Trekkers & Travellers

Trekkers & Travellers Trekkers & Travellers is a well-known travel company that organizes Adventure tours, Treks, Jeep & Instead of “going green,” the young ones are “going screen".

Respected Sir/ mam
Now a days children spend less time in the outdoors than any earlier generation, depriving themselves of the emotional and physical benefits that come from bonding with nature. Indian Kids spend an average daily 8 hours on TV, Games and Gadgets. This is a trend that Trekkers & Travellers is committed to change with its Adventure Camps. Trekkers & Travellers is a well-known trave

l company that organizes Atours, Treks, Jeep & Bick safari specially in Leh and other parts of India since 2007. We assure you to provide best services in any part of India and abroad at a very competitive rates in the tourism industry. We are sure that you will be kind enough to provide us an opportunity to serve you with your requirements in near future. We also plan tours other then School/College groups. "Taj Mahal would not looked so beautiful & Everlasting,
if
Emperor Shah-jahan had colled for quotation & awarded contract
to the loest tender...........
Makarand Chitale 09822308932
Meghana Chitale 09822760824

शालेय सहल 2023या वर्षीच्या हंगामातली पहिली सहल आयुका पुणे भेट जेम्स इंग्लिश स्कूल नाशिक 70 मुले मजा आली More information...
18/08/2023

शालेय सहल 2023
या वर्षीच्या हंगामातली पहिली सहल
आयुका पुणे भेट
जेम्स इंग्लिश स्कूल नाशिक
70 मुले
मजा आली
More information and necessary booking call 9822308932

02/08/2023

Ask us for Andaman
T&T
9822308932

29/07/2023
Trekkers & Travellers  विनम्र आवाहन,ऑगस्ट पर्यत पाऊस कमी होईल पण तरी या वेळी अगदी डिसेंबर पर्यत हिलस्टेशनला किंवा जेथे प...
22/07/2023

Trekkers & Travellers

विनम्र आवाहन,
ऑगस्ट पर्यत पाऊस कमी होईल पण तरी या वेळी अगदी डिसेंबर पर्यत हिलस्टेशनला किंवा जेथे पावसाचे प्रमाण खूप जास्त आहे अशा पर्यटन स्थळी जाताना आपण तिथले जे हॉटेल बुक करतोय ते कशा अवस्थेत आहे याची खात्री करून घेणं अंत्यत गरजेचे आहे, अशा वेळी तिथली बहुतांश हॉटेल पावसाने नुकसान झालेली काही तरी काम निघालेली असतात त्यांना त्या कामा साठी वेळ लागू शकतो अशा अवस्थेत तिथं गेलं तर आपलाच हिरमोड होतो त्या मुळे डिसेंबर पर्यत अतिवृष्टी झालेल्या परिसरात जायचे असेल तर योग्य ती खबरदारी घेऊनच जा , पाऊस चालू असताना कोठेही मोठ्या वॉटर फॉल किंवा डोगरावर/ किल्ल्यावर एकटे जाण्याचे धाडस करू नका.
अतिपरिचित ठिकाणी अशा वेळी प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे त्या गर्दीच्या विळख्यातून , ट्रॅफिक जाम मधून निसटायचे असेल तर घरातून लवकर निघा , त्या प्रसिद्ध ठिकाणाच्या आजू बाजूला , पुढेही तेवढ्याच उत्तम निसर्गरम्य जागा नक्कीच असतात त्या शोधण्याचा प्रयत्न करा , सगळंच एका दिवसात बघण्या साठी प्रचंड घाई गोधळ करण्या पेक्षा शाततेत प्रत्येक गोष्टीचा अस्वाद घ्या, सर्वात महत्वाचे जाताना आपण कोठे जातो आहोत कोण बरोबर आहे याची कल्पना घरी देऊन ठेवा , आजकाल मुला/मुलीची वेगळी स्पेस (?) असते च्या विचाराने पालक ही काही गोष्टी विचारत नाहीत अस करू नका , जेव्हा तुम्ही त्यांना एकट मित्र मैत्रिणी बरोबर जाऊ देता आहात तेव्हा ते बाहेर नक्की कुठे , का चालले आहेत , बरोबर त्या ठिकाणची योग्य माहिती असणारा कोणी आहे का, कधी परत येणार या सारख्या गोष्टीची माहीती आपणास हवी. मुलांना आणि खर तर सर्वच पर्यटकांना धोकादायक ठिकाणी सेल्फी शारीरिक मस्ती गोधळ घालायला तेथे हजर असलेल्या इतर पर्यटकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मज्जाव करायला हवा शासन प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा पोलीस नाही ठेऊ शकत, होणारे जवळपास 99% अपघात हे स्वतः विषयीचे गैरसमज व निसर्गाचा मान न ठेवल्याने होतात या दोन गोष्टी जरी टाळल्या आणि आपल्या कडे फिरायला जायला उद्या नंतरही आयुष्य आहे हे मान्य केलं तर अपघाताच प्रमाण खूप कमी होईल प्रत्येक ठिकाणी मीच पहिला हे सोडून दिले पाहिजे , निसर्गाची देखील अत्याचार सहन करण्याची एक सीमा आहे ती ओलांडली की मग तिथं असणारे कोण बरोबर कोण चूक याचा विचार न करता तो सगळ्यांनाच सरसगट शिक्षा करतो आणि निसर्गाची शिक्षा अंत्यत कठोर असते.
एकदा पावसाळ्याच्या भर ओसरू द्या निसर्ग श्रावणात हिरवागार होऊन खेळकर होऊ दे मग हुडदा त्याच्या अंगाखांद्यावर हवं तेवढं योग्य ती काळजी घेऊन.
अजून काय सांगणार , खेळ , धाडस , पर्यटन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपलं आयुष्य यात सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची बाकी सगळं त्या नंतर.
© मकरंद श्री चितळे
क्षितिज बाय असीम हॉस्पिटलीतज, दिवेआगर
- 09822308932...

