Kalyan Local Guide

  • Home
  • Kalyan Local Guide

Kalyan Local Guide Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalyan Local Guide, Tour guide, .

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म कुंडली माझे भाग्य म्हणून मला पाहायला मिळाली आणि माझे कर्तव्य म्हणून मी तुम्हा सर्वां समोर...
18/08/2024

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म कुंडली माझे भाग्य म्हणून मला पाहायला मिळाली आणि माझे कर्तव्य म्हणून मी तुम्हा सर्वां समोर सादर करत आहे..

25/03/2024
कल्याण लोकल गाईड तर्फुन सर्वांना होळी चे हार्दिक हार्दिक  शुभेच्छा....
24/03/2024

कल्याण लोकल गाईड तर्फुन सर्वांना होळी चे हार्दिक हार्दिक शुभेच्छा....

वारसा म्हणून मिळालेली आपली प्रतिकं आणि इतिहास आपण जपला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवला पाहिजे.
27/02/2024

वारसा म्हणून मिळालेली आपली प्रतिकं आणि इतिहास आपण जपला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवला पाहिजे.

तटबंदीतील एक एक दगड समुद्राला झुंज देत अजुनही उभा असलेला किल्ले रेवदंडा !
31/12/2023

तटबंदीतील एक एक दगड समुद्राला झुंज देत अजुनही उभा असलेला किल्ले रेवदंडा !

*वसुबारस*आजचा दिवस दोन कारणांनी लक्षात राहतो. एक कारण म्हणजे आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस गाय आणि तिच्या वासराची ...
09/11/2023

*वसुबारस*

आजचा दिवस दोन कारणांनी लक्षात राहतो. एक कारण म्हणजे आश्विन वद्य द्वादशी म्हणजेच वसुबारस गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस आणि दुसरं कारण म्हणजे कल्याण आणि भिवंडी शिवाजी महाराजांनी जिंकली आणि आरमाराची मुहूर्तमेढ रोवली ते निमित्ताने.....

कल्याण भिवंडी जिंकली.

अश्विन कृष्ण द्वादशी शके १५७९ (२४ ऑक्टोबर १६५७) या दिवशी दादाजी बापूजी रांझेकर यांनी कल्याण, तर सखो कृष्ण लोहोकर यांनी भिवंडी ही शहरे काबीज केली व कल्याणच्या खाडी किना-यावरील किल्ले दुर्गाडी येथे 'स्वराज्याचेे आरमार कल्याण नगरीत उभारलं'

या घटनेची शिवभारतात आलेली नोंद....

*त्वया गृहीत्वा कल्याणं तधा भीमपुरीमपी | यवनानां महासिध्दिनिलया: किल पातिता: ||५२||*
*तु्भ्य कुप्यति तेऽद्यापि यवनाः पवनाशनाः | अपहृ्त्यापी सर्वस्व कृता येषा वीडंबना ॥५३॥*
*निगृह्य यवनाचार्यानविचार्यात्मनो बलम ।* *प्रनतबध्नास्याववद्दानामध्वानमकुतोभयः ॥५४॥*
शिवभारत १८व्या अध्याय श्लोक ५२-५४

शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी काबीज केल्यानंतर यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या. यवनांनचे सर्वस्व हरण करून शिवाजी महाराजानी विडंबना केली आहे , तसेच काजी व मौलवी यांना देखील कैद केले.

5 Mahim FortBuilt by the then Governor of Bombay - Gerald Aungier in 1669 to strengthen the defense of British-ruled Bom...
03/11/2023

5 Mahim Fort
Built by the then Governor of Bombay - Gerald Aungier in 1669 to strengthen the defense of British-ruled Bombay, the Mahim fort was a place of strategic importance. It attracted many Gujarati Traders and Parsi Shipbuilders making the fort and the city more populous. It looks over Worli to the South, Bandra to the North and Mahim to the East. The fort is currently in a state of disrepair due to tidal erosion and administrative negligence.

