Bhovara

Bhovara 'भोवरा' म्हणजे मुक्त प्रवास करणारा एक स्वच्छंदी मुसाफिर.
(3)

Vasai East Indian TourEaster Special✨Heritage I Culture I Food📆Sunday, 31st March, 2024⏱️08:00am - 12:00pm, Vasai📍Vasai....
24/03/2024

Vasai East Indian Tour
Easter Special✨

Heritage I Culture I Food

📆Sunday, 31st March, 2024
⏱️08:00am - 12:00pm, Vasai

📍Vasai
..

Let's Explore East Indian Culture of Vasai through Heritage Sightseeing. Portuguese Colonial Impact over Vasai natives, their Religion, Language & overall Life. Little bit of discussion about History, Culture, Folklore & Music along with the Traditional Breakfast & Refreshments!

🚙💨Itinerary :

• 08:00am Meet the Tour leader at Vasai stn & begin the journey towards Vasai Fort in private NON-AC Vehicle.

• 08:00am - 09:30am Visit few old Churches, Portuguese cross, Salt Pans & other heritage sites en route with some regional drinks & traditional breakfast

• 09:30am -11:30pm Explore Vasai Fort, Visit Ancient Churches of Portuguese era & Temples of Peshwas, Heritage Site Seeing, Discussion over Vasai Culture, Folklore & Music.

• 12:00pm End of the Tour with ‘Sweet’ memories & move back to Vasai station.
..

💸Charges : Rs.1199/- per person
(Spl discount on group bookings)

Inclusive of..
• Rental Vehicle for commutation
• Guided Heritage & Culture Walk
• Refreshments on Tour
• Authentic Breakfast Menu
• Unique experience of a Curated Tour

📞Call/Whatsapp 9969285045 to book ur seat! Limited Seats.. Book Now..

Sukhala!🐓

#भोवरा

World Forestry Day!जागतिक वन दिन!!     🐝🦀⛰️🌧️🌈🍃🍂Team Bhovara is feeling excited to explore Palghar District Treks, Lakes...
21/03/2024

World Forestry Day!
जागतिक वन दिन!!



🐝🦀⛰️🌧️🌈🍃🍂

Team Bhovara is feeling excited to explore Palghar District Treks, Lakeside Trails, Camping & Cycle Rides with New Friends & Authentic Local Food! DM to book ur Food Walk with us..

Stay connected for upcoming weekend activities. For solo bicycle rides or a group bookings near Vasai, Palghar, Dahanu, Alibaug, Mumbai, Thane, Panvel, Karjat & Kasara call us on 9969285045. We would be happy to organize.😊


9969285045

📸 Clicked by during Monsoon Nature Trail to Tandulwadi Fort in Saphale last year.

Spl Thanks to .thakur_ for leading us to this beautiful place!

#तांदुळवाडी #पालघर #महाराष्ट्र #सह्याद्री #भोवरा

गावरान पोपटी पार्टी! थंडीचा सिझन म्हटल्यावर  #भोवरा ला जशी वसईची मिठागरं आणि ताडी पार्टी आठवते तशीच ओढ लागते रायगडच्या प...
17/03/2024

गावरान पोपटी पार्टी!


थंडीचा सिझन म्हटल्यावर #भोवरा ला जशी वसईची मिठागरं आणि ताडी पार्टी आठवते तशीच ओढ लागते रायगडच्या पोपटीची आणि मोहाच्या गावठी दारूची.. यंदा थंडी तशी उशिराच् सुरू झाली, त्यातही दर वर्षीच्या तुलनेत कमीच्.. आमची रायगडची साईट आणि व्हेंडर व्यस्त असल्याने मग पोपटीचा प्लान शहापूरजवळच्या माहुली गावात आयोजित केला. 'माहुली ट्रेकर्स हाऊस' म्हणजे ट्रेकर्सचा हक्काचा अड्डा; मग लगेच रघुनाथभाऊंना फोन केला आणि पोपटीचा बेत आखला.. पावसाळ्यात दादांसोबत 'रानभाजी फेस्टिव्हल' हिट्ट झाला होता त्यामुळे हा कार्यक्रमही पद्धतशीर होणार यात शंका नव्हती!

ठरल्याप्रमाणे प्लान आउट केला आणि आम्ही आठ-दहा मंडळी शनिवारी दुपारी मुंबईहून शहापूरच्या दिशेने रवाना झालो. आसनगाव स्थानकात पोहोचेस्तोवर संध्याकाळ झाली होती. तिथून अगोदरच् सांगून ठेवलेल्या गाडीने माहुलीला पोहोचलो. मस्तपैकी नाश्ता केला आणि शेणाने सारवलेल्या खळ्यात बैठक मारली. तोंडओळख, ईकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करेस्तोवर पोपटीची तयारी सुरू झाली म्हणून मग मागल्या दारी व्हावरात गेलो. अंधारात दिव्याच्या अंधूक प्रकाशात मडकं भरलं गेलं! भांबुर्डीचा पाल्याच्या गादीवर दगडी मिठ टाकून त्यात मसाल्यात घोळवलेलं चिकन, अंडी, वालीच्या शेंगा, मटार, मके, भुईमुग वगैरे एकापाठोपाठ एक भरले गेले. मडकं प्याक करून उपडं ठेवून त्यावर सुका पाला, गोवऱ्या, सुकं गवत वगैरे शाकारून शेकोटी पेटवण्यात आली. आगीच्या भडकणाऱ्या ज्वाळांसोबत मडक्यातले पदार्थ शिजू लागले. सोबत कोळीगीतांची मैफिल चालूच होती. साधारणपणे तासाभर चांगली हिट मिळाल्यावर आग देणं बंद केलं आणि तापलेलं मडक बाजूला घेऊन त्यातले जिन्नस काढायला सुरूवात केली.