03/07/2023

शाळा कॉलेज ट्रिप चे कोणाचे काही प्लॅनिंग असेल तर त्वरित संपर्क करा रेल्वे रिझर्वेशन 90 दिवस आधी उघडतात.
एन वेळी तिकिटे , हॉटेल्स मिळत नाहीत , आजकाल तसेही सिझन मध्ये हॉटेल वाले विद्यार्थी ग्रुप ला रूम्स द्यायला नाखूष असतात. चांगली हॉटेल्स मिळणे आवश्यक असते सुरक्षेच्या दृष्टीने.
संपर्क
मकरंद चितळे
ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स
9822308932
7588709809

I have reached 1.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
01/06/2023

I have reached 1.5K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

येत्या जून पर्यत आसेतु,  हिमाचल कोकणात दिवेआगर फन कॅम्प व सहली , चारधाम, व लेह सारख्या यात्रा, संपर्क मकरंद चितळे ट्रेकर...
29/03/2023

येत्या जून पर्यत आसेतु, हिमाचल
कोकणात दिवेआगर फन कॅम्प व सहली ,
चारधाम, व लेह सारख्या यात्रा, संपर्क
मकरंद चितळे
ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स
9822308932
9822760824
7588709809

उन्हाळा आला, अखिल भारतीय बाळ गोपाळांना सालाबाद प्रमाण ऍडव्हेंचर कॅम्प, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर असल्या नावांनी अन मनाली...
23/03/2023

उन्हाळा आला,
अखिल भारतीय बाळ गोपाळांना सालाबाद प्रमाण ऍडव्हेंचर कॅम्प,
व्यक्तिमत्त्व विकास शिबीर असल्या नावांनी अन मनालीतला फोटो नैनिताल ला अन नैनिलेकचा फोटो कोकणातला दाखवून ही मारुतीच्या शेपटी सारखी प्रचंड मोठी काय काय करवणार याची लिस्ट देऊन पालकांना भुलवायला रंगीत गुळगुळीत मजकुरा सगट फ्लायर यायला लागले असतीलच , त्यातलेच एक म्हणून या लिखाणा कडे किंवा बरोबर च्या फ्लायर कडे दुर्लक्ष करू नका.
आम्ही दिवेआगर ला जे मुला,मुलींसाठी साठी फन कॅम्प घेतो आहोत त्यात कुठेही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व केवळ चार दिवसात बदलण्याचा , सुधारवण्याचा अजिबात केविलवाणा असफल प्रयोग आम्ही करणार नाही, खर तर असा काही चमत्कार चार आठ दिवसात होत नसतो.
आम्ही गेले अनेक कॅम्प फक्त आणि फक्त या सगळ्या गोड मुलांना मोठ्या शहरात अन छोट्या घरात हरवलेले लहानपण आणि त्यातल्या शक्य तेवढ्या गमती जमती अनुभवायला देत असतो.
मग ते मांडी घालून हात भरवत आंबा खाण असू दे , किंवा वाळूत केलेली मस्ती, बाकी भोवरे , लिंगोरचा, या सारखे आपल्या मातीतले खेळ पतंग उडवणे या सारखे शहरात राहून विसरायला झालेले खेळ हे असलं काही तरी आम्ही त्याच्या बरोबरीने करत असतो तेवढेच लहान होण्याचा प्रयत्न करीत, आमच्या कडे कॅम्प फायर तर असते पण स्पीकर वर गाणी नसतात तर गोल बसलेल्या सगळ्यांनीच त्यात भाग घेऊन काही तरी सादर करायचे असते , थोडक्यात घसा साफ करायचा असतो.
बघा आयडिया आवडली असली तर द्या पाठवून घरातल्या अन बिल्डींग /गल्लीतल्या वानरसेनेस चार दिवस आमच्या कडे तेवढीच घरात गल्लीत शातता हो ना ?
बर हा प्रोग्रॅम कोणत्याही वयाचे बंधन पाळत नाही , आबाल वृद्ध , मध्यम वयीन , तरुण तुर्क कोणाही साठी यात स्वागत आहे अट फक्त एकच वय आणि हुद्दा घरीच व्यवस्थित पॅक करून लहान मुलं होऊन यायचे आणि खूप हुंदडायचे, अर्थात आधार कार्ड वरच्या वया नुसार ग्रुप
9 ते 18
19 ते 36
45 ते 63
या तर्हेने
स्त्रियांना वय सांगायची सक्ती नाही
अधिक माहिती अन बुकिंग साठी संपर्क
मकरंद चितळे
9822308932
7588709809
Meghana Chitale
9822760824

Trekkers & Travellers
15/02/2023

Trekkers & Travellers

येत्या शनिवार रविवार क्षितिज , दिवेआगर येथे बुकिंग उपलब्ध मकरंद चितळे 9822308932
15/09/2022

येत्या शनिवार रविवार
क्षितिज , दिवेआगर येथे बुकिंग उपलब्ध
मकरंद चितळे
9822308932

आज अंगारकी आहे करा प्लॅन गजराजाच हे आफ्रिकन रूप अनुभवायचाT & T 98223089327588709809
13/09/2022

आज अंगारकी आहे
करा प्लॅन गजराजाच हे आफ्रिकन रूप अनुभवायचा
T & T
9822308932
7588709809

जरा हटके हो जाये ??? चलो फिर....- Makarand ChitaleT & T98223089327588709809
11/09/2022

जरा हटके हो जाये ??? चलो फिर....
- Makarand Chitale
T & T
9822308932
7588709809

HI EVERYONE ,FROM THE 15 YEARS I AM WORKING IN TOURISM INDUSTRY.I WORK FOR SCHOOL KIDS , COLLEGE STUDENTS, FRIENDS GROUP...
09/09/2022

HI EVERYONE ,
FROM THE 15 YEARS I AM WORKING IN TOURISM INDUSTRY.
I WORK FOR SCHOOL KIDS , COLLEGE STUDENTS, FRIENDS GROUP, FAMILIES & HONEYMOON COUPLES, BUT ONLY IN INDIA.
NOW,
AFTER COVID ERA TREKKERS & TRAVELLERS IS WORKING TOWARDS MAKING YOUR OVERSEAS TOUR MEMORABLE.
RIGHT NOW WE WORKING IN,

MALDIVES
MAURITIUS
SEYCHELLES
DUBAI
EGYPT
GREECE
AZERBAIJAN
THAILAND
MALAYSIA
SINGAPOR
COMBODIA
CARDELIA CRUISES
& YES
INDIA

PLEASE GIVE US OPPORTUNITY TO SERVE YOU & YOUR LOVE ONES OVERSEAS TOO.

