Deputy Directorate of Tourism, Nashik- DDOT

Deputy Directorate of Tourism, Nashik- DDOT Directorate of Tourism, Nashik looks after introducing and implementing various tourism schemes, promotions, and publicity to boost tourism in Nashik.

दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी “जागतिक पर्यटन दिनानिमित्त” पर्यटन संचालनालय, नाशिक आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक व नार...
27/09/2023

दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी “जागतिक पर्यटन दिनानिमित्त” पर्यटन संचालनालय, नाशिक आयोजित त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक व नारोशंकर मंदिर, पंचवटी, नाशिक येथे वारसा स्थळ पदयात्रा (Heritage Wlak) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये, मंदिर परिसर स्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आले होते.

पर्यटन संचालनालय आयोजित “प्रभू श्री राम” महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रभू श्री राम यांची नाशिक मधील महत्वाच्या पर्यटन स्...
13/08/2023

पर्यटन संचालनालय आयोजित “प्रभू श्री राम” महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रभू श्री राम यांची नाशिक मधील महत्वाच्या पर्यटन स्थळांवर एकदिवसीय सहल पार पडली आणि संध्याकाळी गोदा आरती मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

03/08/2023
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित प्रादेशिक परिषद 2023 – नाशिक परिषद  पर्यटन क्षेत्रात...
06/07/2023

महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित प्रादेशिक परिषद 2023 – नाशिक परिषद पर्यटन क्षेत्रातील प्रमुख भागधारक आणि उद्योग तज्ञांना या क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड, संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते.
यामध्ये पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, भागधारक, कृषी पर्यटन चालक, साहसी पर्यटन उपक्रम धारक, तसेच इतर महत्वाच्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता.

अनुभवा निसर्गाच्या कुशीत वृक्षराजीवरील काजव्यांची मायावी लखलखती दुनिया...भंडारदरा काजवा महोत्सव पांजरेगाव - दि. 3 व 4 जू...
02/06/2023

अनुभवा निसर्गाच्या कुशीत वृक्षराजीवरील काजव्यांची मायावी लखलखती दुनिया...

भंडारदरा काजवा महोत्सव

पांजरेगाव - दि. 3 व 4 जून 2023

- निसर्ग सहल
- आदिवासी कला सादरीकरण
- कॅम्पिंग
- स्वादिष्ट आदिवासी भोजन

अनुभवा निसर्गाच्या कुशीत वृक्षराजवरील काजव्यांची मायावी लखलखती दुनिया भंडारदरा काजवा मोहत्सव - ३ व ४ जुने २०२३, भंडारदरा...
01/06/2023

अनुभवा निसर्गाच्या कुशीत वृक्षराजवरील काजव्यांची मायावी लखलखती दुनिया

भंडारदरा काजवा मोहत्सव - ३ व ४ जुने २०२३, भंडारदरा

महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याआधी अनेक ठिकाणी रात्री हजारो काजवे चमकू लागतात. तुम्ही हा जादूई अनुभव या पूर्वी कधी घेतल...
30/05/2023

महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याआधी अनेक ठिकाणी रात्री हजारो काजवे चमकू लागतात. तुम्ही हा जादूई अनुभव या पूर्वी कधी घेतला नसेल तर नक्की भेट द्या
Fireflies Festival.. अर्थातच काजवा महोत्सव..

Experience the mesmerizing phenomenon of natural lighting on 3rd and 4th June 2023.

संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालय, उपसंचालक, नाशिक कार्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ केल...
06/12/2022

संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन संचालनालय, उपसंचालक, नाशिक कार्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचा शुभारंभ केला आहे. शनिवार (दि. 3) व रविवारी (दि. 4) रोजी या टूर सर्किटवर मोफत सहलीचे आयोजन केले होते. त्यास नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.. !

पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत संविधान दिनानिमित्त, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित डॉ....
28/11/2022

पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत संविधान दिनानिमित्त, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित डॉ. आंबेडकर टूर सर्किट शुभारंभ कार्यक्रम राबविण्यात आला त्याची काही क्षणचित्रे ! ..

पर्यटन संचालनालय नाशिक कार्यालयामार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त, दिनांक 27 सप्टेंबर रोजी 'नाशिक परिसरातील पर्यटन स्थळे'...
27/09/2022

पर्यटन संचालनालय नाशिक कार्यालयामार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त, दिनांक 27 सप्टेंबर रोजी 'नाशिक परिसरातील पर्यटन स्थळे' याविषयी एकदिवसीय प्रशिक्षण व "पर्यटन मित्र - 2022" पुरस्कार वितरण कार्यक्रम राबविण्यात आला त्याची काही क्षणचित्रे !

पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त रामशेज किल्ला, रामशेज येथे दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोज...
27/09/2022

पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त रामशेज किल्ला, रामशेज येथे दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. 🌳🌲🌳🌲 तसेच स्वच्छता जनजागृती करणेसाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

उद्या दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी पर्यटन संचालनालय नाशिक मार्फत नाशिक परिसरातील पर्यटन स्थळे, मार्गदर्शन व रोजगाराच्या ...
26/09/2022

उद्या दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी पर्यटन संचालनालय नाशिक मार्फत नाशिक परिसरातील पर्यटन स्थळे, मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी प्रशिक्षण कार्यक्रम व पर्यटन पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण...
26/09/2022

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला. बंदिवासाच्या काळातच नेहरू यांनी जगप्रसिद्ध ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ भुईकोट किल्ल्यात शब्दबद्ध केला. त्या ग्रंथाची १ हजार पाने त्यांनी येथे लिहिली. याच ऐतिहसिक वास्तूत आज पर्यटन संचालनालयास पर्यटन दिन 2022 साजरा करण्याचे भाग्य लाभले, या पर्यटन दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने , सायकल स्पर्धा, मॅरॅथॉन स्पर्धा, हेरिटेज वॉक, चित्रकला स्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी, या कार्यक्रमास नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . !

जागतिक पर्यटन दिनानिमित्त उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक यांनी भुईकोट किल्ला, अहमदनगर येथे दिनांक 25/09/2022 रोजी सायकल...
24/09/2022

जागतिक पर्यटन दिनानिमित्त उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक यांनी भुईकोट किल्ला, अहमदनगर येथे दिनांक 25/09/2022 रोजी सायकल रॅली, मॅरेथॉन, चित्रकला व रंगभरण स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.

01/09/2022

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
*पर्यटन संचालनालय मार्फत गणेश उत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता मंगलमूर्ती तुमच्या सर्व चिंता , दुःख , विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिक आनंदी ठेवो सर्व इच्छा पूर्ण करोत हीच श्री गणेश चरणी प्रार्थना आपणा सर्वांना व आपल्या परिवारास गणेश उत्सवाच्या निमित्ताने ह्रर्दिक शुभेच्छा ! ..*
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

दिनांक १४ ऑगस्ट रोजी उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक तसेच BLVD हॉटेल, यांच्या संयुक्त विद्यमाने व प्लॉगर्स ग्रुप,नाशिक...
15/08/2022

दिनांक १४ ऑगस्ट रोजी उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक तसेच BLVD हॉटेल, यांच्या संयुक्त विद्यमाने व प्लॉगर्स ग्रुप,नाशिक, गिरिदुर्ग संस्था, नाशिक यांच्या सक्रीय सहभागाने अंजनेरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांचेमार्फत आज दिनांक १०/०८/२०२२ रोजी पांडवलेणी ये...
10/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांचेमार्फत आज दिनांक १०/०८/२०२२ रोजी पांडवलेणी येथे वारसा स्थळ पदयात्रा हेरिटेज वॉक हा उपक्रम संपन्न झाला. वारसा स्थळ पदयात्रा उपक्रमासाठी श्रीमती. मधुमती सरदेसाई-राठोड, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक तसेच श्री. रमेश पडवळ, वारसा पर्यटन स्थळ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास उपसंचालक पर्यटन संचालनालय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक प्लोगर्स ग्रुप, नाशिक आणि रोटरी क्लब गोदावरी, नाशिक यांच्या सक्रिय सहभागाने हा उपक्रम पूर्ण झाला.

भारतीय स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव" अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन कर...
09/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव" अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.

भारतीय स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव" अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सक...
09/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा "अमृत महोत्सव" अंतर्गत उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ ते १० वाजता पांडवलेणी येथे " वारसा स्थळ पदयात्रा / हेरिटेज वॉक" चे आयोजन करण्यात आले आहे. 🚶🚶‍♀️🌿

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत अंजनेरी या पर्यटन स्थळी  वृक्षारोपण मोही...
09/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत अंजनेरी या पर्यटन स्थळी वृक्षारोपण मोहीम आयोजित केली आहे, आपण ही या कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावावा ! .. 🌲🌳🌲🌳

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत कावनाई या पर्यटन स्थळी  वृक्षारोपण मोहीम...
09/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत कावनाई या पर्यटन स्थळी वृक्षारोपण मोहीम आयोजित केली आहे, आपण ही या कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावावा ! .. 🌲🌳🌲🌳

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत राजधेरवाडी या पर्यटन स्थळी  वृक्षारोपण म...
09/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 🇮🇳🇮🇳🇮🇳 निमित्त पर्यटन संचालनालय, नाशिक मार्फत राजधेरवाडी या पर्यटन स्थळी वृक्षारोपण मोहीम आयोजित केली आहे, आपण ही या कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावावा ! .. 🌲🌳🌲🌳

पर्यटन संचालनालय, (DoT) महाराष्ट्र शासन“कृषी पर्यटन धोरण” कृषी पर्यटन केंद्रांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र शासनाचे कृषी पर...
17/06/2022

