24/03/2024
महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉईंटपासून पश्चिमेकडे सुरू होणाऱ्या डोंगररांगेवर चंद्रगड किल्ला आहे. गडावर जननी मंदिर आणि राजेशाही निवासस्थान यांचे अवशेष आहेत. धवलेश्वर महादेव या नावाने ओळखले जाणारे एक शिवमंदिर आहे. किल्ल्यावर दोन पाण्याची टाकी आहेत, एक उत्तरेला आणि एक जवळच आहे. हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी बांधला आणि नंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून जिंकला. महाबळेश्वरमधील आर्थर सीट पॉईंट येथे ट्रेक सुरू करता येतो. किल्ल्यतपासून जवळ उमरठ गाव म्हणजे शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची आठवण.
रायगड, तालुका पोलादपूर येथे असलेल्या ढवळे गावापासून ट्रेकचा मार्ग सुरू होतो. पोलादपूर ते ढवळे अंतर 20-25 किमी आहे. वाट छोट्या शेलारवाडी वस्तीतून जाते.