मस्तपैकी शिजलेलं चिकन, अंडी, मक्याची कणसं.. फर्स्ट क्लास बेत होता. सोबत पाड्यावरून मागवलेली पिव्वर मोहाची दारू म्हणजे विषयच् हार्ड! बैजवार बैठक जमली. तासाभरानं जेवण आलं. भाकरीसोबत चिकनचा रस्सा हाणला आणि पडवीतल्या खाटेवर ताणून दिली. बाकीचे मेंबर्सपण आपापल्या टेंट्समध्ये निद्राधीन झाले.

सकाळी उठतो तोच् खाटेवर चहाची किटली हजर. कडक चहा आणि सोबतीला तर्रीदार मिसळ-पाव! नाश्ता करून हिंडायला निघालो. माहूलीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात काही सुंदर जूनी देवळं आहेत. त्यापैकी गणेशमंदीर, शिवमंदीर, गावदेवी वगैरे मंदीरातल्या जुन्या मुर्त्या पाहिल्या. वीरगळ, महापुरूषांच्या समाध्या वगैरे न्याहाळत छान तास-दिडतासाचा नेचर ट्रेल अनुभवला आणि पुन्हा campsiteवर आलो. कालची गाडी अगोदरच् येऊन थांबली होती. समान भरून, आमच्या यजमान गावकऱ्यांचा निरोप घेत पुन्हा मुंबईच्या वाटेला लागलो. थोडक्यात काय तर कायम आठवणींत राहील असा विकेंडचा हा छोटेखानी Food Walk सहज आणि सुंदररित्या पार पडला..

टिम
9969285045

(या टुअरमध्ये सहभागी झालेल्या सर्व खाद्यप्रेमी व निसर्गमित्र पर्यटकांचे खुप खुप आभार!)

आपल्या व आपल्या कुटुंबातील लहानग्यांना पुण्या-मुंबईजवळच्या ग्रामीण जीवनाचा आनंद देण्यासाठी तसंच इथल्या निसर्ग व संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आमच्या आगामी कॅम्पिंग, ट्रेकिंग, सायकल राईड व सहलीमध्ये नक्की सहभागी व्हा! आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी एखादी ट्रीप प्लान करायला आम्हाला नक्कीच आवडेल.😊 तेव्हा हक्काने फोन करा.. भेटू लवकरच्!!

The Salt MarchIn March 1930, the now famous Salt March (commonly known Dandi March) commenced as a resistance against th...
08/03/2024

The Salt March

In March 1930, the now famous Salt March (commonly known Dandi March) commenced as a resistance against the tax monopoly of the British; the movement eventually paved way for the Civil Disobedience Movement. 94 years later, we at Bhovara and Into The Past Heritage Research join hands in the month of March 2024 to create awareness about our rapidly evaporating cultural heritage - The Vasai Salt Pans!

March here signifies 3 things:-
1. Reminiscing the important Salt Satyagraha of Indian Independence struggle
2. The month of March which is common to both the historic movement and our tiny effort
3. The structure of the cultural heritage walk/session

The March will clearly showcase that how this is not just a means of subsistence for a section of our society but has a lot of cultural and historical heritage significance. It also sheds light on how its plausible chance of inexistence will shake the entire ecosystem!

आपके टूथपेस्ट में नमक हो ना हो, पर यह नमक देखने जरूर आएं!

📣Highlights :

• March through the Salt Pans of Vasai on foot and in vehicle
• Explore the procedure of Salt Farming
• Witness the Cultural Transformation & Historical impacts on the natives of Vasai in different eras
• Know the glorious past & doubtful future of this ancient traditional business
• Interact with local farmers; know the local communities, their lifestyle & culture
• Savour some items that are the hallmark of our cultural heritage

📸 Some of our checkpoints:

• Shree Siddheshwar Mahadev Temple
• Old Chimney of Mithagar
• St. Roques church
• Indo-Portuguese Villas of Typical East Indian Village
• Ancient Kashi Vishveshwar Lord Shiva Temple
• Interaction with the tribal occupants

Limited Seats.. Book Now..

🗓️Date : Sunday, 17th March 2024
📌Venue : Vasai, Maharashtra
⏱️Time : between 7:30am to 11:30am
🚶🏻‍♂️Type: Cultural Heritage March
👨🏻‍🏫 Session leader : Mr. Atul Katdare
🎙️Language of instructions : English/Marathi /Hindi

This Salty interaction is healthy even for hypertension patients 😉

📞For queries and registrations Call/Whatsapp/DM 9969285045 to book ur seat!

(*No Booking will be Confirmed without an Advance Payment. T&C Apply!)

सफर वसईतल्या मिठागरांची.. #भोवरा चा हा कार्यक्रम दर वर्षीप्रमाणेच् यंदाही हिट्ट होता! सलग तिसऱ्या वर्षीही निसर्गप्रेमीं...
06/02/2024

सफर वसईतल्या मिठागरांची..

#भोवरा चा हा कार्यक्रम दर वर्षीप्रमाणेच् यंदाही हिट्ट होता! सलग तिसऱ्या वर्षीही निसर्गप्रेमींचा भरगोस प्रतिसाद लाभल्यामुळे यंदाचा salt pan walk स्मरणीय ठरला..

कालच्या रविवारी, ठरल्यानुसार मुंबई/वसई-विरार परीसरातले साधारणपणे १४ अभ्यासू पर्यटक अगदी वेळेवर म्हणजे सकाळी ७ वाजता वसई स्टेशनात पोहोचले. टूअरिस्ट व्हेईकल्स बुक केल्या होत्याच. त्यात बसून सर्वात आधी मिठागरातल्या सिद्धेश्वर महादेव मंदीरातल्या महादेवाचं दर्शन घेतलं. मंदिर बांधणी, मुर्त्यांवरून मंदीराचा ईतिहास जाणण्याचा प्रयत्न केला. त्या अनुशंघाने स्थानिक संस्कृतीत घडत गेलेले बदलही पाहता आले. मग खास किल्ल्याहून मागवलेली थंडगार नीरा प्यायलो आणि आगरात हिंडायला मोकळे झालो.

