Gad_killa

Gad_killa सह्याद्री Explore करण्याचा प्रयत्न
चला तर मग महाराष्ट्राच वैभव परत आनुया !!�
Travel � | Travel � | Explore � | Photography �

स्वराज्याचे अनमोल रत्न असे रतनगड आपुला...🥰🚩📍“रतनगड (डोंगरी किल्ला)....🌸🚩PC:- .amol.__96k_                               ...
26/11/2022

स्वराज्याचे अनमोल रत्न असे रतनगड आपुला...🥰🚩

📍“रतनगड (डोंगरी किल्ला)....🌸🚩

PC:- .amol.__96k_



𝐋𝐢𝐤𝐞 ! 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ! 𝐒𝐡𝐚𝐫𝐞🤗

रतनगड ❣️ 😍Pic Credit -                   of India
04/08/2021

रतनगड ❣️ 😍
Pic Credit -

of India

मी हरवतो ही इथेच,आणि मला मी सापडतो ही इथेच! ❤️"सह्याद्री" ⛰️📍 "किल्ले,राजहंसगड...!!" Photo credits: Use   to get feature...
01/08/2021

मी हरवतो ही इथेच,आणि मला मी सापडतो ही इथेच! ❤️
"सह्याद्री" ⛰️

📍 "किल्ले,राजहंसगड...!!"
Photo credits:
Use to get featured
Or
Tag us in your post
Follow us:

खरं असणं आणि चांगलं वागणं, यातला फरक ओळखता आला, की माणूस ओळखणं सोप्पं होतं!अगदी तसेच, जसे हे कातळातले दुर्ग.राकट, ओबडधोब...
31/07/2021

खरं असणं आणि चांगलं वागणं, यातला फरक ओळखता आला, की माणूस ओळखणं सोप्पं होतं!

अगदी तसेच, जसे हे कातळातले दुर्ग.

राकट, ओबडधोबड, आणि अजस्त्र.
पण कमालीचे निधडे, सच्चे आणि एकनिष्ठ! 🚩
Pic Credit -

केंजळगड उर्फ मनमोहनगड केंजळ गडावरील कातळात कोरलेल्या या जवळपास 54 पायऱ्या व महा दरवाजाचे काहीसे अवशेष व त्याचे कातळकडे ज...
29/07/2021

केंजळगड उर्फ मनमोहनगड
केंजळ गडावरील कातळात कोरलेल्या या जवळपास 54 पायऱ्या व महा दरवाजाचे काहीसे अवशेष व त्याचे कातळकडे जणू काही मन मोहून टाकतात ! ❤️
Photo credits:

या इथून लोटले कित्येक देशद्रोही खाली..... स्वराज्याच्या दुर्गसंपत्तीमधील अनमोल दागिना 🚩टकमक टोक, दुर्गदुर्गेश्वर रायगड. ...
28/07/2021

या इथून लोटले कित्येक देशद्रोही खाली.....
स्वराज्याच्या दुर्गसंपत्तीमधील अनमोल दागिना 🚩
टकमक टोक, दुर्गदुर्गेश्वर रायगड.
Pic Credit - .jadhav_ .________


















.

रोहिडा ( विचित्रगड ) 🚩 या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून म...
25/07/2021

रोहिडा ( विचित्रगड ) 🚩 या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून१६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता.
Location📍: Rohida fort bhor
Pune,Maharashtra
Pic Credit :
/

गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टये आहेत.अद्वितीय असा निसर्गसौंदर्याने नटलेला य...
24/07/2021

गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टये आहेत.अद्वितीय असा निसर्गसौंदर्याने नटलेला यापैकीच एक सर्पाकार मजबूत तटबंदी असलेला "लोहगड किल्ला” नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद आणि अजिंक्य आहे.....
Pic Credit - .jadhav_ ..
























आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते.श्री भैरवगडPic Credit -          ...
23/07/2021

आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते.
श्री भैरवगड
Pic Credit -

गडकोट जगणारे हे गडकोट फक्त फिरून येणे आणि गडकोट जगणे या दोन प्रवाहाची सध्या माणस आहेत. दुसऱ्या प्रवाहात हे फोटोतील व्यक्...
22/07/2021

गडकोट जगणारे

हे गडकोट फक्त फिरून येणे आणि गडकोट जगणे या दोन प्रवाहाची सध्या माणस आहेत. दुसऱ्या प्रवाहात हे फोटोतील व्यक्तिमत्त्व येत. फोटोची आवड जरी असली तरी सोबत आपली सामाजिक बांधिलकी कायम जपणारा आमचा हा मित्र.

डोक्यावर वारकरी टोपी बाकी पेहराव मात्र तुमच्या आमच्या सारखाच. शांत संयमी असणारा पण तितकाच आपल्या मताशी प्रखर असणारा आमचा दुर्गभटका. गडकोट फक्त फिरून न येता तिथल्या वास्तु , तिथली मंदिर , तिथला सहवास जगणारा हा. कोणत्याही गडावर गेला तरी तिथल्या गडदेवतांची पुजा केल्याशिवाय माघारी काही परतत नाही.

दुर्गभटकंतीच आणि संवर्धनाचा घेतलेला हा वसा कायम असाच सुरू ठेव.

Pic Credit-





आयुष्य किती बी ढासळत राहूदे, इथवर आलेल्या देहाला ही शिवऊर्जा कधी झुकू नाही देत...! #ऊर्जा_छत्रपती  #राजधानी_रायगड ..Pic ...
22/07/2021

आयुष्य किती बी ढासळत राहूदे, इथवर आलेल्या देहाला ही शिवऊर्जा कधी झुकू नाही देत...!

#ऊर्जा_छत्रपती
#राजधानी_रायगड ..
Pic Credit- ..

कळसूबाई डोंगररांगेत वसलेलं हे अभेद्य त्रिकूट. अलंग, मदन, कुलंग😍.प्रत्येक ट्रेकरचा ड्रिम ट्रेक असच काहिसं गणित असतं भटक्य...
21/07/2021

कळसूबाई डोंगररांगेत वसलेलं हे अभेद्य त्रिकूट. अलंग, मदन, कुलंग😍.प्रत्येक ट्रेकरचा ड्रिम ट्रेक असच काहिसं गणित असतं भटक्याचं याच्या बाबतीत अन असू का नये बरं. या त्रिकूटाचं कातळ वैभव एखाद्याला धास्ती सोबत प्रेमात पण पाडेल असच काहिसं😍रतनगडावरून जर हि रांग बघितली तर अशी काही सुंदर दिसते कि बास बघतच बसू वाटतं. कळसूबाई कडून सुरूवात करता कळसूबाई, साकिरा,, सिंदोळा, किर्डा, कातीरा या डोंगरांपाठोपाठ अलंग, मदन, कुलंग आणि शेवटी छोटा कुलंग असा परिसर नजरेस पडतो.😊
अमकू❤️.
PC: .
Location📍: Alang madan kulang,
nashik ,Maharashtra

Devkund Waterfall ❤Pic Credit -._.dust_Location📍: Devkund Waterfall, Maharashtra .
19/07/2021

Devkund Waterfall ❤
Pic Credit -._.dust_

Location📍: Devkund Waterfall, Maharashtra
.

मल्हारसह्याद्रीच्या अंगावर गडदुर्गांच्या मांदीयाळीतील गडपुरुष म्हणजे दुर्गराज राजगड अन अदभुत अशी संजीवनी माची !!!⛰️😌📍San...
19/07/2021

मल्हारसह्याद्रीच्या अंगावर गडदुर्गांच्या मांदीयाळीतील गडपुरुष म्हणजे दुर्गराज राजगड अन अदभुत अशी संजीवनी माची !!!⛰️😌

📍Sanjivani Machi..

