Simple Lifestyle Vlogs

https://youtu.be/8-7CcFi4iWoVarious angles of New TELESIN S3-HBM-01Quick Release Universal Clamp Mount
09/01/2025

https://youtu.be/8-7CcFi4iWo
Various angles of New TELESIN S3-HBM-01Quick Release Universal Clamp Mount

Hi, Thanks for watching our Channel, we are creating , , , , , , , , , and ...

06/01/2025

नमस्कार मंडळी सुप्रभात, काल नाखिंद ते पेब हा अत्यंत कठीण आणि करावी, काट्या कुट्याने भरलेल्या वाटेतून मार्गक्रमण करत 9 जणांनी पूर्ण केला. या सर्व मेंबर्सचे अभिनंदन. साधारण 10 तास वाटचाल करत हा ट्रेक पूर्ण केला गेला. क्षणो क्षणी आव्हान होते ते कठीण चढ आणि भुसभुशीत उतार यांचे यात अंगाला मस्त पैकी टोचेरी काटे यांचा acupuncture आम्हाला ट्रेक पूर्ण करण्याचे बळ देऊन गेला. आम्ही अर्ध्या वाटे पुरती वाटाड्या देखील घेतला होता. हा ट्रेक TTMM तत्त्वावर केला गेला आणि अंदाजे वाजवी खर्च झाला 273 रुपये. 60 रुपये ट्रेन तिकीट बोरिवली वरून + वांगणी ते बेस 33 + 80 रुपये गाईड + 100 माथेरान ते नेरळ टॅक्सी खर्च. विशेष म्हणजे हा ट्रेक प्रशांत मोरे (घटकोपर) यांनी आयोजित केला होता त्यांना आम्ही सगळ्यांनी साथ दिली त्यांचे विशेष आभार.

फोटो, व्हिडिओ आणि अनुभव लेख प्रसारित कारणासाठी थोडा वेळ लागेल त्यात आपल्या शंकाचे पूर्ण पणे निरसन होईल.

आपलाच सिद्धेश पाटील Simple Lifestyle Vlogs/ Borivali Hikers

Our Privat Beach
03/01/2025

Our Privat Beach

The North Konkan region treated us to a mesmerizing display of morning glory, a truly unforgettable experience.
31/12/2024

The North Konkan region treated us to a mesmerizing display of morning glory, a truly unforgettable experience.

नमस्कार मंडळी,आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.या ट्रेकचे आयोजन श्री दीपक शेळके यांनी "द...
27/12/2024

नमस्कार मंडळी,

आजची भटकंती आहे ती दुर्ग त्रिकुटांची माहुलीगड, भंडारगड आणि पळसगड.

या ट्रेकचे आयोजन श्री दीपक शेळके यांनी "दुर्ग वाटाड्या" सफर सह्याद्रीची या पुण्याच्या संस्थेने केले होते. ते पुण्यावरून नेहमी प्रमाणे त्यांची 20-22 जणांची टीम घेऊन आले होते, आम्ही त्यांना मुंबईतून 6 आणि वसईतून 4 जणांनी जॉईन केले होते.

बोरिवली वरून 3.50 ची पहिली लोकल आणि पुढे दादर वरून 4.37 ची कासाऱ्यची पहिली लोकल पकडुन आम्ही 6.30 पर्यंत आसनगाव इथे पोहोचलो.

पुढे 250 रुपये रिक्षाला ( रिक्षात 3 जण फक्त बसवतात) मोजून माहुली गडाच्या पायथ्याला असणाऱ्या माहुली गावात पोहोचलो.

पुणे आणि वसई टीम पहाटे आले असल्यामुळे ते पुढे निघून गेले होते.

आम्ही पण नाश्ता करून ट्रेक चालू केला, नाश्त्यासाठी भूमिका ढाबा 8766590580 यांना संपर्क करा. वाटेतच गडाच्या मुख्य प्रवेद्वराजवळ शाळेपुढे यांचे हॉटेल आहे.

वन विभागाची माणशी 30 रुपये अशी पावती फाडली आणि ट्रेक चालू केला.

पुढे संपूर्ण वाट मळलेली असल्याकारणाने काही चिंता नव्हती, अर्धा डोंगर गर्द झाडीने बहरलेला आहे त्यामुळे उन्हाचा त्रास पण नाही होत.