TODAY I ANNOUNCE TOTAL FREEDOM TOUR PLAN TO BALI.
OFFER VALID TIL NOVEMBER 2022

Makarand Chitale
TREKKERS & TRAVELLERS
[email protected]
09822308932 / 07588709809

आज जागतिक नारळ दिवसा निमित्त शुभेच्छा☺️क्षितिज बाय असीम हॉलिडे , दिवेआगर9822308932 व 7588709809
02/09/2022

आज जागतिक नारळ दिवसा निमित्त शुभेच्छा☺️

क्षितिज बाय असीम हॉलिडे , दिवेआगर
9822308932

7588709809

29/08/2022

"आज की ताजा खबर"
जायचं तर आहे पण बघू करू बुकिंग वाल्याना कश्मीर नंतर परत एकदा धडा शिकवलाय अंदमान ने , दिवाळी च्या महिन्यात ऑक्टोबर मध्ये विमान तिकिटांच्या किमतीने आकाशात झेप घेतली आहे.
आज काल खूप आधी पर्यटक व्यवस्था बुक करायला लागल्याचा हा परिणाम आहे.
या पुढे पर्यटनाला जायचं असेल आणि त्यात विमान किंवा रेल्वे प्रवास ही असेल तर किमान तीन महिने(९० दिवस) बुकिंग करणे आवश्यक आहे.
-मकरंद चितळे
ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स

असीम हॉस्पिटॅलिटीज
9822308932
7588709809

       #अतुल्यभारत
28/08/2022






#अतुल्यभारत

Book your seat in time Call 9822308932
24/08/2022

Book your seat in time
Call 9822308932

AGAIN SCHOOL TOUR START AGAIN WE ARE READY TO MAKE YOU HAPPY , COME AND ENJOY STAY IN KSH*TIJ DIVEAGAR, KONKAN.WE ALSO P...
12/08/2022

AGAIN SCHOOL TOUR START AGAIN WE ARE READY TO MAKE YOU HAPPY , COME AND ENJOY STAY IN KSH*TIJ DIVEAGAR, KONKAN.
WE ALSO PLAN GROUP TOUR ALL OVER INDIA.
FOR MORE INFO & BOOKING CALL / WHATS APP
9822308932

Aluwadi (colacasia leaves roll), a perfect snack for the Monsoon will definitely tempt you into making it now! Do you ag...
09/08/2022

Aluwadi (colacasia leaves roll), a perfect snack for the Monsoon will definitely tempt you into making it now! Do you agree to it?

बाहेर श्रावणधारा कोसळत असताना घरी अशा खमंग अळूवडी बनवण्याचा मोह तुम्हालाही होतो ना? तुम्ही अळूवडी बनवण्याचा बेत करणार असाल तर पान घ्यायला या दिवेआगर ला
आणि ताजी ताजी खुसखुशीत खायची असेल तर
क्षितिज दिवेआगर ला पर्याय नाही
संपर्क
मकरंद , क्षितिज दिवेआगर , कोंकण
9822308932
7588709809

25/07/2022

केरळ, अंदमान,मनाली नैनिताल
चार ते चाळीस कितीही जणांचा ग्रुप असू दे , उत्तम हॉटेल्स सर्वोत्तम प्लॅनिंग.
कोकणात तर हॉटेल्स आहेतच आपली दिवेआगर व चौल ला बंगला.
बोला किंवा व्हाट्स अँप करा
मकरंद चितळे
9822308932
7588709809






आजच टी व्ही वर विनोदी बातमी ऐकली, पावसाळा आहे बिच वर जाऊ नका , लाटा तुम्हाला आत ओढून नेता आहेत. निसर्ग आणि पंचमहाभूत (अग...
13/07/2022

आजच टी व्ही वर विनोदी बातमी ऐकली,
पावसाळा आहे बिच वर जाऊ नका , लाटा तुम्हाला आत ओढून नेता आहेत.
निसर्ग आणि पंचमहाभूत (अग्नी पाणी वायू जमीन आकाश) ही कधीही त्याचा अपमान केला नाही, योग्य तो आदर केला, त्याच्या शक्तींना सर्वोच्च मानले तर अपाय करत नाहीत कारण मग आपोआपच मानव त्याच्या मर्यादेत रहातो, पण जिथे दारू पैसा किंवा बरोबर असलेल्याच्या दिसण्या मुळे या मर्त्य मानवाचा तोल ढळतो तिथं मग हीच निसर्ग देवता आयुष्य भराची अद्दल घडेल एवढी जबरदस्त चपकार देते
सभाळा स्वतः ला मागच्या काही वर्षात
कलावंतीण, हरिहर, अंधारबन, देवकुड या व अशाच ठिकाणी हकनाक जिव गमावलेल्या गाढवाना आठवा. गुरुपौर्णिमा आहे आज निसर्ग देवते कडे अक्कल आणि त्याही पेक्षा कॉमन सेन्स (जो नेहमीच दुर्मिळ असतो) तो मागा अन योग्य वेळी योग्य रीतीने निसर्गाची आदरयुक्त भीती बाळगत पर्यटनाचा आनंद लुटा..
-मकरंद श्री चितळे
9822308932

AGAIN SCHOOL & COLLEGE OPEN , AGAIN LIFE GOES ON , TRIP , TURS START , SCHOOL & COLLEGE STUDENTS & TEACHER ASK FOR STUDY...
11/07/2022

AGAIN SCHOOL & COLLEGE OPEN ,
AGAIN LIFE GOES ON ,
TRIP , TURS START ,
SCHOOL & COLLEGE STUDENTS & TEACHER ASK FOR STUDY TOURS & FUN TOURS.
THIS YEAR AGAIN I ABLE TO MAKE SO MANY HAPPY SOULS.......
FOR MORE INFORMATION & BOOKING
PLEASE CALL / MSG
MAKARAND S CHITALE
9822308932 / 7588709809

04/07/2022







*शक्ती*लडाख मध्ये फिरताना एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरवळ ही अपवादानेच दिसते, त्यातही पंगोंग लेक कडे जाताना डाव्...
27/06/2022

*शक्ती*
लडाख मध्ये फिरताना एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरवळ ही अपवादानेच दिसते, त्यातही पंगोंग लेक कडे जाताना डाव्या हाताची दरी ही जेवढ्या मोठ्या एरिया मध्ये हिरवळ तेही शिस्तबद्द रीतीने केलेल्या शेती च्या स्वरूपात दोन चार ठिकाणीच दिसते त्यातही हे शक्ती गाव माझ्या जास्तच आवडीचे आहे पंगोंग कडे जायला या गावातूनही एक रस्ता आहे मी नेमाने जाताना किंवा येताना त्या रोडचा उपयोग करतो ती हिरवळ बघून डोळे निवतात, या वेळी जुलै महिना अखेस व ऑगस्ट मध्ये परत एकदा डोळ्या बरोबरच मन आत्मा पण सुखावून घ्यायचा योग आहे.
कोणाला यायचं असेल तर नाव नोंदवायची हीच योग्य वेळ आहे.
अधिक माहिती व बुकिंग साठी
मकरंद चितळे
9822308932

