mcvilla_the_jungle_yard

  • Home
  • mcvilla_the_jungle_yard

mcvilla_the_jungle_yard Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mcvilla_the_jungle_yard, Eco tour agency, .

16 August 2024 waterfall Rappelling batch from Gujarat  team....
25/08/2024

16 August 2024 waterfall Rappelling batch from Gujarat team....

Harihar fort trek 26 June 2024.Decathlon team                          #गडकिल्ले
21/07/2024

Harihar fort trek 26 June 2024.
Decathlon team
#गडकिल्ले

Special trek for Kids and Parents. Near mumbai, Parsik Hill Gread; easyTrek Duration; 1 n half hours
21/07/2024

Special trek for Kids and Parents. Near mumbai, Parsik Hill

Gread; easy
Trek Duration; 1 n half hours

13 july 2024. Avachitgad Trek Successfully Summited 🎉♻️💕           #महाराष्ट्र  #छत्रपती_शिवाजी_महाराज  #गडकिल्ले  #इतिह...
15/07/2024

13 july 2024. Avachitgad Trek Successfully Summited 🎉♻️💕

#महाराष्ट्र #छत्रपती_शिवाजी_महाराज #गडकिल्ले #इतिहास #सह्याद्री #सेवक #स्वराज्य #मराठा

Manikgad Pinnacle climbing expedition.माणिकची लिंगी आरोहण मोहीमटिम: मॅकविला द जंगल यार्ड, आरोहक: मॅकमोहन, प्रणय पाटील, र...
11/04/2024

Manikgad Pinnacle climbing expedition.

माणिकची लिंगी आरोहण मोहीम
टिम: मॅकविला द जंगल यार्ड,
आरोहक: मॅकमोहन, प्रणय पाटील, राम वाघे,अक्षय
सपोर्टिंग टिम: वर्धन विजयकर, वैभव वैती, संतोष गायकवाड.

दि.६ एप्रिल २०२४,च्या रात्री माणिकगडावर निवारा-पाणी,
दि.७ एप्रिल, नियोजना-प्रमाणे,
मार्ग: माणिकगडाकडे जाताना, अंतिम टप्प्यात डावीकडे फुटणाऱ्या अत्यंत अस्पष्ट व निसरड्या वाटेनं गड व लिंगी यांमधील खिंडीत जाता येतं किंवा गडावरून रॅपलिंग करून खिंड गाठता येते. त्याकरता गडावर एका प्रस्तरखंडाला दोर बांधून १८० फुट खिंडीत उतरलो.

लिंगीवरील आरोहणाचे तीन मार्ग आहेत.
मध्य मार्ग एकच टप्पा-८० फूट. खिंडीतून समोरील वाजूवरून आरोहण करून, निम्म्या उंचीनंतर मार्गात एक पाचर_झाड_मेख चा वापर करून माथा गाठता येतो. वेळ : एक तास.

खोपोली मार्गे :- खोपोलीहून - चौक - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली - ठाकुरवाडी गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : ठाकुरवाडी मार्गे २ तास लागतात.

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस येता येते. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याचे एक टाके आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. पूर्वी या ठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते. आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी किल्ला पाहाता येतो. सरळ चालत गेल्यास माणूस उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. गडाचा दरवाजा, पाहारेकऱ्यांसाठी असणाऱ्यां देवड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे. त्यात एक शेंदूर फ़ासलेली मूर्ती ठेवलेली आहे.गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे.

Vanertok Pinnacle climbingexpedition(३०/३१मार्च २०२४).टिम- मॅकविला द जंगल यार्ड, आरोहक:- मॅकमोहन,संदीप काळे,पंकज गावकर. ...
10/04/2024

Vanertok Pinnacle climbingexpedition
(३०/३१मार्च २०२४).
टिम- मॅकविला द जंगल यार्ड,
आरोहक:- मॅकमोहन,संदीप काळे,पंकज गावकर.

