guru_sahyadri

  • Home
  • guru_sahyadri

guru_sahyadri We offer treks and tours for you from Pune, Mumbai, Latur, Solapur, Sambhajinagar, etc.
(1)

तेगही कै मेटे जौंन राकस मरद जान्यो सरजा सिबाजी रामही को अवतारू है ||- म्हणजे ज्याच्या तलवारीची गाठ राक्षसांच्या प्राणांश...
17/02/2024

तेगही कै मेटे जौंन राकस मरद जान्यो सरजा सिबाजी रामही को अवतारू है ||
- म्हणजे ज्याच्या तलवारीची गाठ राक्षसांच्या प्राणांशी पडते, अश्या रामाचा शिवाजी हा अवतार आहे.

मराठी कवी आणि इतिहासकारांनी स्वामींची किती स्तुती केली तरी महाराजांच्या समोर त्यांची स्तुती करणाऱ्या श्रीमान कवी भूषणांची सर कोणास येणार नाही.... कवी भूषणांनी त्यांच्या संग्रहात महाराजांनी अपार स्तुती केली आहे पण जेव्हा जेव्हा कवी भूषण महाराजांना भगवान श्री विष्णू सोबत आणि त्यांच्या अवतारांसोबत समानतात तेव्हा छाती गर्वाने फुलून येते ..
आम्ही त्या देवाची पूजा करतो ज्यांची तुलना प्रभू श्रीराम चंद्रासोबत केली जाते भगवान श्री कृष्णा सोबत केली जाते ..... 🙏🚩..

सेर सिवराज हैं ..🚩

Post credit: अनिकेत भोसले

🚩

राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स २३ मे १६७३ रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो...
12/04/2023

राजधानी रायगडचे वर्णन - थाँमस निकोल्स २३ मे १६७३ रोजी थाँमस निकोल्स रायगड वर आला होता. हिंदु-दुर्ग रायगड विषयी तो लिहीतो- "सकाऴी त्या उंच टेकडीवर आम्ही गेलो. वाटेत अनेक ठिकाणी पायरया तयार केल्या होत्या आणि पुढे दरवाज्या जवळ गेलो असता तेथील पायरी पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जेथे टेकडीला निसर्गत: अभेदता नाही तेथे २४ फुट उंचीची भिंत किंवा तट बांधला आहे आणि भिंती पासुन ४० फुटांवर लगेच दुसरी भिंत बांधली आहे. जर शत्रुने पहिली भिंत पार केली तर तर त्यांना हकलुन लावन्यासाठी दुसरी भिंत तयारच होती. अशा प्रकारे हा किल्ला ईतका दुर्गम बनवला आहे कि जर रसदेचा पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प शिबंदीच्या सहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढु शकेल.” —थाँमस निकोल्स, इंग्रज वकिल

PostCredit: 🚩🚩

#गुरू_सह्याद्री
#रायगड
#छत्रपती_शिवाजी_महाराज

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात नूतन वर्षारंभ.श्री राजा शालिवाहन शके १९४५श्री राजा विक्रम शके २०८०शोभकृत संवत्सरउत्तरायण, व...
22/03/2023

चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात नूतन वर्षारंभ.
श्री राजा शालिवाहन शके १९४५
श्री राजा विक्रम शके २०८०
शोभकृत संवत्सर
उत्तरायण, वसंत ऋतू


🚩कविराज म्हणायला लागले...!!🚩🚩‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।ज्यो रवि छबी लखतह...
21/03/2023

🚩कविराज म्हणायला लागले...!!🚩

🚩‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’🚩
कवितेचा अर्थ: रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास औरंग्या पुढे उपस्थित केले. हनुमंताच्या अंगाला शेदूर शोभून दिसावा असे घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिहासानाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे.
औरंगजेब उभा राहिला आणि... कवी कलश कडे बघून म्हणाला....!!

" बहौत !!! जुबान चलती है इस काफर की...."

आणि औरंगजेब उभा राहिला तो शंभुराजेंपुढे...!!

शंभुराजेंची आग्निदिव्य नजर औरंगजेब च्या कपटी नजरेला भिडली...