7588709809











जग, हे इतक्या वेगाने आणि भयंकर पद्धधतीने बदलत आहे, लवकर बघून घ्या उदयाला कदाचित तुम्हाला अपेक्षित असेल ते तुम्ही जरी असल...
21/06/2022

जग,
हे इतक्या वेगाने आणि भयंकर पद्धधतीने बदलत आहे, लवकर बघून घ्या
उदयाला कदाचित तुम्हाला अपेक्षित असेल ते तुम्ही जरी असलात तरी त्या जागेवरच नसेल,
लेह
अंदमान
केरळ
कोकण
आणि भारतातील इतरही ठिकाणी जाण्याच्या प्लॅन मध्ये असाल तर नक्की विचारा
मकरंद चितळे
ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स

असीम हॉस्पिटलीटीज
9822308932

7588609809

*लेह यात्रा*अनेक वर्षे मी लेह ला जातो आहे.दर वर्षी असा एखादा लामांचा जथ्था एखादी पालखी सोहळा दिसतोच. कुठे वाद्यांचा प्रच...
02/04/2022

*लेह यात्रा*
अनेक वर्षे मी लेह ला जातो आहे.
दर वर्षी असा एखादा लामांचा जथ्था एखादी पालखी सोहळा दिसतोच.
कुठे वाद्यांचा प्रचंड गोधळ तर कुठे अंत्यत शांत पणे मंत्र पठण करत केलेली वाटचाल.
कोणताही प्रकार असू दे भक्ती , श्रध्दा तेवढीच आपल्या भारतात प्रत्येक सणाचा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे होतो हे इथं परत एकदा जाणवते.
कुठे एक चुटकी गुलाल लावून आनंदात रंगपंचमी साजरी होते, तर कुठे हौद भर रंगही खेळून अजून काय उपद्व्याप करता येतील त्याचा विचार चालू असतो.
गणपती कुठे अर्धा दिवस, तर कुठे दीड दिवस, तर कुठे 11 दिवस असूनही अजून हवा आपल्या घरात म्हणून रडणारी मुलं.
खरतर कोणत्याच आजकाल फॅड झालेल्या डे ची आपल्याला गरज नाही.
फ्रेण्ड शिप डे साठी संक्रात तिळगुळ आहे,
तर हॅलोइन डे साठी कोकणातील दिवेआगर, बोरलीची होळी आहे तिथंही सोंगच नाचवली , फिरवली जातात. व्हेलटाईन डे ला तर भारतीय संस्कृती आणि इतिहासात इतके पर्याय आहेत की ठरवले तर दर महिन्यात उत्सव होऊ शकतो.
नवीन वर्षाची सुरवात आहे त्या मुळे सगळ्यांना शुभेच्छा
येणारे वर्ष प्रचंड भरभराटीचे व मानसिक शातता,आनंद देणारे असू देत.
आनंदी रहा , प्रवास करा , त्यातून रोज काहीतरी नवे अनुभवा.
-मकरंद चितळे
9822308932

7588709809

*वळणे आणि फक्त वळणेच*लेह यात्रा म्हणजे सतत डाव्या उजव्या बाजूला वळत रहाणाऱ्या रस्त्यावरून होणारा प्रवास , प्रत्येक वळण घ...
23/02/2022

*वळणे आणि फक्त वळणेच*
लेह यात्रा म्हणजे सतत डाव्या उजव्या बाजूला वळत रहाणाऱ्या रस्त्यावरून होणारा प्रवास , प्रत्येक वळण घेतलं की आधीच्या वळणा नंतर दिसणाऱ्या दृष्या पेक्षा अधिक सूंदर चित्र आपल्या समोर उभे रहाणार याची खात्री.
आयुष्यात अनेक वळण येतात आणि जातातही पण त्या आणि या वळणात फरक आहे उत्सुकता दोन्ही ठिकाणी असते पण त्यातही फरक आहे.
आयुष्यात वळणा वळणाचा प्रवास नको वाटतो आणि या यात्रेत लागणाऱ्या वळणानी परत परत इथं यायची ओढ लागते.
कोणी तरी मला म्हटलं होतं की लेह तुझं व्यसन आहे , मला ते एखाद्या शिवी एवढं लागलं होतं इतक्या सूंदर गोष्टी बद्दल जवळीक निर्माण झाली तर ते व्यसन कस होईल? काहीही बोलतात लोक.
गेली दोन वर्षे मी माझ्या निसर्ग देवाला भेटायला लेह यात्रेला जाऊ शकलो नाही , या वेळी नक्की जाणार.
तुमच्यातल्या कोणाला यायचं असेल तर त्वरित संपर्क साधा.
मकरंद चितळे
9822308932

9822308932

*झरोका*प्रत्येक मनाला , घराला , कधी कधी जुन्या काळी घराच्या छपराला सुध्दा झरोका असायचा. जे काय जगातले चागले ते घरात , मन...
11/02/2022

*झरोका*
प्रत्येक मनाला , घराला , कधी कधी जुन्या काळी घराच्या छपराला सुध्दा झरोका असायचा.
जे काय जगातले चागले ते घरात , मनात यायला आणि मनातले घरातले वाईट , मळभ बाहेर निघून जायला.
हळू हळू प्रायव्हसी , चौकोनी कुटूंब या गोंडस कल्पने खाली हे सगळे झरोके आपण हळू हळू बंद करत आणले, करोना काळात तर आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीचीही गळाभेट घ्यायला त्यांना आनंदाने टाळी द्यायला विसरत चाललो आहोत, घाबरायला लागलो आहोत.
आता मात्र हे लक्षात येतंय की करोना सारखे अनेक दैत्य येणाऱ्या भविष्यात आपल्या भोवती असू शकतील मग असच सगळे झरोके खिडक्या बंद करूनच अंधार आयुष्य घालवायच का वरच्या फोटोत दिसतंय तस इतुकल्या का होईना झरोक्यातून भव्य दिव्य निळाई पहायची ?
फोटोतला झरोका हा प्रतिकात्मक आहे, यातून जेवढी समोरची निळाई दिसते ना , तेवढेच लढाख आपण आपल्या प्रचंड सायासाने खेचून मिळवलेल्या तुटपुज्या दिवसात बघतो म्हणून वारंवार दर वर्षी मन तृप्त होते तो पर्यत ही *यात्रा* सतत करत रहावी.
11 रात्री आणि 12 दिवस हे लेह सारख्या प्रचंड मोठ्या चित्राला बघायला फारच कमी वेळ आहे, लोक विमानाने लेह ला जाऊन पाच दिवसात परत येतात त्यांची मला कीव येते की इतका पैसा असूनही त्यांना खरा आनंद मिळवण्या साठी 12 दिवस ते ही वर्षभरातले काढता येऊ नयेत ? असो ज्याचे त्याचे आयुष्य जगायचे फंडे असतात.
पण व्हेलताईन डे ला स्वतः ला आणि त्याच बरोबर आपल्या अंत्यत आवडीच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायला लेह टूर सारखे गिफ्ट नाही
फक्त एकदा द्या आयुष्य भरासाठीच्या सूंदर आठवणी बरोबर घेऊन याल यात शंका नाही.

