19/05/2024
#फिरस्ता जंगल भ्रमंती
गेले 15-20 दिवस जंगल भ्रमंती सुरु असल्यामुळे लिखाणाला जरा कमीच वेळ मिळाला..
आधी पेंच आणि त्यानंतर लगेच ताडोबा..😊
मार्च-एप्रिल मधला उन्हाळ्याचा पुणेरी पाहुणचार घेतल्यामुळे जरा जास्तच तयारीनीशी खास वैदर्भीय उन्हाचा पाहुणचार घ्यायला नागपुरात दाखल झालो..(सुदैवाने ह्यावेळी इकडचा उन्हाळा बराच सुसह्य होता..आम्ही जायच्या आधीच पावसाने हजेरी लावल्यामुळे अर्थात).
आणि आमच्या पहिल्या मोहिमेला सुरुवात झाली..
"Pench Tiger Reserve..!!"
एक बरं आहे पेंच ला आपण 2-2.5 तासातचं नागपूरहून पोहचून जातो.
पेंच चे जंगल हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अश्या 2 राज्यांमध्ये विभागले गेले आहे..पैकी आमचा मुक्काम होता, MP Pench मध्ये..
आपण जंगलात पोचलो कि खरंच त्या जंगलाचे आपण कधी होऊन जातो ह्याचे भान राहतच नाही..अगदी तसेच आम्हा सगळ्याचेचं झाले होते..
काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये टिपायची संधी नक्कीच मिळाली ह्या 3-4 दिवसांमध्ये..
पण खरंच याची देही याची डोळा जंगल अनुभवणं ही गोष्टच वेगळी..
awaiting for some more... 😊
- संकेत मोडक (पुणे)
+91 92252 45752