Konkan Tourism Regional Office - Navi Mumbai

  • Home
  • Konkan Tourism Regional Office - Navi Mumbai

Konkan Tourism Regional Office - Navi Mumbai Local travel - Konkan Region
(1)

18/11/2023

Charni Mask- Bohada festival Jawhar Tourism

18/11/2023
आदिवासी कला संस्कृती आणि पर्यटन महोत्सव जव्हार 2023 दिनाक  १८.११.२०२३ आणि १९.११.२०२३ चे उद्घाटन  आज मा अप्पर जिल्हाधिकार...
18/11/2023

आदिवासी कला संस्कृती आणि पर्यटन महोत्सव जव्हार 2023 दिनाक १८.११.२०२३ आणि १९.११.२०२३ चे उद्घाटन आज मा अप्पर जिल्हाधिकारी पालघर श्री भाऊसाहेब फटांगरे यांचे हस्ते करण्यात आले या उद्घाटन वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जव्हार नगरपरिषद श्रीमती कांबळे , उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार शैलेश काळे, उपसंचालक पर्यटन पर्यटन संचालनालय कोकण विभाग श्री हनुमंत हेडे तसेच संगीत नाटक अकॅडमी चा पुरस्कार प्राप्त झालेली श्री भीकलया लडकाया धिंड्या आदी मान्यवर उपस्थित होते. आदिवासी कला व संस्कृती पर्यटन महोत्सव 2023 मध्ये आदिवासी हस्तकला चे विविध 16 स्टॉल लावण्यात आलेले आहे यामध्ये वारली पेंटिंग, स्थानिक विविध वस्तूंचे प्रदर्शन, लावण्यात आली आहे. या महोत्सवात आदिवासी संस्कृती कार्यक्रम -तारपा नृत्य, टिपरी नृत्य, तूर नृत्य, कामडी नृत्य आणि पोहाडा मुखवडा सादरीकरण असे विविध कार्यक्रम आहेत पर्यटकांनी यांचा आनंद घ्यावा.

17/11/2023

आदिवासी कला,संस्कृती व पर्यटन महोत्सव, 2023

ऐतिहसिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या निसर्गरम्य जव्हारमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी पर्यटन महोत्सव मध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.

या प्रदेशात राहणार्‍या आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे

आपण सर्व पर्यटक मिळून या महोत्सवाला भेट देऊन शोभा वाढवूयात...

Jawhar Tourism

17/11/2023

आदिवासी कला,संस्कृती व पर्यटन महोत्सव, 2023

ऐतिहसिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या निसर्गरम्य जव्हारमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी पर्यटन महोत्सव मध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.

या प्रदेशात राहणार्‍या आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे

आपण सर्व पर्यटक मिळून या महोत्सवाला भेट देऊन शोभा वाढवूयात...

Jawhar Tourism
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🎊

"आदिवासी कला,संस्कृती व पर्यटन महोत्सव"ऐतिहसिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या निसर्गरम्य जव्हारमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबर 2...
17/11/2023

"आदिवासी कला,संस्कृती व पर्यटन महोत्सव"

ऐतिहसिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या निसर्गरम्य जव्हारमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी पर्यटन महोत्सव मध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला आनंद होत आहे.
या प्रदेशात राहणार्‍या आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे

आपण सर्व पर्यटक मिळून या महोत्सवाला भेट देऊन शोभा वाढवूयात...
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🎊

Jawhar Tourism

11/11/2023
पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प चालवत असलेल्या किंवा नवीन प्रकल्प उभारू इच्छित असलेल्या महिला उद्योगांसाठी रुपये 15 लाख कर्जा...
11/11/2023

पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प चालवत असलेल्या किंवा नवीन प्रकल्प उभारू इच्छित असलेल्या महिला उद्योगांसाठी रुपये 15 लाख कर्जावरील "व्याज परतावा" पर्यटन संचालनालय कडून देण्यात येणार आहे. यासाठी महिला उद्योजकांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना,मार्गदर्शक सूचना आणि प्रतिज्ञापत्र सोबत जोडलेले आहे.