*या वर्षी लेह टूर जून जुलै व ऑगस्ट मध्ये आहेत त्याच बुकिंग फेब्रुवारी एन्ड ला बंद होईल*

*अधिक माहिती व बुकिंग साठी*
*मकरंद चितळे ट्रेकर्स & ट्रॅव्हलर्स 9822308932 व 7588709809*

उन्हाचा एक कवडसा आयुष्यात , फोटोत कसली गम्मत आणतो ना? काकडलेल्या शरीराला ऊब मिळेल अस आश्वासन मिळत , निराश हताश दिसणाऱ्या...
31/01/2022

उन्हाचा एक कवडसा आयुष्यात , फोटोत कसली गम्मत आणतो ना? काकडलेल्या शरीराला ऊब मिळेल अस आश्वासन मिळत , निराश हताश दिसणाऱ्या फोटोत तक्षणी उत्साह सळसळताना दिसायला लागतो. लेह मध्ये हा ऊन सावलीचा खेळ खूपच जास्त रंगतो पेगॉग हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे , ऊन पडल्यावर निळ्या हिरव्या अगणित छटांनी लखळखणारा जादुई नजारा ढग येऊन सावली पडली की मलूल निस्तेज पडतो , म्हणूनच लेहला फक्त दिवस भराची ट्रिप करणाऱ्यांची मला कीव येते पेगॉग हे दिवसाच्या आणि काही वेळा तर रात्रीच्याही प्रत्येक प्रहरात बघण्याचा , दर्शन घेण्याचा विषय आहे . या वेळी लेह यात्रा जून , जुलै, व ऑगस्ट अशा तिन्ही महिन्यात आहे बुकिंग अर्थातच सुरू झालं आहे चला फेब्रुवारी अखेर पर्यत तिन्ही महिन्याच्या टूर फुल्ल होणार शेवटी दोन वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षे नंतर प्लॅन करतोय.
*मकरंद चितळे , ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स* *9822308932 / 7588709809*

*निळाई*लेह यात्रेत अशी असंख्य ठिकाण आहेत की त्यात आपले शब्द त्याचं वर्णन करायला खुजे पडतात, आपण सौंदर्य बघून उत्साहित ने...
26/01/2022

*निळाई*
लेह यात्रेत अशी असंख्य ठिकाण आहेत की त्यात आपले शब्द त्याचं वर्णन करायला खुजे पडतात, आपण सौंदर्य बघून उत्साहित नेहमीच होतो पण ह्या सौंदर्याची खासियत ही आहे की याचे दर्शन आपल्याला शांत करते आपण कुठंतरी बसून मनात कोणताही, विचार न आणता, आठवणी न जागवता बसू शकू हे असल्या निळाईच्या जवळ गेल्यावर उगाचच वाटू लागते काही वेळा तस होतही तो क्षण मोठा मजेदार असतो सुरवाती ला लेह ला गेलो तेव्हा बुध्धीस्ट लामा असेच कुठ तरी बघत शांत बसलेले दिसायचे त्या वेळी ध्यान , साधना मनाच रिकाम होणं हे लक्षात न घेता त्याच्या तशा तासन तास शांत बसण्या वरून टीगल पण केली आहे, आता मात्र त्याच्या अशा शांत बसण्याची ताकद लक्षात आली आहे. त्यातून पेगॉग च निळेपण जेव्हा अशा पूर्ण ताकदीने समोर येत ना तेव्हा भले भले शब्द विसरून गप्प होतात.
मला तर नेहमी अस पेंगॉग चे निळेपण पाहिले की वाटते श्रीकृष्णाचे निळेपण यांच्याच खोलीत जाऊन कालियामर्दन केल्या मुळे आलं असावं.
काहीही असो हे निळेपण तिथं जाऊन शांतपणे अनुभव घेण्याची गोष्ट आहे , फोटोत चित्रात त्या निळाईतली गोडाई येत नाही
या वेळी लेह यात्रा
जून , जुलै व ऑगस्ट महिन्यात आहे, जे वारीला येण्यास उत्सुक असतील त्यांनी त्वरित फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधावा.
मकरंद श्री. चितळे
9822308932

7588709809

*लेह*ट्रान्स हिमालय सफारी(मनाली ते श्रीनगर व्हाया लेह , पेगोंग लेक , तूरतूक , कारगिल , सोनमर्ग) एकूण जवळपास 2000 km रोडन...
18/01/2022

