02/01/2024
भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ट्रकचा कधी ना कधीतरी संबंध आलेला असतोच.
कोणतीतरी एखादी तरी वस्तू ट्रकमधूनच येते.
ट्रकडायवर हा पेशा रिस्की असतो. घरातून पंधरा दिवस महिनाभर तो बाहेर असतो. आणि पगार म्हणाल तर त्याच्या मानाने अत्यल्प असतो.
घरापासून अनेक दिवस बाहेर असतो.
बाकीच्या तुमच्या हाफीसातील ड्युटीवर तुम्ही डुलकी मारू शकता, टंगळमंगळ करू शकता पण ड्रायवर हा पेशा असा आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या भागाला सुद्धा अलर्ट राहावं लागतं.
अपघात हे अपघात असतात. जाणूनबुजून कुणालाही कुणी मारायचं धाडस करत नाही. नजरचुकीने अपघात घडतात त्याला पुर्वी दोन वर्षे शिक्षा होती.
आता अमितभाईंनी ती शिक्षा १० वर्षांवर नेली. मूळात अशी काही जरूरत नव्हती. ट्रकडायवर होणे हीच तशी एक मोठी शिक्षा आहे. त्यावर अमितभाईंनी आणलेला कायदा म्हणजे नरकात जन्माला एखादा जाणार असेल तर तो भारतात ट्रकडायवर होईल अशी परिस्थिती करून ठेवली आहे.
ट्रकचा अपघात झाला की, पुढे असणारा वाहनधारक शक्यतो वाचत नाही तो मरतोच. मात्र अशावेळी मॉब असा काही खवळतो की ट्रकडायवरचा जीव घेऊनच तो शांत होतो.
त्यामुळे डायवरला तिथून पळून जाण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. मग ही केस हिट अँन्ड रनची होते.
दहा वर्षाची सजा ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. अशाने ड्रायवर व्हायला कुणीही धजावणार नाहीत. सरकारने असला उंडगेपणा करण्यापेक्षा चांगले रस्ते, दिशादर्शक फलक, रस्त्यावर व्यवस्थित पट्टे, डिव्हायडर, काम चालू असते तिथे रिफ्लेक्टर आदी गोष्टी नीट केल्या तर अपघात कमी होतील.
सरकारच्या चुकीमुळे हजारो अपघात होतात मग रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षाच द्यायला हवी.
सरकारने हा जुलमी कायदा माघारी घेऊन दोनच वर्षांची शिक्षा कायम ठेवावी. आणि भारतातील सर्वात रिस्की धंद्याला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात कुणीच ड्रायवर पेशा स्विकारणार नाही.
सुज्ञ नागरिकांनीही ट्रकडायवरच्या संपास पाठिंबा द्यावा.
- Narade