पुढे आगरातल्या शेतमजूरांची घरं, लोकजीवन वगैरे पाहून तिथल्या मुकादमाकडून मिठ पिकवण्याची प्रक्रिया जाणून घेतली. सोबतच् पोर्तुगीजांपासून ते ब्रिटिश कालखंडापर्यंतच्या स्थानिक इतिहासावर चर्चा घडली. आगरी व आदिवासी संस्कृती, खानपान वगैरे अनुभवता आलं. ईतकंच नव्हे तर मस्त गवताने शाकारलेल्या मांडवाखाली मातीने लिंपलेल्या थंडगार जमिनीवर विसावून लोकगीतांची मैफिलही जमवली.😄

उन्हाचा प्रहर वाढू लागता आगरातून निघालो आणि किमान १०० वर्षे जुन्या असलेल्या Joana Villa या इंडो-पोर्तुगीज स्थापत्यशैलीतल्या सुरेख का़ैलारू घरात दाखल झालो. तिथे घरत काकांनी मस्तपैकी नाश्त्याचा बेत केला होता! 'आधी पोटोबा.. मग विठोबा..' या न्यायाला स्मरून पोटभर नाश्ता करून गोखिवऱ्यातल्या पेशवेकालीन काशीविश्वेश्वर मंदीराला व st roque चर्चला भेट दिली आणि सर्व पाहुण्यांचा निरोप घेऊन एका सुंदर दिवसाची सांगता केली. एका सुंदर रविवार सकाळची कल्पना याखेरीज दुसरी काय असू शकेल..?

टिम
9969285045

(या टुअरमध्ये सहभागी झालेल्या सर्व अभ्यासू व निसर्गप्रेमी पर्यटकांचे खुप खुप आभार!)

आगामी आकर्षण : पोपटी night camping!

आपल्या व आपल्या कुटुंबातील लहानग्यांना पुण्या-मुंबईजवळच्या ग्रामीण जीवनाचा आनंद देण्यासाठी तसंच इथल्या निसर्ग व संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आमच्या आगामी कॅम्पिंग, ट्रेकिंग, सायकल राईड व वर्षा सहलीमध्ये नक्की सहभागी व्हा! आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी एखादी ट्रीप प्लान करायला आम्हाला नक्कीच आवडेल.😊 तेव्हा हक्काने फोन करा.. भेटू लवकरच्!!

'पोपटी'... A गावरान Camping!Limited Seats.. Book Now..🍹Cheers to Winters...🗓️Date & Time :From Saturday, 17th Feb, 5:00p...
05/02/2024

'पोपटी'... A गावरान Camping!
Limited Seats.. Book Now..

🍹Cheers to Winters...

🗓️Date & Time :
From Saturday, 17th Feb, 5:00pm
To Sunday, 18th Feb, 11:00am
Mahuli, Shahpur region of Thane Dist.
Type: Food Tour, Camping & a Nature Trail

🏕️What's the plan :

•Saturday, 5:00pm meet Team at Asangaon Railway Stn. Let's begin our journey wid hot cup of tea & tasty vada-pav frm the local joint.

• 6:00pm head towards the Campsite in private rented vehicle.

• 6:30pm reach Campsite. Freshen up & get settled for a while.

•7:00pm prepare for the night under sky. Learn to pitch tents.

•7:30pm-9:30pm experience the Popti making along with the bonfire. U can participate in making or just shoot the live kitchen. Enjoy 'Popti Feast' (Veg/Non-veg) with Local Drinks.

•9:30pm-10:30pm Dinner Time! (Veg/Non-veg)

•11:00pm-12:00am Chit-chat around Camp fire; some Ghost Stories, Travel experience, Sing Songs & so on...

•12:00am-7:00am Silent hours. Get a peaceful sleep inside Ur respective tents or just sleep outside for few hours gazing at the sky..

-Day ends-🌙

•6:00am-7:00am Not for lazy ppl! Only Morning Birds can wake up so early to experience rays of Rising Sun

•7:00am-9:00am take a morning walk or a nature trail to the historic temples in this region.

•9:00am-10:00am Hot cup of Tea or a Coffee will be served with tasty Breakfast

•10:00am-10:30am A group click & Selfies session. Pack Ur bags & get ready for return journey!

•Sunday, 11:00am Check out & leave the Campsite in our rented vehicle with New Friends & Pleasant Memories!!

💸Charges: ₹1399/- only
(Early Birds to get discounted rates. Special rates for Kids Below 12 years & on a group bookings)

Inclusions:

•Local Pickup & Drop
•Tents on Twin Sharing basis
•Clean & sanitized washrooms
•Proper food hygiene practices along with the taste
•Practice of hand sanitization in respective areas
•Safe & Secured zone
•Activities: Farm Camping, ‘Popti’ Feast, Bonfire, Nature Trail etc.

Team #भोवरा

Salty Tales of The Old Bassein!Limited Seats.. Book Now..🗓️Date : Sunday, 4th Feb 2024📌Venue : Vasai, Maharashtra⏱️Time ...
29/01/2024

Salty Tales of The Old Bassein!
Limited Seats.. Book Now..