डोंगराचा खडा चढ मग पठार मग परत चढ असा थोडा लांब पल्ल्याचा दमवणारा भूभाग आहे.

शेवटी आपण मुख्य डोंगरावरून निघालेल्या एका डोंगराच्या सोंडेवर पोहोचतो आणि ती सोंड मुख्य माहुली गडाला जाऊन भिडते.

वरचा चढ हा साधारण आहे पण जर निरखून बघितले तर ही एक डोंगराची धार आहे त्यावरून आपण चालतो हे प्रामुख्याने आपण व्हिडिओमध्ये चित्रित केले आहे.

सर्वात आधी गडावर पोहोचल्यावर आपल्याला काही बुरुज आणि शिल्लक राहिलेली तटबंदी असे दिसते. गडावर ठिसूळ असा जांबा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यापासून ही तटबंदी बांधली गेली आहे.

माहुलीगड तीन भागत मोडतो दक्षिणेचा भांडारगड, मुख्य असा माहुलीगड आणि उत्तरेचा पळसगड हे तिन्ही स्वतंत्र डोंगरावर स्थापित आहेत.

सर्वात आधी आम्ही भांडार गडाकडे निघालो. ह्या गडावर जाण्यासाठी आपल्याला माहुली गडावरून फार लांबचा गर्द अशा झुडपातला पल्ला गाठावा लागतो. इथे वाटेत जागोजागी थोडे भग्न वास्तूचे विखुरलेले अवशेष पहायला मिळतात. गडावर गणपती, मारुती आणि शंकराची भग्न स्वरूपातील मंदिरे आहेत. शंकराचे माहुलेश्वर मंदिर हे फक्त चौथाऱ्या पुरते मर्यादित आहे, समोरच गडावरील एकमेव असा सर्वात मोठा तलाव आहे.

माहुली गडाचा डोंगर संपून आपण एका घळीत उतरतो, पुढे भांडारगडावर जायला एका भक्कम लोखंडी शिडीचा सहारा घेतो.

आपण आता भांडारगडाच्या डोंगरावर पोहोचलो. थोडे पुढे चाल दिल्यावर आपल्याला कल्याण दरवाजा दिसतो, हा दरवाजा कल्याणच्या दिशेने आहे म्हणून याला कल्याण दरवाजा म्हणून संबोधतात. तूर्त तरी हा रस्ता टेक्निकल सपोर्ट घेऊन चढ किंवा उतरू शकतो.

थोड पुढे गेले की एक गुहा सदृश्य खांब टाक दिसते, यात पाणी पीण्याजोगे आहे.

थोड पुढे गेले की आपल्याला गडा समोरचे विहंगम दृश्य दीसायाला सुरुवात होते. हा भाग दक्षिणेकडच्या टोकाला आहे.

समोरच आपल्याला वशिंद आणि कल्याण कडचा लांबवर पसरलेला भूभाग दिसतो. याच भागातून पूर्वी सुरतेकडे जाण्यास मुख्य मार्ग होता त्यावर पण लक्ष ठेवण्यासाठी याच गडाचा उपयोग केला जाई.

इथून पुढे नवरा, नवरी भटजी, करवली आणि खास असा वजीर सुळका पण दिसतो.

हा गड फिरून आम्ही परत माहुलीगडाकडे फिरलो.

माहुली गडावर आपल्याला महादरवाजा, पाण्याचे टाके, देवड्या, शिवलिंग, वाडा, आणि एका चौथऱ्यावर स्थापित केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते.

माहुली गडाच्या उत्तर भागात पळसगड आहे, या गडावर पूर्वी भरपूर पळसाची झाडे होती म्हणून याला पळस गड म्हणून संबोधले जाते असा अंदाज इतिहासकार बांधतात.

या गडावर जाणे अत्यंत कठीण आहे, दोन डोंगरांच्या घळीतून आपण वाट काढत मार्गस्थ होतो. गडावरील भग्न असा गणेश दरवाजा फक्त उरला आहे बाकी सगळे नामशेष झाले आहे. गणेश दरवाजा हा नुकताच नजिकच्या काळात गडप्रेमेंनी शोधून काढला आहे. दरवाज्या जवळ कातळात कोरलेली गणेश मूर्ती आणि शिलालेख आहे. बाकी या गडावर काही शिल्लक नाही.