पर्यटन व्यवसायात कार्यरत असलेल्या महिला उद्योजकांनी व्याज परतावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्यात यावेत असे आव्हान करण्यात येत आहे.
Regards
Hanumant Hede
Dy Director Tourism
Directorate of Tourism
Kokan division new Mumbai

पर्यटन स्थळांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात वकृत्व स्पर...
15/09/2023

पर्यटन स्थळांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात वकृत्व स्पर्धा आयोजित करणे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण चा विकास होईल त्या अनुषंगाने सातवी वर्गाच्या वरील विद्यार्थ्यां युवा टुरिझम क्लब स्थापन करण्यासाठी शाळा कॉलेज यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे

पर्यटन संचालनालय मुंबई यांचे सोलापूर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर च्या कॉलेजचे ऍडमिशन सुरू झालेल...
01/09/2023

पर्यटन संचालनालय मुंबई यांचे सोलापूर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सोलापूर च्या कॉलेजचे ऍडमिशन सुरू झालेली आहे इच्छुकांनी ऍडमिशन घेण्याच्या संधीचा लाभ घ्यावा

12/08/2023

आंबोली वर्षा महोत्सव २०२३ चे उद्घाटन मा.शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला

दिनांक 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीत आंबोली वर्षात महोत्सव 2023 आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन माननीय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांच्या हस्ते संपन्न केले याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अगरवाल , माजी आमदार श्री राजन तेली, श्री प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष भाजप, श्री नवल किशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी, श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन, पर्यटन संचालनालय, श्री गोसावी मुख्य लेखाधिकारी पर्यटन संचालनालय, उपविभागीय अधिकारी श्री प्रशांत पणवेकर, तहसीलदार श्री श्रीधर पाटील, श्री बाबा मुंडकर अध्यक्ष सिंधुदुर्ग पर्यटन महासंघ,आंबोली सरपंच श्रीमती सावित्रीबाई पालेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

11/08/2023

आंबोली वर्षा महोत्सव २०२३

आंबोली वर्षा महोत्सव २०२३
11/08/2023

आंबोली वर्षा महोत्सव २०२३

पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई द्वारे टूर ऑपरेटर आणि टूर गाईड यांचे नेटवर्किंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राजीव ग...
28/07/2023

पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई द्वारे टूर ऑपरेटर आणि टूर गाईड यांचे नेटवर्किंग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राजीव गांधी नॅशनल पार्क बोरवली मुंबई येथे चर्चासत्र आयोजित केले.

Ratnagiri as a tourist destination and accommodation facilities has developed by  entrepreneur. Tourist can enjoy the sa...
21/06/2023

Ratnagiri as a tourist destination and accommodation facilities has developed by entrepreneur. Tourist can enjoy the said facilities in Ratnagiri.

Directorate of Tourism (DoT)is inviting you to a scheduled Zoom meeting.Topic: पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई  आय...
15/05/2023

Directorate of Tourism (DoT)is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई आयोजीत - जागतीक कृषी पर्यटन दिनानिमित्त चर्चासत्र
Time: May 16, 2023 11:30 AM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/82913172870?pwd=VGdaSG1iTHJwOGwzVzIwUDBuRDc0UT09

Meeting ID: 829 1317 2870
Passcode: 956217

आदरणीय प्रधान सचिव पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांचे अभिप्रायhttps://youtube.com/watch?v=IyuPTx4LC_E&fea...
22/01/2023

आदरणीय प्रधान सचिव पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांचे अभिप्रायhttps://youtube.com/watch?v=IyuPTx4LC_E&feature=share

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
01/01/2023

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

04.12.2022  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाशी निगडित बुधिस्ट सर्किट अंतर्गत चवदार तळे - गांधरपाली बुद्ध लेणी -महाड येथ...
04/12/2022

04.12.2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाशी निगडित बुधिस्ट सर्किट अंतर्गत चवदार तळे - गांधरपाली बुद्ध लेणी -महाड येथे दिनांक 04.12.2022 रोजी एकदिवसीय सहल आयोजीत केली होती या सहलीत 31 पर्यटकांचा समावेश होता. ही सहल निःशुल्क होती या मध्ये बस व्यवस्था, सकाळ ब्रेक फास्ट, दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा आणि बिस्कीट, गाईड, टूर लीडर अशी सुविधा देण्यात आली. पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

