11/12/2021
https://www.youtube.com/watch?v=q2ebzGnUNvs
ढाक बहिरी - हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरी चा वापर आजूबाजूच्या( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. ढाक बहिरी किल्ला आणी या किल्ल्याच्या जवळच असणारा कळकराय हा सुळका इतिहास प्रेमी, गिर्यारोहक , साहस प्रेमी यांना आकर्षित करतो. कर्जत डोंगररांगेत येणारा हा ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. ढाक भैरीला जाताना प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा जणू कस लागतो. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या उद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे. ढाक किल्ल्या वरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. येथ पर्यंत जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो. गुहेमध्ये पाण्याची २ मोठी टाक आहेत. यातील एका टाक्यामधील पाणी पिण्यासाठी वापरतात तर यातील दुस-या टाक्यांमध्ये गावकयांनी जेवणासाठी व जेवण बनवण्यासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवली जातात. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. ढाक बहिरीला पोचण्यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने, जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर कोंडेश्वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोळी 90 अंशा मधे उभी असणारी खिंड लागते. ही खिंड ढाकचा किल्ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड उरण्यासाठी जाडजूड लोखंडी साखळ्या व रोप लावण्यात आले आहेत. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे अवघड आहे. अतिउत्साही पणे जाऊन किंवा कोणत्याही सुरक्षिततेच्या साधनसामुग्री शिवाय जाऊन तेथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
आमच्या Trek-Diary Marathi Vlog या युट्युब चॅनलला अवश्य subscribe करा.
कृपया आपल्या अन्य मित्र मंडळींना व अन्य ग्रुपवर अवश्य फॉरवर्ड करा.
ढाक बहिरी - हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्य.....