडे | Betel nuts
गुदस्ता परास यंदा बेडणीक बेडे मोठे लागले.बेड्यांची चव मातर अस्सल मालवणी.बेडणी उंच आसतत हूनान बेडे चडान काडणारो म्हायतगार व्हयो.

17/10/2020

#टोळ
टोळ नाचन्याच्या शेतात आसतत.कदीतरी सांजेची पिंगानी आणि कीटक खावक लायटीच्या उजेडान लोट्यार घरात येतत. येगयेगळ्या परकारचे आणि रंगाचे टोळ आसतत.

Grasshoppers eat plants,primarily leaves,grasses and cereal crops

 #शिरपुटाचो भारो चुलीत घालूक चार शिरपुटा लागतत.चुलीवरचा जेवान ता चुलीवरचा ! तेची चव आणि खेका येवची नाय. सांजेक न्हानयेत ...
06/10/2020

#शिरपुटाचो भारो
चुलीत घालूक चार शिरपुटा लागतत.चुलीवरचा जेवान ता चुलीवरचा ! तेची चव आणि खेका येवची नाय. सांजेक न्हानयेत आग पेटवूची लागता.न्हावक पाणी तर तापाक व्हया ?

येवा आमचो गाव बगूक : 9769920295

 #बुरटातली फुलाबुरटातली फुला बगून आणि त्येचो वास घेवन थकलेल्या जीवाक बरा वाटता.निसर्गान आमका खुब भरभरून दिल्यान हा.ता जप...
05/10/2020

#बुरटातली फुला
बुरटातली फुला बगून आणि त्येचो वास घेवन थकलेल्या जीवाक बरा वाटता.निसर्गान आमका खुब भरभरून दिल्यान हा.ता जपाक व्हया,नाशाडी करून चलाचा नाय.

 #येचूयेचू ह्यो इशारी परानी आसा.माकसाक चावल्यान तर जीवाची आग होता.कोकणात काळे,तांबडे असे येगयेगळ्या परकाराचे येचू आसतत.व...
04/10/2020

#येचू
येचू ह्यो इशारी परानी आसा.माकसाक चावल्यान तर जीवाची आग होता.कोकणात काळे,तांबडे असे येगयेगळ्या परकाराचे येचू आसतत.

वाटसरु वंगडा फिराचा आसा ? : 9769920295

#विंचू

 #सायकलीन जावया सायकलीन फिराक जरा बरा.व्हाळाच्या कडेन,भरडार,पान्नीस्सून चलत जावक बरा पण सायकलीन बेगीन जावन येवक येता.   ...
02/10/2020

#सायकलीन जावया
सायकलीन फिराक जरा बरा.व्हाळाच्या कडेन,भरडार,पान्नीस्सून चलत जावक बरा पण सायकलीन बेगीन जावन येवक येता.

 #डोंबलीमानग्याची डोंबली बनौक कसब लागता.व्हाळात डोंबली लाव्क जाय्त तर कुर्लो हमकास गावतल्यो.येवा कुर्लो धरूक आणि व्हाळात...
01/10/2020

#डोंबली
मानग्याची डोंबली बनौक कसब लागता.व्हाळात डोंबली लाव्क जाय्त तर कुर्लो हमकास गावतल्यो.
येवा कुर्लो धरूक आणि व्हाळात फिराक : 9769920295

 #तळयेर्ला देवाचा झाड वाडवडील सांगान गेले देवाच्या झाडाकडे आरसा बुरसा करुचा नसता.तळयेर्ला २०० वर्षापुरइचा देवाचा झाड आंब...
30/09/2020

#तळयेर्ला देवाचा झाड
वाडवडील सांगान गेले देवाच्या झाडाकडे आरसा बुरसा करुचा नसता.तळयेर्ला २०० वर्षापुरइचा देवाचा झाड आंब्याचा आसा आणि तेका वडगान फणसाचा आसा.मोटा आसा ६० एक फुटाचा.झाडा खालच्या तळयेचा पाणी नितळ आणि थंडगार आसता तासुदा बाराय म्हयने.

 #रांधाप पाट्यार वाटाप करून येका चुलीर सांभारा ,दूस-या चुलीर भात रांधलो की जेवक मोकळे झालव. येवा कोकण आपलोच आसा : 📞 9769...
29/09/2020

#रांधाप
पाट्यार वाटाप करून येका चुलीर सांभारा ,दूस-या चुलीर भात रांधलो की जेवक मोकळे झालव.

येवा कोकण आपलोच आसा : 📞 9769920295

 #माळोभाता पिकली हत.भाटल्यात माळ्याक जावक व्हया. नायतर रातची रानटी जनावारा भाताची वाट लावतली.माळो नाय राकलो तर डुकरा, मे...
28/09/2020

#माळो
भाता पिकली हत.भाटल्यात माळ्याक जावक व्हया. नायतर रातची रानटी जनावारा भाताची वाट लावतली.माळो नाय राकलो तर डुकरा, मेरवा काय येक ठेवची नाय.