🗓️Date : Sunday, 4th Feb 2024
📌Venue : Vasai, Maharashtra
⏱️Time : between 7:30am to 11:30am
🚶🏻‍♂️Type: Heritage/Cultural Walk
🎙️Language of instructions : Marathi /English

📣Highlights :

• Walk through the productive Salt Pans of Vasai
• Explore the procedure of Salt Farming
• Witness the Cultural Transformation & Historical impacts on natives of Vasai in different eras
• Know the glorious past & doubtful future of this ancient traditional business
• Interact with local farmers; know the local communities, their lifestyle & culture

📸What to see :

• Shree Siddheshwar Mahadev Temple
• Old Chimney of Mithagar
• St. Roques church
• Indo-Portuguese Villas of Typical East Indian Village
• Ancient Kashi Vishveshwar Lord Shiva Temple

🚙How to Join :

Participants join the team sharp 7:00am at Vasai Station (of Western Railway). From where we will pick u up in our private rented vehicle & visit the above mentioned sites. Let's explore the Salt Pans of Vasai & walk through the nearby villages till 9:00am followed by the breakfast. We will end the walk by 11:00am & drop all the participants back to vasai station.
.....

💸Charges : Rs. 750/- pp
(Rs. 550/- pp for own vehicle)

🍽️Inclusive of :

• A Guided Walk
• pickup & drop to Vasai Railway Station
• Post walk Breakfast
• Refreshments on Tour

📞Call/Whatsapp 9969285045 to book ur seat!

(*No Booking will be Confirmed without an Advance Payment. T&C Apply!)

Vasai Festival Tour✨Limited Seats.. Book Now..Date : Sunday, 7th Jan 2024Venue : VasaiTime : 10:00am to 5:00pmDistance :...
27/12/2023

Vasai Festival Tour✨
Limited Seats.. Book Now..

Date : Sunday, 7th Jan 2024
Venue : Vasai
Time : 10:00am to 5:00pm
Distance : 40kms approx to & fro
Commutation : by a private rental vehicle
Language of instructions : Marathi/English

🌟How to Join :
Participants interested to join can meet the team at Vasai Road stn. Vasai has an easy access by local trains of Western Railway. Our pick up vehicle will be ready for u near the stn. alongwith the local guide.

*Participants can join this tour on their own vehicles as well from Vasai/Virar region (Free parking will be available)

🌲What to see :
• Old Churches of Portuguese time
• Explore Local History, Culture, Food, & Music
• Enjoy Authentic East Indian menu for Lunch
• Experience the Regional Songs on Traditional Instruments
• Taste Homemade Wine
• Interact with Natives

🎅🏻Who can Join :
History enthusiasts, Food Lovers, Wanders & Explorers, Photographers, Bloggers & Vloggers of all age groups

💸Charges : Rs.1499/-
(Rs. 1049/- for own vehicle)

Included :
• Rental Vehicle for commutation
• Pickup & Drop to Vasai stn.
• Guided Walk to Heritage of Vasai
• Lunch (Veg/Non Veg Menu)

Not included :
• Breakfast
• Mineral Water, Cold Drinks etc.
• Personal Shopping

🎒Things to Carry :
• Bottle of water (must)
• Cap/Hat, Sunglasses, Sun screen lotion etc.
• Clean napkin or a small towel
• Backpack to keep everything mentioned above
• Camera, Power bank etc. (Optional)

(*No Booking will be Confirmed without an Advance Payment. T&C Apply!)

📞DM to know more or Call/Whatsapp to book on 9969285045

#भोवरा
भिरी भिरी भ्रमंती

Vasai Beach CampingMusic I Food I Walk🗓️Date & Time :From Saturday, 16th Dec, 5:00pmTo Sunday, 17th Dec, 11:00amVenue : ...
12/12/2023

Vasai Beach Camping
Music I Food I Walk

🗓️Date & Time :
From Saturday, 16th Dec, 5:00pm
To Sunday, 17th Dec, 11:00am
Venue : Vasai
Type: Beach Side Leisure Camping

🏕️What's the plan :

•Saturday, 5:00pm Check in, Freshen up & take a Sunset Walk or just sit on the sand to witness sinking sun in an ocean

•6:30pm Tea/Coffee will be served with Snacks

•7:00pm Set up the Tents & get Settled

•7:30pm- 9:30pm Live Music, Fun games etc. Let the Annu Malik or Prabhudeva inside u come out & sing or dance on the floor!

•9:30pm-10:30pm Dinner Time! (Veg/Non-veg)

•11:00pm-12:00am Chit-chat around Camp fire; some Ghost Stories, Travel experience & so on..

•12:00am-7:00am Silent hours. Get a peaceful sleep inside ur respective tents or just sleep outside for few hours gazing at the sky..

-Day ends-🌙

•6:00am-7:00am Not for lazy ppl! Only Morning Birds can wake up this early to experience rays of rising sun

•7:00am-9:00am Get some 'Vitamin Sea' with a Beach Walk or a Morning Doobki!

•9:00am-10:00am Hot cup of Tea or a Coffee will be served with tasty Breakfast

•10:00am-10:30am A group click & Selfies session. Pack ur bags & get ready for return journey

•Sunday, 11:00am Check out & leave the Campsite with New Friends & Pleasant Memories

💸Charges : ₹1399/- only
(Advance Booking Mandatory)

⛱️Things to look Forward :
•Tents on Twin Sharing basis
•Clean & sanitized washrooms
•Proper food hygiene practices alongwith the taste
•Practise of hand sanitization in respective areas
•Safe & Secured zone
•Activities : Camping, Karaoke, Bonfire, Beach Walk, Games etc.

🛺How to Join :
Participants can meet us directly at the venue. Our campsite has an easy access by local transportation from Vasai (W) Railway station. Besides, Google Map Location will b shared with Telephonic Guidance to the Campsite. Also, Parking is available!

🎒Things to carry :
•Comfortable Footwears
•Extra pair of Clothes & Towel
•Hat/Cap, Sunglasses, Sunscreen lotion etc.
• Woolen wears, sweater, shawl, monkey cap etc as it will b chilling cold
•Mobile Chargers, Powerbank
•Portable Speakers, Tourch, Camera (optional)
•Personal Medicines, Mosquito Repellent, Hand Sanitizer, toiletries etc.
•Bedding will b provided, however U can carry extra blanket or a sleeping bag if required

Limited Entries.. Book Now..