आम्ही ही गड भ्रमंती TTMM तत्त्वावर केली, एकूण खर्च बोरिवली ते बोरिवली 250 रुपये झाला.

हा गड फिरण्यासाठी दुर्ग वाटाड्या संस्थेने गाईड उपलब्ध केला होता त्याचा खर्च त्यांनीच केला होता त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

माहुली गडावर माझे आधी पण जाणे झाले होते पण फक्त महादरवाजा जवळचा भाग बघितला आणि माघारी फिरलो होतो. पण या वेळी ही दुर्ग भ्रमंती त्रीकुटांची होती हे विशेष म्हणून मी पण या गड भ्रमंतीमध्ये सहभागी झालो.

या फिरस्तीमध्ये गडाचा डेरा एव्हढा मोठा होता की कुठेही दम खायला वेळ मिळाला नाही.

श्री दीपक शेळके पुणे, श्री फ्रँक अल्फान्सो Frank Alphanso , श्री नितीन कामात, वसई येथून आले होते, यांची भेट पण हस्तांदोलनापूर्ती मर्यादित राहिली.

थोडा इतिहास:

ठाणे जिल्ह्यात असणारा माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतला होता. पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन १६७० मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजेंच्या काळात मराठ्यांचे किल्ले लढून जिंकता येत नसल्याने औरंगजेबाने ते फितुरीने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला. माहुली किल्ला फितुरीने घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखान याने माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी याचे मन वळवण्यासाठी नरसु महाडिक याला मध्यस्थ नेमले. त्याच्या प्रयत्नाने किल्लेदार द्वाराकोजी मुघल सरदार अब्दुल कादिर याला भेटला आणि म्हणाला की साल्हेरचा किल्लेदार असोजी प्रमाणे मला मनसब दिली तर मी किल्ला खाली करीन आणि ४० हजार रुपये, १० घोडे, खिलत इनाम आणि राहण्यासाठी जुन्नर जवळची दोन गावे वतन दिली तर मी स्वतः दरबारात हजेरी देण्यासाठी येईन. माहुलीचा किल्लेदार द्वाराकोजी अब्दुल कादिराला भेटला ती तारीख होती २१ ऑगस्ट १६८८.

पेशवाईच्या काळात किल्लाच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी, त्यांचे वाडे होते. त्यांचे अवशेष आजही आहेत. मंदिरासाठी वर्षासने दिली होती. परंतु पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात आणि स्वातन्त्रायानंतर मंदिराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन उदासीनच होता.

जर आपल्याला आमच्या TTMM ट्रेक ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल तर खालील लिंक क्लिक कारा.
https://chat.whatsapp.com/JUPpnS6ZYmg5KsPvxC3ltw

हा व्हिडिओ Insta 360 या कॅमेऱ्याने शूट केला आहे, त्याची व्हिडिओ ग्राफि GoPro कॅमेरा पेक्षा वेगळी असते, या व्हिडीओची लिंक पुढील प्रमणे देत आहे, जरूर बघून घ्या.

भाग 1
https://youtu.be/gKGvg2qB9Bw

भाग 2
https://youtu.be/M3H4ywLXYgg

गडावर फिरण्यासाठी गाईड ची गरज नाही, जगो जागी बोर्ड आहेत, पण पळसगडावर जायचे झाल्यास गाईड लागेल. तो हवा असल्यास आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता.

श्री कृष्णा मामा आगिवले
+917875322744

आसनगाव येथे भल्या पहाटे रिक्षा उपलब्ध नसते तेव्हा रिक्षा साठी संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.

अतुल कपटे +917620515036

चला तर मग परत भेटू अनोख्या भ्रमंती मध्ये.