-सागरगडाच्या उत्तरेला महादरवाजा,गडाच्या दक्षिण टोकासमोरच वानरटोक सुळका दिसतो. गडाच्या त्या टोकाच्या डाव्या बाजूवरून खाली उतरणाऱ्या पायवाटेनं सुळका व गड यांमधील खिंडीत दोर सुरक्षेच्या साह्याने पोहोचता येतं. खिंडीतूनच आरोहणास सुरुवात होते.गडावर गडेश्वर मंदिरा शेजारी,व्याघ्रमुखिकुंडात मुबलक बाराही महीने पाणी असतो.
आरोहण : पायथा- मेख ठोकणे. पहिला टप्पा-३० फूट. चिमणीतून आरोहण करून वरच्या धारेवर पोहोचता येतं. मेख ठोकून दोर बांधता येईल.
दूसरा टप्पा १० फूट.उभं आरोहण. प्रस्तरखंडाला दोर बांधता येईल. मेखही ठोकता येते.
तिसरा टप्पा ५० फूट. सुळक्याला उजवीकडे ठेवून वळसा घालत मागच्या बाजूला पोहोचता येतं.
अंतिम टप्पा ३० फूट. मागील बाजूनं सरळ नाध्याच्या दिशेनं आरोहण करून माथा गाठता येतो. माथ्यावर दोर बांधण्याकरता प्रस्तरखंडाचा उपयोग करता येतो.
वेळ:- १०वा. आरोहणास सुरुवात १ वा. तिघेही माथ्यावर,
साधने: १०० फुटी २ दोर, २ मेखा, पाचरी.
गाईड-हेमंत पाटील+छायाचित्रण

कसे पोहचाल- मुंबईहुन,अलिबाग रोड,कार्लेखिंड नंतर खंडाळे गांवातुन सरळ सागरगडमाची वर मोटर गाडीने पोहचाल,तिथुन तासभरात सागरगडावर पोहचाल, माचीवर अन्न,पाणी,निवारा सोईसकर आहे.गाईड पण मिळेल.

मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्यासारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे. गडाचा इतिहास ही मोठा आहे. माचीवर १०० घरांची वस्ती आहे.

Kalgonda Pinnacle, Rock climbing expedition Team    43
08/04/2024

Kalgonda Pinnacle, Rock climbing expedition

Team
43



17 मार्च 2024. Team summited chira Pinnacle climbing expedition, Behind Mahuli Fort.
20/03/2024

17 मार्च 2024. Team summited chira Pinnacle climbing expedition, Behind Mahuli Fort.

Riverside Camping organizing by  & .dcosta ,Our team Visiting places      Enjoying more then Adventure activitys at , zu...
11/03/2024

Riverside Camping organizing by & .dcosta ,
Our team Visiting places
Enjoying more then Adventure activitys at , zumaring, valley crossing, kayaking.., tree climbing, jungle cooking, tent pitching, Swimming in amba river
Popti one of the Delicious food,music the guitarist .raaja & every one enjoying adventure fun activitys, food and music 🎶 🎵

11 Feb 2020 One day return plan for kayaking...Successfully completed....*Including*Welcome Tea 🫖 ☕️Kayaking 🛶🚤Lunch 🍲🌮🍚...
15/02/2024

11 Feb 2020 One day return plan for kayaking...Successfully completed....

*Including*
Welcome Tea 🫖 ☕️
Kayaking 🛶🚤
Lunch 🍲🌮🍚🍮
Tea, coffee 🫖🍵
Hot spring bath 🛁

#

Riverside Camping..⛺️🏕25,26,27,जानेवारी 2024. Visited- Shree Ballaleshwar temple,🛕 Hot spring bath near Unhere, 🛀🤽‍♀️Sar...
01/02/2024

Riverside Camping..⛺️🏕
25,26,27,जानेवारी 2024.
Visited- Shree Ballaleshwar temple,🛕
Hot spring bath near Unhere, 🛀🤽‍♀️
Sarasgad Trek 👨‍🦯🧑‍🦯
Water activity- Kayaking 🛶 + Riverside bird Watching 🦩🦜🐸🐍🦋🕸🕊🐦🐤🐓

Sarasgad Trek Successfully summited 26 जानेवारी 2024.TeamLead  ,
29/01/2024

Sarasgad Trek Successfully summited 26 जानेवारी 2024.
Team
Lead ,








Climbing session at sarasgad fort...43
07/12/2023

Climbing session at sarasgad fort...43





*"रायगड भूषण पुरस्कार"* *२०२१**"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत**ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात."*मा. श्री. मॅकमोहन ...
07/05/2022

*"रायगड भूषण पुरस्कार"* *२०२१*

*"विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत*
*ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात."*

मा. श्री. मॅकमोहन हुले.
ता. सुधागड, जि. रायगड.