4 Worli FortLocated in the Worli neighborhood of Mumbai, Worli Fort is an ancient defence fort that was built in around ...
02/11/2023

4 Worli Fort
Located in the Worli neighborhood of Mumbai, Worli Fort is an ancient defence fort that was built in around 1675. It is often mistaken to have been constructed by the Portuguese. But in reality, it was built by the British as a defence fort as their strategy to lookout for enemy ships and pirates. Overlooking the Mahim Bay, the fort offers some of the best views in the city and is visited by locals and tourists alike. In addition to that, the monument has a built-in well, a temple and ample viewpoints overlooking the vast sea.

3 Bandra FortAlso known as Castella de Aguada, Bandra Fort is an ancient Portuguese Fort that is situated in Land’s End ...
01/11/2023

3 Bandra Fort
Also known as Castella de Aguada, Bandra Fort is an ancient Portuguese Fort that is situated in Land’s End in the Bandra neighborhood of Mumbai. The fort lies several feet high from the average sea level, at a height of 24 m. Besides being a major tourist spot in the region, the fort has also been featured in several Bollywood films like Dil Chahta Hai and Buddha Mil Gaya. It is also frequented by couples and love birds who come here for photo and video shoots, pre wedding shoots etc.
Besides being an important historical site and a tourist attraction, Bandra Fort offers mesmerizing views of the sea. It is also known for its very stunning sunset views. In addition to that, the fort also has a staircased park that is visited by health freaks and fitness enthusiasts who come here to exercise and take routine walks. It is considered the most perfect place to meditate and relax.
Bandra Fort was built in the early 1640 AD by the Portuguese to act as a watchtower for the adjoining areas- Mahim Bay to the south, the islands of Worli to the south,the Arabian Sea to the west, the town of Mahim to the south west and Mumbai Harbour in the northern sea route. Initially it was also facilitated by cannons and guns for defence purposes.
Later, in the early 18th century, a part of it was demolished by the Britishers as it was posing a threat to them because it was being occupied by the Marathas. It was anyhow, occupied by the Marathas in 1739 AD who ruled here till about 1774 AD, after which the British finally gained possession after the Anglo - Maratha War.

2 Vasai FortLocated in the town of Vasai in the Palghar District of Maharashtra, Vasai Fort is a majestic fort and a pro...
31/10/2023

2 Vasai Fort
Located in the town of Vasai in the Palghar District of Maharashtra, Vasai Fort is a majestic fort and a protected monument by the Archaeological Survey of India. Also known as Fort Bassein or Fort Bacaim, it overlooks the confluence of the River Ulhas in the background and is one of the top tourist destinations in the region. Considered to be a heritage site and a notable historical monument, the architectural marvel stands sturdy with intact chapels and fortifications and very little ruins. It is also a popular spot among filmmakers and renowned music artists who visit here often to shoot their pieces amidst beautiful landscape and stunning scenery. The very famous “Hymn for the Weekend” by Coldplay was shot here as were several Bollywood movies like Josh, Aag and Khamoshi etc.
Architecture of vasai fort
Boasting of Indo-Portuguese history, Vasai Fort stands testimony to the rich history and culture of the bygone times. The mighty ramparts or the fortifications are overgrown with verdant vegetation and overlook the Vasai Creek and the Bhayandar Creek. Several sturdy staircases lead up to the watchtowers from which you can enjoy a beautiful panoramic view of the city. However, some of the Portuguese buildings inside the fort like the church etc. are in ruins but you can still figure out the structure and demarcated area of the same. Some of the outer walls or facades of these structures have carvings and inscriptions made on them. In addition to this, there are three chapels inside Vasai Fort that are completely in good state. They have facades resembling 17th century Potuguese churches.