आपलाच,
सिद्धेश पाटील,
WhatsApp no 9967152938
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers

https://youtu.be/M3H4ywLXYggमाहुलीगड, भंडारगड, पळसगड, गड त्रिकुट, आसनगाव, ठाणे "दुर्ग वाटाड्या" पुणे आयोजित TTMM सफर सह्...
25/12/2024

https://youtu.be/M3H4ywLXYgg
माहुलीगड, भंडारगड, पळसगड, गड त्रिकुट, आसनगाव, ठाणे "दुर्ग वाटाड्या" पुणे आयोजित TTMM सफर सह्याद्रीची

Merry Christmas 🎉🎂🎁🎄🥳🍾🥂
25/12/2024

Merry Christmas 🎉🎂🎁🎄🥳🍾🥂

https://youtu.be/gKGvg2qB9Bw?si=75OAkfycwd-p4xe_माहुली गडाची अवघड वाट, Highest Fort in Thane District, TTMM Trek organiz...
19/12/2024

https://youtu.be/gKGvg2qB9Bw?si=75OAkfycwd-p4xe_
माहुली गडाची अवघड वाट, Highest Fort in Thane District, TTMM Trek organized by "दुर्ग वाटाड्या - सफर सह्याद्रीची" संस्था पुणे

*Climbing Mela*Climbing Mela is an exciting event designed to promote outdoor climbing and inspire newbies to take the s...
18/12/2024

*Climbing Mela*

Climbing Mela is an exciting event designed to promote outdoor climbing and inspire newbies to take the sport to new levels by sharing knowledge about natural rock climbing. This event is completely free of charge.

# # # Event Objectives:
This event aims to promote outdoor climbing and inculcate safe practices amongst newbies by introducing them to the local community. The newbies will get a chance to climb and interact with experienced climbers during this event.

# # Details:
*Date:* January 5, 2025 / *Time:* 8:00 AM to 4:00 PM
*Venue:* Sanjay Gandhi National Park (SGNP), Gandhi Tekdi

# # # How to Register:
Simply arrive at SGNP Gandhi Tekdi by 8:00 AM to register in person and participate in the event.
Note: *This is not a competition*. It is an opportunity to learn, explore, and grow in the world of rock climbing.

# # You Need to Bring:
-*Registration with any climbing club* is required. Registration mandatory before activity as rule made by SGNP forest department. Everyone is expected to bring registered club letter (format provided with this flyer) duly signed and stamped by authorities. If you are not yet a member of any registered club yet, are suggested to seek membership of any registered club or MAC by visiting(Maha Adventure Council) at https://mahaadventurecouncil.org/
-*Self declaration* letter (format provided with this flyer).

-*Harness and climbing shoes/ sports shoes with rubber sole* are mandatory.
- Own meal and snacks for the day.

Event Schedule:
*Morning Session (9:00 AM - 1:00 PM):* Rock climbing session for all participants.
*Afternoon Session (1:00 PM - 4:00 PM):* informative talks on various rock climbing-related topics with expert climbers.

Key Highlights:
Expert climbers will be invited to guide the participants, sharing their valuable knowledge and experiences throughout the event.
For more information, please contact:

Prakash Walvekar: 9821194373 / Kaivalya Verma: 9920404414 / Kunal Sutar: 98697 78202 / Suraj Malusare: 92218 31364
We look forward to seeing you at Climbing Mela, where learning, adventure, and community come together to create an unforgettable experience!

Maha Adventure Council (MAC) is a Not-for-Profit organization striving towards Safety and Excellence in the Adventure Field in Maharashtra.

उत्तर कोकणातील शिरगाव किल्ल्याचा रंजक इतिहास आणि अनोखे सौंदर्य, मुंबई पासून हाकेच्या अंतरावर, मुंबईतून पालघर कडे ट्रेनचा...
16/12/2024

उत्तर कोकणातील शिरगाव किल्ल्याचा रंजक इतिहास आणि अनोखे सौंदर्य, मुंबई पासून हाकेच्या अंतरावर, मुंबईतून पालघर कडे ट्रेनचा एक तास प्रवास 20 रुपये , पुढे सातपाटी एसटी चा 15मिनिटे प्रवास 20 रुपये, एसटी स्टॉप शिरगाव किल्ला, आणि समोरच सुंदर असा किल्ला, किल्ला बघायला 2 तास पुरे, किल्ल्या मागे सुरुची बाग आणि पुढे सफेद वाळूचा अतिशय सुंदर समुद्र. ऐका दिवसात मस्त आणि स्वस्त भटकंती. मग यातायना फिरायला.....

Hi, Thanks for watching our Channel, we are creating , , , , , , , , and #...

दत्त जयंती च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!श्री क्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थानदत्तात्रेयांनी जिथे प्रत...
13/12/2024

दत्त जयंती च्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

श्री क्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्री गिरनार!

Hi, Thanks for watching our Channel, we are creating , , , , , , , , and #...

गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज.गोरखगड किंवा गोरक्षगड असे नाव...
12/12/2024

गोरखगड एक थरारक अनुभव, 80°अंशातील कातळातील कोरीव पायऱ्या, 2137 फूट उंच असा टेहाळणीचा बुरुज.

गोरखगड किंवा गोरक्षगड असे नाव जरी असले तरी हा एक टेहाळणी साठी वापरला गेलेला बुरुज आहे. हा गड सातवाहन काळापासून घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे, प्रामुख्याने कोकण आणि सातवाहन कालीन राजधानी पैठण यांना जोडणारा दुआ जवळच असलेल्या नाणे घाटातूनच जात असे.

गडावर भग्न अशा भरपूर वास्तू आहेत पणं त्यातील प्रामुख्याने एक महादेव / शनी मंदिराची वास्तू विखुरलेल्या अवस्थेत आजही दिसते.

हा गड उंचीवर असल्याकारणाने गडावर भरपूर पाण्याच्या टाक्या आहेत जेणेकरून उन्हाळ्यात पण इथे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, बहुदा काही टाक्या अन्न धान्य साठवण्यासाठी, घाट वाटेतील कराचा खजिना ठेवण्यासाठी पण वापर करत असावे असा अंदाज आहे.

गडावर काही शिल्प, शिलालेख, आणि गडावर सर्वोच्च ठिकाणी जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या अशा गोष्टी पण आहेत.

हा ट्रेक आम्ही सार्वजनिक वाहनाचा वापर करून केला होता, ट्रेकला येणाऱ्या सदस्य संख्या 10, या TTMM ट्रेकची आयोजन वडोदरा येथील गौरव वैशंपायन यांनी केले होते.

मी बोरिवली वरून पहाटेची पहिली लोकल पकडुन कल्याण इथे वेळेत पोहोचलो, पुढे मुरबाड पर्यंत एसटी उपलब्ध झाली, पण ती उशिरा आल्यामुळे पुढची देहरी गावातील एसटी निघून गेली होती, मग आम्ही शेरींग इको जी आम्हाला 500 रुपयात मिळाली ती घेऊन आम्ही देहरी गावात पोहोचलो. थंडी हलकेच चालू झाली होती. गोरख गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी जाते आम्ही तिथेच उतरलो.

प्रवेश द्वाराजवळील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि ट्रेकला सुरुवात केली.

हा ट्रेक एक साधारण ते कठीण श्रेणीतील आहे, सुरुवातीला उभा चढ लागतो, दमछाक उडते. पण आजू बाजूची गर्द झाडी आणि पक्षी आपले लक्ष विचलित करते. घनदाट जंगलातून आपण मार्गक्रमण करत असतो. एक डोंगर, दोन डोंगर, तीन डोंगर असे कितीतरी डोंगर आपण पार करतो ते कळत पण नाही. मध्ये काही कठीण चढ आहेत तिथे सावधानतेने पाऊल टाकावे लागते.

सगळ्यात शेवटी आपण गोरख गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या माळरानावर पोहोचलो, इथे सिद्धागडाची विहंगम दर्शन घडते.

पाठरापुढे एक भग्न अवस्थेतील शनी मंदिर दिसते, तिथे शिलालेख असल्याचा बोर्ड आहे पण झाड झुडपे वाढल्यामुळे कुठेही दृष्टी पथास पडत नाही.

थोडे पुढे गेल्यावर आपल्याला आहुपे घाट दिसायला सुरुवात होते. पुढे दुर्गादेवी कोकणकडा फार विस्तृतीत असा भाग दिसतो.

पुढे सगळ्या कातळा तील कोरीव पायऱ्या लागतात. कातळ कडा सरळसोट आहे बहुदा 80 ते 90 अंशामध्ये.

थोडे वर चढल्यावर गडाचे मुख्य आकर्षण असा गडाचे भक्कम असे प्रवेशद्वार दिसते, ते नुकतेच बसऊन घेतल्यासारखे भासते.

आपण जसे वर चढतो तशा उजवीकडे आणि डावीकडे पाण्याच्या टाक्या दिसायला सुरुवात होते.

परत कातळातील पायऱ्या लागतात आणि परत पाण्याच्या मोठ्या टाक्या दिसतात, गडाच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे तिथे एका छोट्या गुहेत काही कोरीव शिल्प आहेत. गडाच्या उजव्या बाजूला भरपूर मोठी अशी गुहा आहे तिथे राहण्याची सोय होऊ शकते.

