Panshet Backwater Tourism, Pune

Panshet Backwater Tourism, Pune Tourist Destination

11/03/2024
25/01/2024
३६५ दिवसांचे पर्यटनस्थळ - "खडकवासला पानशेत बॅक वॉटर सिरीज टुरिस्ट डेस्टिनेशन", म्हणजेच पुण्यातील खडकवासला धरण शृंखला...प...
22/04/2023

३६५ दिवसांचे पर्यटनस्थळ - "खडकवासला पानशेत बॅक वॉटर सिरीज टुरिस्ट डेस्टिनेशन", म्हणजेच पुण्यातील खडकवासला धरण शृंखला...

पुण्यापासून फक्त २० किमी अंतरावर आहे जगप्रसिद्ध खडकवासला धरण, येथून पुढे आहे इतिहासप्रसिद्ध सिंहगड किल्ला, येथून राजगड व तोरणा या दोन किल्ल्यांचे विहंगम दृश्य पहावयास मिळते व गाडीने या किल्ल्यांजवळ जाता येते.

येथून जवळच आहेत पानशेत, वरसगांव ही दोन जुळी धरणे (अगदी आजूबाजूला असलेली धरणे.) या दोन्ही धरणांच्या बॅकवॉटर मध्ये वॉटर स्पोर्ट्स ची व्यवस्था आहे. येथून बोटीने लवासा या पर्यटन सिटीला जाता येते.

पानशेत धारणांपासून १७/१८ किमी वर उत्तरेला आहे टेमघर धरण व दक्षिणेला तेवढ्याच अंतरावर आहे गुंजवणी धरण. या पाचही धरणांच्या आजूबाजूला पर्यटकांच्या निवासासाठी MTDC रिसॉर्टसह, टेंट कॅम्पस, ल्यावीश रिसॉर्ट्स, हॉटेल्स, कृषी पर्यटन केंद्रे, फार्म हाऊसेस, गेस्ट हाऊसेस, होम स्टेज, ट्री हाऊसेस असे अनेक पर्याय उपलब्ध असून येथील पर्यटन व्यावसायीकांनी आपल्या पर्यटन सेवांमध्ये सुसूत्रता असावी व पर्यटकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी यासाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

येथील सर्व पर्यटन व्यावसायिक हे पर्यटन व्यवसायासंबंधी अत्यंत जागरूक असून येथील अनेक पर्यटन व्यावसायिक हे डॉक्टर्स, इंजिनियर्स, टेक्निशियन्स, वकील, पत्रकार, प्रोफेसर असे जबाबदार नागरिक असून पर्यटन क्षेत्राची आवड आहे म्हणून यांनी या भागामध्ये रिसॉर्ट्स, फार्म-हाऊसेस, होम स्टेज, टेंट कॅंम्पस इत्यादी सुरू केले आहेत.

छ्त्रपती शिवाजी महाराजांनी येथील मावळ्यांच्या मदतीने व मवळ्यांच्या बलिदानाने येथेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती येथील या ज्वलंत इतिहासाची ओळख पर्यटकांना व्हावी यासाठी येथील अनेक रिसॉर्टस मध्ये इतिहासाविषयी माहिती आपल्याला मिळू शकते व तसेच यासाठी येथे हेरिटेज जंगल सफारी सुरु करण्यात आलेली आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांना व त्यांच्या परिवारामधील आबालवृद्ध अशा प्रत्येकाला पर्यटनाविषयी अनेक सेवा सुविधा येथे उपलब्ध आहेत.

वॉटर स्पोर्ट्स सोबतच पक्षी संग्रहालय, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स, रोप क्लायबिंग, हॉर्स रायडींग, जंगल सफारी, ट्रेकिंग, लाईव्ह म्युझीक, जादूचे व मनोरंजनाचे अनेक प्रयोग, टीम बिल्डिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स, वन भोजन अशा अनेक ऍक्टिव्हिटीझ येथे उपलब्ध आहेत.

येथून जवळच निळळकंठेश्वर, लवासा, खेड शिवापूर, बनेश्वर, प्रती बालाजी अशी अनेक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे असून खडकवासला, पानशेत बॅकवॉटर डेस्टिनेशन मध्ये आपण आपल्या परिवारासोबत २ किंवा ३ रात्री स्टे करून या ठिकाणांना भेटी देऊन आपला हॉलिडे व अनेक कौटुंबिक सेलिब्रेशन्स याठिकाणी साजरे करू शकता.