हजरत सलामत किब्ला ई दिनों दुनिया अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहंमद औरंगजेब शहेनशहा ई आलमगीर’

आणि पुढे उभे होते

🚩शिवबांचा छावा, 🚩धर्मवीर,🚩 स्वराज्यरक्षणकर्ते,🚩 धर्मशील ,🚩कुशाग्र बुद्धिवंत,
शौर्यपती, 🚩स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज...

with .repost
• • • • • •

आयुष्य किती खडतर आहे हे सह्याद्री दाखवितो आणि हा खडतर प्रवास लीलया कसा पेलायचा ते दाखवितो तो जुन्नर तालुक्यात असाच गड कि...
14/03/2023

आयुष्य किती खडतर आहे हे सह्याद्री दाखवितो आणि हा खडतर प्रवास लीलया कसा पेलायचा ते दाखवितो तो जुन्नर तालुक्यात असाच गड किल्ल्यांनी सुंदर नटलेला कातळात दगडी कोरीव पायऱ्या भक्कम उभा किल्ला “हडसर”....🚩

हडसर किल्ल्याची उंची साधारणतः तब्बल ४६८७ फूट..त्याच्या या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड अशक्यच वाटू लागतो यामुळेच की काय त्याला आणखी एक नाव पर्वतगड...
सर्व बाजूने तुटलेले कडे पाहून सुरुवातीला गोंधळायलाच होते पण मग आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहून तिथला एखादा खेडूत आपली वाट सोपी करून सांगतो या गडाला खेटूनच एक वाटोळा डोंगर आहे या दोन डोंगरांच्या दरम्यानच्या घळीतून एक लपलेली वाट गडावर जाते दगड गोटे आणि झाडोऱ्याने भरलेली ही वाट परीक्षाच पाहते पण या साऱ्या अडचणी आणि शेवटचे छोटेसे प्रस्तरारोहण करत या दोन डोंगरांदरम्यानची खिंड गाठली की आपण हडसरच्या मुख्य मार्गाला येऊन मिळतो खरेतर हडसरची मुख्य वाट या त्याच्या शेजारच्या डोंगराला वळसा घालतच वर चढते हा शेजारचा डोंगरदेखील हडसरचाच एक भाग आहे या डोंगरात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या याचाच एक भाग आहे या छोट्या डोंगराचा आकारही अगदी कुणीतरी तासल्याप्रमाणे सरळ-गुळगुळीत एखाद्या वाटोळा बिनीचा बुरुज वाटावा असा या डोंगराला वळसा घेत उत्तर दिशेस आलो की गडावर जाणारा पायऱ्यांचा राजमार्ग दिसतो...

खिंडीतील गडाचा राजमार्ग ऐन कड्यात खोदलेला आहे.. हडसरचा हा मार्ग आज जरी दुर्गम झालेला असला तरी गडाच्या प्रवेशद्वारात हजर झालो की त्याचे हे कातळरूपच सौंदर्य बनून पुढय़ात येते मूळच्या कातळातच पायऱ्या खोदून तयार केलेला मार्ग त्याला अंगच्या कातळाचेच पुन्हा कठडे पुढे या कातळात खोदून काढलेली दोन अत्यंत रेखीव प्रवेशद्वारे, त्यावरच्या त्याच्या त्या लयबद्ध कमानी, भोवतीचे बुरुज, आतमधील चौकीदारांच्या खोल्या ऊर्फ अलंगा.. खोदकामातील ही सारी कला पाहताना एखाद्या लेण्यातून फिरल्याचाच भास होऊ लागतो...

➖➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : 👌🏼♥️🔥

काशी की कला जाती, मथुरा मे मस्जिद बसती,छत्रपती शिवाजी महाराज न होते,तो सुन्नत होती सबकी..!आज छत्रपती शिवाजी महाराज यांची...
10/03/2023

काशी की कला जाती, मथुरा मे मस्जिद बसती,
छत्रपती शिवाजी महाराज न होते,
तो सुन्नत होती सबकी..!