पुढे गडाच्या सर्वोच्च भागात जाण्यासाठी परत पायऱ्यांचा वापर करावा लागतो, हा चढ थोडा कठीण श्रेणीतील आहे.

सर्वात वरती एक छोटेखानी असे शंकराचे मंदिर आहे.

सगळी कसरत झाल्यावर आम्ही झाडाखाली बसलो आणि दुपारचे जेवण उरकून घेतले आणि परतीचा प्रवास केला.

गडावर थोडीफार माकडे आहेत त्याची नोंद घ्यावी, ते खाण्यासाठी आपल्याला त्रास देतात.

हा ट्रेक आम्ही TTMM तत्त्वावर केला होता, एकूण खर्च बोरिवली ते बोरिवली 240 रुपये झाला.

जर आपल्याला आमच्या TTMM ट्रेक ग्रुप मध्ये सामील व्हायचे असेल तर खालील लिंक क्लिक कारा.
https://chat.whatsapp.com/JUPpnS6ZYmg5KsPvxC3ltw

हा व्हिडिओ Insta 360 या कॅमेऱ्याने शूट केला आहे, त्याची व्हिडिओ ग्राफि GoPro कॅमेरा पेक्षा वेगळी असते, या व्हिडीओची लिंक पुढील प्रमणे देत आहे, जरूर बघून घ्या.
https://youtu.be/u5pzysCHfbs

गडाखाली राहण्याची सोय आहे त्याचा फोटो पोस्ट आणि व्हिडिओ मध्ये दिला आहे.

आपलाच,
सिद्धेश पाटील,

WhatsApp no 9967152938
Simple Lifestyle Vlogs
Borivali Hikers

12/12/2024

International Mountain Day निमित्ते काय पोस्ट करू असा बराचवेळ विचार करत दिवस संपला, पण आपण एव्हढे आयकॉनिक पॉईंट कव्हर केले आहेत की कुठला फोटो टाकू आणि कुठला नको असे झाले शेवटी पोस्ट करायची राहूनच गेली.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर एव्हढे व्हिडिओज आहेत की नवीन काही पोस्ट करावे असे वाटलेच नाही, आसो जो पर्यंत जमत आहे तो पर्यंत सह्याद्री मधील कठीण घाट वाटा फिरून घ्या आणि त्या सुखाचा आनंद मिळवा.

माझे काही मित्र आणि आप्त स्वकीय बोलतात कशाला त्या उठाठेव्या करतोस रविवारी मस्त ताणून झोपायचे सोडून पहाटे 2.30 वाजता उठून तयारी करून 3.30 वाजता घर सोडणे आमच्या बापाच्यान पण जमणार नाही.

असो, प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते, ज्यांना हा छंद जडला त्यांचा ह्या जन्मी तरी तो सुटणे कठीण आहे.

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या शुभेच्छा

https://youtu.be/u5pzysCHfbs?si=FjpjaJFc6CUwf675गोरखगड, 2137 फूट उंचीवरील आभाळातील अनोखा थरार, मनात धडकी भरवणाऱ्या 80° अ...
10/12/2024

https://youtu.be/u5pzysCHfbs?si=FjpjaJFc6CUwf675
गोरखगड, 2137 फूट उंचीवरील आभाळातील अनोखा थरार, मनात धडकी भरवणाऱ्या 80° अंशातल्या कोरीव पायऱ्या

नाखिंद एक नैसर्गिक नेढे, जे मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे, येथून श्री मलंग गड, चंदेरी गड, इर्षाळ गड, माथेरानची डोंगर ...
06/12/2024

नाखिंद एक नैसर्गिक नेढे, जे मुंबई पासून हाकेच्या अंतरावर आहे, येथून श्री मलंग गड, चंदेरी गड, इर्षाळ गड, माथेरानची डोंगर रांग, अर्नाळा गड, खंडोबा डोंगर, मोर्बे धरणाचा विस्तृत असा नजरा दिसतो. चला तर मग या नेढ्याला भेट देऊयात

Hi, Thanks for watching our Channel, we are creating , , , , , , , , and #...

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Simple Lifestyle Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Simple Lifestyle Vlogs:

Videos

Share