Arunoday Tours

  • Home
  • Arunoday Tours

Arunoday Tours Proprietor - Aditya Joshi

"Discover the captivating Rani ki Vav in Patan, India, a UNESCO World Heritage site. This remarkable stepwell, built in ...
18/04/2024

"Discover the captivating Rani ki Vav in Patan, India, a UNESCO World Heritage site. This remarkable stepwell, built in the 11th century by Queen Udayamati in memory of her husband King Bhimdev I, is not just a beautiful monument but a testament to the rich history and culture of ancient India. Its intricate carvings depict scenes from Hindu mythology, showcasing the artistic and architectural brilliance of that era. On World Heritage Day, let's honor and preserve such treasures of our past for future generations to admire and learn from.

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे,रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नम: ।
17/04/2024

रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे,
रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नम: ।

Exploring Ladakh with Arunoday Tours was a dream come true! Dr. Vikas Sohani & Medha Sohani couldn’t be happier with the...
11/04/2024

Exploring Ladakh with Arunoday Tours was a dream come true! Dr. Vikas Sohani & Medha Sohani couldn’t be happier with their unforgettable journey. 😃✈️

नववर्ष नवचैतन्यं ददातु ॥ 😃✨🌼
09/04/2024

नववर्ष नवचैतन्यं ददातु ॥ 😃✨🌼

Happy Holi🎨😊✨
24/03/2024

Happy Holi🎨😊✨

नमस्कार,यावर्षी २६ जुलै २०२४ रोजी कारगील विजयाला २५ वर्ष पूर्ण होतायत. अरुणोदय टुर्स दरवर्षी कारगिल विजय दिनाचे औचित्य स...
22/03/2024

नमस्कार,

यावर्षी २६ जुलै २०२४ रोजी कारगील विजयाला २५ वर्ष पूर्ण होतायत. अरुणोदय टुर्स दरवर्षी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून २५ जुलै ते ०२ ऑगस्ट या कालावधीत लदाखची टूर आयोजित करत आलेली आहे, तरी यावर्षी रजत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने द्रास समरभुमिवर जाऊन कारगिल युद्धातील वीर योध्यांना आदरांजली वाहुया.

विशेष सवलत योजना

• कारगिल विजय दिवस विशेष टूर (रजत महोत्सवी वर्ष) आणि
• स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन विशेष

या टुर्ससाठी गुढीपाडव्यापर्यंत म्हणजेच ०९/०४/२०२४ पर्यंत फुल पेमेंट करा आणि प्रति व्यक्ती ₹2000/- चा discount मिळवा. तेव्हा त्वरा करा आणि आजच अरुणोदय टुर्ससोबत आपली जागा नक्की करा.

विशेष नम्र विनंती - आपली लदाखची टूर झाली असेल तर आपल्या संपर्कातील लडाख टूर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कृपया हा मेसेज फॉरवर्ड करा आणि अरुणोदय टुर्स सोबत टूर बुक करायला सांगा ही आग्रहाची विनंती.

- आदित्य राम जोशी
(अरुणोदय टूर्स)

नमस्कार..!!आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, अरुणोदय टुर्स मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित महाराष्ट्र व्यापारी पेठे...
21/03/2024

नमस्कार..!!

आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, अरुणोदय टुर्स मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित महाराष्ट्र व्यापारी पेठेत सहभागी होत आहे.

तेव्हा महाराष्ट्र व्यापारी पेठेला अवश्य भेट द्या आणि आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना सुद्धा अवश्य कळवा..... वाट पाहत आहोत ...

दिनांक : २२, २३, २४ मार्च २०२४
स्थळ : स्काऊट आणि गाईड पॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई - २८

वेळ : रोज सकाळी ११ ते रात्री ९
🇮🇳

18/03/2024

8 wanderers, 11 days, countless memories! 🌄 Arunoday Travels curated the perfect journey through Jammu, Vaishnodevi, Shivakhori, Patani Top and Kashmir Valley. Let’s plan your next adventure—reach out now!