📞DM to know more or Call/Whatsapp 9969285045 for bookings!

Winter is coming...❄️Yes, you guessed it right!Team Vision Foundation with our travel partner   brings to you Overnight ...
29/11/2023

Winter is coming...❄️
Yes, you guessed it right!

Team Vision Foundation with our travel partner brings to you Overnight camping and nature trail to Prabalmachi with a special event

December 9 & 10, 2023

Highlights:
• Experience one of the peaceful nature trail
• Camping at Prabalmachi
• Authentic Veg/Non veg Food with Local flavours
• Panoramic view of Sahyadri in winter
• Special event in lap of Nature

Schedule:

DAY 1 - Saturday,

03:30 pm Meet at Panvel Station

04:00 pm Move towards base village in Public Transport

05:15 pm Reach base village & start a mini trail towards Prabalmachi after a quick introduction

07:30 pm Reach Prabalmachi (where we will be staying for the night) Get Refreshed & settled

08:00 pm Prepare for a night under open sky, learn to pitch the tents, have a delicious local cuisine for dinner, make new friends, play few games, share ur travel stories, let the Singers in you come out and enjoy the chilled windy weather with campfire

11:30 pm Off to the bed for a sound sleep (For those who are very sleepy)

Day Ends 🌙
-----

DAY 2 - Sunday,

06:00 am Wake up call, get refreshed. Enjoy the foggy morning at Prabalmachi with a hot cup of tea

07:00 am - 08:00 am Get ready for the event, help organizers for event preparation & setting up

8:00 am Have a lite breakfast
08:30 am - 10:30 am Event Ceremony (keep your curiosity high)

11:00 am have a quick brunch & pack ur bags

12:30 pm Start to descend towards base village

02:30 pm Reach base village, say your goodbyes with a promise to meet again, leave for Panvel in our transfer vehicle

03:00 pm Reach Panvel Stn. This brings us to the end of our trip, or rather just the beginning 🙂

💸Charges inclusive of everything mentioned below:

Stay: 🏕️
• Accommodation in Hilltop Tents (Twin) on sharing basis

Meals: 🫕
• Authentic Veg / Non Veg food for Dinner (Day 01)
• Breakfast with Tea prior to the event (Day 02)
• Tasty Local Veg food for Brunch post event (Day 02)

Transportation: 🛻
• Pick up and drop from Panvel Railway Station to base village & Entry fees to Prabalmachi (if any)

📞Call 9004 851 841 / Whatsapp 9372 851 841 for more details!

Hurry, Limited Seats.. Book Now!!

 #भोवरा चा रानभाजी महोत्सव!गेल्या महिन्यात जव्हारला भातलावणीनिमित्त गेलो असता नागलीच्या भाकरीसोबत कुर्डू आणि तेरा (रान अ...
04/10/2023

#भोवरा चा रानभाजी महोत्सव!

गेल्या महिन्यात जव्हारला भातलावणीनिमित्त गेलो असता नागलीच्या भाकरीसोबत कुर्डू आणि तेरा (रान अळू) या दोन भाज्या पंक्तीला होत्या. तेव्हाच ठरलं एक ट्रीप खास रानभाज्यांसाठी राखीव ठेवायची. पण संपूर्ण पावसाळा अगोदरच काही प्लान्स ठरले असल्याने तसा मुहूर्त सापडत नव्हता. होय-नाही करत दिवस उलटत होते, पावसाचे महीने संपत आलेले, आता रानभाज्या मिळण्याची शक्यताही कमी होती. पण गोकुळाष्टमीला पावसाने जोर धरला तो गणपती गावी जाईपर्यंत कोसळतच् होता. मग काय, माहूली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रघुनाथ दादांना फोन लावला. जून महिन्याच्या शेवटी 'भोवरा' तर्फे माहूली किल्ल्याचा ट्रेक आयोजित केला होता. तेव्हा दादांच्या 'माहुली ट्रेकर्स हाऊस'ने आमच्या पाहूण्यांचं फार छान आदरातिथ्य केलं होतं. शाकाहारी मंडळींसाठी भाकरीसोबत खास कोरल्याची रानभाजी आणि ठेचा असा बेत होता. तेव्हा सध्या रानभाजी कितपत उपलब्ध होईल आणि काय मेन्यू ठेवता येईल याबद्दल थोडी खलबतं झाली. दादांनी त्वरित मोहीम फत्ते होणार आणि आमच्या पाहुण्यांना रानभाजीचा गावरान बेत चाखता येणार याची कबूली दिली.

ठरल्याप्रमाणे प्लान आउट केला आणि आम्ही दहा-बारा मंडळी पहाटेच मुंबईहून शहापूरच्या दिशेने रवाना झालो. पावसाची काही खास लक्षणं नव्हती, रस्त्यांची कंडिशन तिसऱ्या चंद्रयानाच्या टेस्टींगकरीता तयार केली गेली असावी अशी काहिशी शंका येत होती. त्यामुळे माहुलीला पोहोचेस्तोवर मध्यान्ह उलटली होती. बारा-सव्वाबाराच्या सुमारास सर्व मंडळी दादांच्या घरी पोहोचलो. प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी वेलकम ड्रिंक म्हणून लिंबू सरबत देण्यात आलं. जेवायला बऱ्यापैकी वेळ असल्याने थोडं सेटल होऊन, फ्रेश होऊन निघालो पाय मोकळे करायला. समोर माहूली, पळसगड आणि भंडारदुर्ग डावीकडे नवरा-नवरी सुळका आणि भटोबा. बऱ्यापैकी उन होतं. टोप्या-छत्र्या सावरत माहूलीच्या पायथ्याशी असलेल्या जून्या देवळात चक्कर टाकून आलो. गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करून देवळालगतची वीरगळ पाहिली, त्यानिमित्त वीरगळ व माहुली किल्ल्याच्या ईतिहासाची उजळणी झाली. तिथूनच जवळच्या शिवमंदीरात गेलो. मंदीरातला सुंदर नंदी, भव्य शिवलिंग आणि पार्वतीची सुरेख मुर्ती पाहून छान फोटो काढून पुन्हा थोडी माहिती घेतली. एव्हाना भूकही जागृत झाली होती.

