SwamiRaj Tours and travels

  • Home
  • SwamiRaj Tours and travels

SwamiRaj Tours and travels Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SwamiRaj Tours and travels, Travel Company, .

14/01/2020

काळूबाई
'''मांढरदेवी''' हे सातारा जिल्ह्यातील एक हिंदू यात्रास्थान आहे.
मांढरदेवदेवस्थान येथील देवी माता पार्वतीचे रूप आहे. सध्या देवीला काळुबाई हे अस्सल मराठी नाव रूढ झाले आहे.
मंदिर -
देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच अशा टेकडी वर मांढरदेवी काळुबाई चे मंदिर आहे . मंदिर लहान असुन सभामंडप व गाभारा आहे. कळस रेखीव असुन त्यावर गाय, सिंह यांच्या मुर्ति बसविलेल्या आहेत. मंदीर पुर्वाभिमुख असुन मंदिरासमोर दिपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा, मांगीरबाबा, अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. परिसर निसर्गरम्य असुन वनराई ने नटलेला आहे.

मूर्ती.....
मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान (मुर्ती) असुन मुर्ती चत्रुभुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे.तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे.देवी उभी असुन एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपुर्ण मुर्तीस शेंदुर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व चेहर्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो.देवीचे वाहन सिंह आहे.
आख्यायिका-
सतयुगात मांढव्य ऋषि गडावर यज्ञ करित होते. ( या ऋषिंमुळे गडाला मांढरगड नाव पडले ) त्यांचा यज्ञकार्यात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञकार्य सिध्दिस जावे म्हणून मांढव्य ऋषिंनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरवात केली.तेव्हा महादेव प्रसन्न होवुन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगितले. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरवात केली.तेव्हा पार्वतीने प्रसन्न होवुन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले . आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातुन या मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते.तेव्हा देवीने रात्री चा वध करण्याचे ठरविले.पौष पोर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युध्दासाठी आवाहन केले.आणि तुंबळ युध्द करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले.

मित्रानो आज आपण माहिती घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण 'माथेरान'बद्दलमाथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड ह...
09/01/2020

मित्रानो आज आपण माहिती घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण 'माथेरान'बद्दल
माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

माथेरानमधील पर्यटनस्थळे

शार्लोट लेक

मार्केटपासून जवळजवळ १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे तळे आहे. माथेरानवरील पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय पुर्णपणे भरून वाहू लागतो. त्या वेळी तयार होणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा जोर ऊरात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. बाकी ऋतुंमध्ये संध्याकाळ जर छानपैकी घालवायची असेल तर शार्लोट लेकला दुसरा पर्याय नाही.

पॅनोरमा पॉईंट

हा पॉईंट उत्तर टोकावर असून त्याच्या पूर्व व पश्चिमेस दरी आहे. पुर्वेला खाली नेरळ दिसते, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा मुलूख दिसू शकतो.

गणपती पुळेगणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. ...
08/01/2020

गणपती पुळे

गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.
गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात.

गणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे.
गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे.
इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.
गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट...
31/12/2019

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती, याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५, स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे.[१] येथे मराठी, हिन्दी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

भौगोलिक परीस्थिती आणि हवामानसंपादन करा

महाबळेश्वर शहर १७.९२३७ उत्तर अक्षांश आणि ७३.६५८६ पूर्व रेखांश वर वसलेले आहे. याची सरासरी उंची १३५३ मीटर(४४३९फुट) आहे.[२] हे पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण बाजूस १२० किमी.आणि मुंबई पासून २८५ किमी अंतरावर आहे. हे १५० वर्ग किमी क्षेत्रफळ असणारे विशाल असे पठार आहे आणि त्याच्या सर्व बाजूंनी खोल दर्‍या आहेत. याचे समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाण १४३९मी.आहे जे विल्सन / सनराईज पॉइंट म्हणून ओळखले जाते.मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा तीन खेडेगावांचे मिळून हे शहर निर्माण झालेले आहे.
कृष्णा नदीचा उगम येथे झालेला आहे की जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जुन्या महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील 'गो'मुखातून या नदीचा उगम झाला अशी दंतकथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णूला शाप दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत असे म्हटले जाते. आणखी एक मनोरंजक बाब म्हणजे या कृष्णा नदीशिवाय आणखी ४ नद्या त्याच 'गो'मुखातून उगम पावलेल्या आह

SwamiRaj tours and travels🤗
31/12/2019

SwamiRaj tours and travels🤗

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SwamiRaj Tours and travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share