1 Sion FortSurrounded by lush green lawns, Sion Fort is located on a hilltop which serves as a podium to it. It serves a...
30/10/2023

1 Sion Fort
Surrounded by lush green lawns, Sion Fort is located on a hilltop which serves as a podium to it. It serves as a serene attraction in the middle of the city hustle. The fort is a picturesque architectural stone structure with square windows which presumably had cannons in the earlier times. There is a stairway which leads you to the original structure.
Significance of Sion Fort
Sion Fort has a watchtower in the foreground. The fort is made secure with guards stationed at nook and crannies to protect the fort and avoid overcrowding. The change in its outlook is quite evident, but it still holds its old charm. At the base of the hill is the Mumbai Circle office of the Archaeological Survey of India, and a garden – Pandit Jawaharlal Nehru Udyan. Sion Fort was constructed by the Governor of Bombay, General Gerald Aungier in the interest of offering a passage from Bombay to the neighbouring island of Salsette. It held prime importance to the British as Salsette was in the fist of the Marathas. Currently, the gap between Salsette and the fort has been taken up by commercial Eastern Express Highway. The Archeological Society of India maintains this piece of heritage. The Fort has disintegrated and does not stand in its original beauty and structure. It is quite evident when you contrast it with a picture captured by James Wales in 1791-92 to its current outlook
Attractions At Sion Fort
The fort requires some excavation as it is no fun from just taking a view from the outside. Head inside the fort by taking the stairway. Head up and view the clock tower first. Then traverse through the areas, looking out of the vast bricked windows. You can also see the sole Canon which was possibly used to keep any trespassers away during the times of the British. The structure above is plaintive with just doors leading you from one room to another.
Clocktower Views
Then head to the verandah and take the city view from the top of the fort. It is a pretty picturesque view from up there. Through the clocktower, you can witness another bastion uphill with a tree located adjacent to it. It is another beautiful sight from the fort. You can while away your time, sitting on a bench in the lamp of nature and admiring the simple complexity of the scattered walls and ruins of the structure.
The closest point to the fort is Rani Laxmibai Chowk / Sion is 592 meters away, 8 min walk. Followed by Central Labour Institute is 937 meters away, 13 min walk.
By Train: To get to Sion Fort, take a train to Sion railway station and then walk up to the fort. The distance from Sion railway station is about 7 kilometres.
By Bus: You can take a bus from different points of the city to get to the fort. The bus lines which stop near the fort are 180, 22 LTD, 305, 348 LTD, 351, 354.
Taxi: You can take a cab from anywhere in the city to get to the fort directly. It is a convenient way, but it is time-consuming considering heavy traffic.

30/10/2023

Mumbai is Known for it's beaches and nightlife, Mumbai is also home to some significantly historic forts that have withstood the test of time. These forts in Mumbai have become popular heritage sites in the city and hold a lot of cultural significance with regard to the city.
So we are going to post each day one of the fort which is actual located in proper Mumbai.....

गडदेवी दिवस ९अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंक...
23/10/2023

गडदेवी दिवस ९
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे जोडकिल्ले “अंकाई टंकाई”...अंकाई टंकाई या जोडदुर्गा मधील अंकाईचा दुर्ग महत्त्वाचा आहे तसा टंकाई हा दुय्यम दुर्ग आहे मुख्य किल्ल्या जवळ असलेला दुसरा डोंगर हा मुख्य किल्ल्याला बाधक ठरु शकतो म्हणून तो डोंगर शत्रूच्या ताब्यात जाता कामा नये म्हणून तो दुर्गम करण्यात येतो अथवा त्यालाही तटबंदीचे शेलापागोटे चढवण्यात येऊन मुख्य किल्ल्यामध्ये समाविष्ठ करण्यात येतो त्यामुळे टंकाई हा अंकाईचा जोडदुर्ग झालेला आहे या जोडदुर्गांना जोडणाऱ्या खिंडीलाच बंदिस्त केल्यामुळे टंकाईचा प्रवेशमार्ग अंकाईच्या कह्यात आलेला आहे...गडदुर्गा “अंकाईदेवी माता”....🚩अंकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात इ.स १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला इ.स १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला इ.स १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला...“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई...