03/12/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाशी निगडित बुधिस्ट सर्किट अंतर्गत चवदार तळे - गांधरपाली बुद्ध लेणी -महाड येथे दिनांक 03.12.2022 रोजी एकदिवसीय सहल आयोजीतकेली होती या सहलीत 30 पर्यटकांचा समावेश होता. ही सहल निःशुल्क होती या मध्ये बस व्यवस्था, सकाळ ब्रेक फास्ट, दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा आणि बिस्कीट, गाईड, टूर लीडर अशी सुविधा देण्यात आली. पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि पर्यटकांचे अभिप्राय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाशी निगडित बुधिस्ट सर्किट अंतर्गत चवदार तळे - गांधरपाली बुद्ध लेणी -महाड येथे दिनांक 03....
03/12/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाशी निगडित बुधिस्ट सर्किट अंतर्गत चवदार तळे - गांधरपाली बुद्ध लेणी -महाड येथे दिनांक 03.12.2022 रोजी एकदिवसीय सहल आयोजीतकेली होती या सहलीत 30 पर्यटकांचा समावेश होता. ही सहल निःशुल्क होती या मध्ये बस व्यवस्था, सकाळ ब्रेक फास्ट, दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा आणि बिस्कीट, गाईड, टूर लीडर अशी सुविधा देण्यात आली. पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

30/11/2022

तारपा कला जव्हार जि पालघर

आज दिनांक 30.11.2022 रोजी पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई आणि केशव सृष्टी ग्राम विकास योजना केंद्र जव्हार यांचे सं...
30/11/2022

आज दिनांक 30.11.2022 रोजी पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई आणि केशव सृष्टी ग्राम विकास योजना केंद्र जव्हार यांचे संयुक्त विद्यमाने पर्यटन कार्यशाळा दिव्य विद्यालय जव्हार येथे आयोजीत करण्यात आली होती सदर कार्यशाळेमध्ये पर्यटन विभागाच्या विविध योजना, पर्यटन स्थळातील संधी, साहसी पर्यटन धोरण आणि रेजिस्ट्रेशन, कृषी पर्यटन आणि साहसी पर्यटन यांची सांगड घालून कशाप्रकारे पर्यटन वाढवता येईल याविषयी माहिती देण्यात आली.या कार्यशाळेसाठी सुमारे 85 प्रशिक्षणार्थी जव्हार तालुक्याच्या वेगवेगळया भागातून उपस्थित होते. या कार्यशाळेत श्री हनुमंत हेडे उपसंचालक पर्यटन कोकण विभाग नवी मुंबई, श्री संजय नाईक आणि श्वेता नाईक संचालक निसर्ग पर्यटन, श्री वैभव घोलप संचालक जव्हार टुरिझम , श्रीमती प्रमिला कोकड सचिव दिव्या विद्यालय आणि श्री कैलाश कुरकुटे केन्द्र प्रमुख , केशव सृष्टी ग्राम विकास योजना इत्यादीनी मार्गदर्शन केले

दिनाक 03.12.2022 , 04.12.2022 ,07.12.2022 आणि 08.12.2022 यादिवशी चवदार तळे - गांधार लेणी  .... सहल एका ऐतहासिक पर्वाची ए...
30/11/2022

दिनाक 03.12.2022 , 04.12.2022 ,07.12.2022 आणि 08.12.2022 यादिवशी चवदार तळे - गांधार लेणी .... सहल एका ऐतहासिक पर्वाची एक दिवसीय मोफत सहल ...

जव्हार जिल्हा पालघर येथे निसर्ग पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटन क्षेत्रात स्थानिकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यावर आ...
29/11/2022

जव्हार जिल्हा पालघर येथे निसर्ग पर्यटन वाढीसाठी आणि पर्यटन क्षेत्रात स्थानिकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यावर आधारित पर्यटन कार्यशाळा दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित केली आहे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोंकण टूर सर्कीट कार्यक्रमाचा शुभारंभ चवदार तळे / गंधारपाले लेणी - सहल एका ऐतिहासिक पर्वा...
27/11/2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोंकण टूर सर्कीट कार्यक्रमाचा शुभारंभ

चवदार तळे / गंधारपाले लेणी - सहल एका ऐतिहासिक पर्वाची.....

