Malvani Katta

सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग प्रदेश, यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे प्रमुख ध्येय आहे. "सिंधुदुर्ग जिल्ह्याची रूपरेखा"
सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळग

ाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाबोलीम (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत. "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास"

सिंधुदुर्ग जिल्हा हा 'कोकण' या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. 'कोंकण' हा शब्द मुळ भारतीय व पुरातन असून या नावाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

काश्मीरच्या हिंदू इतिहासामध्ये कोकणच्या सात राज्याच्या हिंदु पौराणिक कथा उल्लेख केलेल्या आहेत आणि भारताच्या जवळजवळ पूर्ण पश्चिम तटाच्या रुपात सामील केल्या आहेत. पांडवांनी आपल्या अज्ञातवासाचे तेरावे वर्ष या क्षेत्रात व्यतीत केले असा उल्लेख आढळतो. या क्षेत्राचा राजा विराटराय याने कुरुक्षेत्र येथे झालेल्या कौरवांबरोबरील युद्धात पांडवांना साथ केली होती. दुसऱ्या शतकात र्मौर्यांच्या महान साम्राज्याने कोकण तटावर कब्जा केला. सोळाव्या शतकामध्ये मौर्य आणि नल राजवंशाच्या राजांनी कोकणावर राज्य केले असे दिसते. रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.

चंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. ई. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध 'सिंधुदुर्ग' किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी मालवण नजीक बांधलेल्या या किल्याचा अर्थ 'समुद्री किल्ला' अस होतो. २५ नोव्हेंबर १६६४ साली सुरु झालेले या किल्ल्याचे बांधकाम तब्बल ३ वर्षांनी अशा रीतीने पूर्ण झाले की अरबी समुद्रा मार्गे येणाऱ्या शत्रूला हा किल्ला दिसणे अवघड होते.

सुख.
04/08/2021

सुख.

01/08/2021

😂😂😂😂😂

29/07/2021

दूधसागर धबधबा, गोवा.
Video Credit :

साकव.
28/07/2021

साकव.

28/07/2021

मुंबई - मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस. विस्टाडोम कोच.

गाववाल्यानु जेवूक येवा. 😋
28/07/2021

गाववाल्यानु जेवूक येवा. 😋

26/07/2021

Sikh response to the flood situation in Maharashtra

कोकणच्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी सर्व स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहेत.

साभार - Chiplun Cha Balya.

26/07/2021

बघा विचार करा आणि आता तरी जागे व्हा. प्रगती, बेरोजगारी च्या नावावर जे नको ते निसर्गाला हानिकारक प्रकल्प आपल्या माथ्यावर मारले जात आहेत त्याला कडाडून विरोध करा. तरच कोंकण टिकेल.
साभार - Konkani Ranmanus Ecotourism (Prasad Gawde) 🙏😪

आपल्या मदतीची खूप गरज आहे !!!फक्त योग्य माणसा पर्यंत पोचवा ...
26/07/2021

आपल्या मदतीची खूप गरज आहे !!!
फक्त योग्य माणसा पर्यंत पोचवा ...

'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुन;'गंगामाई' पा...
24/07/2021

'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुन;
'गंगामाई' पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको माञ वाचली

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले

कारभारणीला घेऊण संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.

- कुसुमाग्रज

कोकण रेल्वेची वाहतूक पुढील आदेशापर्यत बंद.
22/07/2021

कोकण रेल्वेची वाहतूक पुढील आदेशापर्यत बंद.

 #अतिवृष्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील महत्त्वाचे संपर्क क्रमांक
22/07/2021

#अतिवृष्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील महत्त्वाचे संपर्क क्रमांक

22/07/2021

निसर्गापुढे माणुस हतबल. चिपळुण आगार.गाव वाल्यांनू काळजी घ्या.फोटो - Swapnil Kadam
22/07/2021

निसर्गापुढे माणुस हतबल. चिपळुण आगार.
गाव वाल्यांनू काळजी घ्या.
फोटो - Swapnil Kadam

21/07/2021

काळजी घ्या. सुरक्षित रहा.

19/07/2021

एसटी बसने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या माऊलींच्या पालखीवर खंडेरायाच्या जेजुरीत गावकऱ्यांकडून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली!

साडे अकराच्या दरम्यान माऊलींची पालखी जेजुरीतून पुढे गेली, यावेळी ही उधळण करण्यात आली. माऊलींची पालखी जेजुरीत आल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्याची परंपरा आहे.

चांगले प्रकल्प असतील तर त्याला आम्ही समर्थन नक्की करू पण नाणार सारख्या प्रकल्पाने कोकणाची वाट लागत असेल तर त्याला आमचा व...
09/03/2021

चांगले प्रकल्प असतील तर त्याला आम्ही समर्थन नक्की करू पण नाणार सारख्या प्रकल्पाने कोकणाची वाट लागत असेल तर त्याला आमचा विरोध आहे ।
रोजगार निर्मिती होईल नक्की पण कोकणचा सर्वनाश होयला नाही पाहजे
Credit : धर्मेंद्र घाग

Address

Vengurla

Telephone

+919029345459

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malvani Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Tourist Information Centers in Vengurla

Show All