*लेह*
ट्रान्स हिमालय सफारी(मनाली ते श्रीनगर व्हाया लेह , पेगोंग लेक , तूरतूक , कारगिल , सोनमर्ग) एकूण जवळपास 2000 km रोडने प्रवास 11 रात्री व 12 दिवसाची यात्रा आहे ही , ट्रिप नाही यात्रा आहे निसर्ग देवतेची , सुंदरतेत भयंकर पणा अनुभवण्याची आहे, सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक तीन तासाने अगदी वेगळे हवामान अनुभवण्याची आहे तर 12 दिवसात संपूर्ण वर्षातले तीन ऋतू हमखास अनुभवण्याची आहे, पैसे देऊन मानव निसर्गाच्या पुढ्यात किती हीन दिन लाचार आहे हे जाणवून घेण्याची आहे.
मुली आणि स्त्रियांना ब्युटीपार्लल न जाताही निरोगी राहील तर किती सूंदर दिसता येत ते इथल्या म्हाताऱ्या आणि लहान मुली पदोपदी दाखवून देतात.
एकूणच आपल्या रोजच्या कफर्ट झोन म्हणजे सुरक्षित व आपण म्हणू तसच होण्याच्या आपल्या छोट्याशा जगातून आपण एक छोटंसं पिलू आहोत आणि आपल्या सपर्कातली प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट ही भव्य दिव्य आहे अशी अनुभूती देणारी ही यात्रा आहे म्हणूनच या दिवसांना मी यात्रेला चाललो आहे म्हणतो, जुन्या काळी चार धाम यात्रा आणी ही यात फक्त आपण सदेह परत येतो हाच फरक आहे.
पूर्वीच्या या यात्रातही बरेचसे वरच्या मार्गी निघायचे, त्या वेळी परत येण्याची शक्यता खूपच कमी होती आता आपली आर्मी आणि चागले रोड याने ही शक्यता कमी करून टाकली आहे आता हॉटेल पासून ते रस्त्या पर्यत सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत काही वेळा निसर्ग त्याचा भव्य पणा दाखवून मानवाने केलेल्या या सोई सुविधा एका झटक्यात पुसून टाकतो आणि मग त्या वेळी माय बाप आठवतात, पण त्या वेळीही आपली आर्मी आणि रस्ता बांधणी कामगार हे खंबीर पणे परिस्थितीशी सामना करतात आणि आपण परत सुखद प्रवास करू लागतो.
या वेळी जून , जुलै , ऑगस्ट अशा तीन महिन्यात फक्त तीन ट्रिप असणार आहेत .

*ज्या कोणा ला स्वतः च्या कफर्ट झोन मधून बाहेर फिरायला आवडते, स्थानिक लोकांशी हितगुज करायला आवडते त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.*

*मकरंद श्री चितळे, ट्रेकर्स अँड ट्रॅव्हलर्स नाशिक व दिवेआगर. 9822308932 व 7588709709*

*दिवेआगर पक्षीजगत*The black-winged kite, also known as the black-shouldered kite, is a small diurnal bird of prey in the...
16/01/2022

*दिवेआगर पक्षीजगत*
The black-winged kite, also known as the black-shouldered kite, is a small diurnal bird of prey in the family Accipitridae best known for its habit of hovering over open grasslands in the manner of the much smaller kestrels. Wikipedia
Scientific name: Elanus caeruleus
Order: Accipitriformes
Family: Accipitridae
Phylum: Chordata
Habitat
The black-winged kite species primarily inhabit open savanna grasslands with scattered bushes and small trees and semi-deserts areas. They have been also seen at higher altitudes in Sikkim, Nilgiris and Nagaland.

माणसाच्या जगात जस , प्रत्येक सामाजिक आर्थिक आणि बौद्धिक पातळीवर त्या त्या पातळीचा एक एक दबंग (टग्या) असतो तसा पक्षाच्या जगतातही असतो मोठे मासे, मोठे साप, ससे , बारकी बकरीची पिल उचलणारे गरुड दिसतात(हाय इन्कम ग्रुप) तसेच किडे अळ्या खाऊन जगणारे किंगफिशर , कोतवाल , खाटीक पण असतात (हे बहुदा लो इन्कम ग्रुप वाले)
मग मिडील क्लास कोण तर हे सगळे कायटोबा , ससाणे , बहिरी ससाणे , कापशी इत्यादी हे सरडे , पाली , छोटेमोठे पक्षी यावर भागवतात पण असतात हे सुध्दा त्याच्याच गुर्मीत आपण कॅमेरा रोखला न रोखला हे लगेच बघायला लागतात काय उपद्व्याप करतोय म्हणून ते. यांच्या बघण्यातही बहुतेक वेळा माणसा विषयी तुच्छताच असते अर्थात ते बरोबरच आहे इतकं सूंदर उडणारा बंदुकीच्या गोळीच्या वेगात खाली येऊन शिकार करून परत वर झेपावणाऱ्या पक्षाच्या तुलनेत आपण किड्या पेक्षा जास्त योग्यतेचे नक्कीच नाही.
*मकरंद चितळे, क्षितिज, बाय असीम हॉस्पिटलिटीज, दिवेआगर.9822308932 व 7588709809*

*शुभप्रभात*भव्य दिव्य , ज्याला लार्जर देन लाईफ म्हणतात ते नक्कीच छान , सूंदर वाटू शकतं, असत.पण काही वेळा आपल्या क्षणभंगु...
21/12/2021

*शुभप्रभात*
भव्य दिव्य , ज्याला लार्जर देन लाईफ म्हणतात ते नक्कीच छान , सूंदर वाटू शकतं, असत.
पण काही वेळा आपल्या क्षणभंगुर आयुष्यात त्या पेक्षाही कमी आयुष्य असलेलं नाजूक अलवार पण तेवढाच आनंद , गम्मत, निखळ फ्रेशनेस देऊन जात अगदी या लाल चिऱ्याच्या अभेद्य वाटणाऱ्या दगडात हळुवार पावलांनी प्रवेश करून दिवस दिवस त्याला सॉफ्ट बनवणाऱ्या या इतुकल्या रान फुलांच्या झुडुपा ने आम्हाला परशुराम मंदिरात दिला तसा.
आपल्या आयुष्यात भरभरून उधळली जाऊनही आनंद देणारी वाइट न वाटणारी उलट आनंद देणारी ही निसर्गाची उधळण पहायला डोळे, कान, नाक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं *मन* मात्र सतत तयार हवं, त्याचं आहे त्या आकारात रुपात आपणही भरभरून स्वागत करायला हवं ,तस केलं की मग आयुष्य पण गमतीदार होत फोटोत ही पुढली गोड फुल नसती तर तो मागचा दगड फक्त दगड असता निर्जीव, रुक्ष.
या इतुकल्या पिटुकल्या नखभर फुलांनी त्याला अख्ख जिवंत केलं आहे आणि अजून नीट बघितलं ना तर त्यात तुम्हाला त्या छोट्याश्या झाडांना फुलांना सभाळणारा तुमच्या आजी किंवा आजोबाचा चेहरासुध्धा दिसेल, फक्त थोडा वेळ काढा तो बघायला या आमच्या दिवेआगर ला कोकणात, तिथं काही माणसं पण भेटतील घरातल्या जुन्या आजी आजोबा सारखी आपुलकीने काळजी घेणारी , हवं नको बघणारी.
अरे हो त्या आजोबांचं ठीक आहे पण ही पिल पण कमी नाहीत बरका, यांच्या मुळांचा उपयोग चायनीज लोक वाळवून पोट बिघडले , किंवा हाय ब्लड प्रेशर , श्वसन विषयक विकार यावर करतात आणि ही सूंदर फुल आहेत ना ती सिडेंटिव्ह म्हणजे गुंगी आणण्यासाठी वापरली जात, बॉस या आलम दुनियेत मला वाटत माणूसच कुचकामी आहे बाकी लहानात लहान किंवा मोठ्यात मोठा सजीव , निर्जीव प्रत्येक जण एकमेकांना पूरक आहे, सोचो इसके बारे मे।
*मकरंद चितळे*
*क्षितिज*
*दिवेआगर*
*9822308932*
*7588709809*