Machi - A Narrow Extension of the fort on the neighboring Mountain range.

Sanjivani Means The Remedy for all diseases.

Sanjivani Machi is a part of Rajgad Fort.

This is an Ideal example of Strengthening the Weakest link of the Fort to safeguard it from the External attacks.
Spending an evening at this place is Every Trekkers Favorite thing to do.💕..
Pic Credit -


   

जवळपास दोन वर्षांनी पावसाळ्यातला राजगड अनुभवलाय...हे हिरवगार सौंदर्य सोबतीला धुक्यांचा अथांग सागर, पावसाच्या रिमझिम सरी,...
17/07/2021

जवळपास दोन वर्षांनी पावसाळ्यातला राजगड अनुभवलाय...हे हिरवगार सौंदर्य सोबतीला धुक्यांचा अथांग सागर, पावसाच्या रिमझिम सरी, कड्याकपाऱ्यांमधून झिरपणार पाणी, हवेतला हा गारवा 😍.अजून काय हवं....!
Pic Credit -

भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय लोक जलविज्ञानाचा वापर आपल्य...
17/07/2021

भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय लोक जलविज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन गरजांसाठी करीत होते त्याची एक उत्तम ऐतिहासिक रचना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी गावात रस्त्यालगतच “जांब्या दगडात कोरलेली ही बारव”....

जांबा दगड बाबत थोडक्यात माहिती :

कोकणात जांबा दगड आढळतो..तो एक प्रकारचा खडक आहे.. हा खडक लाल रंगाचा असतो यात लोह आणि बॉंॅंक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो तसेच सच्छिद्र असतो खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात या चिरा बांधकामासाठी वापरतात कोकणातील घरे या दगडापासून घरे, बारव विहिरी बांधली जातात...

बारव विहिरी बाबत थोडक्यात माहिती :

बारव म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या गावाला नदी वाहत नसे त्या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी व इतर देखील अनेक कामांसाठी बारवेचा वापर केला जात अनेकदा बारव चौकोनी आकाराची सुद्धा असते, आकाराने मोठी अशी जिला पायरी आहे अशी विहीर म्हणजेच बारव...अनेकदा बारव चौकोनी आकाराची बघण्यास मिळते तिच्या पायऱ्या हि रुंदीला अधिक व लांब असतात.....
Pic📸 : ..
तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा चा वापर करा...

आठवडाभराच्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी मिळालेला एक रविवार.. दिवसभर घरात बसून वेळ घालवण्यापेक्षा आलेला सगळा थकवा घालवण...
15/07/2021

आठवडाभराच्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी मिळालेला एक रविवार.. दिवसभर घरात बसून वेळ घालवण्यापेक्षा आलेला सगळा थकवा घालवण्याचे एकच ठिकाण म्हणजे "सह्याद्री".. रात्रभर "मिलियन स्टार" हॉटेल मध्ये राहुन सकाळ अशी "ब्यूटीफुल" असावी, ह्या पेक्षा अजुन काय हवं "सह्याद्रीकडून"..
श्री पदरगड..
Pic Credit - ..

📍 ताहुली पीक, कल्याण उंची: 3487 फूट श्रेणी: मध्यम-कठीण (मान्सून) सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कल्याण तळ: कुशीवली गाव किंम...
15/07/2021

📍 ताहुली पीक, कल्याण

उंची: 3487 फूट
श्रेणी: मध्यम-कठीण (मान्सून)
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन: कल्याण
तळ: कुशीवली गाव
किंमत: प्रति व्यक्ती 100
गँग: पावसाळ्यात या ठिकाणी कधीही एकटे जाऊ नका

पोहोचण्याचे मार्गः

कल्याण कडून

कल्याण स्टेशनवर उतरून बस आगाराकडे जा. मलंगगडला जाणाऱ्या केडीएमटी बस उपलब्ध असतात बस प्रवासाची किंमत 20 प्रती आहे आणि कुशीवली गाव स्टॉपवर जाण्यासाठी सुमारे 40 मिनिटे लागतात.
या ट्रेकसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्देः