गडदेवी दिवस 8नांदेड जिल्ह्यात माहूरगडाची गडदुर्गा “माहूरची रेणुकामाता”....🙏🚩सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे मा...
22/10/2023

गडदेवी दिवस 8
नांदेड जिल्ह्यात माहूरगडाची गडदुर्गा “माहूरची रेणुकामाता”....🙏🚩सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुकामातेचे माहूर हे स्थान म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक स्थळांसोबतच निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे देव, सिद्ध,ऋषी यांचे निवास असलेल्या भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची प्रसिद्ध नगरी होती...त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रांत प्रवीण असलेला इश्वाकू नावाचा राजा होता व इश्वाकू राजाच्या सद्गुणी मुलीचे नाव होते रेणू..रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली...शंकरपार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रिबबाप्रमाणे कन्या प्रगटली तीच एकवीरा अदिती म्हणजेच श्री रेणुका..रेणुकेचे आणखीन एक रूप प्रगट होते आणि ते म्हणजे ‘लज्जागौरी’चे...महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी रेणुकामातेचे हे मूळ पीठ अतिशय शुचिर्भूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी आहे.. रेणुकेलाच मातंगी हेसुद्धा नाव आहे विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे.. म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे अशा तऱ्हेने समाजास आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे...शके १६९७ मध्ये लिहिल्या गेलेल्या ’श्री रेणुका महात्म्यम्’ या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य आणि महत्त्व श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते माहूर हा महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे...“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....

गडदेवी दिवस ७कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा “किल्ला सामानगड...
21/10/2023

गडदेवी दिवस ७
कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा “किल्ला सामानगड”....कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठ्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्व फार आहे कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे...सामानगडाची गडदुर्गा “आई भवानी”...🙏🚩गडावरील असलेली आई भवानी आजही उभी आहे मंदिराची बांधणी जुनी आहे स्थानिक लोक देवीला अतिशय सुंदर पद्धतीने साडीचोळी नेसवतात साडीचोळी रूपातील आई तुळजाभवानीची आठवण करून देते....“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....

गडदेवी दिवस 6 गडदुर्गा “आंग्लाईदेवी माता”....🙏🏼🚩परळी, गजवाडी सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे.. आश्वलायन रूषींचे...
20/10/2023

गडदेवी दिवस 6
गडदुर्गा “आंग्लाईदेवी माता”....🙏🏼🚩परळी, गजवाडी सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे.. आश्वलायन रूषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्ववलायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड, नवरसतारा अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत.. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असलेल्या किल्ले सज्जनगडा वरील आंग्लाई देवी माता... घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दहा दिवस इथे नवरात्रीचा उत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होतो या वेळी देवीची 'तळई' भरली जाते.. तळई म्हणजे एका मोठया परातीत नारळ ठेऊन परात पाण्याने भरलेल्या घागरीवर ठेऊन 'येळ कोट येळ कोट ... चांगभलं ... असं तीन वेळा म्हणत परात उचलली जाते. नंतर हे नारळ फोडून त्या खोबऱ्याच्या वाटया हळद लावून परत परातीत ठेऊन परत हा गजर तीन वेळा करतात. या प्रसंगी देवीची गाणी देखील म्हटली जातात. नवरात्रीच्या उत्सवात अनेक भागातून 'भुत्ये' देवस्थानात मुक्कामाला येतात. देवीच्या मानाची 'कवड्यां' ची माळ देवीपुढे ठेवली जाते. या नऊ रात्रीत रोज हे भुत्ये गळ्यात संबळ अडकवून भजन, कथा, भारुडं साजरी करून जागरण करतात. ते कवड्यांची माळ गळ्यात घालून पोत नाचवतात... “तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई... #गडदेवी