🤳 9561697253
DM for enquiries

📲

भारताचा मुकुटमणी लडाखभारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडा...
16/03/2024

भारताचा मुकुटमणी लडाख

भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख. लडाख म्हणलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो बर्फाच्छादित सुंदर प्रदेश, नजर जाईल तिथवर पसरलेली उत्तुंग पर्वतराजी, अति दुर्गम खिंडी आणि त्यातून जाणारे नागमोडी रस्ते, अद्भुत पॅगॉग लोक, हुंदरचे वाळवंट, मोनॅस्ट्रीज, लडाखी माणस आणि या सगळयाशी जोडलेला भारतीय लष्कराचा अभिमानाने गौरवावा असा इतिहास. या प्रदेशातील प्रवास वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक असला तरी प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे, कारण काही गोष्टी या अनुभवल्याशिवाय त्याची मजा येत नाही. तर मित्रांनो, अशा या लेह-लडाखच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या टूर्सचा आनंद घेण्यासाठी अरुणोदय टूर्ससोबत चला लडाखच्या सफरीवर.

२५ जुलै - ०२ ऑगस्ट २०२४ (कारगिल विजय दिवस विशेष)
१४ ऑगस्ट - २२ ऑगस्ट २०२४ (स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन विशेष)
(या डेट्स ना आपल्याला शक्य नसल्यास आपल्याला पर्सनल टूर अरेंज करून दिली जाईल)

विशेष सवलत योजना
• कारगिल विजय दिवस विशेष टूर (रजत महोत्सवी वर्ष) आणि
• स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन विशेष

या टुर्ससाठी गुढीपाडव्यापर्यंत म्हणजेच ०९/०४/२०२४ पर्यंत फुल पेमेंट करा आणि प्रति व्यक्ती ₹२०००/- चा डिस्काउंट मिळवा. तेव्हा त्वरा करा आणि आजच अरुणोदय टुर्ससोबत आपली जागा नक्की करा.

अधिक माहितीसाठी संपर्क
आदित्य जोशी (अरुणोदय टूर्स)
📞: 9571697253
📧: [email protected]

“Empowering journeys with Arunoday: Exploring Gujarat’s gems on our special Women’s Day tour! 💃✨                        ...
11/03/2024

“Empowering journeys with Arunoday: Exploring Gujarat’s gems on our special Women’s Day tour! 💃✨

"Today, we celebrate Women's Day and Mahashivratri, recognizing women's strength, resilience, and beauty. We embrace the...
08/03/2024

"Today, we celebrate Women's Day and Mahashivratri, recognizing women's strength, resilience, and beauty. We embrace the power of Shiva and Shakti within every woman. Saluting all women embodying grace and power!🪷🙏🏻

🌷 🔱🙏♥️special🙏🚩🔱📿🕉️😘😘🥰🥰♥️

मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा! 😊📚📖
27/02/2024

मराठी भाषादिनाच्या हार्दीक शुभेच्छा! 😊📚📖

On this special day dedicated to the memory of Swatantrya Veer Savarkar, let us reflect on his remarkable contributions ...
26/02/2024

On this special day dedicated to the memory of Swatantrya Veer Savarkar, let us reflect on his remarkable contributions to our nation's freedom struggle. His unwavering courage and dedication to the cause of independence continue to inspire us. With heartfelt gratitude, we salute his legacy and proudly proclaim "Jai Hind" in remembrance of his extraordinary life. 😃🙏🏻🇮🇳

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा         🚩
19/02/2024

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

🚩

एकदंताय वक्रतुण्डायगौरीतनयाय धीमहि |गजेशानाय भालचन्द्रायश्रीगणेशाय धीमहि ||😊🌺🙏🏻गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा!         ...
13/02/2024

एकदंताय वक्रतुण्डाय
गौरीतनयाय धीमहि |
गजेशानाय भालचन्द्राय
श्रीगणेशाय धीमहि ||😊🌺🙏🏻
गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा!