परत येईस्तोवर दोन वाजले होते, जेवण तयारच् होतं. मग क्षणाचाही विलंब न करता पंगतीला बसलो. एकापाठोपाठ एक रानभाज्यांची रांग लागली होती. लोत, पावसाळी अळू, गाबोळी, कोरळा, माठ, टेटूच्या शेंगा आणि खुरसाणी.. एकापाठोपाठ एक रानभाज्या पानात पडू लागल्या. सोबत नाचणी आणि तांदळाच्या भाकऱ्या. चवीला अळुवड्या, कुरडया यांनी पान सजलं. भरपेट जेवून डेझर्टमध्ये तांदळाच्या गोड खीरीचा आनंद घेत मंडळी तृप्त झाली. जेवण १ नंबर होतं. माहुलीच्या डोंगराळ भागात व पायथ्याशी असलेल्या जंगलात पावसाळ्यात मुबलक प्रमाणात रानभाज्या सापडतात. ईथला अनुभवी कातकरी, ठाकर, वारली, महादेव कोळी समाज या भाज्या गोळा करून आणतात; क्वचित शहरात नेऊन विकतात. पण त्यांची ओळख व त्या बनवायच्या कशा याचं ज्ञान सर्वांना नसल्यामुळे बहुसंख्य मुंबईकर या नैसर्गिक आहाराला मुकतात. रघुनाथ दादांच्या सहकार्याने तो प्रश्नही सुटला आणि आम्हाला ऐन पावसाळा संपताना रानभाज्यांची एक सुग्रास ट्रीट मिळाली!

जेवणं झाल्यावर वामकुक्षी घ्यावी या माझ्या विचाराला सुरूंग लावत पाहूणे मंडळी नदीवर सोबत घेऊन गेली. एव्हाना ढग दाटून आले होते आणि गडगडाट सुरू झाला होता. थोडा वेळ झुळझूळ वहाणाऱ्या नदीच्या पाण्यात पाय सोडून बसून राहीलो. तासाभरातच् माहूली आणि ईथल्या प्रेमळ माणसांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा रिमझिमत पाऊस सुरू झाला होता. गाडीच्या तावदानांवर साचलेल्या पाण्याच्या थेंबातून अलगद दिसेनासं होणारं हे गाव आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला एक सुंदर दिवस दोन्ही आठवणींच्या कप्प्यात कैद करून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला! 'भोवरा'चा रानभाजी फेस्टिव्हल सफळ संपूर्ण झाला!!

(सदर ट्रिप करिता भोवरा ला लोकल गाईडपासून ते गावरान जेवणापर्यंत सर्व सुविधा अगदी आगत्याने पुरवणाऱ्या माहुली ट्रेकर्स हाऊसच्या रघुनाथदादा आगिवले व त्यांच्या कुटुंबीयांचे खुप खुप आभार!)


टिम
9969285045

मंडळी, आपल्या व आपल्या कुटुंबातील लहानग्यांना पुण्या-मुंबईजवळच्या ग्रामीण जीवनाचा आनंद देण्यासाठी तसंच इथल्या निसर्ग व संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आमच्या आगामी कॅम्पिंग, ट्रेकिंग, सायकल राईड व धर्मिक सहलीमध्ये नक्की सहभागी व्हा! आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी एखादी ट्रीप प्लान करायला आम्हाला नक्कीच आवडेल.😊 तेव्हा हक्काने फोन करा.. भेटू लवकरच्!!

*रानभाजी महोत्सव & Nature Trail*Limited Seats.. Book Now..🎋🌾🌿☘️🍀🍃🍂Hey Foodies! Get ready to taste the Wild Veggies befor...
29/09/2023

*रानभाजी महोत्सव & Nature Trail*
Limited Seats.. Book Now..

🎋🌾🌿☘️🍀🍃🍂

Hey Foodies! Get ready to taste the Wild Veggies before this Monsoon Season ends. invites U all to enjoy the Food Festival filled with tasty & healthy 'रानभाजी'.

🗓️Date : Sunday, 1st Oct 2023
📌Venue : Mahuli, Thane Dist
⏱️Time : between 7:00am to 7:00pm
🍽️Type: Food Tour & a Nature Trail
🎙️Language of instructions : Marathi /English

🫕What's the Menu?

Local Tribes like Thakar, Katkari, Warli, Mahadev Kolis of Shahapur region visit the hills of Mahuli & nearby jungle to collect these seasonal vegetables during the month of Shravan & so on which we have included in our menu..

- Wild Veggies :
बांबू I लोत I रानकेळी I पावसाळी अळू
गाबोळी I कोरळा I बाफली I टेटूच्या शेंगा

- Served with :
तांदळाची/नाचणीची भाकरी
चवळीच्या शेंगाची आमटी-भात
अळूवडी, पापड/कुरडया, लोणचं

- Sweet dish :
शेवया/तांदळाची खीर

(Menu may change a bit depending upon the availability of wild veggies)

📸Activities :
• Explore the wild veggies found in hilly regions of rural Maharashtra

• Enjoy the authentic taste of Home cooked food of the region

• Heritage Temple Walk & a River Trail

• Live Kitchen & चुलीवरचं जेवण!