आज छत्रपती शिवाजी महाराज
यांची तिथीनुसार #शिवजयंती
सर्व शिवभक्तांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा

िवराय 💪🏻🚩

with .repost
• • • • • •

एक तू बुद्धीवान ।एक तू बलवान।   with .repost • • • • • •
15/01/2023

एक तू बुद्धीवान ।
एक तू बलवान।

with .repost
• • • • • •



दुर्गराज रायगड अभेद्य महादरवाजा 🌺😍   • • • • • •....................................................................    ...
06/12/2022

दुर्गराज रायगड अभेद्य महादरवाजा 🌺😍


• • • • • •.....
...............................................................

इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक...
05/12/2022

इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्यसत्ता स्वतंत्र झाल्या त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली त्यापैकी सातवाहन घराणे हेदेखील एक महत्त्वाचे घराणे होय प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती.चंद्रवंशी यादव कुळातील राजा सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवां कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते.



मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला ’मल्हारगड’ . पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्य...
02/12/2022

मराठेशाहीतील सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला ’मल्हारगड’ . पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात. एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्वपश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.
Among all the forts Built During Maratha Empire,, Malhargad is famous as the last fort to be built. To the south of Pune district, Near Velhe taluka Sahyadri splits into two branches of the original Sahyadri range. Rajgad and Torna are spread on one mountain range and the other mountain range is spread east-west. This queue is called Bhuleshwar queue. Purandar, Vajragad, Malhargad, Sinhagad are forts situated on this range. Malhargad was constructed to keep an eye on the Diveghata required on the way to Saswad from Pune. The construction of this fort is very recent which dates between 1757 to 1760. The fort is also known as 'Sonori' due to the village situated at the Foot of the Fort.

Reposted from .wanderer 🏰

रायगड किल्ल्याचे कौतुक करतांना महाराज त्यावेळी बोलले होते – “दीड गाव उंच-देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा.पावसाळ्यात कड्या...
02/12/2022

रायगड किल्ल्याचे कौतुक करतांना महाराज त्यावेळी बोलले होते – “दीड गाव उंच-देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा.

पावसाळ्यात कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका.
दौलताबादचे दशगुणी गड उंच, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे पाहून महाराज आनंदाने बोलले- तख्तास जागा हाच गड करावा.”
जय शिवराय 🙏

Credits 📷

🚩

रतनगडावरुन दिसणार कात्राबाई शिखर व कात्राबाई शिखराच कातळ वैभव आणि पाठीमागे महाराष्ट्रातील तिन नंबर ऊंचीचे गवळदेव शिखर Re...
29/11/2022

रतनगडावरुन दिसणार कात्राबाई शिखर व कात्राबाई शिखराच कातळ वैभव आणि पाठीमागे महाराष्ट्रातील तिन नंबर ऊंचीचे गवळदेव शिखर

Reposted from:



लक्ष्मणाला वाचवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने महाबली हनुमंतरायाने संजीवनी साठी द्रोणागिरी पर्वतचा काही भाग च उचलून...
26/11/2022