पावसाळ्यात कधीही एकटे जाऊ नका

पावसाळ्याच्या ट्रेकसाठी नेहमीच रेनकोट ठेवा

फोनच्या नेटवर्क क्षमतेवर कधीही विश्वास ठेवू नका

फक्त ट्रेक पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाला धोका देऊ नका ( स्टंटबाजी करू नका )

आपण कोठे जात आहात हे कोणालातरी सांगून जा.

व्लॉग आणि ब्लॉगवर डोळेझाक करु नका. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. काही शंका असल्यास माझ्याशी संपर्क साधा.

योग्य पकड असलेले बूट आणि अतिरिक्त जोडी सँडल सोबत कॅरी करा.

बदलापूर मार्गावरून चढण्याचा प्रयत्न करु नका.

४ तासाच्या ट्रेकिंगनंतर आम्ही वर पोहोचलो.

टीप: ट्रेकिंग करताना आपल्या जीवाला धोका देण्याचा प्रयत्न करु नका आणि जर आपल्याला मार्ग माहित नसेल तर नेहमीच मार्गदर्शक घ्या. गडाच्या भिंतींवर लिहू नका, कचरा करू नका, किल्ल्यांवर मद्यपान करू नका. आमचा वारसा स्वच्छ ठेवा!

PC:
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Location📍: Tahuli Peak Maharashtra ...

पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते.या किल्ल्याच्या प...
13/07/2021

पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते.

या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग, रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.
Pic📸 :
तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा चा वापर करा.

पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे पुनःपुन्हा प्रेमात पाडणारा कोकणकडा🌨️❤️💚📍 कोकणकडा, हरिश्चंद्रगड ⛰️ Reposted from  PC:-
11/07/2021

पृथ्वी वरील स्वर्ग म्हणजे पुनःपुन्हा प्रेमात पाडणारा कोकणकडा🌨️❤️💚

📍 कोकणकडा, हरिश्चंद्रगड ⛰️

Reposted from PC:-

रतनगड (डोंगरी किल्ला )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २...
07/07/2021

रतनगड (डोंगरी किल्ला )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

रतनवाडीपासून ६ किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून २३ किमी, पुण्यापासून १८३ किमी आणि मुंबईपासून १९७ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारादरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२५० फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता.

किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही चार प्रवेशद्वारे आहेत. (हि नावे दरवाजा ज्या विभागाकडे म्हणजे किल्लेदाराच्या राज्याच्या चारी दिशांना असणाऱ्या भागांवरून दिली आहेत)
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे -

१ - गणेश दरवाजा.
२ - रत्ना देवीची गुहा. (मंदिर)
३ - मुक्कामाची गुहा.
४ - प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात)
५ - इमारतींचे जोते. (गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष)
६ - कडेलोट पॉइंट.
७ - राणीचा हुडा (भग्न बुरूज)
८ - प्रवरेचे उगमस्थान.
९ - मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज.
१० - अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे )
११ - नेढ़ (गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड.)
११ - कल्याण दरवाजा. (यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात.).
Pic Credit - .

इरशाळगड- इरशाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्ग...
06/07/2021

इरशाळगड-
इरशाळगड हा कर्जत विभागात येतो. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरुन जाताना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हसमाळ, प्रबळगड, इरशाळगड हा परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सर्वसामान्य जनजीवन असणाऱ्या या भागात मुबलक पावसामुळे भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाची सोय होते.