OTM, Asia’s foremost travel trade show, happened at the BKC Jio World Convention Centre in Mumbai from February 8th to 1...
12/02/2024

OTM, Asia’s foremost travel trade show, happened at the BKC Jio World Convention Centre in Mumbai from February 8th to 10th, 2024. This premier event brings together industry professionals to establish long-term business relationships, discover new destinations, and gather valuable insights from travel experts. Arunoday company joined this to travel business and stay ahead in the dynamic industry!

सावरकर अभिवादन यात्रा.२६ फेब्रुवारी!सावरकरांचा आत्मर्पण दिवस!सावरकरांप्रमाणेच जिथे अपार कष्ट सोसून भारतमातेच्या स्वातंत्...
04/01/2024

सावरकर अभिवादन यात्रा.
२६ फेब्रुवारी!
सावरकरांचा आत्मर्पण दिवस!

सावरकरांप्रमाणेच जिथे अपार कष्ट सोसून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करल अशी ऐतिहासिक जागा म्हणजे अंदमान, स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून अरुणोदय टूर्स अंदमानची टूर आयोजित करत आहे. ज्या सावरकरांनी अंदमानात ५० वर्ष शिक्षा भोगण्याच्या इराद्याने पाऊल ठेवले, हाल सोसले त्यांना वंदन करण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवे.

चला तर मग भारताच्या स्वातंत्र्याचं एक ज्वलंत स्मारक बघायला आपणही या आणि आपल्या परिचितांना या सहलीत सामील करा. अरुणोदय टूर्स सोबत लवकरात लवकर आपली सीट नक्की करा.

अधिक माहितीसाठी संपर्क
- आदित्य जोशी (अरुणोदय टूर्स)
Call: 9561697253
Email: [email protected]

🇮🇳

Wishing you a happy new year filled with approved leaves, boarding passes and brand new adventure.   🇮🇳
31/12/2023

Wishing you a happy new year filled with approved leaves, boarding passes and brand new adventure.

🇮🇳

नमस्कार..!!आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, अरुणोदय टुर्स बिझनेस जत्रा २०२३ मध्ये सहभागी होत आहे. बिझनेस जत्रा ...
25/11/2023

नमस्कार..!!
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, अरुणोदय टुर्स बिझनेस जत्रा २०२३ मध्ये सहभागी होत आहे.

बिझनेस जत्रा २०२३.... अवश्य भेट द्या ..... वाट पाहत आहोत ...
दिनांक : ०१ आणि ०२ डिसेंबर २०२३
स्थळ : टीप टॉप प्लाझा, ठाणे (प)
🇮🇳

Here's a list of our upcoming trips For more details,- Aditya Joshi (Arunoday Tours)📱: 9561697253📧: arunoday.aditya@gmai...
20/10/2023

Here's a list of our upcoming trips
For more details,

- Aditya Joshi (Arunoday Tours)
📱: 9561697253
📧: [email protected]

Celebration Of Entrepreneurship,Festival Of MSMEs. 👨🏻‍💼🎪 Business Jatra 2023🗓️ Date: 1st & 2nd December 2023.📍 Venue: Ti...
05/10/2023

Celebration Of Entrepreneurship,
Festival Of MSMEs. 👨🏻‍💼

🎪 Business Jatra 2023
🗓️ Date: 1st & 2nd December 2023.
📍 Venue: Tip Top Plaza, Thane.

🇮🇳

Travelling is still the most intense mode of learning.   🇮🇳
27/09/2023

Travelling is still the most intense mode of learning.

🇮🇳

बाप्पाच्या आशीर्वादाने सादर करीत आहोत "अरुणोदय टुर्स" चा नवीन लोगो !Unveiling New Logo of “Arunoday Tours”Logo By : Mayu...
19/09/2023

बाप्पाच्या आशीर्वादाने सादर करीत आहोत "अरुणोदय टुर्स" चा नवीन लोगो !

