PGP Travels & Tourism

  • Home
  • PGP Travels & Tourism

PGP Travels & Tourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PGP Travels & Tourism, Travel Company, .

Maa Ganga's birthplace - ❣️ Confluence of Alaknanda & BhagirathiDevprayagDevprayag is a town in Uttarakhand, India, and ...
06/03/2022

Maa Ganga's birthplace - ❣️

Confluence of Alaknanda & Bhagirathi
Devprayag
Devprayag is a town in Uttarakhand, India, and is one of the Panch Prayag (five confluences) of Alaknanda River.
Devaprayāga" means "Godly Confluence" in Sanskrit. As per Hindu scriptures, Devaprayaga is the sacred event of merging two heavenly rivers,

Alakananda and Bhagirathi, to form the holy Ganga
Devprayag I Uttarakhand
📸 : @ mananinmotion (IG)

enjoy with PGP Travels n tourism...
06/03/2022

enjoy with PGP Travels n tourism...

Tarkarli beach one of the most favorite place of tourists in kokan tourism....
06/03/2022

Tarkarli beach one of the most favorite place of tourists in kokan tourism....

Newly Inaugurated Sindhudurga Airport to give a major lift to tourism in kokan...
06/03/2022

Newly Inaugurated Sindhudurga Airport to give a major lift to tourism in kokan...

*चाकरमान्यांनू... आपल्या कोकणसाठी 'येताव' ॲप पुन्हा घेऊन इलंय !*कोकण ! 🏖️🏝️ म्हणजे छोट्या-मोठ्या डोंगरकपारीने सजलेला, हि...
05/03/2022

*चाकरमान्यांनू... आपल्या कोकणसाठी 'येताव' ॲप पुन्हा घेऊन इलंय !*

कोकण ! 🏖️🏝️ म्हणजे छोट्या-मोठ्या डोंगरकपारीने सजलेला, हिरव्यागार वनश्रीने नटलेला, निसर्गाचा वरदहस्त लाभलेला अतिशय देखणा असा परिसर. कोकणी माणूसही अगदी तसाच. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही, आपण बरं नी आपलं काम बरं. जेवढं काही परमेश्वराने दिला आहे त्यातच भागवण्याची वृत्ती जास्त, त्यामुळे एकंदरच समाधानी. 😌

या ना त्या निमित्ताने मुंबईशी नातं जोडलेला हा चाकरमानी.. शिमगा, गणपती आणि मे महिन्यात आंबा🥭 फणस खायला गावाकडे येणार म्हणजे येणारच. 🚗🚌🚙🚆🚍

कोकणात येण्यासाठी आधी बोट 🛳️ मग एसटी 🚍आणि आता रेल्वे 🚆 आहेत परंतु कोकण रेल्वेची सगळी स्टेशन पुन्हा गावापासून तशी लांबच असल्यामुळे रेल्वेच्या तिकिटापेक्षा रेल्वेस्टेशन पासून गावातल्या घराकडे जायचा खर्चच जास्त अशी गावोगावी परिस्थिती. 😞 त्यात रेल्वेचे तिकीट मिळणे म्हणजे मोठ्या नशिबाचा भाग. तसं बघायला गेलं तर चारचाकी गाड्या आता घरोघरी आहेत, नायत असा नाय. परंतु पेट्रोल,😢😢 गॅसच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे एका दोघांसाठी प्रत्येक वेळी गाडी घेऊन जाणं परवडेलच असं नाही.

नेमका हाच मुद्दा पकडून कोकणातल्या माणसांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही *'येताव'* हे मोबाईल ॲप दोन वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी २०२० मध्ये घेऊन आलो होतो. दोन महिन्यातच आपल्या कोकणातल्या जवळपास 10 हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी या ॲप मध्ये आपले नाव रजिस्टर केले व प्रवास चालू केला होता. परंतु अचानक लागलेल्या लॉकडाउनमुळे आम्हाला हे ॲप बंद करावे लागले होते.

आता पुन्हा शिमगा, खेळे व मे महिन्याचा सुट्ट्या येत आहेत. त्यात एसटी संपामुळे रोड वाहतुकीचे कंबरडेच मोडले आहे म्हणून अनेक प्रवाशांनी *‘येताव’* ॲप पुन्हा लवकरात लवकर चालू करा, म्हणून विनंती केलीय. त्यांच्या विनंतीचा मान राखून, कोकण ते मुंबई व मुंबई ते कोकण हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही पुन्हा *‘येताव’* ॲप नव्या स्वरूपात सुरू करत आहोत.