येथे मल्टी कुझीन रेस्टॉरंट्स सोबतच अस्सल गावरान व्हेज व नॉन व्हेज जेवणही उपलब्ध आहे. येथे अगदी ताजे ताजे मासे, चिकन, मटण तसेच गावरान कोंबड्यांचे चिकन सर्वत्र उपलब्ध असून येथील अनेक रिसॉर्ट्स व हॉटेल्समध्ये स्थानिक भाजीपाला वापरूनच आपल्या आवडीनुसार डिशेस तयार करून सर्व्ह केल्या जातात हे येथील वैशिष्ठ आहे.

येथे येण्या जाण्यासाठी बस, एसटी, जीप अशा वाहनांची व्यवस्था असून आपण आपल्या परिवारासाठी सेपरेट लोकल जीप बुक करू शकता. येथे लोकल साईटसिंग करण्यासाठी देखील स्थानिक जीप मिळतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर शासन व MTDC ने सुचविलेल्या आवश्यक प्रत्येक बाबींची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी येथील प्रत्येक पर्यटन व्यावसायिक करीत असून पूर्णपणे सुरक्षित पर्यटन सेवा सुविधा येथे उपलब्ध आहेत.

*येथे पर्यटनाच्या दृष्टीने खालील बाबी उपलब्ध आहेत...*

- जल पर्यटन
- वन पर्यटन
- कृषी पर्यटन
- साहसी पर्यटन
- ग्रामीण संस्कृती
- राजगड, तोरणा, सिंहगड
- यात्रा, जत्रा, ग्राम महोत्सव
- धार्मिक पर्यटन
- ज्वलंत इतिहास
- किल्ले, वाडे, स्मारक
- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज शिवसृष्टी, निगडे मोसे
- पाण्यामधील बेटे
- जैववैविधता
- पक्षी निरीक्षण
- शेतामध्ये काम करण्याची संधी
- डेअरी फार्म, फिशरी, पोल्ट्री, पशुखाद्य प्रकल्प भेटी
- चुलीवरील नाचणी, ज्वारी, बाजरी ची भाकर, तांदळाचे घावणे
- ताज्या ताज्या भाज्या
- गावरान चिकन, मटण, मासे, खेकडे
- चटण्या, ठेचा, कुरडया, सांडगे ई.
- आंबे, फणस, करवंद, जांभूळ, पेरू, चिकू ई.
- वॉटर पार्क, थीम पार्क
- मिनी महाबळेश्वर
- ग्रामीण बाजारपेठ
- काजवे निरीक्षण
- फुलपाखरे निरीक्षण
- पांडवकालीन मंदिरे
- निळकंठेश्वर
- कमर अली दरवेश दर्गा
- प्रति बालाजी
- बनेश्वर
- नारायणपूर
- शिरकाई देवी देवस्थान
- लवासा सिटी
- घोड्यावरून जंगल सफारी
- नाईट सफारी
- बोटीने लवासा सिटी सफारी
- ईनडोअर, आऊटडोअर गेम्स
- MTDC रिसॉर्ट, लॅविश व थिम रिसॉर्ट्स, फार्म हाऊसेस, होम स्टेज, मचाण, बांबू हाऊसेस, कॉटेजेस
- गावठाणे, वाड्या, वस्त्या जनजीवन पाहणी
- हेरिटेज जंगल सफारी
- ग्रामीण उत्पादने विक्री केंद्र
- पक्षी संग्रहालय
- पतंग महोत्सव
- ट्रेकिंग, लॉंग ड्राइव्ह, बायकिंग
- सायकलिंग व कॅंम्पिंग
- टेंट कॅंम्पिंग
- पोवाडे, जादूचे प्रयोग, मनोरंजनपर कार्यक्रम
- ब्युटी पार्लर
- योगा, आयुर्वेद, निसर्गउपचार केंद्र
- मानसोपचार केंद्र
- वृद्धाश्रम भेट
- धबधबे, ओहोळ, KT वेल्स
- प्रिवेडिंग शूट
- डेस्टिनेशन वेडिंग
- शूटिंग डेस्टिनेशन
- वस्तुसंग्रहालय
- ओपन थिएटर
- वनभोजन
- विविध पर्यटन महोत्सव
ई. ई. ई.

