06/03/2022
भारतीय लेण्यांची सांस्कृतिक भव्यता , संपन्नता आजही आश्चर्यचकित करते ..इ.स.पु.दुसऱ्या शतकापासून ते इ.स.6 व्या शतकापर्यत भारतातील सर्वच राजे , महाराजे , धनाढ्य व्यापारी , परदेशी व्यापारी ह्यांनी आपली अलोट संपत्ती ह्या लेण्यासाठी दान म्हणून दिलेली आहेत ..तत्कालीन जेंव्हढे धन त्या काळात असेल त्यापैकी निम्यापेक्षा जास्त धन लेण्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात आले ,,म्हणूनच लेण्यांची संपन्नता ,भव्यता ,प्रसंन्नता अजूनही कायम आहे ..
विशेष म्हणजे त्या काळातील सर्वोच्य सामर्थ्यशाली राजांचे राजवाडे ,धनाढ्य व्यापाऱ्यांचे महाल आज अतित्वात नाहीत ..ते तेंव्हाच धुळीत मिळालेत ..
पण लेण्या अजूनही दिमाखात त्यांच्या कर्तुत्वाचा ध्वज फडफडत उभ्या आहेत, त्यांनी दालेली दान व दानलेखामुळे ते सर्वजण अजरामर झालेले आहेत.
अगदी सामान्य लोकांनीही आपआपली संपत्ती या लेणी निर्मितीसाठी दिलेली आहे .ही सामान्य जनता मातीच्या , कुडाच्या घरात राहत असे ..ते लोक व त्यांची घरे केंव्हाच मातीत मिसळून गेलीत ..पण ही सामान्य लोक देखील लेण्यावरील दानलेखामुळे आजही अजरामर झालेली आहेत .जेंव्हा जनता कुडाच्या मातीच्या घरात राहत ..तेंव्हा ह्या दुमजली ..तिन मजली लेण्या निर्माण होत होत्या ..त्या दानशूर लोकांच्या दातृत्वाला माझा सांष्टांग प्रणाम ...
आज या आधुनिक काळात तुम्ही अशी लेणी निर्माण करुच शकत नाही ..
महेन्द्र शेगांवकर ..