💸Charges : Rs. 1399/- per person
(Discounted rates for Kids upto 5 years)

Inclusive of :
• Travelling in a private rented vehicle from Vasai to Shahapur & back

• Breakfast & Lunch

• Washroom/ Changing Room available

• Parking, Toll, Entry fees for Sighting etc.

• Local Guidance & Tour Operator throughout the journey

• All the above mentioned 'Activities & Experiences'

📞Call/Whatsapp 9969285045 for detailed itinerary & Booking!

Team #भोवरा
भिरी भिरी भ्रमंती

श्रावणातील भातलावणी आणि रानभाज्या.. #भोवरा ची अभिनव वर्षा सहल!!श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सरसर...
19/08/2023

श्रावणातील भातलावणी आणि रानभाज्या..
#भोवरा ची अभिनव वर्षा सहल!!

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

आणि अश्याच एका अधिक मासातल्या रविवारी, उन-पावसाच्या लपंडावात 'भोवरा'तर्फे एक मस्त बेत आखला होता. पालघरजवळील जव्हार या अतिदुर्गम व आदिवासी पट्ट्यातील भटकंतीचा. खास प्लान होता ईथल्या शेतात भातलावणीचा अनुभव घ्यायचा, एखाद्या आडवाटेवरील धबधब्यात मनसोक्त डुंबायचं, ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची आणि एखाद्या पाड्यावर अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घ्यायचा.. आमची ही कल्पना अनेकांना ईतकी आवडली की अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने टूअर ओव्हरबुक्ड झाली आणि नाइलाजाने काही मंडळींना नकारही द्यावा लागला. आमच्या ट्रीप्स मध्ये आम्ही उगाच गर्दी न करता कमीत कमी टूअरीस्ट नेतो जेणेकरून प्रत्येकाला वेळ देता येतो ज्यामुळे ट्रीपचा आनंददेखील वाढतो. ठरल्याप्रमाणे याच महिन्याच्या ६ तारखेला वीसेएक जण वसई स्थानकात भेटलो. मिनी-बस सांगून ठेवल्याप्रमाणे वेळेअगोदरच् हजर होती. मग काय, 'गणपती बाप्पा मोरया..'च्या गजरात सकाळी ७च्या सुमारास वसईहून जव्हारच्या दिशेने प्रस्थान केलं ते थेट तासाभरात मनोर फाट्याजवळच्या 'श्रीदत्त'ला थांबलो. अस्सल मराठमोळा मेन्यू असलेल्या श्रीदत्त मध्ये चहा-नाश्ता करून पुन्हा पुढल्या प्रवासाला सुरूवात केली. दोन्ही बाजूला हिरवळ पसरली होती, अधूनमधून श्रावणसरी बरसत होत्या, नांगरलेली शेतं, माळरानावर चरणारी गुरं, मधूनच दिसणारी कार्वीची किंवा का़ैलारू घर वगैरे न्यहाळत छान प्रवास सुरू होता. विक्रमगड येईस्तोवर साधारणपणे १० वाजले होते. तिथल्याच एका शेतात आमचे स्थानिक मित्र व मार्गदर्शक वैभव घोलप यांची भेट झाली. यापुढच्या कार्यक्रमाचा चार्ज घेत वैभवजींनी आम्हा सर्वांना जव्हार प्रांताची एक मस्त सफर घडवून आणली..

सर्वप्रथम आम्ही सर्वांनी या भागातल्या भातशेतीची माहिती घेतली. या भागात बहुतकरून 'दप्तरी' हा भाताचा प्रकार जास्त प्रचलित आहे. नांगरणी- पेरणीपासून कापणी- झोडणीपर्यंतची प्रक्रिया समजावून घेत भातलावणीचा मनमुराद आनंद घेतला. गुडघाभर पाण्यातून, चिखल तुडवत स्थानिक शेतकऱ्यांच्या जोडीने भाताच्या पिकाच्या हिरव्यागार जुड्या रोवण्यात गंमत होती. शहरात जन्मलेल्या/वाढलेल्या आमच्यापैकी अनेकांनी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला. त्याशिवाय निसरड्या जमिनीवर माती/चिखलामुळे कपडे खराब होण्याची पर्वा न करता अनेक वर्षांनी डोंगर की पाणी, रस्सीखेच, पकडा-पकडी, सोनसाखळी वगैरे खेळ खेळत बालपणीच्या आठवणींची उजळणी झाली. लहान मुलांपासून अगदी सिनियर सिटीझन्सपर्यंत सर्वच जण चिखलाने माखले होते. बालगोपाळांनी तर शेतातल्या पाण्यात जी बैठक घातली ते तास दिड तास झाला तरी उठायचं नाव घेईनात! काय सुंदर वेळ गेला.. शेवटी वेळेआभावी आवरतं घेत तिथल्याच hand pumpवर जमून मस्त थंड पाण्याने अंग साफ करत कार्यक्रम संपवला. सर्वांसोबत फोटो काढून शेतकऱ्यांचा निरोप घेतला आणि गाडी जव्हारच्या दिशेने निघाली.