*- निवासासाठी*... येथेच उत्पादित झालेल्या ताज्या भाज्या, ग्रामीण चवीचे व्हेज व नॉनव्हेज फूडसह...
टेन्ट्स - 1500/- रु प्रती व्यक्ती प्रति रात्र
रूम्स - 1800/- ते 2500/- रु प्रती व्यक्ती प्रति रात्र
लक्सरी स्टे - 3000/- रु ते 6000// रु प्रती व्यक्ती प्रति रात्र या दरामध्ये उपलब्ध आहेत.

*- डेस्टिनेशन वेडिंगसाठी* सर्व व्यवस्था येथील अनेक रिसॉर्ट्समध्ये उपलब्ध आहेत.

*पानशेत येथे MTDC चे सुसज्ज असे रिसॉर्ट आहे.*

*- 365 दिवस भरपूर पाणीसाठा असणारी धरणे व बॅकवॉटर्स*
खडकवासला
पानशेत
वरसगांव
टेमघर
गुंजवणी

*- नद्या*
मोसे नदी
आंबी नदी
मुठा नदी

*- पावसाळी धबधबे व ओढे*
वरसगांव धबधबा
वडघर धबधबा
घोल धबधबा
टेकपोळे धबधबा
य्क मोठ्या धबधब्यासोबतच अनेक छोटे छोटे धबधबे येथे आहेत.

याचसोबत अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे येथे असून खूप नयनरम्य निसर्गसृष्टी या भागाला लाभली आहे.

*- घनदाट जंगलाने वेढलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा येथे आहेत.*

*- किल्ले*
राजगड
तोरणा
सिंहगड
तसेच कोकणदिवा किल्ला, डेरेबंडा टेहळणी बुरुज

*- बोटिंग, वॉटरस्पोर्ट्स*
पानशेत वॉटरस्पोर्ट्स
वरसगांव वॉटरस्पोर्ट्स
लवासा वॉटरस्पोर्ट्स

*- ऐडव्हेन्चर सेंटर्स*
ऐडव्हेन्चर मावळ
X-थ्रील
वृंदावन रिसॉर्ट

*- ऍग्री & रूरल फार्म्स*
आनंदवन कृषी पर्यटन केंद्र
शेतकरी कृषी पर्यटन केंद्र
अभिरुची रुरल & वेलनेस फार्म्स
गार्डनिया रुरल & ऍग्री फार्म्स

*- बोट्यानीकल गार्डन्स & नर्सरीज** (काम चालू आहे.)
जगताप नर्सरी (रामराई)
अभिरुची कृषी पर्यटन

*- जंगल ट्रेल्स*
पाऊस घर जंगल ट्रेल्स
आनंदयात्रा पर्यटन

*- ऐतिहासीक स्थळ दर्शने*
यासाठी पानशेत MTDC रिसॉर्ट येथून हेरिटेज जंगल सफारी सकाळी 9 वाजता सुरु होऊन सहा तासांची सफर करून सायंकाळी 3 वाजता MTDC रिसॉर्ट येथे ही सफारी संपते....

या *हेरिटेज जंगल सफारी* मध्ये-
महाराज शहाजीराजे, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज व तसेच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज
यांच्या प्रत्यक्ष वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली अनेक ऐतिहासिक...
देवस्थाने, गावठाणे, मंदिरे, देवराई, विहिरी, टेहळणी बुरुज, गुहा, बारमाही जिवंत पाण्याची झरे, महाराजांनी उभारलेली सैन्य प्रशिक्षण केंद्राची जागा, व्यापारी केंद्रे, शिवकालीन व्यापारी वाहतूकसाठीची लमान तांड्यांच्या वस्तीची जागा, पायदळाच्या राखीव तुकडीची जागा, राखीव घोडदळाची जागा, टेहळणी बुरुज, धान्य साठवण्याची शिवकालीन कोठारे, दिपमाळा, ऐतिहासिक राजमार्ग, पायवाटा ई. ई. ज्वलंत इतिहासाच्या खुणा आजही येथील मावळ्यांनी मोठ्या श्रध्येने जपल्या असून आजही यांचे पावित्र जपले जाते व आजही शिवकाळापासून चालू असलेल्या रूढी, परंपरा, सण वार, उत्सवं, यात्रा जत्रा तितक्याच पुरातन पद्धतीने येथे साजरे करून साक्षात शिवकाळच ज्वलंतपणे उभा केला जातो...
आपणही सहकुटुंब सहपरिवार यामध्ये सहभागी होऊ शकता...
यासाठी...
नंदन ट्रेक्स & जंगल कॅम्पिंग
आनंदवन कृषी पर्यटन केंद्र
महाराजा एअर टूर्स
यांच्यातर्फे वर्षभर हेरिटेज जंगल सफारीसह विविध ट्रेक्स व ट्रेल्स आयोजित करण्यात येतात...