गडदेवी दिवस ५कन्हेरगडाची गडदुर्गा “पाटणादेवी”...🙏🚩पाटणादेवी एका अतिदुर्गम आणि अपरिचित अश्या किल्ल्याची निवासिनी पुणे, नग...
19/10/2023

गडदेवी दिवस ५
कन्हेरगडाची गडदुर्गा “पाटणादेवी”...🙏🚩पाटणादेवी एका अतिदुर्गम आणि अपरिचित अश्या किल्ल्याची निवासिनी पुणे, नगर, नाशिक ही भटक्यांची आवडीची ठिकाणे पण ह्या जिल्ह्याच्या थोडे बाहेर बघितले की आपल्याला खुणाऊ लागतात ते अपरिचित किल्ले आणि त्यावरील विशेष स्थाने...जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून जवळच असलेल्या गौताळा अभयारण्यात आहे कन्हेरगड किल्ला दाट जंगल, खळखळून वाहनारी नदी, विविध पक्षी आणि प्राणी हे ह्या अभरण्याचे आकर्षण ६६० मीटर उंचावलेल्या कन्हेरगडाच्या पायथ्याशी आहे पाटणादेवीचे सुप्रसिद्ध व भव्य असे हेमाडपंथी मंदिर...१८ भुजा असलेले पाटणादेवी आपल्या प्रत्येक हातात अस्त्र शस्त्र घेऊन तर आहेच तसेच दानव संहार करत सिंहावर सुद्धा आरूढ़ आहे पाटणादेवी हे दुर्गेचे अश्या प्रकारतील दुर्मिळ रूप दर्शविते मंदिरा शेजारील जंगल पक्ष्यांचे आवाज आणि पाण्याची झुळझुळ मन प्रसन्न करतात...इ.स. ११२८ मधे यादवांचे असलेले मांडलिक हेमाडीदेव निकुंभ ह्यांची पाटणदेवी ही राजधानी आणि राजधानी असल्याची पुरेपुर साक्ष कन्हेरगड हा येथे असलेल्या अवषेशावरुन देतो इ.स. १३०० मधे येथे फारूकी घराण्याने सत्ता स्थापन केली तर इ.स. १६०० मधे मुघल राजवटित हा किल्ला व प्रदेश गेला इ.स. १७५२ ते १८१८ पर्यन्त मराठी स्वराज येथे होते आणि इतर किल्ल्या प्रमाणे १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकला...किल्ला बघताना आपल्यास बघायला मिळतात ते सीता न्हाणी, नागार्जुन गुंफा, जैन गुंफा, यक्ष यक्षिणी, सप्तमातृका शिल्प, श्रृंगारचौरी लेणी, तटबंदी व इतर अवशेष.. वाट वाकडी करून पितळखोरे, कन्हेरगड आणि पाटणादेवीचे मंदिर अवश्य बघावे...“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....

गडदेवी दिवस ४न्हावीगड (रतनगड) किल्ल्याची गडदुर्गा “सप्तश्रृंगी देवी”...🙏🚩न्हावीगड हा चार हजार नऊशे फूट उंच गिरिदुर्ग किल...
18/10/2023

गडदेवी दिवस ४
न्हावीगड (रतनगड) किल्ल्याची गडदुर्गा “सप्तश्रृंगी देवी”...🙏🚩न्हावीगड हा चार हजार नऊशे फूट उंच गिरिदुर्ग किल्ला आहे तो नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेत आहे.. सह्याद्री पर्वताच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते सह्याद्रीच्या या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळक्यांच्‍या सोबतीने “न्हावीगड किल्‍ला” उभा आहे...इसवी सन १४३१ मधे अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी तुंबळ युध्द झाले दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाल्याने दोन्ही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन माघार घेतली शिवाजी महाराजांच्या काळात हा गड स्‍वराज्‍यात आला.. शिवकालीन कागदपत्रात न्‍हावीगडचा उल्लेख नाहावागड असा आला आहे...सह्याद्रीच्या कुशीतील कोणत्याही गडावर एखादी गडदेवता किंवा गडदेव हा हमखास आपल्याला पाहायला मिळतो पूर्वी गडनिर्माण करतानाच सर्वप्रथम गडदेवतेची स्थापना करण्यात येत व मग गड बांधण्यास सुरूवात होत असत.. येथेच एका दगडावर कोरलेली सप्तश्रृंगी माता आणि गंगादेवीची मूर्ती कोरलेली आहे....“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....

