28/03/2019
अक्षय जिरगे यांची मुलाखत आर्टीफिसिअल इंटेलिजन्स आणि आर्ट मार्केट या विषयावर द टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध झाली आहे. "एआय कलाकारांचा आणि कंपन्यांचा उदय"असे या लेखाचे नाव आहे.
मी, अक्षय जिरगे अत्यंत आनंदाने, इंग्लडमधील आघाडीचे दैनिक द टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध झालेली माझी पहिली आंतरराष्ट्रीय मुलाखत तुमच्याशी शेअर करीत आहे. तंत्रज्ञान विभागासाठी, द टेलीग्राफमधील अग्रगण्य तंत्रज्ञान रिपोर्टर नताशा बर्नल यांनी माझी एक मुलाखत फेब्रुवारीमध्ये घेतली. आर्टीफिसिअल इंटेलिजन्समुळे कला उद्योग कसा बदलत आहे याबद्दल माहिती असलेल्या निवडक तज्ज्ञ मंडळींमध्ये माझा समावेश करण्यात आला होता. "एआय कलाकारांचा आणि कंपन्यांचा उदय"असे या नावाचा लेखामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून अमेरिका, युरोप, चीनमधे इतर स्टार्टअप्स आणि भारतात आर्टमार्क, करत असलेले नवनवीन प्रयोग या संदर्भात कोट्स आहेत.
लेखात इतर आर्ट मार्केट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ ज्यो ब्लॅक, (सीईओ आर्टोमेटिक्स, एक आयरिश स्टार्टअप), आंद्रेय ओसोल्त्सेव (सीईओ प्रिझमा), मरीना रुइज कोलोमर (सोथबीसच्या समकालीन डे विक्री प्रमुख) आणि ह्यूगो कॅसेलिस-डुप्रे (ऑबव्हिअस, पॅरिस चा सह-संस्थापक) यांच्या बरोबरीने माझीही मतं मांडण्यात आली आहेत. मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो की फोटोशॉपची मालक कंपनी अॅडोब, डिस्नेची पिक्सार आणि यूएस ग्राफिक्स फर्म एनव्हीडीआ प्रसिद्ध कंपन्यांप्रमाणेच आर्टमार्कचाही या लेखात उल्लेख आहे.
द डेली टेलीग्राफ, सामान्यत: द टेलीग्राफ म्हणून संबोधित केले जाते, टेलिग्राफ मीडिया ग्रुपद्वारे लंडनमध्ये प्रकाशित करण्यात येत असलेले हे एक ब्रिटिश वृत्तपत्र आहे. द टेलीग्राफ युनायटेड किंगडम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरीत केला जातो.
आपल्या सगळ्यांचा पाठिंब्यामुळेच हे प्राप्त करू शकलो म्हणून तुमचे आशीर्वाद असेच माझ्या सोबत राहावेत ही विनंती करतो.
आपला विश्वासु
अक्षय जिरगे
Earlier this month, art dealer Sotheby's auctioned a painting that came straight from the mind of a machine.