''गिर्यारोहण क्षेत्रात आपण विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे, या क्षेत्रात आपली कामगिरी उल्लेखनीय आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या उचित कार्याबद्दल रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आपणास *'रायगड भूषण पुरस्कार'* देऊन गौरविण्यात येत आहे,

उपस्थित मान्यवर पालकमंत्री अदिती तटकरे, मा. आमदार पंडितशेठ पाटील, मा. जिप अध्यक्षा योगिता पारधी, मा. जिप अध्यक्षा ऍड. नीलिमा पाटील, मा. अर्थ व बांधकाम सभापती जिप चित्रा पाटील, व मा. जिप सदस्य सुरेशशेठ खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड भूषण पुरस्कार सत्कार सोहळा पार पडला.

#रायगडभूषण #रायगडभूषणपुरस्कार #रायगडभूषणपुरस्कार२०२१ #छत्रपतीशिवाजीमहाराज #महाराष्ट्र #महाराष्ट्रदेशा #सह्याद्री #गिर्यारोहन #हिमारोहन #प्रस्तरारोहण #मीमहाराष्ट्राचा #महाराष्ट्रमाझा #महाराष्ट्रबाणा #कणखरदेशा #रायगड #सुधागड

Successful Ascending 300ft long pitch Duke nose, lonavla.
21/01/2022

Successful Ascending 300ft long pitch Duke nose, lonavla.

प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सरसगडावर रचला नवा रेकॉर्ड;स्पोर्ट क्लायंबिंगच्या नवीन मार्गाचा लावला शोधअमित गवळे सकाळ व...
04/11/2021

प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांनी सरसगडावर रचला नवा रेकॉर्ड;
स्पोर्ट क्लायंबिंगच्या नवीन मार्गाचा लावला शोध

अमित गवळे सकाळ वृत्तसेवा

पाली, ता. 30 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील मॅकमोहन हुले या प्रस्तरारोहकाने सरसगड किल्ल्यावर मागील आठवड्यात नवीन प्रस्तरारोहण मार्ग (स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट) तयार केला आहे. आणि 2 वेळा अशी प्रस्तरारोहण मोहीम फत्ते केली असून प्रस्तरारोहण चढाईचा नवा रेकॉर्ड बनविला आहे. ही चढाई तब्बल 150 फुटांची होती.

या मोहिमेत प्रस्तरारोहणाचा खर्च व रूपरेषा मॅकविला द जंगल यार्ड चे संस्थापक मॅकमोहन हुले यांच्या अंतर्गत करण्यात आली. मॅकमोहन यांनी सकाळला सांगितले की प्रस्तररोहण या खेळाला 2019 मध्ये ऑलम्पिकमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे तरुणांना या खेळात नावलौकिक मिळविण्यासाठी संधी आणि वाव आहे. सरसगडावरील या मार्गवर जिल्ह्यातील अनेक तरुण व मुले गिर्यारोहण व प्रस्तरारोहण करू शकतील. तसेच नवीन मार्ग शोधून नवा रेकॉर्ड देखील बनवू शकतील. सरसगडावर प्रस्तरारोहण चे नैसर्गिक मार्ग आहेत. गिर्यारोहण क्षेत्रात अनुभवी प्रस्तरारोहक आपला एक रेकॉर्ड बनवून आपली एकछाप सोडतात. अनेक वर्षापासून असा घडत आहे. मॅकमोहन यांनी अनेक मोहिमांमध्ये आपला सहभाग दाखवून अशा अनेक जोखीम घेतल्या आहेत.

चौकट 3
मॅकमोहन यांची आत्तापर्यंतची 'सर्वात उंच ७१० फूट' चित्तथरारक मार्गावरील चढाई "बाण सुळका' प्रस्तरारोहण मोहीम" २६ जानेवारीला केली होती. त्यांच्या अनुभवातून सरसगडावरील हा नवा प्रस्तरारोहण मार्ग त्यांनी तयार केला.