इतिहास -
इरशाळ गडाचा तसा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक ह्या गावी झाला.
तसे गडावर पाहण्यासारखे काही नाही. मात्र प्रस्तरारोहणाचा आनंद मात्र अवर्णनीय आहे. गडावरती एक मोठी गुहा आहे पण त्या गुहेमध्ये जाण्याचा मार्ग खूप जीवघेणे आहे.पाणी साठा कुंड आहेत.
गडमाथ्यावरुन प्रबळगड, माथेरान, चंदेरी मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसत..
Pic Credit - ..
अशाच पोस्ट साठी फॉलो करा Gad_killa ..

#सह्याद्री











हरिहर किल्ल्यापर्यंतचा ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेक आहे.हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी...
06/07/2021

हरिहर किल्ल्यापर्यंतचा ट्रेक हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेक आहे.

हा किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेला असून पावसाळ्यात येथील नैसर्गिक सौंदर्य मनावर भुरळ पाडते.

Harihar Fort Trek is one of Maharashtra's most beautiful ones!
It lies a few kilometers from Igatpuri in Maharashtra's Nashik District and is an absolute treat during the monsoons...
Pic Credit - ..



गडकोटांची कधी सुटका होणार आशा कृत्यापासून???हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आपले गडकोट.असंख्य शुरा...
05/07/2021

गडकोटांची कधी सुटका होणार आशा कृत्यापासून???

हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आपले गडकोट.असंख्य शुरांच्या बलिदानाची साक्ष देणारे आपले गडकिल्ले अजूनही तितक्याच भक्कमपणे स्वराज्याचे रक्षण करत आहेत.आशा गडकोटांचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे.

आमच्यासाठी ती पवित्र मंदिरे आहेत आणि त्यांचे रक्षण करणे हे आम्ही कर्तव्य समजतो.पाऊस आला की गडकिल्ले आठवतात....का?? फक्त मज्जा मस्ती म्हणून?? इतर वेळी त्या गडांकडे कोणी पाहत ही नाही.संवर्धन तर दूरची गोष्ट साधा कचरा ही कोणी उचलत नाही.कधी थांबणार आहे हा प्रकार??कमीत कमी आपल्या राज्यांना तरी आठवा असे प्रकार करताना.अहोरात्र कष्ट घेऊन,मावळ्यांच्या रक्ताने पवित्र ही भूमी याचे रक्षण करणे आपलीच जबाबदारी आहे. #कधी मिळणार गडकोटांना न्याय.

श्री कोथळीगड..
Pic Credit - ..
तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा चा वापर करा...

थकलेल्या जीवाला सहारा फक्त इथेच मिळतो ❤️  #सह्याद्री ⛰️..किल्ले सिध्दगड 🚩..PC : ..                                      ...
03/07/2021

थकलेल्या जीवाला सहारा फक्त इथेच मिळतो ❤️ #सह्याद्री ⛰️..
किल्ले सिध्दगड 🚩..
PC : ..

किल्ले विसापूर || Visapur Fort..Pic Credit- ..तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा   चा वापर करा...  ...
02/07/2021

किल्ले विसापूर || Visapur Fort..
Pic Credit- ..
तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा चा वापर करा...

Devkund-Bhira, Maharashtra ⛰.There are no shortcuts to any place worth going -Beverly Sills.Pic Credit-  ⛰..तुम्ही टिपले...
30/06/2021

Devkund-Bhira, Maharashtra ⛰.
There are no shortcuts to any place worth going -Beverly Sills.
Pic Credit- ⛰..
तुम्ही टिपलेले असेच उत्कृष्ट फोटोज आम्हाला टॅग करा अथवा चा वापर करा...