 #बांडूकसरायक येगयेगळे बांडूक पाणथळ जाग्याक किवा शेळीत फिरतना दिसतत.भोवतेक किडेबिडे खावक फिरतत आसतले.
26/09/2020

#बांडूक
सरायक येगयेगळे बांडूक पाणथळ जाग्याक किवा शेळीत फिरतना दिसतत.भोवतेक किडेबिडे खावक फिरतत आसतले.

 #बुरटात फिरना दिवसबर बुरटात फिरान इल्यार कडकडीत पाणयाचे दोन तांबये न्हावन गाड नीज लागता.बुरटात जितक्या बगश्यात तितक्या ...
25/09/2020

#बुरटात फिरना

दिवसबर बुरटात फिरान इल्यार कडकडीत पाणयाचे दोन तांबये न्हावन गाड नीज लागता.बुरटात जितक्या बगश्यात तितक्या कमीच आसा. हूनान बुरटात जातना एकादो सादो कॅमेरो आसलेलो बरो.

आमचो फोन रेंज आसली तर लागतलो : 9769920295

 #रेडकूसकाळीच उटान रेडकूंका पयल्यो चारीच्यो  पेंडयो हाडूच्यो लागतत.चा-याच्या निमतान फाटेक उटाची सवय तरी पडली. कसाव काय आ...
24/09/2020

#रेडकू
सकाळीच उटान रेडकूंका पयल्यो चारीच्यो पेंडयो हाडूच्यो लागतत.चा-याच्या निमतान फाटेक उटाची सवय तरी पडली. कसाव काय आसना पण सकाळीच उटान चलान सडसडीत वाटता.हूनान काम नसला तरी शेरातली मानसा फाटेकच चलाक जातत.

23/09/2020

चुलीवरचा जेवान
चुलीवरच्या जेवनाची चवच बरी लागता.वडे खावचे तर गावठी तांदळाचे.आरोग्याक पण बरे.आणि जा काय वाडवडलांनी केळीच्या पानात जेवचा केल्यानीहा तेका आयुर्वेदिक महत्त्व आसा म्हणानच.



Vatsaru with me : 9769920295

22/09/2020

जंगलातले व्हाळ
दिवसभर धो-धो पावस लागलो काय व्हाळाक उतार गावना नाय.बरा वरच्या साकवान जावचा तर तेच्यार सुदा पानी इला. काय हरकत नाय पानी थोड्या येळान काढात.

's

वाटसरु इकोटुरिझम : 9769920295

वालयचे तांदूळ - उकडे आणि सूरययाक वाटग्या वालयच्या उकड्या तांदळची पेज शिक मानसाक दिलव तर तेका ताकत येता. वालयचे, पांड-या ...
20/09/2020

वालयचे तांदूळ - उकडे आणि सूरय
याक वाटग्या वालयच्या उकड्या तांदळची पेज शिक मानसाक दिलव तर तेका ताकत येता. वालयचे, पांड-या बेळ्याचे किवा पाटणीच्या तांदळाचे घावने बरे लागतत.तवसाेळ्यो, धोंडास,खसखसा,तवसोळ्यो, शिरवाळे,पातोळ्ये खाशात तर काय भारीच.

#वालयचेतांदूळ

थोडो येळ का आसना खडकार बसाक बरा हा. Amazing quiet place in konkan - how about spending some quiet time here? √ Like, √ S...
19/09/2020

थोडो येळ का आसना खडकार बसाक बरा हा.

Amazing quiet place in konkan - how about spending some quiet time here?
√ Like, √ Share our page to get more updates from us

आज लायटीक काय झाला आजून येवक नाय कशी?शिरापडला हाली असीच जाता अभ्यास करुच्या येळात.
19/09/2020

आज लायटीक काय झाला आजून येवक नाय कशी?
शिरापडला हाली असीच जाता अभ्यास करुच्या येळात.

डोंगरावरसून धबधबे कोसाळतना जवळ जावन बगूख बरा वाटताThe wonderful and amazing tourist destination of hidden waterfall in S...
18/09/2020

डोंगरावरसून धबधबे कोसाळतना जवळ जावन बगूख बरा वाटता

The wonderful and amazing tourist destination of hidden waterfall in Sindhudurg.contact us on: 9769920295

निरफणसनिरफणसाची कापा तव्यार तळुन कधी खालात?
18/09/2020

निरफणस
निरफणसाची कापा तव्यार तळुन कधी खालात?

Address

Anjivade, Tal. Kudal, Dist. Sindhudurg
Kudal
416519

Telephone

+919769920295

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vatsaru Ecotourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vatsaru Ecotourism:

Videos

Share

Category


Other Tour Agencies in Kudal

Show All