पर्यटन संचालनालय, (DoT) महाराष्ट्र शासन
“कृषी पर्यटन धोरण”
कृषी पर्यटन केंद्रांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाचे कृषी पर्यटन धोरण दि. 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहिर झाले आहे.
यानुसार ऑनलाईन नोंदणी अर्ज पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कृषी पर्यटन धोरण अंतर्गत नोंदणी किमान १ एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेतकरी/ कृषी सहकारी संस्था / शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविदयालये विदयापिठे किवा शेतक-यांनी स्थापन केलेली भागीदार संस्था या धोरणांतर्गत नोंदणी करू शकतात.
नोंदणी फी रू.2500/- फक्त ५ वर्षांसाठी
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे -
१. अर्जदाराची जमिनीची कागदपत्रे (७/१२ उतारे. ८अ) २. आधार कार्ड/ पॅन कार्ड
३. बीज बील
४. ऑनलाईन पध्दतीने www.gras.mahakosh.gov.in या वेबसाईटर रू. २५००/- भरून त्या चलनाची प्रत
५. अन्न सुरक्षा कायदयांतर्गत परवाना (Food License)
कृषी पर्यटन धोरण अंतर्गत नोंदणीचे फायदे
शेतीला पुरक व्यवसाय, रोजगाराचे नवीन साधन मिळेल • पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
नोंदणीकृत पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण २०१६ मधील प्रोत्साहनांना उदा. वस्तु व सेवाकर, विदयुत शुल्क इ. चा लाभ
घेता येईल,
शेततळे योजनेकरिता प्राधान्य / ग्रीन हाउस, फळबाग, भाजीपाला लागवड यासारख्या योजनांचे फायदे घेता येतील.
घरगुती गॅस जोडणी वापरता येईल.
शासनाकडून अनुभवी प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल.
पर्यटन संचालनामार्फत कृषी पर्यटन केंद्राची प्रसिध्दी करण्यात येईल.
मार्केटिंगसाठी पर्यटन विभागाकडून मार्गदर्शन.
८ खोल्यांपर्यंतच्या केंद्रांसाठी खोल्यांच्या बांधकामासाठी नगर रचना विभागाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

नोंदणी संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क -
पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन, शासकीय विश्राम ग्रह आवार, गोल्फ क्लब मैदान,
नाशिक 422001. दु. क्र. (0253) 2995464/2570059
ईमेल – [email protected]
वेबसाईट - www.maharashtratourism.gov.in
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/p/CdfiJBfj9Ub/?igshid=MDJmNzVkMjY=
फेसबुक - https://www.facebook.com/100077960062532/posts/135785842363417/?d=n

क्षणभर विश्रांतीसाठी ! ..... पर्यावरण पूरक ठिकाण, मौजमस्ती, एकच उत्तर.कृषी पर्यटन केंद्र.अवश्य भेट द्या. तुमच्या जवळील क...
01/06/2022

क्षणभर विश्रांतीसाठी ! .....
पर्यावरण पूरक ठिकाण, मौजमस्ती, एकच उत्तर.
कृषी पर्यटन केंद्र.
अवश्य भेट द्या. तुमच्या जवळील कृषी पर्यटन केंद्राला ! ..

दिनांक २६ मे व २७ मे रोजी पर्यटन संचालनालयाच्या वतीने नाशिक येथे  कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये, साहसी पर्यट...
27/05/2022

दिनांक २६ मे व २७ मे रोजी पर्यटन संचालनालयाच्या वतीने नाशिक येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये, साहसी पर्यटन, कॅरॅव्हॅन धोरणाच्या अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम आणि त्यांची अंमलबजावणी तसेच आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देणे यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. जमीन आणि पाणी यांवरील पर्यटन, आदरातिथ्य क्षेत्र आणि कॅरॅव्हॅन पर्यटन या विषयांतील तज्ज्ञ व्यक्ती कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाची झलक पहा.

Incredible Nasik               &  Kanchan_stay सर्व नियमांचे पालन करून बुकिंग सुरू काजवा महोत्सव भंडारदरा २०२२संपर्क:- ८...
25/05/2022

Incredible Nasik
&
Kanchan_stay

सर्व नियमांचे पालन करून बुकिंग सुरू
काजवा महोत्सव भंडारदरा २०२२

संपर्क:- ८९८३५८९२३९
पवन राजेंद्र माळवे.
Directorate of Tourism
Certified Tourist Guide

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार ! .. जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष...
17/05/2022

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार ! ..

जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालय आणि कृषी पर्यटन विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या केंद्र चालकांचा सत्कार करण्यात आला.

आंबा महोत्सव ! 🥭 ग्रीन झोन कृषी पर्यटन केंद्र. बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.११ ते १५ मे २०२२.
13/05/2022

आंबा महोत्सव ! 🥭 ग्रीन झोन कृषी पर्यटन केंद्र.
बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
११ ते १५ मे २०२२.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deputy Directorate of Tourism, Nashik- DDOT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deputy Directorate of Tourism, Nashik- DDOT:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Nashik

Show All

You may also like