*ग्रेस*काल दिवेआगर चिपळूण प्रवास केला , गोरेगाव मार्गे सूंदर रस्ता धुक्याने भरलेली आणि भारलेली पहाट अन त्यात ही सौंदर्य ...
20/12/2021

*ग्रेस*
काल दिवेआगर चिपळूण प्रवास केला , गोरेगाव मार्गे सूंदर रस्ता धुक्याने भरलेली आणि भारलेली पहाट अन त्यात ही सौंदर्य मूर्ती, आदिवासी स्त्री जेव्हा डोक्यावर ओझं घेऊन चालते ना ते चालणं कोणत्याही नृत्या पेक्षा कमी सूंदर नसत शहरातल्या मुली , स्त्रिया त्याची चालण्याची पद्धत योग्य होण्या साठी काही व्यायाम ट्रेनिग सुध्दा घेतात अस ऐकलं होतं, या बाईला घरात चूल पेटवायला लाकूड आणण्यातून ते आपसूक मिळालं आहे.
सकाळचे धुके, सूंदर रस्ता , आपण एसी कार मध्ये बसून निघालो की सूंदर, झकास, ओसम , या शब्दाची उधळण होते , त्याच वेळी ही ग्रेसफुली चालणारी बाई मात्र सकाळच्या काळोखात घरातून निघून जंगलात घरातली चूल पेटावी म्हणून लाकडाचा भारा बांधत असते कोणतंही संरक्षण नसताना, अंधारात जंगलात आणि नंतर दाट धुक्यात रस्त्यावरून आत्मविश्वासाने एकट चालणाऱ्या बायका बघितल्या की स्त्री शक्ती म्हणजे काय ते लक्षात येत. मी काही खूप चांगला फोटोग्राफर नाही पण असला काही फोटो काढला की नंतरही प्रत्यक्षातली ती सूंदर सकाळ कायम डोळ्यापुढे यायची तरतूद मात्र होते, लोक विचारतात काय आहे तुमच्या दिवेआगर ला त्याला हे असले फोटो अंत्यत समर्पक उत्तर आहे.
इतकी सूंदर पहाट जर होत असेल तर मग ती पहाणाऱ्याचा उरलेला दिवस बोअर, कंटाळवाणा जाऊच शकत नाही.
मकरंद चितळे
क्षितिज,
दिवेआगर
9822308932

7588709809

*सोई-सुविधा*निसर्गात , स्वतः च्या घरापासून शहरापासून दूर कुठेतरी जेव्हा व्यक्ती जायला निघतो , तेव्हा खर तर तो त्याच्या र...
08/12/2021

*सोई-सुविधा*
निसर्गात , स्वतः च्या घरापासून शहरापासून दूर कुठेतरी जेव्हा व्यक्ती जायला निघतो , तेव्हा खर तर तो त्याच्या रोजच्या आयुष्यात असणाऱ्या बहुतांश गोष्टी पासून काही तास , दिवस दूर जायचं आहे असं ठरवून निघत असतो त्याला परत त्याच त्या रहाट गाडग्याला जुंपून घ्यायला नवं बळ तो निसर्गदेव त्याला भरभरून देतो.
आजकाल अजून एक नवीन पर्यटकांची जात जन्माला आली आहे वरचा फोटो खास त्याच्या करता कोलाज केला आहे खर तर अशी असंख्य बच्चे कंपनी दिवाळी नंतर *क्षितिज, दिवेआगर* ला भेट देऊन गेली त्यातल्या एकानेही आमच्या कडे *टी व्ही* नाही आम्ही *वायफाय* फक्त 10 वर्षा वरील मुलांना तेही क्लास असेल तरच देतो, एवढंच काय त्याच्या आई , वडिलांनाही तोच रुल आहे याची तक्रार केलेली नाही. कारण ही सगळी बच्चापार्टी खरोखर बाहेर खेळायला , हुंदडायला, चिखलात आपले इवलेसे पाय रंगवून घ्यायला, हौदात डुबायला आली होती, त्याचे आई वडीलही त्याच्या कडे पुरेसे लक्ष देत होते , यातली काळा टीशर्ट घातलेली थोडंस आपण काही वेगळं करतोय म्हणून लाजत हसत खाली बघणारी *कौशिकी* तर फक्त गार चिखलात मजेदार वाटत म्हणून सतत जाऊन त्या चिखलात आपल्या पायाची नक्षी उमटवत होती, कोणी तरी तिच्या आईला म्हणाल की अरे पाय खराब होता आहेत तिचे तर आईच म्हणाली की मलाही या वयात हेच करावं वाटतय शहरात *स्वच्छ* चिखल मिळतो कुठे? आणि त्यातून तीच मन चिखलात खेळून तृप्त झाले की करीन ना स्वच्छ तिला आंघोळ घालून, मग काय इतरही दोन चार पोरांनी आणि काही मोठ्यांनी पण कौशिकीचा कित्ता गिरवला.
आमच्या हौदातला पाण्याचा पिसारा फुलवलेला मोर व्हायला तर प्रत्येक मुला मुलीला आवडते.
तुम्ही या आमच्या कडे
*क्षितिज, दिवेआगरला*
पण
मुलांसाठी वेगळा काही प्ले एरिया असेल , खेळणी असतील(तशी काही आहेतही) अस काही डोक्यात घेऊन येऊ नका, त्या साठी तुमच्या तुमच्या शहरा शेजारी वॉटर पार्क , बगीचे, ग्राऊंडस, एसेल वर्ड किंवा कोणत्याही मॉल सारखी अनेक ठिकाणे हात जोडून तुम्हाला तुमच्या मुला पासून दूर नेण्यासाठी उभे आहेत तिथं एकदा मुलांना सोडलं की राजा राणी निवांत पणे स्वतः साठी काही वेळ मोकळा काढू शकतात.
आम्ही मुलांना आणि पालकांना किंवा छोट्या मोठ्या भावंडांना जवळ आणतो फक्त लहान बाळांना कोणी एकटाच अंगणात , वाडीत सोडून देत नाही यावर आमचं लक्ष असत, जेवताना कोणी आई मुलाला मोबाइल हातात देऊन खाऊ घालत असेल तर आमच्या कडे कामाला असणाऱ्या एखाद्या मावशी त्या आईला अस करू नकोस त्याला गोष्ट साग आणि खाऊ घाल , तुझ्या आयशीने पण तसच वाढवलं आहे तुला तेव्हा हे नव्हतं अस प्रेमान दटाऊ शकतात.
थोडक्यात, आमच्या कडे गरुडाचे घरटे आहे आमच्या कडे स्वच्छ समुद्रकिनारा आहे, आमच्या कडे दीड एकर किंगफिशर , खारुताई ते अजूनही काही पक्षी प्राणी दिसणारी सजीव वाडी आहे. थोडक्यात,
*आमचं हॉटेल हे घरपण प्रोव्हाईड करणारा जॉइंट आहे,एसेल वर्ड किंवा कोणत्याही वॉटर पार्क सारखा कृत्रिम वस्तूतून बेगडी आनंद देणारा कारखाना नाही*
सध्याच वातावरण मुलांनी खेळावं , सक्षम व्हावं , प्रतिकार शक्तीने ओतप्रोत भराव अस ओरडून ओरडून सांगतंय चला तर मग मुलांना तुमच्या बरोबरीने लवकर उठून पहाटे पहाटे समुद्रावर फेरफटका मारायची सवय लावून हे शुभकार्य सुवर्णगणेशाच्या सोबत त्याच्याच आशीर्वादाने सुरू करू यात.
अधिक माहिती , व बुकिंग साठी संपर्क
मकरंद चितळे
क्षितिज बाय असीम हॉस्पिटॅलिटीज
दिवेआगर
कोंकण
9822308932
7588709809