लक्ष्मणाला वाचवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने महाबली हनुमंतरायाने संजीवनी साठी द्रोणागिरी पर्वतचा काही भाग च उचलून श्रीलंकेत नेला.
रामायणात पर्वत उचलून आणला तर शिवभारतात पर्वत फोडला ...
कस ते? तर
रयतेला इस्लामी आक्रमणापासून वाचवण्यासाठी किल्ले बांधले ते ही उंच.
बरं किल्ले बांधायचं म्हणले तर दगड तर आलेच.
मग ते दगड खालून वर नेण म्हंजे अवघड अन् खर्चाच काम.
सर्वात जास्त किल्ले महाराष्ट्रात बांधले गेले साहजिकच तेवढे दगड फोडावे लागले.
प्रत्येक किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी तळी, तलाव, टाकी खोदणे आलेच.
पण गडावर दगड घडवायचा म्हंजे सुरुंग तर लावायचा नाही मात्र दगड बी घडवायचा.
त्यासाठी महाराजांनीच दगड घडवण्यासाठी काय काय केलं असावं ?
एक म्हंजे तो दगड निघाला तर ज्या जागेतून नघेल तिथे तळे, तलाव, टाकी तयार झाली पाहिजेत.
या तून निघालेला दगड हा वास्तू बनवण्यासाठी वापरला जाई.
तर त्यावर मोरव्याचे भस्म व काळ्या तिळाचे भस्म पाण्यात घालून ते पाणी चांगले कालवावे नंतर हे पाणी कढवावे आणि मग दगड तापवून त्यावर हे कढलेले पाणी शिंपडावे मग दगड फुटलाच.
दुसर म्हंजे पळस व टेंभूर्णी यांच्या काटक्या/लाकूड एकत्र करून दगडावर पेटवावे, दगड चांगला भाजून घ्यावा.
यावर भर उन्हात चुन्याचे पाणी तापवुन मारावे म्हणजे दगड फुटतो.
त्याकाळी सुरुंग लावले जायचे पण ते बांधकाम केलेले किल्ल्याचे बुरूजांना भगदाड पाडण्यासाठी.
सुरूंग फोडीचा उपयोग खडक फोडण्यासाठी क्वचितच झाला असावा

खंडेराव, एक मात्र आहे... रामायण आणि शिवभारतात एकाच गोष्टीचा अट्टाहास होता .. तो म्हंजे हिंदू धर्म!

किल्ले दातेगड 🚩
लेखन: click by:

15/09/2022

सह्याद्रीतील या इमारतीवरील पाण्याची चव न्यारीच 🥰🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Reposted From


#गुरु_सह्याद्री #मानगड #सह्याद्री

15/09/2022

गड रानफुलांनी गजबजलाय😍😍😍
WhatsApp us on +918999795723 / 8180908299 for regular updates about our weekend treks/tours around Mumbai & Pune!
Media Credits:



#

13/09/2022

A Dive In The Glorious Past✨

Hampi:The Glory Of Vijaynagara Samrajya.✨

⚜️The Hampi Was The Capital Of Vijaynagara Samrajya And Around 15th Century It Was The Second largest City Of World And Probably Was The Richest City Of India.

✨The Hampi Is Also One Of Most well preserved And Famous World Heritage sites Of India.

Credit:-


#गुरु_सह्याद्री

सह्याद्रि : पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम ...
04/09/2022

सह्याद्रि : पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे.

=============================

भूवैज्ञानिक इतिहास : सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय. ही क्रिया अचानक घडली नसून मंद गतीने घडली असावी. मिआमी विदयापीठातील भूभौतिकीविज्ञ बॅरन व हॅरिसन यांच्या सिद्धांतानुसार सु. १०० ते ८० द.ल. वर्षांपूर्वीच्या दरम्यान मादागास्करपासून विभंगून भारताचा पश्र्चिम किनारा अस्तित्वात आला असावा. या पश्र्चिम किनाऱ्याचे विभंजन होऊन पश्चिम घाट ह्या १,००० मी. उंचीच्या उभ्या कडयाची आकस्मिक निर्मिती झाली असावी. सुमारे ६५ द.ल. वर्षांपूर्वी प्रचंड प्रमाणात भेगी प्रकारचे ज्वालामुखी उद्रेक होऊन दक्षिण ट्रॅप (डेक्कन ट्रॅप) ची निर्मिती झाली असावी. लाव्हारसापासून निर्माण झालेल्या बेसाल्ट खडकाचे विस्तृत व जाड थर असलेल्या या प्रदेशाने मध्य भारताचा फार मोठा भाग व्यापला आहे. अशा ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेल्या संचयनातून पश्र्चिम घाट प्रदेशाची ही भूरचना बनलेली आहे. पश्र्चिम घाटातील अशा बेसाल्ट खडकाच्या खालील खडकांचे थर सु. २०० द.ल. वर्षांपूर्वीचे जुने असावेत.

