Maharashtra Dharm : Goraikar Mavle

  • Home
  • Maharashtra Dharm : Goraikar Mavle

Maharashtra Dharm : Goraikar Mavle जय महाराष्ट्र मित्रांनो !!

भगवा झेंडा पेलायला .....
मर्द
मावळा लागतो ज्याला
जमत
नाही तो पळून जातो ...
मराठी माणसा .... शपथ
भगवा झेंडाची ....!!!
कमान भगवा झेंडाची मोडू
नको ..............
साथ भगवा झेंडाची सोडू
नको...........!!!
|लढ भगवा झेंडासाठी
मर भगवा झेंडासाठी |
!! जय भवानी !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे,झोके घेत कसे चहुकडे हिरवे गालिचे !!
10/08/2020

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे,
झोके घेत कसे चहुकडे हिरवे गालिचे !!

(या करोनारुपी महामारीत संपूर्ण जगातील मानवजात घरात कोंडनू आहे, यास नेहमी भंटकंतीवर असणारे ट्रेकर्स कसे अपवाद असतील? सर्व...
26/04/2020

(या करोनारुपी महामारीत संपूर्ण जगातील मानवजात घरात कोंडनू आहे, यास नेहमी भंटकंतीवर असणारे ट्रेकर्स कसे अपवाद असतील? सर्व ट्रेकर्स मंडळींना सह्याद्रीची, दऱ्या-खोऱ्यांची, कातळ-कड्यांची ओढ लागलीय. आणि बरेच दिवस झालेत आपल्याला भेटायला आपले भटके मित्र कसे आले नाहीत असा प्रश्न सह्याद्रीला, डोंगर-दऱ्यांना पडल्यावर एका ट्रेकर्सने सह्याद्रीस पत्र पाठवलंय ...) प्रिय सह्याद्री, आता तुला पुन्हा भेटायचे असेल तर घरीच बसून संयम ठेवणेच योग्य. [ 193 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2020/04/26/%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/

(या करोनारुपी महामारीत संपूर्ण जगातील मानवजात घरात कोंडनू आहे, यास नेहमी भंटकंतीवर असणारे ट्रेकर्स कसे अपवाद असत...

Morbe Dam, Chowk, Panvel.मोर्बे धरण, चौक, पनवेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खैरवाडी- गारमाळ परिसरात ५0 एकर जागेवर...
26/02/2020

Morbe Dam, Chowk, Panvel.मोर्बे धरण, चौक, पनवेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खैरवाडी- गारमाळ परिसरात ५0 एकर जागेवर मोर्बे धरण वसलेले आहे. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ या धरणाचे पाणी शेतीसाठी वापरतात. तर मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांतील ग्रामस्थ या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. ३.२२ दशलक्ष घनमीटर इतकी या धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. जवळच मुंबई - पुणे हायवे आहे. पावसाळ्यात इथे बरेच पर्यटक फिरायला येतात. - विशाल अडखळे.
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2020/02/26/morbe-dam-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a5%87-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%a3/

Morbe Dam, Chowk, Panvel.मोर्बे धरण, चौक, पनवेल. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खैरवाडी- गारमाळ परिसरात ५0 एकर जागेवर मोर्बे धर...

ईरशाळगड - एक रम्य संध्याकाळ. उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्या श्वासा...
15/02/2020

ईरशाळगड - एक रम्य संध्याकाळ. उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्या श्वासांची आणि दिवस मावळेल म्हणून ऊर फुटस्तोवर धावताना निघालेल्या घामाच्या धारांची! रविवारचा दिवस होता आणि मी दिवसभर लोळत होतो. बरेच दिवस काही Thrilling Adventure केलं नाही तर शरीर कस सुस्तावून जातं एकदम. दुपारी 1.00 ला मनात आले कुठेतरी भटकून येऊ.. कंटाळा आलाय... माझा Trek Partner स्वप्निलला विचारू म्हणून call केला... [ 273 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2020/02/15/%e0%a4%88%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be/

ईरशाळगड – एक रम्य संध्याकाळ. उंच कड्यावर जाऊन काढलेल्या फोटोच्या मागे असते ती कठोर मेहनत चढण्याची, धापा टाकलेल्य.....