गडदेवी दिवस ३आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकल...
17/10/2023

गडदेवी दिवस ३
आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला “विजयदुर्ग”.... किल्ले विजयदुर्गावरील गडदुर्गा “भवानी माता”...🙏🚩छत्रपतींनी विजयदुर्ग किल्ला जिंकल्यावर किल्ल्यामध्ये बांधलेले भवानी मातेचं मंदिर मराठे वीरांना नेहमीच स्फूर्ती देत आलं सन १६०० मध्ये शिवाजी महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आजही या मंदिरात पाहायला मिळते विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास एेकताना मराठ्यांच्या अंगात वीरश्री निर्माण करून शत्रूचा पाडावा करण्यास स्फूर्ती देणाऱ्या या देवतेचं तत्कालीन आठवण करून देणारं मंदिर आहे...“सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…”

गडदेवी दिवस २हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळ...
16/10/2023

गडदेवी दिवस २
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री शिर्काई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री शिर्काई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही अबाधित आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरांमध्ये देखील शिर्काई देवीची नोंद आहे. शिर्काई म्हणजे महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते.किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिर्काई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिर्काई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिर्काई देवीचे मंदिर आहे. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता मानली जाते. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिर्काई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.शिर्काई देवीची मूर्ती अष्टभूजा असलेली महिषासुरमर्दिनी भवानीची आहे. मूर्ती शिवपूर्वकालातील असावी, माधवराव पेशव्यांचे सरदार आपाजी हरी यांनी १७७३ मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा प्रथम शिर्काई देवीचे दर्शन घेतल्याची, नव चंडिकायाग केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये घट उठल्यानंतर शिर्काई देवीच्या गोंधळ होई. १७८६ मध्ये हा गोंधळ विधी बंद करण्यात आला.गुहेतील स्वयंभू भवानी देवीकिल्ले रायगडावर देवीचे दुसरे स्वयंभू स्थान असून ती भवानी देवी म्हणून ओळखली जाते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या डोंगराच्या टोकदार आकाराला भवानी टोक असे म्हटले जाते.जुन्या दस्तांमध्ये श्री देवी भवानी राजहुडा असा उल्लेख आढळून येतो. भवानी मंदिराकडे जाणारी पायवाट अत्यंत अवघड, तसेच धोकादायक आहे. दगडी गुहेत देवीची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात येते. या ठिकाणी एक शिवलिंग देखील असून पेशवेकाळांमध्ये या मंदिराच्या पूजेची व्यवस्था करण्यात आली होती, अशी पेशवे दप्तरामध्ये नोंद आहे. नवरात्रौत्सवात गडावर येणारे भाविक आणि शिवप्रेमी शिर्काई आणि भवानी देवीचे दर्शन आवर्जून घेतात. #गडदेवी

गडदेवी दिवस १स्वराज्याच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरलेला छत्रपती शिवरायांच्या एक मुख्य शिलेदार “तोरणा/ प्रचंडगड”....तोरणाची...
15/10/2023

