क्षेत्र महाबळेश्वर ...
महाबळेश्वरपासून उत्तरेकडे सुमारे सहा किमीवर असलेले क्षेत्रमहाबळेश्वर पौराणिक काळापासून तीर्थक्षेत्र व एतिहासिक महत्वाचे ठिकाण आहे. स्कंदपुराणामध्ये प्रथमतः क्षेत्र महाबळेश्वरचा संधार्भ येतो. विन्ध्याद्रीला नमवून मूळ वाराणसीच्या अगस्ती मुनी दंडकारण्यात आले. सह्य पर्वतावर त्यांनी वास्तव्य केले तरी त्यांना वाराणसीची आठवण येत असे. त्यांनी स्कंदाकडे पृच्छा केली कि, दक्षिणेकडे एख
ादे तीर्थस्थान नाही का? या प्रश्नावर ब्राह्मरण्यात असलेले बहाब्लेश्वर या स्थानचे महत्व स्कंदाने विषद केले ते असे.
सृष्टी निर्माण केल्यावर विष्णूनी ब्रह्मदेवांना मनुष्यप्राणी शृष्टीनिर्माण करण्यास सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव – विष्णू, शिव, सरस्वती, वेद यांच्यासह सह्याद्रीच्या माथ्यावर आले. तेथे तपश्चर्या करून मानव शृष्टी निर्माण करण्यास सामर्थ्य प्राप्त करून घेतले. ब्रह्मदेवाचे मनात प्रथम यज्ञ करून कार्यारंभ करावा असे आले. कश्यपादी ऋषींनी यज्ञाची अतिशय उत्तम तयारी केली. देव, ऋषी, गंधर्व, किन्नर मोठ्या संकेने आले.मुहूर्त घटिका भारत आली तरी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री साजशृंगार करण्यात गुंतली होती, त्यामुळे यज्ञ मंडपात येऊ शकली नाही म्हणून विष्णूंनी ब्रह्मदेवाची द्वितीय पत्नी गायत्री हिच्यासहयज्ञदीक्षा घेण्यास सुचविले.मुहूर्त साधला पण सावित्री संतप्त झाली तिने सर्वाना शाप दिला , “तुम्ही सर्वजण स्त्रीलिंग रुपात जगात अवतराल”. विष्णूनीही तिला तूही आमच्याप्रमाणे जलरूप होशील असा शाप दिला. ब्रह्मदेवाने सावित्रीची व विष्णूचीही समजूत काढली. यज्ञ पुढे सुरु केला.तेव्हा आणखीन एक संकट समोर आले .
याच अरण्यात महाबळ व अतिबळ हे दोन दैत्य अतिबल होते या हे दोघे यज्ञाच्या ठिकाणी आले तेंव्हा ब्रम्हा,विष्णू ,महेश यांनी त्यासोबत युद्ध केले. विष्णूने अतिबळाला मारले यावर महाबळ खूप चिडला तो कोणालाही आवरेना.देवांनी शेवटी महामायेला साकडे घातले. तिने मोहास्त्र सोडून त्याला प्रसन्न केले, त्याने प्रसन्न होऊन देवांना वर मागण्यास सांगितले,तेंव्हा देवांनी आपल्या हातून त्याचा वध व्हावा अशी मागणी केली. महाबळाने विचारपूर्वक ती मागणी मान्य केली. देवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले,त्याने अंतिम इच्छा प्रकट केली कि शिवाने लिंगरुपाने पंचगंगेसह माझ्या भावाच्या नावाने आपले वास्तव्य करावे. विष्णूंनी माझ्या भावाच्या नावाबरोबर तर ब्रम्हदेवाने माझ्या कोटी सैन्याच्या नावाने तेथे रहावे. यानंतर महाबळाने आपले प्राण अर्पण केले विघ्न टळले यज्ञाची सांगता करुन महाबळाच्या इच्छेनुसार शिवाने पंचनद्यांना जलरुपात,रुद्राक्षरूपी खळग्यात धारण केले व महाबळेश्वर या नावाने वास्तव्य केले. विष्णू अतिबळेश्वर व ब्रम्हदेव कोटीश्वर या रुपात राहिले. सावित्रीच्या शापामुळे विष्णू-कृष्णा नदी, महेश-वेण्णा नदी व ब्रम्हा कोयना नदी बनून वाहू लागले. गायत्री जलरुपात येथे गुप्त झाली व हरिहरेश्वरला प्रकट होऊन सागराला मिळाली. सावित्री जलरूप झाल्याने रागाने कड्यावरून उडी घेऊन पश्चिमेला वाहत गेली, बाणकोटजवळ सागरात विलीन झाली या प्रमाणे या स्थानांची उत्पत्ती झाली कशी कथा आहे.
इतिहासात महाबळेश्वरचे मंदिर, दोलताबादचे राजे यादावराजे सिंघन यांनी १३व्या शतकात बांधले.१६व्या शतकात जावळीचे चंद्रराव मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला या नंतर शिवरायांनी मंदिराचा विस्तार केला. १७०८ ते ४९ या काळात शाहुराजांनी मंदिराची सुधारणा केली .
महाबळेश्वर मंदिराच्या गाभार्यातत रुद्राक्षरूपी श्री शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे. बारमास तेवढेच पाणी असते त्या प्रवाही नाहीत तेथून गुप्त होतात .याच गाभाऱ्यात पार्वतीची मूर्ती स्थापन केलेली आहे .गाभाऱ्याच्या बाहेर शयनकक्ष,कालभैरव,गणेश इ.मंदिरे आहेत. महाशिवरात्र व नवरात्रीला येथे कार्यक्रम होतात व यात्राही भरते.