*- पक्षी संग्रहालय व तारे निरीक्षण*
सूर्य शिबीर aviary
येथील जंगलामध्ये 200 पेक्षा ज्यास्त प्रजातीचे पक्षी पाहवयास मिळतात.

*- ओपन थिएटर्स*
- बांबू & ब्रिक्स रिसॉर्ट
- वृंदावन रिसॉर्ट
- सूर्य शिबीर रिसॉर्ट
- जिप्सी सोल रिसॉर्ट

*- ग्राम पर्यटन केंद्रे*
घोल गांव
दापसरे गांव
टेकपोळे गांव

*- घोड्यावरून जंगल सफारी*
दिग्वीजय हॉर्स रायडींग

*- जागृत देवस्थाने व देवराई*
शिरकाई देवी - शिरकोली
गारजाई देवी - कुर्तवडी
जोगोबा मंदिर - घिवशी
वरदायीनी देवी - टेकपोळे
जननी देवी - माणगांव
मळाईदेवी मंदिर - कुर्तवडी

येथे अनेक ठिकाणी *शिवकालीन जागृत देवस्थाने* असून येथील दापसरे, माणगांव अशा देवस्थानांच्या घनदाट देवराई सुप्रसिद्ध आहेत.

*- प्राचीन लेण्या व गुहा*
सिद्धेश्वर गुहा - ठाणगांव
प्राचीन लेण्या - ठाणगांव
प्राचीन गुहा - वडघर

खडकवासला पानशेत बॅकवॉटर सिरिझ टुरिस्ट डेस्टिनेशन हे निसर्गाने व ज्वलंत इतिहासने समृद्ध असे पर्यटन स्थळ वर्षभरामधील तिनही ऋतूंमध्ये आपल्या परिवारासह, मित्रमंडळींसह कमीतकमी 2 रात्री 3 दिवसांसाठी स्टे करून enjoy करण्यासाठी अगदी योग्य आहे.

पुण्यापासून फक्त 25 किमी पासून सुरु होणाऱ्या व मुंबईपासून 170 किमी अंतरावर असणाऱ्या या खडकवासला पानशेत बॅकवॉटर सिरिझ टुरिस्ट डेस्टिनेशनला आपण आपल्या परिवारासह आवश्य भेट द्या.

अधिक माहितीसाठी
आनंद गोरड
समन्वयक - खडकवासला पानशेत बॅकवॉटर सिरिझ टुरिस्ट डेस्टिनेशन, पुणे
8999188300
9325771201
[email protected]

ऑफर साजरी करा तुमच्या स्वप्नातील होळी ....Big ब्लास्ट .... 5 मार्च 2023कलर फुल होळी ..बॉलीवूड ऍक्टर💃🏻 ....मॉडेल🐤💃🏻🕺🏻 ......
02/03/2023

ऑफर
साजरी करा तुमच्या स्वप्नातील होळी ....

Big ब्लास्ट .... 5 मार्च 2023
कलर फुल होळी ..
बॉलीवूड ऍक्टर💃🏻 ....मॉडेल🐤💃🏻🕺🏻 ...बॉलीवूड डान्स ....live Dj show (plasma)🎧🎧
let's Join us AND enjoy color full holi.....
@ panshet junction resort ..🏊‍♀️🏝️🌄

Address

Varasgaon, Goradwadi
Pune
412107

Telephone

+919325771201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Panshet Backwater Tourism, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Panshet Backwater Tourism, Pune:

Videos

Share


Other Tourist Information Centers in Pune

Show All