Visit Hemalkasa

  • Home
  • Visit Hemalkasa

Visit Hemalkasa An initiative of Tukai Social Tourism, Pune. An attempt to connect people with The Legendary Amte Fa

Tukai Tourism Pvt Ltd is expanding its horizons beyond Social Tourism. Now we are at your service in Leisure as well as Heritage, Adventure Tourism too.

13/09/2022

दोन महिन्यानंतर प्रकाश काकांची आणि त्यांच्या परिवाराची भेट झाली. हे जगावेगळे नाते आपल्याला केवळ हेमलकसा येथेच पाहायला मिळते. हेमलकसा ला भेट देण्यास आपण सर्वजण निमंत्रित आहात. अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करावा. 9403496101.

दोन हुन अधिक महिने पुण्यात वैद्यकीय उपचारांनातर डॉ. प्रकाश आमटे सुखरूप लोक बिरादरी प्रकल्प अशोकावन येथे पोहचले आहेत. प्र...
27/08/2022

दोन हुन अधिक महिने पुण्यात वैद्यकीय उपचारांनातर डॉ. प्रकाश आमटे सुखरूप लोक बिरादरी प्रकल्प अशोकावन येथे पोहचले आहेत. प्रकृती मध्ये लक्षणीय सुधारणा आहे. केमोथेरपी नंतर वजन कमी झाले आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा करिता आभारी आहोत. थोडे दिवस लोटल्यानंतर डॉक्टरांच्या सहमतीने डॉ प्रकाश आमटे यांची भेट घेता येईल. प्रकल्पबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास, मदत करण्यास, भेट देण्यास या पेजवर मेसेज करावा. धन्यवाद.

सप्रेम नमस्कार....गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सु...
25/08/2022

सप्रेम नमस्कार....
गेली अडीच महिने पुण्यात Dinanath Mangeshkar Hospital येथे कॅन्सर वरील उपचार घेऊन बाबांची तब्येत आता सुधारली आहे. 5 केमोथेरपी ने काम केले आहे. आज हाताचे प्लॅस्टर काढले. केमोथेरपी सुरू असतांनाच खोलीत अडखळून पडल्याने मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्याला आज दीड महिना झाला म्हणून प्लॅस्टर काढले. आज दवाखान्यात डॉक्टरांनी फॉलोअप साठी बोलावले होते. समाधानकारक सुधारणा असल्याने येत्या शुक्रवारी डॉक्टरांनी नागपूरला जायची परवानगी दिली आहे. तो आनंद वेगळा आहे.
मधले काही दिवस त्यांच्यासाठी आणि आमच्या साठी अतिशय खडतर गेले. 2 महिने सलग ताप आणि न्युमोनिया मुळे 9 किलो वजन कमी झाले आहे. असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर सारखा भयंकर आजार कोणालाही होऊ नये अशी निसर्गाला प्रार्थना करतो.
DMH मधील डॉक्टरांचे अथक प्रयत्न, तेवढ्याच प्रेमाने नर्स आणि स्टाफ यांनी केलेली सेवा आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा याच मुळे बाबा बरे होत आहेत. कुठल्याही इन्फेक्शनचा धोका होऊ नये म्हणून सध्या गर्दी टाळावी असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांनी डॉक्टरांच्या परवानगीने बाबा सर्वांना भेटू शकतील.
आम्ही सर्व कुटुंबीय आपले खूप खूप आभारी आहोत.🙏🏻 पुण्यात 75 दिवस वास्तव्य असताना अनेकांनी विविध मार्गाने सहकार्य केले. लोभ असावा असाच कायम.
आपला नम्र,
अनिकेत आमटे

04/07/2022
पुन्हा ताप असल्याने ऍडमिट :-डॉ प्रकाश आमटे यांना काल (दि. 27 जून रोही) परत admit केले आहे. आता सर्व visitors ला प्रवेश ब...
28/06/2022

पुन्हा ताप असल्याने ऍडमिट :-
डॉ प्रकाश आमटे यांना काल (दि. 27 जून रोही) परत admit केले आहे. आता सर्व visitors ला प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. प्रकाश काकांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. जे काही असेल अपडेट ते येथे आपल्याला कळवले जातील.

Good news 😊 Dr Prakash Amte's cancer is curable...
21/06/2022

Good news 😊 Dr Prakash Amte's cancer is curable...

डॉ प्रकाश आमटे यांची तब्येत आता बरी आहे. काल सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या स...
18/06/2022

डॉ प्रकाश आमटे यांची तब्येत आता बरी आहे. काल सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. 2-3 दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड values ठीक असल्यास लवकरच (8-10 दिवसात) किमो थेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे.

बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.

_अनिकेत आमटे..

डॉ प्रकाश आमटे    प्रकृती मध्ये चांगली सुधारणा आहे. अतिशय प्रेमाने उपचार करणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचे तसेच हॉस्पिट...
17/06/2022

डॉ प्रकाश आमटे प्रकृती मध्ये चांगली सुधारणा आहे. अतिशय प्रेमाने उपचार करणाऱ्या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींचे तसेच हॉस्पिटल स्टाफचे आभार. सर्व जनतेच्या शुभकामना आम्हाला धीर देत असतात.
सर्व ठीक होईल.
_अनिकेत आमटे.

डॉ प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा..कालची पोस्ट - डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये...
15/06/2022

डॉ प्रकाश आमटे यांच्या तब्येतीत सुधारणा..

कालची पोस्ट - डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. आज उपचाराला थोडा प्रतिसाद मिळाला आहे. कदाचित Lukemia ची शक्यता आहे. त्या साठी पुढील तपासण्या सुरू आहेत. सर्वांना नम्र विनंती आहे की सध्या त्यांना फोन/मेसेज करू नये. भेटायला येऊ नये. लवकरच ते ठणठणीत बरे होतील यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया.

आजची पोस्ट - बाबांची तब्येत सुधारते आहे. कृपया हॉस्पिटल मध्ये येऊन भेटू नये. कृपया कॉल पण करू नये. त्यांना आराम मिळाला पाहिजे. आपले प्रेम आणि कार्या प्रती असलेला नितांत आदर आम्ही समजू शकतो. पण गर्दी झाल्याने दवाखान्यात असणाऱ्या इतर पेशंटना तसेच सिक्युरिटी ला त्रास होऊ नये. हे समजून घ्यावे ही विनंती. बरे झाले की हेमलकसा भेटायला नक्की यावे.
_अनिकेत आमटे

Don't miss this opportunity to visit Anandwan Hemalkasa Tadoba ☺️Please do share this with your friends..
28/10/2021

Don't miss this opportunity to visit Anandwan Hemalkasa Tadoba ☺️
Please do share this with your friends..

Happy Independence Day to all 😊💐Todays Flag hoisting at Lok Biradari Prakalp, Hemalkasa.
15/08/2021

Happy Independence Day to all 😊💐

Todays Flag hoisting at Lok Biradari Prakalp, Hemalkasa.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Visit Hemalkasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Visit Hemalkasa:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share