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे तुझ्या नावातच समाधान आहे. . . . .🤩❣️ Credi...
23/08/2022

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे तुझ्या नावातच समाधान आहे. . . . .🤩❣️

Credit -


#गुरु_सह्याद्री

म्हणजे आता आम्ही आमचा इतिहास सांगायचं पण नाही का.?????गड, किल्ले माहिती आपल्या पुढच्या पिढी पर्यंत पोहचल्या पाहिजे आणि ऐ...
23/08/2022

म्हणजे आता आम्ही आमचा इतिहास सांगायचं पण नाही का.?????
गड, किल्ले माहिती आपल्या पुढच्या पिढी पर्यंत पोहचल्या पाहिजे आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन झाले पाहिजे 🚩

महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न.🙏🚩

Dm For credit/ Removal .

( महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन आपल्या विडिओ / पोस्ट मधून होत असते ..म्हणून आम्ही पेज च्या माध्यमातून जास्तीस्त जास्त लोकांना पर्यंत share करत असतो काही विडिओ / पोस्ट क्रेडिट / delet बद्दल काही तक्रार असेल तर DM करू शकता आम्ही योग्य ते सहकार्य करू 😇❤️🚩 . . . . . . . . . .

#गुरु_सह्याद्री chhatrapati

जय शिवराय… मुंबईचा लाडका शुभंकर २०२२. 😍|| आगमण सोहळा २०२२ ||😍 . . या अप्रतिम छायाचित्रकारासाठी एक लाइक बनतोच. छायाचित्रक...
23/08/2022

जय शिवराय… मुंबईचा लाडका शुभंकर २०२२. 😍|| आगमण सोहळा २०२२ ||😍 . .

या अप्रतिम छायाचित्रकारासाठी एक लाइक बनतोच. छायाचित्रकार\Pc:.sam यांनी टीपलेले अप्रतिम छायाचित्र.

महाराष्ट्रातील अशाच अप्रतिम छायाचित्रांसाठी आत्ताच फाॅलो करा.

नोट:- ह्या पेज वर आपण महाराष्ट्रातील प्रत्येकाला जोडणार आहोत तरी लगेच फॉलो करा आणि आपल्या प्रत्त्येक मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी ह्या पेजच स्क्रीनशॉट काढुन तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि ला Tag करा. धन्यवाद 🙏


#गुरु_सह्याद्री

Rajgad Fort, Maharashtra ...⛳🙏 *Dm For Credits or removal*   #गुरु_सह्याद्री                                            ...
23/08/2022

Rajgad Fort, Maharashtra ...⛳🙏

*Dm For Credits or removal*



#गुरु_सह्याद्री
















About this Treks 👇Hello Trekkers and Travellers,We Guru Sahyadri Trekkers are really excited to announce below one day M...
22/07/2022

About this Treks 👇

Hello Trekkers and Travellers,
We Guru Sahyadri Trekkers are really excited to announce below one day Monsoon treks from pune for you.

1. Harishchandaragad and Kokankada trek
Date: 24th July (Sunday)
Departure: 23rd night (, Saturday, 9pm)
Group discount available

2. One day exploration tour to Raigad Fort
Date: 24th July (Sunday)
Departure: 23rd night (, Saturday, 9pm)
Group discount available

🔸Last few sests available.

🔸DM for Details and to book your seats.
Limited seats available

Guru Sahyadri Trekkers 🙏🚩

🔸Call/Whatsapp number: 8999795723, 8180908299

➖➖➖➖➖➖
#गुरू_सह्याद्री #रायगड

 #गडकोटांसाठी_स्वतंत्र_मंत्रालय_निर्माण_करावे...महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट...
18/07/2022

#गडकोटांसाठी_स्वतंत्र_मंत्रालय_निर्माण_करावे...

महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात विजयदुर्गची तटबंदी ढासळली होती. पन्हाळगडची तटबंदी अथवा बुरुज ढासळणे, हे तर नेहमीचेच झाले आहे. यावर ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मी झटत आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करून विजयदुर्ग तटबंदीचे काम सुरू करण्यास मंजुरी आणली होती. विशाळगडाच्या तटबंदी संवर्धनाचे काम सुरू केले आहे. रांगणा किल्ल्यासाठी भरीव निधी आणलेला आहे. पन्हाळगडच्या संवर्धनासाठी देखील मी पाठपुरावा करीत आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गराज रायगडच्या जतन संवर्धनाचे काम जोमाने सुरू आहे. रायगड प्राधिकरणच्या धर्तीवर केंद्राच्या ताब्यात असणारे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, शिवनेरी यांसारखे किमान १० महत्त्वाचे किल्ले सामंजस्य कराराद्वारे राज्य सरकारकडे देण्यात यावेत, यासाठी सदैव प्रयत्न केले. १५ व्या वित्त आयोगामार्फत गडकोटांसाठी भरीव निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला, ज्याला केंद्राकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे केवळ तात्पुरते उपाय करून आणि जुजबी डागडुजी करून गडकोटांचे संवर्धन होणार नाही. हा ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर त्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन व भरीव योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी माझी गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी आहे की, राज्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची अथवा किमान महामंडळाची निर्मिती करावी. विद्यमान राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेऊन यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही एक दुर्गप्रेमी म्हणून मी मागणी करीत आहे.

Reposted from

गुरू पौर्णिमेच्या सर्व सह्यभटक्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या साऱ्या भटकंती डोळस आणि सुखरूप व्हाव्यात हीच या सह्याचरणी प...
13/07/2022

गुरू पौर्णिमेच्या सर्व सह्यभटक्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या साऱ्या भटकंती डोळस आणि सुखरूप व्हाव्यात हीच या सह्याचरणी प्रार्थना 🙏🚩






















घराबाहेर पडा- मनसोक्त फिरा- मजा करा- उंदर जीवन जगा.. हेच तर आयुष्य आहे.📍Sarasgad fort,Raigad,Maharashtra Reposted from  ...
21/06/2022

घराबाहेर पडा- मनसोक्त फिरा- मजा करा- उंदर जीवन जगा.. हेच तर आयुष्य आहे.
📍Sarasgad fort,Raigad,Maharashtra
Reposted from



*heaven




About this Event 👇Harihar fort is located in the Nashik district of Maharashtra. It lies at an altitude of 3,676 ft from...
20/06/2022

About this Event 👇

Harihar fort is located in the Nashik district of Maharashtra. It lies at an altitude of 3,676 ft from the sea level.
The hill on which the fort is built looks like a rectangular shape from the base village. But it is built on the triangular prism of rock during the Yadava dynasty. The edges of the Harihar fort are almost vertical.
The attraction of Harihar fort is the iconic steps to the top of the fort. It is almost 80 degrees vertically inclined.

The Gondeshwar temple is an 11th-12th century Hindu temple located in Sinnar, a town in Maharashtra’s Nashik district. Sinnar Temple has a panchayatana design, with a main Shiva shrine and four subsidiary shrines dedicated to Surya, Vishnu, Parvati, and Ganesha.

*Date:* -
Batch 4 - 26th June (25th night departure)

Trekking Level: Medium
Duration: 1 Night / 1Day

*Pickup Point* -
Deccan Bus Stop – 9.00 PM
Shivajinagar(Mhasoba Gate) – 9.15 PM
Aundh – 9.30 PM
Jagtap Dairy – 9.40 PM
Nashik phata – 9.55 PM
Bhosari - 10.05

Group discount available

DM/Whatsapp/SMS or call us on given numbers for Booking and Itinerary.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

Do follow us for regular trek related updates.

PC:

इ.स.1630 - मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाल...
17/06/2022

इ.स.1630 - मोघल आक्रमण शहाजी राजे ,महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांच्या मदतीने निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुढे मोघल विजयी आणि माहुलीच्या तहात किल्ला मोघलांना स्वाधीन केला.

इ.स.1660 - छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंतांच्या आणि स्थानिक महादेव कोळी लोकांच्या मदतीने किल्ला स्वराज्यात घेतला आणि किल्ल्यावर पुन्हा स्थानिक महादेव कोळी यांची नेमणूक केली.

इ.स.1664 - सुरतेच्या स्वारीहून परतताना राजांनी किल्ल्याचा आश्रय घेतला हा किल्ला भौगोलिक दृष्टीने महत्वाचा होता.

