14/01/2017
दि. २६/०१/२०१७ रोजी PetsBazzar.com व पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (अशोकस्तंभ), नाशिक येथे पाळीव पक्ष्यांच्या मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे.
सदर शिबिरात खालीलप्रमाणे तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभणार आहे:
१. पाळीव पक्ष्यांची निगा व आरोग्य
२. संगोपन, प्रजनन व आहार
३. पाळीव पक्ष्यांसाठी प्रथमोपाचार
४. Wildlife Protection Act, 1972, Prevention of Cruelty to Animals Act, 1960 वर मागदर्शन
५. वेळेवर येणाऱ्या प्रश्न व शंकांच्या समाधानासाठी तज्ञांचे मार्गदर्शन
६. पक्षीमित्रांसाठी विशेष मार्गदर्शन व कायदे विषयक माहिती
सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी ७३८७४६६९९९ या क्रमांकावर संपर्क करावा व आपल्याकडील पक्ष्याची नोंदणी करण्यासाठी ७३८७४६६९९९ याच क्रमांकावर खालील पद्धीतीने माहिती Whatsapp वर अथवा Message ने पाठवावी:
आपले नाव:
पक्ष्याची जात(Breed/Species):
पक्ष्याचे वय:
पक्ष्यांची संख्या:
सदर शिबिराचा लाभ हौशी पक्षी पालक, व्यावसायिक, पोल्ट्री चालक व पक्षीमित्र घेऊ शकतील.
शिबीर २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते ३ पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (अशोकस्तंभ), नाशिक येथे असेल, पक्षीमित्रांनी त्यांच्याकडील जखमी व आजारी पक्ष्यांना ४ ते ५ या वेळेत आणावे.
मागील वर्षी ५०० लोकांनी त्यांच्या १६०० पक्ष्यांसाठी २६ वैद्यकीय अधिकारी व ६ तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण व आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे.
कळावे
उमेशकुमार नागरे
संचालक
www.PetsBazzar.com
७३८७४६६९९९
Complete pet encyclopedia aming to deliver updated pet profile database along with pet product information, free pet classified, pet forum and expert's advice on your any veterinary problem...