18/12/2020
👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवास सवलतीबाबत सविस्तर माहिती
1⃣➖ पुरुष ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय ६० वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त.
2⃣➖ स्त्री ज्येष्ठ नागरिक सवलतीचे वय ५८ पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त.
3⃣ ➖पुरुषांना 40 % रेल्वे प्रवासी भाडे सवलत.
4⃣➖ स्त्रियांना 50% रेल्वे भाड़े सवलत.
5⃣➖मेल/ एक्सप्रेस/राजधानी/ शताब्दी/ जनशताब्दी/ दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्यामध्ये कोणत्याही श्रेणी मध्ये ही सवलत मिळणार.
6⃣➖रेल्वे आरक्षण / अथवा सर्व साधारण तिकीट काढताना कोणताही वयाचा दाखला द्यावयाची आवश्यकता नाही.
7⃣➖परंतु रेल्वे प्रवास करतांना मात्र रेल्वे तिकीट तपासणीस ( TC ) ने मगितल्यास वयाचा दाखला संबंधित पुरावा म्हणून पैनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालन परवाना अथवा कोणतेही फ़ोटो असलेले शासनमान्य ओळखपत्र देणे अनिवार्य.
8⃣➖ज्येष्ठ नागरिक आपले रेल्वे तिकिट कोणत्याही तिकिट / आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेटद्वारे खरेदी करू शकता.
9⃣➖प्रवासी आरक्षण पद्धती (PRS) मध्ये ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, तसेच जांचे वय 45 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अशांना रेल्वेत प्रवास करताना लोअर बर्थची आरक्षित सेवा दिली जाते.
🔟➖प्रत्येक रेल्वे प्रवासी गाड़ीमध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 बर्थ, एसी -3 ,एसी-2 मध्ये 3 बर्थ राजधानी/दूरंतोमध्ये 4 बर्थवरील आरक्षणसाठी नियोजित राहणार आहेत.
🆓➖ ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी यांना व्हील चेयर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
🆕➖ तसेच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनीस (अधिकृत कुली) हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे.
🆕➖ रेल्वे प्रशासनद्वारे काही महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये आजारी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवासीसाठी बैटरीवर चालणारी आधुनिक व्हीलचेयर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
➡➖ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आणि आजारी रेल्वे प्रवासीच्या सेवेसाठी IRCTC विशेष ‼️यात्री मित्र सेवा‼️ अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरू केली आहे. वरील सवलतीसाठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकता.
✅ रेल्वे प्रवासी गाडी सुटल्यानंतर वरील सवलतीचे आरक्षित लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे तिकिट तपासणीस वेटिंग चार्टमधील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्रथम प्राध्यान्य देऊन उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवाशांना देऊ शकतात.
➖वरील सर्व महत्त्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवाशापर्यंत पोहचवावी आणि गरजुंनी त्याचा लाभ घ्यावा.