गडदेवी दिवस १
स्वराज्याच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरलेला छत्रपती शिवरायांच्या एक मुख्य शिलेदार “तोरणा/ प्रचंडगड”....तोरणाची गडदुर्गा “तोरणजाई देवी” मंदिर...🙏🚩कोठी दरवाज्यासमोरच्या दगडी चिरेबंदी तटामध्ये एक छोटे मंदिर आहे त्यामध्ये तोरणजाई देवीची मूर्ती आहे वेल्हे गावचे लोक येथे नवरात्रोत्सव साजरा करतात....इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा/प्रचंडगड पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असत या मावळातून कानंदी नावाची नदी वाहत असल्यामुळे या खोर्या ला कानंद मावळ असे नाव मिळाले याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला खरीव खिंडी आहेत...“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची कायातुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई.... #गडदेवी

350th year of Chhatrapati Shivaji Maharaj's CoronationPrivate Presentation folder with My Stamps
28/07/2023

350th year of Chhatrapati Shivaji Maharaj's Coronation
Private Presentation folder with My Stamps

🎊उधे ग अंबे उधे...🎊कल्याणच्या दुर्गाडी देवीची पूजा करतानाचे सपत्नीक आदरणीय शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे सोबत धर्मवीर...
13/05/2023

🎊उधे ग अंबे उधे...🎊
कल्याणच्या दुर्गाडी देवीची पूजा करतानाचे सपत्नीक आदरणीय शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे सोबत धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि शिवभक्त साबीर भाई शेख..
प्रकाशचित्रात असलेली दुर्गाडीची दुर्गादेवी...हिच्याच आशीर्वादाने आणि साक्षीने श्री शिवाजी राजांनी कल्याणच्या खाडीत मराठा आरमाराची स्थापना केली...या दुर्गाच्या पायभरणीच्या वेळी महाराजांना द्रव्य मिळाले...पुढे याच आरमाराने मुंबई जवळील नागाव च्या दर्यात इंग्रजांना पराभूत करून खांदेरी जलदुर्गाची उभारणी केली...

🙏🚩🙏🎭🙏🚩🙏🎭🚩🙏🎭🚩🙏🎭🚩🙏

01/05/2023

Maharashtra!!

Third largest state!
Second most populous state!
State of largest commercial and industrial centres!
State of Shri Chhatrapati Shivaji Maharaj!
State of social reformers such as SavitriBai Phule, Karve, Agarkar and many more!
State of pioneers such as Dr. AnandiBai Joshi, Kirloskar and many more!
State of Bharat Ratnas, Sachin Tendulkar and Lata Mangeshkar!

State of rich culture and traditions!
State of Ukadiche modak and Puranpoli!
State of majestic Sahyadri, tough forts and serene beaches!

I don’t even know where to stop this post. I have utmost respect for each state, culture, race, religion, yet, there is always this pride filled in my heart- I am Marathi❤️

In remembrance of those who devoted their lives and sacrificed their blood to form Maharashtra, to you all-

“JAI MAHARASHTRA”

नाणेघाटातील प्राचीन जकातीच्या रांजणाचे संवर्धन.रांजणाचा भोवताली दगडी चौथरा बांधण्यात आला आहे.
10/04/2023

नाणेघाटातील प्राचीन जकातीच्या रांजणाचे संवर्धन.
रांजणाचा भोवताली दगडी चौथरा बांधण्यात आला आहे.

दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर पश्चिम आकाशात आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी खगोलीय घटना पाहायला मि...
25/03/2023

दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर पश्चिम आकाशात आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी खगोलीय घटना पाहायला मिळाली, ही अनोखी खगोलीय घटना म्हणजे चैत्र शुकलेच्या तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती होय.

वेळ होती सायंकाळी ७.१५ ते ७.४५, या वेळेत पश्चिम आकाशात चांगल्या प्रकारे चंद्रकोर पाहायला मिळाली, त्या नंतर म्हणजे ८ वाजल्या नंतर चंद्र आणि शुक्र मंद होत गेले .

ज्यांनी हा नजरा पाहिला ते नशीबवानच 😊🙏🚩

22/03/2023

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan Local Guide posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalyan Local Guide:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share