Unveiling New Logo of “Arunoday Tours”

Logo By : Mayur More (Fresco the creative box)

🇮🇳

नुकत्याच झालेल्या कारगिल विजय दिनाच्या टूर वर आलेल्या तेलवणे काकांनी दिलेला हा फीडबॅक. प्रत्येक टूर नंतर असे अभिप्राय ये...
02/09/2023

नुकत्याच झालेल्या कारगिल विजय दिनाच्या टूर वर आलेल्या तेलवणे काकांनी दिलेला हा फीडबॅक. प्रत्येक टूर नंतर असे अभिप्राय येतात तेव्हा सर्व थकवा निघून जातो आणि पुन्हा नव्या जोमाने काम करायची ऊर्जा मिळते.....

Thank you - .art for the art work

🇮🇳

नमस्कार,सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.सीमेवर उभं राहून देशासाठी अमूल्य त्याग करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व...
30/08/2023

नमस्कार,

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सीमेवर उभं राहून देशासाठी अमूल्य त्याग करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी फार कमी वेळा आपल्याला मिळते आणि अशी संधी आपल्याला मिळावी म्हणून अरुणोदय टुर्स लडाख आणि काश्मीर मध्ये रक्षाबंधन विशेष टूर आयोजित करते. तेव्हा २०२४ मध्ये प्रत्यक्ष जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करण्याची संधी सोडू नका.

Tour Date - १४ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२४ (स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन विशेष टूर)

🇮🇳

गुजरात म्हटलं की सर्वसाधारण पणे वडोदरा अहमदाबाद राजकोट अशा जागा पर्यटकांच्या नजरेसमोर येतात, त्यात आजकाल अमिताभ बच्चन या...
20/08/2023

गुजरात म्हटलं की सर्वसाधारण पणे वडोदरा अहमदाबाद राजकोट अशा जागा पर्यटकांच्या नजरेसमोर येतात, त्यात आजकाल अमिताभ बच्चन यांच्या कृपेने रण उत्सवाला आगळ वेगळं महत्व प्राप्त झालं आहे पण या व्यतिरिक्त गुजरातमध्ये असलेल्या अनेक जागा त्यामानाने अजून पर्यटनाच्या पटलावर आलेल्या नाहीत. अशाच काही वारसा स्थळांची ४ रात्र ५ दिवसांची टूर अरुणोदय टुर्स आपल्या साठी घेऊन येत आहे. येताय ना मग या अशा ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला?

ग्रूप टूरची तारीख - २८ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) ते ०२ ऑक्टोबर (शास्त्री जयंती)

*Tour Cost (As Per Atleast 6 Person In A Group) - ₹18350/- (Ex. - Ahamadabad)*

For More Details:

- Aditya Joshi (Arunoday Tours)
Call: 9561697253
Email: [email protected]

अरुणोदय टूर्सचे पाऊल पडते पुढेदोन दिवसांपूर्वी २०२३-२४ सीझनची अरुणोदय टूर्सची कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने ग्रूप टूर ...
05/08/2023

अरुणोदय टूर्सचे पाऊल पडते पुढे

दोन दिवसांपूर्वी २०२३-२४ सीझनची अरुणोदय टूर्सची कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने ग्रूप टूर सुफळ संपूर्ण झाली. नेहमीप्रमाणे निसर्गाच्या आगळ्या वेगळ्या रूपाचा आनंद घेत, लडाखच्या रूपाचे वेगवेगळे रंग उलगडत ९ दिवस अतिशय छान गेले, या प्रदेशातील प्रवास वैविध्यपूर्ण आणि आव्हानात्मक असला तरी प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे, कारण काही गोष्टी या अनुभवल्याशिवाय त्याची मजा येत नाही. सतत बदलणार हवामान पण त्याला तितक्याच उत्साहाने सामोरा जाणारा ग्रूप सोबत असला की अशा प्रदेशात प्रवास करण्याचा आनंद वेगळा असतो, लडाख म्हटल की निसर्गाचं बदलणार रूप आणि त्याच्याशी मिळत जुळत करून घेत टूर एन्जॉय करण हे ओघाने आलच. याव्यतिरिक्त या टूर मधील सर्वात जास्त लक्षात राहणारा क्षण म्हणजे परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार यांची भेट.