'जव्हार'ला City of Waterfalls म्हणतात ते उगाच नव्हे. सुंदर धबधब्यांनी नटलेल्या या डोंगराळ भागातील आमच्या भेटीत एखाद्या धबधब्यात मनमुराद न भिजणं अशक्यच् होतं. पण हल्ली पावसाळा सुरू झाला की मुंबईकर जवळपासच्या भागातील सर्व धबधबे, नद्या, धरण परीसरात गर्दी करतात. तेव्हा मुद्दामच् एका जास्त प्रसिद्ध नसलेल्या पण कमी गर्दी असलेल्या धबधब्यालगत गाडी लावली आणि सर्व जण मन भरेस्तोवर भिजायला मोकळे झालो. हिरवेगार डोंगर, डोंगर उतारावर होणारी नागलीची शेती, कड्या कपाऱ्यांतून प्रचंड वेगानं खळखळत वहाणारं स्वच्छ, फेसाळ पाणी, आणि त्याखाली केवळ आम्ही.. तासाभरासाठी का होईन तो आमचा प्रायव्हेट धबधबा होता आणि आम्ही तिथल्या निसर्गाचे राजे!! मनसोक्तपणे भिजून शेवटी अगदीच पोटान भूकेची जाणीव करून दिली आणि नाईलाजाने तिथून निघालो. या सर्व खेळण्या भिजण्याच्या दंगामस्तीत जेवणाची वेळ अर्थातच टळून गेली होती. पण भूक मात्र चांगलीच लागली होती. मग ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो, फ्रेश होवून कपडे बदलून पंगतीला बसलो. अगदी गावठी पद्धतीचं स्वयंपाकघर. चुलीवर नागलीच्या आणि तांदळाच्या भाकऱ्यांचा रतीब लावला होता. सोबतच कोंथिंबीरवडीच्या तळणाचा घाट घातला होता. त्या घमघमाटामुळे जठराग्नि चांगलाच् प्रज्वलित झाला होता. मग काय, माजघरात जमिनीवरच बैठक आंथरून, मांडीला मांडी लावून सर्वजण स्थानापन्न झाले आणि यजमान जेवण वाढण्याच्या लगबगीला लागले.

नागलीच्या भाकरीसोबत चिकनचा रस्सा. स्थानिक मसाल्यात घोळवलेलं, पारंपारीक पद्धतीने बनवलेलं सुकं चिकन म्हणजे 'गजब मामला' होता! पण सामिष जेवणाला टक्कर देईल ईतक्या लाजवाब पद्धतीने बनलेल्या शाकाहारी जेवणाने त्यादिवशी पाहुण्यांची मनं जिंकली. नागलीच्या भाकरीसोबत पिठलं-भात आणि श्रावणात रानावनात सापडणारा रानमेवा म्हणजे रानभाज्या मेन्यूवर असल्याने काही मंडळींना अधिक मास धरल्याचा जराही खेद नव्हता उलट 'श्रावणमासी' शहरात अभावानेच आढळणाऱ्या या भाज्या पानात पडल्यामुळे 'हर्ष मानसी' नक्कीच होता! आणि स्वीट डिश म्हणून शेवयांची खीर म्हणजे ब्रम्हानंद होता!! जेवण होईस्तोवर चा़ैथा प्रहर उलटून गेला होता. आता मात्र परतीचे वेध लागले होते. हाताशी केवळ एकच् तास होता, किमान पाच साडेपाच पर्यंत ईथून निघालो तर आठ साडेआठपर्यंत वसईत पोहोचण्याची शक्यता होती. शिवाय सोबतीला काही मंडळी अगदी मुंबईहून आली होती, तेव्हा कार्यक्रम वेळेत आटोपणं गरजेचं होतं. मग प्लानमध्ये थोडा बदल करून दाभोसा धबधबा स्किप करून त्याऐवजी थोडी ऐतिहासिक भटकंती करावी असा ठराव एकमुखाने संमत झाला..

लगेच गाडी शिर्पामाळच्या दिशेने वळवली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या जागी महाराजांचं स्मरण व जयघोष झाला. जव्हार संस्थानाच्या मुकणे राजघराण्याच्या ईतिहासाची माहिती घेत तिथूनच पुढे असलेल्या त्यांच्या जय-विलास राजवाड्याला भेट देण्यात आली. सुंदर स्थापत्यशैलीतील बांधकाम, उंचावरून दिसणाऱ्या जव्हार नगरीचा नजारा मन मोहून टाकणारा होता! एकंदरीतच् ट्रिप वसूल झाली होती. मस्तपैकी वाफाळलेल्या चहासोबत या वर्षासहलीचा समारोप करण्यात आला. दिवसभर दंगा मस्ती करणारे, बसमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळणारे बहुतेक सर्वच जण परतीच्या प्रवासात मात्र दमून भागून आपापल्या जागी विसावले होते! या ट्रीपमध्ये जेष्ठ नागरीक पुन्हा तरूण तर तरूण मंडळी लहान मुलांप्रमाणे हुंदडत होती. कधी नव्हे ते बालगोपाळ मोबाईल गेम्स बाजूला ठेवून चिखलात उतरले होते, पाण्यात भिजले होते. या टूअरनिमित्त का होईन शहरी पर्यटकांनी ग्रामीण जीवन, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि गावरान पाहुणचार अनुभवला. निसर्गाशी आणि आपल्या मातीशी असलेलं नातं अधिकंच घट्ट केलं!

(सदर ट्रिप करिता भोवरा ला लोकल गाईडपासून ते गावरान जेवणापर्यंत सर्व सुविधा पुरवणाऱ्या जव्हार टूरीजमच्या वैभव घोलप यांचे खुप खुप आभार!)


टिम
9969285045

मंडळी, सह्याद्रीत पावसाची धुव्वादार Batting सुरू आहे. आपल्या व आपल्या कुटुंबातील लहानग्यांना पुण्या-मुंबईजवळच्या ग्रामीण जीवनाचा आनंद देण्यासाठी तसंच इथल्या निसर्ग व संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आमच्या आगामी कॅम्पिंग, ट्रेकिंग, सायकल राईड व वर्षा सहलीमध्ये नक्की सहभागी व्हा! आपल्या व आपल्या प्रियजनांसाठी एखादी ट्रीप प्लान करायला आम्हाला नक्कीच आवडेल.😊 तेव्हा हक्काने फोन करा.. भेटू लवकरच्!!

Address


Telephone

+919969285045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhovara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhovara:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share