आपल्याच कोकणातल्या बांधवांच्या प्रवासासाठी जर ही कल्पना उपयुक्त ठरत असेल तर आम्हाला मिळालेला देवीचा हा मोठाच आशिर्वाद आहे असे आम्ही समजू.

*येताव* ॲप सध्या वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे. अँप डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

*अँड्रॉईड मोबाईल साठी* --> https://play.google.com/store/apps/details?id=com.yetavtravel

*ॲपल मोबाईल साठी* --> https://apps.apple.com/in/app/yetav/id1612264742

*येताव : शोधा... बोला... चला... !!!*

धन्यवाद!

---
*टीम 'येताव' ॲप*

*आनंद वामनसे (पावस )* - https://wa.me/919324667322

*रुपेश चौधरी* - https://wa.me/919029773108

*सुबोध अनंत मेस्त्री (संगमेश्वर)* - https://wa.me/919221250656

*प्रसन्न हर्डीकर (सावर्डे)* - https://wa.me/918108108493

*अतिश कुलकर्णी व महेंद्र देवगडकर (गिर्ये)*

🌴🏠 🌊सामंत बीच रिसॉर्ट, भोगवे ...🌴🏠🌊🙏तळकोकणात सागरी पर्यटनातील एक विश्वसनीय नाव🙏      देवबागच्या निमुळत्या किनारपट्टी समो...
05/03/2022

🌴🏠 🌊सामंत बीच रिसॉर्ट, भोगवे ...🌴🏠🌊

🙏तळकोकणात सागरी पर्यटनातील एक विश्वसनीय नाव🙏

देवबागच्या निमुळत्या किनारपट्टी समोर आणि कर्ली नदीच्या संगमाच्या कुशीत दक्षिणेला वसलेलं भोगवे हे छोटंसं गाव.....

अगदी विरळ वस्ती असलेलं हे गाव तसं दुर्लक्षितच... याच गावात सहा वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेल्या या छोट्याश्या प्रयत्नांना आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, आणि आजपर्यंतच्या प्रवासात आम्ही 1000+ रिव्ह्यूचा पल्ला गाठला...

भारत सरकारतर्फे ब्ल्यू फ्लॅग दर्जासाठी नामांकन मिळालेला हा निळ्याशार पाण्याचा, पांढऱ्या वाळूचा सुंदर किनारा या महिन्यात CN TRAVELLER तर्फे भारतातील सर्वात सुंदर नऊ पर्यटन स्थळांमध्ये विराजमान झालाय..

याच किनाऱ्याच्या अगदी समोरच आहे, सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे *सामंत बीच रिसॉर्ट*...
देवदारच्या लाकडांपासुन बनवलेल्या, नारळाच्या बागेतील अप्रतिम रिसॉर्ट. पर्यटकांनी न गजबजलेल्या या शांत ठिकाणी आपल्या राहण्याची सर्वोत्तम सोय करणाऱ्या या रिसॉर्टमध्ये आपल्याला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

सामंत रिसॉर्टमध्ये पाईन च्या लाकडातून बांधलेल्या रूम्स असून वरच्या मजल्यावरील रूममधून थेट फेसाळणाऱ्या समुद्राचे सुंदर दर्शन होते.

प्रत्येक रूम हा आरामदायी बेड, एसी, टिव्ही, मिनी फ्रीज, गिझर, शॉवर, बेसिन, कमोड, कॉफी मेकर, हेअर ड्रायर या सर्व सोयींनी युक्त असून राहण्याच्या टेरिफ मध्ये चहा,कॉफी, बाथरूममध्ये किट, कॉफी किट,रूम स्नॅक्स ,पाणी बॉटल, आणि नाश्ता यामध्ये कॉम्प्लिमेंटरी दिला जातो.

केवळ राहण्याचीच नव्हे तर खाण्या-पिण्याची देखील उत्तम सोय सामंत रिसॉर्टमध्ये आहे. आपल्या आवडीनुसार अस्सल मालवणी शाकाहारी, मांसाहारी जेवणाची सोय इथे केलेली आहे. इथल्या मालवणी पद्धतीच्या माशांची चव तर एकदा तरी घ्यायलाच हवी.

