25/07/2021
#शनिवार_वाडा
पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे.
शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले.
शनिवारवाडा मुंबई पासून साधारण १५० किलोमीटर अंतरावर आहे.
.
Shaniwar Wada is a historical monument in Pune, Maharashtra. In the 18th century, this palace was the residence and office of the Prime Minister of the Maratha Empire, namely the Peshwa. The Government of India on Saturday 17th June, Declared as a National Protected Monument in Maharashtra on 1919.
The foundation work of Shaniwarwada was started on January 10, 1730, while the construction of Shaniwarwada was completed on January 22, 1732. That day was Saturday, hence the name Shaniwarwada.
The Shaniwarwada building was 21 feet high and had a total wall of 950 feet on all four sides. These walls and bastions still stand tall in the heart of Pune.
Shaniwarwada is about 150 km from Mumbai.