इ.स.1688 - मोघलांची दक्षिण स्वारी, नाशिक आणि कल्याण मुघल सुभेदारांनी जव्हारच्या राजांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला.

इ.स.1720 - छत्रपती शाहूराजांबरोबर किल्ला मराठा साम्राज्यात आला.

इ.स.1750 - पेशवे यांनी राजूर प्रांत तयार केला.प्रांताचे मुखयालय रतनगड करून सुभेदार म्हणून महादेव कोळी जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली.

इ.स.1750-1790 - सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला.राजूर प्रांत संपन्न झाला आणि रतनगड किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढले

हा किल्ला(१६००-१७०० शतकात) मौल्यवान वस्तू,दागिने,रत्न, ठेवण्याचे एक ठिकाण होते.आणि १८२० नंतर ब्रिटीशांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतर गडावरील या वस्तु ताब्यात घेतल्या. गड पूर्ण दारुगोळा लावून नष्ट केला.तसेच पश्चिम घाटातील ज्या काही औषधी,जडीबुटी,शोधण्याचे ठिकाण या गडाकडे पाहिले जायचं.

पुराणात असा उल्लेख आहे, समुद्र मंथन झाल्या वर देव आणि दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले त्याच पंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच विष्णूने मोहीनी रुप धारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून त्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.

टीप: माहिती नेत साभार

Reposted from

महाराष्ट्र परकियांच्या गुलामगिरीत अडकलेला, रयत पिचलेली, परीकिय आणी स्वकिय जाहगिर दार आणी वतनदारांच्या त्रासाला कंटाळलेली...
06/06/2022

महाराष्ट्र परकियांच्या गुलामगिरीत अडकलेला, रयत पिचलेली, परीकिय आणी स्वकिय जाहगिर दार आणी वतनदारांच्या त्रासाला कंटाळलेली, बाया -बापड्यांची इज्जत राज-रोस लुटली जायची, ना कुणी वाली होता ना कैवारी, एवढी मोठी सह्याद्री रोज हुंदके द्यायची, कारन माणसांची हालत जनावरांन पेक्षा बत्तर असायची, जगण्याची फिकीर नव्हती मरनाची तमा नव्हती,सत्तासंघर्षाच्या सारीपाटावर मराठ्यांची नेहमी उपेक्षाच होती....
अण तो लाख मोलाचा दिवस उगवला,..
काळ हि जागीच थबकला..
माँ जिजाऊंच्या पोटी राजे तुम्ही
जन्मला ...
अन्याय, अत्याचार करनार्यांचे हात कलम केले जाऊ लागले,
बेईमानाना तुम्ही जबर शासन केले..
माणसान माणुस गोळा केला, त्यातुनच एक एक मावळा घडत गेला...
बघता बघता आवघा मुलूख एक झाला..
माझा राजा, ...
माझा शिवबा छत्रपती जहाला ,बत्तीस मण सुवर्ण सिंहासन सिध्द जहालं,..
स्वराज्याच्या रयतेला, महाराष्ट्राच्या मातीला सौभाग्य प्राप्त जहालं..
आवघा आसमंत उजाळून निघाला...
सुमारे ५०० वर्षांच्या इस्लामी गुलामगिरीच्या वरवंटा तुन पिचलेल्या मराठी मनाला उभारी देणारा हा क्षण अर्थात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा या दिवशी झाला देवगिरीच्या रामदेवरा यानंतर सुमारे चारशे वर्षानंतर मराठी राजा छत्रपती झाला ही फार मोठी गोष्ट झाली होती...
#शिवराज्याभिषेक
६ जून १६७४
६ जून २०२२

Reposted from

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदममहाराsssssजगडपतीगजअश्वपतीभूपतीप्रजापतीसुवर्णरत्नश्रीपतीअष्टवधानजागृतअष्टप्रधानवेष्टितन्या...
06/06/2022

आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम

महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो 🚩🚩

नगारखान्यात नगारा वाजतोय 🥁
रायगडी आवाज घुमतोय, 
गनिमांचा उडवुनी फज्जा
माझा 'राजा सिंहासनी' बसतोय..
'मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाहला,
ही गोष्ट काही सामान्य न जाहली!!🚩
📯 #शिवराज्याभिषेकदिन 📯
🚩६ जुन, १६७४🚩
📷 Picture by 
                                                              

शिवराज्याभिषेकासाठी_६_जूनच_का ? वाचा 👇याची उकल केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तर मिळेलच,सोबतच छत्रपती शिवरायां...
05/06/2022

शिवराज्याभिषेकासाठी_६_जूनच_का ? वाचा 👇

याची उकल केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तर मिळेलच,
सोबतच छत्रपती शिवरायांना भारतीय उपखंडातील हवामान आणि भौगोलिक परिस्थितीविषयी किती सखोल ज्ञान होते याची प्रचितीही येईल.
शिवरायांच्या काळात नैऋत्य मान्सून वारे, अक्षांश, रेखांश, हवेच्या कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे, अल निनो-ला निनो वगैरे संकल्पना नव्हत्या.
केवळ निरीक्षणं आणि अनुमान यावरच नैसर्गिक स्थितीचा अंदाज लावला जायचा.
भारतात सर्वसाधारणपणे ७ किंवा ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो.
हा दिवस सहसा बदलत नाही.
सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश म्हणजे आपल्याकडे अधिकृतरित्या पावसाळ्याची सुरुवात मानली जाते.
त्यामुळे दरवर्षी ७ जूनच्या आधीच शेतकरी आपापल्या शेतांची मशागत,
जनावरांच्या चाऱ्याची झाकणी, पावसाळाभर पुरेल अशा सरपणाची सोय वगैरे कामे पूर्ण करुन पेरणीसाठी निवांतपणे पावसाची वाट पाहत बसलेला असतो.
हा असा काळ असतो जेव्हा उन्हाळ्याची धग कमी झालेली असते.
आकाश निरभ्र असते.
वारे वाहत असतात.
अधूनमधून उनसावलीचा खेळ सुरु असतो.
वातावरण आल्हाददायक असते.
दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे एकदा का सह्याद्रीत विशेषतः कोकणात पावसाने मुक्काम ठोकला की तो लवकर जात नाही.
नद्या भरुन वाहत असायच्या.
वाटा बंद झालेल्या असायच्या त्यामुळे शत्रू देखील पावसाळ्याच्या काळात सह्याद्रीकडे फिरकायचे धाडस करत नसायचे,
त्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा काळ योग्य होता.
राज्याभिषेकासाठी गोरगरीब रयतेला, शेतकऱ्यांना येता यावे, शत्रूची भीती नसावी, वातावरण सोयीचे असावे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांनी आपल्या #राज्याभिषेक साठी
६ जून १६७४ किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ हा दिवस निवडला.
महाराजांचा नक्षत्रांचा शास्त्रीय अभ्यास कामी आला.
राज्याभिषेकासाठी दिवस निवडताना राजांनी पाऊस हा एक महत्वाचा घटक डोळ्यासमोर ठेवला होता.
आज केवळ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे म्हणुन तिथीनुसारच शिवराज्याभिषेक करायचा म्हटलं, तर ही तिथी अनेकदा मागेपुढे होते, कधी कधी ती १८ जूनपर्यंत लांबते.
अशा काळात कोकणात मुसळधार पावसाची सुरुवात झालेली असते.
प्रवासाच्या दृष्टीने घाटमार्ग सुरक्षित नसतात.
केवळ तिथीचा अट्टाहास करुन राज्याभिषेक साजरा करायचा आणि शिवरायांनी हा राज्याभिषेक मृग नक्षत्र सुरु व्हायच्या आधीच का करवुन घेतला हे अभ्यासणे महत्वाचे,
महाराज डोक्यात न घालून घेता, त्यांना डोक्यावरच घेऊन नाचवायचे असेल तर मग काय उपयोग ?

Address


Telephone

+918999795723

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when guru_sahyadri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to guru_sahyadri:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share