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय कोकण विभाग व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल व सांस्कृतीक कार्यक्रमाचा शुभारंभ आज महाड येथिल चवदार तळे या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व अस्पृश्यता निवारणाची नांदी जेथे झाली तेथे करण्यात आला. त्याच प्रमाणे चवदार तळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील सभागृह येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले. बार्टी येथे संविधान गौरव परीक्षेचे व प्रा. डाॅ वाघमारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

२६ नोव्हेंबर संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनाचे औचित्य साधत चवदार तळे, महाड येथे मा. श्री. किसन जावळे (अतिरिक्त विभागीय आयुक्त कोंकण विभाग) याचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोकण टूर सर्किटच्या लीफलेटचे आणि संस्कृती कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत रायगड जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक पर्यटन श्री हनुमंत हेडे , उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड , तहसिलदार महाड श्री सुरेश काशीद , मुख्याधिकारी महाड श्री महादेव रोडगे, गट शिक्षणाधिकाऱी श्रीम सुनिता चांदोरकर, कोंकण मराठी साहित्य परिषद, चवदारतळे साहित्यमंच , चवदार तळे विचारमंच, महाड तालुका गृहनिर्माण संस्था महासंघ चे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती श्री. हनुमंत हेडे - संचालक कोकण विभाग पर्यटन संचालनालय यांनी दिली.

*चवदार तळे माहिती*
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्हयातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळयाचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन " म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली ही पहिली सामायिक कृती होती.

*गंधार पाले लेणी माहिती -*
*हा एकूण २९ लेण्यांचा समुह
*३ चैत्यगृह व १९ विहार आहेत.
*लेणे क्र. १ मध्ये ५३ फुट लांब व 4 फुट रुंद ओसरी आहे. गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मुर्ती व धम्मचक्र कोरलेली आहेत. लेणे क्र. २१ मध्ये गौतम बुद्ध यांची बसलेली मुर्ती, त्यांचे शिष्य व हरिणाची चित्र कोरली आहेत.
*येथील शिलालेख नुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कुंभोज वंशिव राजा विष्णू पुलित यांच्या कारकीर्दित ई.स. १३० च्या आसपास निर्माण केली गेली.
*येथील शिलालेखानुसार ई.स. बौद्ध संघाला सावकारांकडून देणगी व जमिनी मिळाल्याची नोंद आहे.

*महापर्यटन l* मुंबई l लंडन येथे गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असलेला स्टॉल ठरणार लंडन मधील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबि...
07/11/2022

*महापर्यटन l* मुंबई l लंडन येथे गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असलेला स्टॉल ठरणार लंडन मधील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू l आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास होणार मदत... पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत राज्यातील ही माहिती पोहचण्यास होणार मदत... पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

जागतिक पर्यटन 2022 दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यां...
22/09/2022

जागतिक पर्यटन 2022 दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर 2022 या कालावधीत ठाणे परिसरातील गणपतीचे एक दिवसीय सहली आयोजित कर...
11/09/2022

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिनांक एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर 2022 या कालावधीत ठाणे परिसरातील गणपतीचे एक दिवसीय सहली आयोजित करण्यात आले होत्या यात सहलीत 220 ज्येष्ठ नागरिकांनी भाग घेतला होता सहलीतील ज्येष्ठ नागरिकांचे अभिप्राय या बातमीत दिलेली आहेत

01/09/2022

दिनाक 01.09.2022 रोजी ठाणे गणपती दर्शन जेष्ठ नागरिक यांनी पर्यटन संचालनालय यांनी आयोजित केलेल्या सहलीवर feed back

बातमी"पर्यटन संचालनायमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी  गणेश दर्शनसाठी "विना शुल्क  विशेष सहलीचे आयोजन"....आजादीच्या अमृत महोत्स...
01/09/2022

बातमी
"पर्यटन संचालनायमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी गणेश दर्शनसाठी "विना शुल्क विशेष सहलीचे आयोजन"....

आजादीच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि ठाणे महानरपालिकेच्या संयुक्त विद्याने जेष्ठ नागरिकांसाठी" गणेश दर्शन साठी विना शुल्क विशेष सहली "आयोजित करण्यात येत आहेत. ठाणे परिसरातील
खेवरा सर्कल सार्वजानिक गणपती ,जय भवानी नगर सार्वजनिक गणपती,जनजागृती मित्र मंडळ (किसन नगर 3), सूर्योदय मित्र मंडळ (ठाण्याचा इच्छापूर्ती गणपती) किसन नगर 2, गांधी नगर चा शिवसमर्थ मित्र मंडळ आणि पंचशील मित्र मंडळ (खोपत ) या ठिकाणी आयोजीत करण्यात येत आहेत.
सहलीमध्ये एसी बस, अल्प उपहार, पाण्याची बॉटल आणि एक पर्यटन गाईड इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे . त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी एक नर्स/ब्रदर असणार आहेत त्याच बरोबर प्राथमिक उपचार काही औषध संच असणार आहे. या सहली विना शुल्क आयोजित केलेल्या आहेत