Overall टूर अतिशय उत्साहात पार पडली, त्याची काही क्षणचित्रे सोबत आहेतच, आता वेध पुढील वर्षी होणाऱ्या २५व्या कारगिल विजय दिनाचे. पुढील वर्षी कारगिल विजय दिनाच्या टूरसाठी २५० देशप्रेमी पर्यटकांना सोबत घेऊन जाणार आहे. तेव्हा आपल्या कॅलेंडर मध्ये २५ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२४ या तारखा आत्ताच block करून ठेवून द्या आणि अरुणोदय टुर्स सोबत कारगिल विजय दिन साजरा करायला चला लेहच्या टूर वर.

- आदित्य राम जोशी
(अरुणोदय टूर्स)
9561697253
[email protected]

व्यर्थ न हो बलिदानलेह लडाखला फिरायला जाणारे आपण गाडीमधून फिरत असतानाही प्राणवायूच्या कमतरतेने कासावीस होतो, तेव्हा विचार...
26/07/2023

व्यर्थ न हो बलिदान

लेह लडाखला फिरायला जाणारे आपण गाडीमधून फिरत असतानाही प्राणवायूच्या कमतरतेने कासावीस होतो, तेव्हा विचार करा की त्या परिस्थितीत आपले जवान कसे रहात असतील, कसे लढले असतील. किमान एकदा कारगिलला जा, तिथल्या युद्ध स्मारकाला भेट द्या! त्या स्मारकाशी सलग सलग सहा सहा तास न हलता उभे राहून पहारा देणाऱ्या सैनिकाला पहा! शेकडो हुतात्म्यांचं स्मारक म्हणून उभ्या असलेल्या शिळांच्या पार्श्वभूमीवर फडकणारा आपला प्रचंड मोठा तिरंगा पाहिल्यावर, तुमची मान अभिमानानं ताठ झाल्याशिवाय राहणार नाही!! तिथूनच टायगर हिलकडे नजर टाका त्याक्षणी या देशाचं आपणही काही देणं लागतो ही भावना मनात जागृत होईल. गेल्या काही वर्षात इथे येणारे इतर प्रवासी बघून कधी कधी मन खिन्न होतं, ऐन तारुण्यात असताना देशासाठी आपले बलिदान देणारे ते महान हुतात्मे एका बाजूला आणि त्याच पावन भूमीवर फिरताना फक्त स्वतःचे फोटो काढून घेऊन, तिथला इतिहास समजून न घेता परत जाणारे काही तरुण एका बाजूला. आज आपला देश सुरक्षीत आहे कारण आजही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले जवान या सीमांच रक्षण करतायत. आपण देशाच्या सीमेवर कदाचित लढू नाही शकत पण आपल्या विजयाच्या गाथा तरी सगळ्या भारतीयांपर्यंत पोचवू शकतो. प्रत्येकाच्या मनात देशप्रेम जागृत करू शकतो.

द्रास मधल्या या युद्धभूमी मधून बाहेर पडताना गेटवर १ फार छान वाक्य लिहिलेलं आहे.

“WHEN YOU GO HOME, TELL THEM OF US AND SAY, FOR YOUR TOMORROW, WE GAVE OUR TODAY.”

चला तर मग आज २४व्या कारगील विजयदिना निमित्त निश्चय करूया की ही यशोगाथा आपणं सगळ्यापर्यंत पोचवूया आणि आपला भारत अजून सशक्त बनवूया.

- आदित्य राम जोशी
(अरुणोदय टूर्स)

Address


Telephone

+919561697253

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arunoday Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arunoday Tours:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share