चौकट 1
अशी केली थरारक चढाई
हुले यांनी सरसगडाच्या उजव्या बाजूला 10 ऑक्टोबर 2021 रोजी नवीन मार्गाने प्रस्तरारोहणाला सुरुवात केली. दुपारी 11.30 मिनिटांनी पहिले रिंग बोल्ट, दुसरे रिंग बोल्ट 1.30 मिनिटांनी फिक्स केले. दुपारीच पावसाचा वर्षाव विजांचा कडकडाट, वारा सुरू झाल्याने मोहीम अर्धवट सोडून ते खाली गावाकडे परतले. पुढील प्रस्तरारोहण मोहीम बुधवारी (ता.20) गुरुवारी (ता.21) सुरक्षित पूर्ण केली गेली. यामध्ये प्रस्तरारोहण मार्गावर ८ रिंग बोल्ट चा वापर केला आहे. सुरुवातीपासून ५ रिंग बोल्ट नंतर एक हेक्सा 5no. (ट्रेड क्लाइंबिंग) उपयोग करता येतो. 80 फुटाचा ग्रेड असून पहिला स्टेशन बनतो नंतर ट्रेड क्लाइंबिंगची सुरुवात होते. तो जाऊन दुसऱ्या स्टेशनला मिळतो. प्रस्तरारोहण मार्गावरील हा मार्ग स्पोर्ट्स क्लायम्बिंग ग्रेड दर्शवितो (6C+, 7a). या मोहिमेत प्रस्तरारोहक मॅकमोहन, तसेच आउट डोअर एक्सपर्ट आयुष सिंग (उत्तम बीलेर) सहभागी झाले होते. तसेच मदतीस दिनेश कदम, सुनयना काशीद, वर्धन विजयकर, मिहिर जोशी, अनिकेत व्हावळ, विजय मनवी व संदेश उतेकर हे उपस्थित होते.

चौकट 2

सरसगडावरील मोहिमा

सरसगडावरील अनुभव असलेले व पहिले प्रस्तरारोहण करणारी टीम "गिरीविराज हायकर्स ' चे फाउंडर किरण अडफाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पहिली चढाई मार्च 1991 खालची भिंत 47 बोल्ट आणि वरची भिंत 11 बोल्ट पुनर्प्राप्त आहे. पुन्हा चढाई फेब्रुवारी 2010 जुने बोल्ट्स फक्त कोणतीही नवीन बोल्टींग नाही.

2019 मध्ये वरची भिंत "शिवदुर्ग मित्र', लोणावळा" या टीमकडून रिबोल्टींग करण्यात आली. हा मार्ग सुरक्षित असल्यामुळे इथे ग्रेड क्लाइंबिंग ची प्रॅक्टिस करता येते. हुले यांनी सांगितले की येथे नवीन मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली. त्यानुसार मागील आठवड्यात त्यांनी रिंग बोल्ट ही जुनी पद्धत वापरून पोकर व हातोड्याच्या सहाय्याने काही मिनिट होल करत फिट केले गेले. (एक होल करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट)

कोट
ही मोहीम थरारक व उत्साही होती. गिर्यारोहक व प्रस्तरारोहकांना जिल्ह्यात सरावासाठी आर्टिफिशल वॉल (क्लाइंबिंग जिम) ची गरज आहे. सरकार मान्य करून ती करता येईल. यासाठी खर्चही आहे. प्रशिक्षणास आम्ही तयार आहोत. तरीही आम्हाला क्लाइंबिंग जिम साठी जागा, जिम व साहित्य उपलब्ध करून मिळावे.

मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक व मॅकविला द जंगल यार्ड चे संस्थापक.

फोटो ओळ, पाली, सरसगडावरील नवीन व जुना प्रस्तरारोहण मार्ग. (निळी रेषा अंतर दर्शविते) (छायाचित्र, अमित गवळे)

27/09/2021

20/03/2021

Classic boys group from Mumbai.Two days camping our campsite.
20/03/2021

Classic boys group from Mumbai.
Two days camping our campsite.


Pic credit...   from Mumbai cyclist
03/03/2021

Pic credit... from Mumbai cyclist










01/06/2020

Vikramgad,Sajan.
29/09/2019

Vikramgad,Sajan.

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when mcvilla_the_jungle_yard posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share