आज दिनांक 01.09.2022 रोजी 14 जेष्ठ नागरिकांनी या सहलीत सहभाग घेऊन गणपती चे दर्शन घेऊन अधायत्मिक आनंद घेतला आणि पर्यटन ही केले.
या सहली आता 2, 5,6 आणि 7 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 3.30. वाजता ठाणे शहरातील सहली तलाव पाली (गडकरी रंग गायातन सर्कल)- घंटाळे ,ठाणे आणि वाघ भिळ नाका - घोडबंदर रोड ,ठाणे, माजिवडा बस टॉप , माजिवडा ठाणे येथून निघणार आहेत. या सहली साठी निवड "प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य " या तत्त्वावर नोदणी करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकना ऑनलाईन नोदणी करता येईल किंवा ऑफ लाईन ही श्री प्रशांत वाणी उपअभियंता कोकण विभाग नवी मुंबई याचे कडे या 9029581601 किंवा कल्याणी पाटील 7030780802 या भ्रमणध्वनी फोन करून नाव नोदणी करता येईल. एका सहलीत जास्ती जास्त 25 ते 30 वरीष्ठ नागरिकाचा समावेश असणार आहे. www. maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर किंवा खालील नंबर वर नोंदणी करता येईल अधिक माहितीसाठी 9029581601 किंवा 7030780802 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री हनुमंत हेडे , उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे.

"पर्यटन संचालनायमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी  गणेश दर्शनसाठी "विना शुल्क  विशेष सहलीचे आयोजन"....आजादीच्या अमृत महोत्सवाचे ...
31/08/2022

"पर्यटन संचालनायमार्फत जेष्ठ नागरिकांसाठी गणेश दर्शनसाठी "विना शुल्क विशेष सहलीचे आयोजन"....

आजादीच्या अमृत महोत्सवाचे निमित्ताने पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय आणि ठाणे महानरपालिकेच्या संयुक्त विद्याने जेष्ठ नागरिकांसाठी" गणेश दर्शन साठी विना शुल्क विशेष सहली "आयोजित करण्यात येत आहेत. ठाणे परिसरातील
खेवरा सर्कल सार्वजानिक गणपती ,जय भवानी नगर सार्वजनिक गणपती,जनजागृती मित्र मंडळ (किसन नगर 3), सूर्योदय मित्र मंडळ (ठाण्याचा इच्छापूर्ती गणपती) किसन नगर 2, गांधी नगर चा शिवसमर्थ मित्र मंडळ आणि पंचशील मित्र मंडळ (खोपत ) या ठिकाणी आयोजीत करण्यात येत आहेत.
सहलीमध्ये एसी बस, अल्प उपहार, पाण्याची बॉटल आणि एक पर्यटन गाईड इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे . त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी एक नर्स/ब्रदर असणार आहेत त्याच बरोबर प्राथमिक उपचार काही औषध संच असणार आहे. या सहली विना शुल्क आयोजित केलेल्या आहेत या सहली दिनांक 1, 2, 5,6 आणि 7 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 3.30. वाजता ठाणे शहरातील सहली तलाव पाली (गडकरी रंग गायातन सर्कल)- घंटाळे ,ठाणे आणि वाघ भिळ नाका - घोडबंदर रोड ,ठाणे, माजिवडा बस टॉप , माजिवडा ठाणे येथून निघणार आहेत. या सहली साठी निवड "प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य " या तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन नोदणी केल्यास सहलीत सहभागी होता येणार आहे ज्या जेष्ठ नागरिकांना रजिस्ट्रेशन करण्यास अडचण येत आहेत त्यांनी खालील कर्मचाऱ्यांकडे ऑफ लाईन ही रजिस्ट्रेशन करता येईल . एका सहलीत जास्ती जास्त 25 ते 30 वरीष्ठ नागरिकाचा समावेश असणार आहे. www. maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर किंवा खालील नंबर वर नोंदणी करता येईल अधिक माहितीसाठी 9029581601 किंवा 7030780802 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री हनुमंत हेडे , उपसंचालक (पर्यटन) पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांनी केले आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Tourism Regional Office - Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share