*BREAKFAST TIME AT OUR PLACE DIVEAGAR*सतत दिवेआगर ला राहिल्याने कोणता पक्षी नक्की कुठे व कोणत्या वेळी दिसेल याचा आता थोड...
02/12/2021

*BREAKFAST TIME AT OUR PLACE DIVEAGAR*
सतत दिवेआगर ला राहिल्याने कोणता पक्षी नक्की कुठे व कोणत्या वेळी दिसेल याचा आता थोडा थोडा अंदाज यायला लागला आहे.
जे खरोखर पक्षाविषयी माहिती गोळा करत असतात त्याच्या बरोबर भटकायलाही जातो अधून मधून त्यानं मला खूप फायदा पण होता आहे.
हमखास ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी दर्शन देणाऱ्या पक्षाच्या यादीत आता या जोडप्याची भर पडली आहे , खर तर किनारपट्टीवर खूप गरुड दिसतात पण ते उंच आकाशात असतात आणि मग आपण हळहळतो की फोटो काढता आला नाही नीट बघता आलं नाही, तुम्ही क्षितिज ला उतरलात तर तुम्ही तासन्तास याच निरीक्षण करू शकता त्याच्या हालचाली न्याहाळू शकता, बरेच जण मला सांगतात तू प्रत्येकाला हे दाखवू नकोस पण मी मुलांना आवर्जून ही जोडी दाखवतो त्यांना सांगतो की बघा घरटे बाधण्या पासून ते खाण आणे पर्यत किती मेहनत हे पक्षी करतात (इथंही घर बांधताना बायकोच बॉस असते बरका, प्रत्येक काडी बिचारा नर निगुतीने लावत असतो आणि ह्या राणी साहेब ढिम्म बसून कोणतंही कौतुक न करता सुपरवाईज करत असतात) त्यातून मला खात्री आहे काही मुलांना तरी पक्षी निरीक्षणाची गोडी लागेल
तस आता दिवेआगर मध्ये *Siddhu Kosabe* आणि फॉरेस्ट डीपार्टमेंट ने संयुक्त रित्या मॅनग्रोव्ह सफारी , मरीन वॉक सारखे अभिनव उपक्रमही चालू केले आहेतच दिवेआगर ला भेट द्यायला येणार्यांना आता दोन दिवस रहावं लागेल हे नक्की
अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क
मकरंद चितळे
क्षितिज बाय असीम हॉस्पिटॅलिटीज
दिवेआगर
कोंकण
09822308932 / 07588709809

पक्षी निरीक्षणा साठी विविध जागा उपलब्ध समुद्र किनारा आहे पाणथळ जागा आहेत नदीकिनारे आहेतगवताळ कुरण आहेघनदाट जंगल आहेआणि य...
29/11/2021

पक्षी निरीक्षणा साठी विविध जागा उपलब्ध
समुद्र किनारा आहे
पाणथळ जागा आहेत
नदीकिनारे आहेत
गवताळ कुरण आहे
घनदाट जंगल आहे
आणि या सगळ्या ठिकाणी विनासायास पोचायला रस्तेही आहेत, हा कुठे कुठे थोडे खराब आहेत पण आपण तरी कुठे रेस जिकायला निघालो आहोत ?
मस्त खायचं आणि निघायचं फेरफटका मारायला , क्या खयाल है ?
अधिक माहिती / बुकिंग साठी संपर्क
मकरंद चितळे
क्षितिज बाय असीम हॉस्पिटॅलिटीज दिवेआगर
कोंकण
09822308932 / 07588709709

Address

Flat No 401, B Wing , Rushiraj Hirise , Near Prasad Mangal Gangapur Road. Nashik 13
Manmad
422013

Telephone

0 98 22 30 89 32

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trekkers & Travellers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trekkers & Travellers:

Videos

Share

Category

Our Story

Respected Sir/ mam Now a days children spend less time in the outdoors than any earlier generation, depriving themselves of the emotional and physical benefits that come from bonding with nature. Instead of “going green,” the young ones are “going screen". Indian Kids spend an average daily 8 hours on TV, Games and Gadgets. This is a trend that Trekkers & Travellers is committed to change with its Adventure Camps. Trekkers & Travellers is a well-known travel company that organizes Atours, Treks, Jeep & Bick safari specially in Leh and other parts of India since 2007. We assure you to provide best services in any part of India and abroad at a very competitive rates in the tourism industry. We are sure that you will be kind enough to provide us an opportunity to serve you with your requirements in near future. We also plan tours other then School/College groups. "Taj Mahal would not looked so beautiful & Everlasting, if Emperor Shah-jahan had called for quotation & awarded contract to the lowest tender........... Makarand Chitale 09822308932 Meghana Chitale 09822760824


Other Travel Agencies in Manmad

Show All