आमची खासियत :

★संपुर्ण लाकडामध्ये बांधलेल्या सर्व सुविधायुक्त रूम्स
★सगळ्या रूम्समध्ये ए.सी.
गीझर, टी मेकर, हेअर ड्रायर ,इस्त्रीची सोय
★सॅटेलाईट टेलिव्हीजन
★जनरेटर बॅकअप
★फ्री वायफाय
★फ्री पार्कींग
★शुद्ध मालवणी आदरातिथ्य
★नारळाच्या बागेतून समुद्राचे दर्शन
★नारळ आणि झाडांनी वेढलेले स्वच्छ आणि हवेशीर रूम्स
★नैसर्गिक प्रसन्न आणि शांत वातावरण
★स्वच्छ आणि हिरवागार परिसर
★फ्री खेळाचे साहित्य

*आम्ही पुरवत असलेल्या सुविधा:*

●कार ऑन रेंट
●अनुभवी गाईड
●बीच कॅंप फायर
●फिशींग रॉड
●पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणी
●लाईफ जॅकेट्स
●बीच सेलिब्रेशन

*स्थानिक आकर्षणे:*
◆वॉटर स्पोर्ट्स
◆पॅरासेलिंग
◆स्कुबा डायविंग
◆जंगल सफारी
◆पक्षी निरीक्षण
◆ट्रेकींग
◆निवतीचा किल्ला
◆डॉल्फीन सफारी
◆मासेमारी
◆लाईट हाऊस सफारी
◆समुद्र सफर
◆खाडी भ्रमण
◆स्थानिक नाटकं (दशावतारी)
◆आंबा, काजू आणि सुपारीच्या बागांची सफर

तेव्हा भोगवेमधील कोलवेळच्या या शांत आणि विलोभनीय समुद्रकिनाऱ्याला एकदा तरी भेट द्या आणि सामंत रिसॉर्टच्या मालवणी आदरतिथ्याची संधी आम्हाला नक्की द्या. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही इथे परत-परत नक्की भेट द्याल.

*आमचा पत्ता:*

सामंत बीच रिसॉर्ट (Samant Beach Resort)
मु. पो. भोगवे (कोलवेळ),
जि. सिंधुदुर्ग (कुडाळमार्गे)

फोन नं :
Whatsapp.
9421261819
7083705594
9545730100

सिंधुदुर्ग एअरपोर्ट पासून 06 km
कुडाळ रेल्वे स्टेशन पासून 30 km

PGP Travels was at juhu chaupati....
02/03/2022

PGP Travels was at juhu chaupati....

Happy mahashivratri..
01/03/2022

Happy mahashivratri..

27/02/2022

Kalsubai trek ....

Our Happy customers... ❤️❤️Kalsubai trek with PGP Travels & tourism....Highest mountain of Maharashtra..
27/02/2022

Our Happy customers... ❤️❤️
Kalsubai trek with PGP Travels & tourism....

Highest mountain of Maharashtra..

25/02/2022

सिंधुदुर्ग पर्यटन... लवकरच....

जगातील सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा; लंडन, सिंगापूरच्या पंगतीत सिंधुदुर्गला स्थान.

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय ९ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे.

जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटनस्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.

यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या ३० पर्यटनस्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

यामध्ये स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड यासारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.

या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते.

*PGP Travels & Tourism*बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला तुम्हाला आवडतं? बाहेर जाताना किंवा बाहेर फिरायला गेल्यावर एक वेग...
14/02/2022

*PGP Travels & Tourism*

बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला तुम्हाला आवडतं? बाहेर जाताना किंवा बाहेर फिरायला गेल्यावर एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये असते. कारण प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. अनेकांनी त्यांना बाहेर जाण्याचे प्लॅन केलेले असतात. पण काही कारणास्तव हे प्लॅन मागे पडतात. पण आता हे प्लॅन मागे पडू देऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्याची खरी किंमत ही प्रवासात कळते. शिवाय हाच प्रवास तुम्हाला अनेक अनुभव देतो. जे आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला देतात. तुम्हालाही या प्रवासासाठी निघावे असे वाटत असेल तर मग आजच कॉल करा

*PGP Travels & Tourism : 9702400245*

*Fully Sanitized car after every trip
*Your Safety is our priority

आयुष्याचा प्रवास खूप सुंदर आहे, एकदा प्रवास करून तर पहा...!!!

*Enjoy with PGP Travels & Tourism*

*Cars Available : Ertiga 7 seater & 27 Seater Traveller*

Fortuner
11/01/2022

Fortuner

PGP Travels... Worlds best travels
11/01/2022

PGP Travels... Worlds best travels

Address


Telephone

9702400245

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PGP Travels & Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share