24/07/2023
गोखले टूर्स आयोजित - श्री क्षेत्र गिरनार परिक्रमा स्पेशल
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।। जय गिरनारी
ll गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमःll
गोखले टूर्स आयोजित दिव्यत्वाची जेथे प्रचिती - श्री क्षेत्र गिरनार परिक्रमा स्पेशल (सोरटी सोमनाथ आणि गीर जंगल सफारी सह) .
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत सर्वांसाठी प्रवेश मिळतो. ही दत्तगुरूंची कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत येथे येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन म्हणजे दुग्ध शर्करा योगच.
चला तर मग उत्साहाने आणि उमेदीने गिरनार परिक्रमेत सहभागी व्हायला
परिक्रमेची तारीख खालील प्रमाणे
२३ ते २९ नोव्हेंबर २०२३
प्रवासी खर्च १६,५००/- प्रति व्यक्ती
सोरटी सोमनाथ, गीर जंगल बस सफारी , गिरनार परिक्रमा गुरु शिखर (रोप वे खर्चा सहित)
लवकर आपला सहभाग नोंदवा म्हणजे बस, रेल्वे आणि हॉटेल रूम बुक करणे सोईस्कर होईल.......
सहलीस ईच्छुक पर्यटकांस कळविण्यात येते कि रेल्वेमध्ये सिट्स उपलब्ध असेपर्यंतच आम्ही ठरलेल्या रक्कमेनुसार बुकिंग घेवू शकतो. तरी आपण विलंब केल्यास तत्काल तिकिटसाठी सहलीच्या रक्कमेव्यतिरिक्त २०००/- प्रत्येकी ज्यादा रक्कम भरावी लागेल.
यात्रेत समाविष्ट असलेले मुद्दे :-
१) पुणे / नाशिक येथून मुंबई पर्यंतचा परतीचा बस / रेल्वे प्रवास.
२) संपूर्ण प्रवास वातानुकूलित रेल्वे ३rd AC क्लासने.
३) सॅनिटायाझिंग केलेलं स्वच्छ डबल शेअरिंग हॉटेल
४) सहली दरम्यान चहा नाश्ता आणि दोन्ही वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण.
५) सर्व खर्च समाविष्ट भक्ति यात्रा (रोपवे सहित / गीर जंगल बस सफारी) .
६) प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित सीट्स.
७) सहलीदरम्यान गिरनार यात्रेचा अनुभव असलेले यशस्वी संयोजक.
८) महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून यायचे असल्यास मुंबई / पुणे / नाशिक पर्यंत प्रवास खर्च आकारून सोय.
९) कोविड - १९ चे सर्व नियम आणि अटींचे पालन करून सुरक्षित पर्यटन.
अधिक माहितीसाठी ७७२०९२५६५० / ९६५७७०२६९७ ह्या व्हाट्सअप क्रमांकावर "परिक्रमा" असा मेसेज करा संपूर्ण माहिती तुम्हाला पाठवली जाईल.
संयोजन गोखले टूर्स
संदेश झोडगेकर - ७०३०९४४९९२ / ९६५७७०२६९७.
पंकज गोखले - ७०३०९४४९९१ / ७७२०९२५६५०.