30/06/2021
सातवाहन स्थापत्यकलेचा अजोड नमुना,छन्नी-हातोड्याची कलात्मकता,रेखीव व सुबक कातळकोरीव सौंदर्य,सातमाळा डोंगररांगेतील अवघड स्...
29/06/2021

सातवाहन स्थापत्यकलेचा अजोड नमुना,छन्नी-हातोड्याची कलात्मकता,रेखीव व सुबक कातळकोरीव सौंदर्य,सातमाळा डोंगररांगेतील अवघड स्थान,समुद्र सपाटीपासून तब्बल १३७० मीटर उंच,कमनीय नक्षीकाम लाभलेली २० दालने,पुरातन शिल्पकाराच्या गुणवत्तायुक्त कामाची पावती देणारे महादेव मंदिर,घाटवाटांचा पहारेकरी,प्रचंडता दर्शवणारे विस्तीर्ण पठार,साहसी व अवाढव्य राजवट लाभलेला,आपल्या गतवैभवाची साक्ष देणारा अशी नाना मानाची तुरे ज्याच्या शिरपेचात आहे असा दुर्गम दुर्ग "इंद्राई"

थोडक्यात-

गौतमीपुत्र सातकर्णी ( ३ रे शतक )
राष्ट्रकूट राजे ( ३९६ - ६८२/८५ )
महाराजा चंद्रादित्य ( ५ वे शतक )
शेउनचंद्र प्रथम ( ६५५ - ६८९)
देवगिरी साम्राज्य ( ७१२ - १११० )
खिलजी ( ११२८ - १२९० )
क्षत्रप पूळूवामी ( १२९२ - १३८९ )
निजामशाही ( १४०३ - १५९६ व १६०१ - १६३६ )
मुघल ( १६३६ - १८१८ )
इंग्रज - १८१८

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मुघल सरदार अलीवर्दीखानाने नऊ ओळींचा फारसी भाषेतला शिलालेख कोरून त्यात त्याने जिंकलेल्या किल्ल्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे...
Pic Credit :- ..
#सह्याद्री _tourism

ह्या मावळातून मावळून तू कधीच गेला रं!माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं !!जेव्हा केव्हा मी गडकिल्ल्यांवर असतो,स्वराज्याची ह...
29/06/2021

ह्या मावळातून मावळून तू कधीच गेला रं!
माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं !!
जेव्हा केव्हा मी गडकिल्ल्यांवर असतो,स्वराज्याची ही भरभक्कम तटबंदी, बुरुजे,महादरवाजा अन येथील वास्तू, इथल्या वाटा पाहत असताना अचानक मनाला अनेक प्रश्न घेरु लागतात, तेव्हाच नजारा कसा असेल?,कश्या प्रकारे इथला महादरवाजा महाराजांना मुजरा करत असेल?, कशाप्रकारे रयत इथं गुण्या गोविंदाने नांदत असेल,एखादा सण किती थाटात साजरा होत असेल,
कश्याप्रकारे महाराजांनी स्वराज्याची सूत्र इथून चालवली असतील,
तेव्हा होणाऱ्या सूर्यनारायणाला सुद्धा गहिवरून येत असेल,इथली माती स्वतःला किती धन्य मानत असेल, आपण आता उभे आहोत इथं तेव्हा काय बर होत असेल, कस बर होत असेल? अश्या अनेक 350 वर्ष्यापूर्वीच्या कल्पना मन करु लागत, खर च जर एकदा तो सुवर्ण काळ आपल्याला अनुभवायला मिळाला तर....
आणि मग कुठंल्या तरी तट बुरुजावर निवांत बसल्यावर "माझ्या राजा रं" हे गाणं ऐकताना अंगावर शहारा येतो त्यातील प्रत्येक शब्द नी शब्द मनाला भिडतो, जिथे तिथं महाराजांच अस्तिव दिसायला लागत, अन आपसुकच त्या महादरवाजात महाराज स्वतः उभे असल्यासाच भासून मी मुजरा करायला लागतो.
अन पुन्हा नकळत मन म्हणत महाराज तुम्ही हवे होतात , महाराज तुम्ही आज ही हवे होतात.
( आजवर वाचलेल्या, ऐकलेल्या महाराजांना मनात, विचारांत स्थान दिल की महाराज दिसत्यात, होय आजही महाराज दिसत्यात 🙏)..
Pic Credit : ..

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Gad_killa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gad_killa:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share