गंमती ट्रेकिंगच्या भाग 2(सिंधुदुर्ग जिल्हा) त्या दिवशी आमची बरीच घौडदौड झाली होती. आदल्या रात्री कामावरून येऊन 2-3 तासां...
01/02/2020

गंमती ट्रेकिंगच्या भाग 2(सिंधुदुर्ग जिल्हा) त्या दिवशी आमची बरीच घौडदौड झाली होती. आदल्या रात्री कामावरून येऊन 2-3 तासांची झोप घेऊन सकाळी 3.00 वा. मुंबई सोडली होती. दिवसभरात रमत गमत कोल्हापूरात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती, आणि आता सगळेच Down झाले होते. फोंडा घाटात यायला रात्र झाली. त्यात फोंडा घाटात रस्ता खराब असल्याने आमचा बराच वेळ गेला. आणि त्यात तारकर्लीहून काका आम्हाला सारखे जेवणासाठी call करत होते त्याना 10.00 वा पोहचतो असे सांगितलेले. [ 142 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2020/02/01/%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2-gamati-trekki/

गंमती ट्रेकिंगच्या भाग 2(सिंधुदुर्ग जिल्हा) त्या दिवशी आमची बरीच घौडदौड झाली होती. आदल्या रात्री कामावरून येऊन 2-3 त...

गिर्येचा रामेश्वररामेश्वर वाडी, देवगड तालुका, सिंधुदुर्ग. आता विजयदुर्गावरून परतीचा प्रवास सुरू करून अधांर पडला होता. दे...
31/12/2019

गिर्येचा रामेश्वररामेश्वर वाडी, देवगड तालुका, सिंधुदुर्ग. आता विजयदुर्गावरून परतीचा प्रवास सुरू करून अधांर पडला होता. देवगड मालवण रस्त्याने जाताना रामेश्वर अशी पाटी दिसते. रस्त्याला लागूनच एक-दिड किलोमीटरवर रामेश्वराचे मंदिर होते. आम्ही गाडी फिरवली लगेच. काळोखात गाडीच्या उजेडात आम्ही मंदिर नाहीतर त्याचा कळस तरी दिसतोय काय ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण फोकसमध्ये आम्हाला फक्त प्रवेशद्वार दिसले. आम्ही गेलो तिथे. अगदी प्रवेशद्वारात उभे राही पर्यंत मंदिर काय आम्हाला शोधता आले नाही. [ 222 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2019/12/31/girye-rameshwar-temple/

girye rameshwar temple

किल्ले अशेरीगड. उंची - १७०० फुट जवळचे गाव - खोडकोना, पालघर जिल्हा. सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास... गावातल्या वाघदेवाच्...
29/12/2019

किल्ले अशेरीगड. उंची - १७०० फुट जवळचे गाव - खोडकोना, पालघर जिल्हा. सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास... गावातल्या वाघदेवाच्या छप्परवजा मंदिरातला रात्रीचा मुक्काम... कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री ३.०० वा. शेकोटीसाठी केलेली धावपळ... कोपऱ्यात नं झोपण्यासाठी सिद्धूची उडालेली धांदल...!!! [ 344 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2019/12/29/asherigad/

किल्ले अशेरीगड. उंची – १७०० फुट जवळचे गाव – खोडकोना, पालघर जिल्हा. सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास… गावातल्या वाघद....

घोसाळगड तारीख - २६ मे २०१७, शुक्रवार.उंची ८५०जवळचे गाव - घोसाळेठिकाण- रोहा, रायगड, महाराष्ट्र. तर आता या वर्षी एवढ्या कड...
29/12/2019

घोसाळगड तारीख - २६ मे २०१७, शुक्रवार.उंची ८५०जवळचे गाव - घोसाळेठिकाण- रोहा, रायगड, महाराष्ट्र. तर आता या वर्षी एवढ्या कडक उन्हात ट्रेकिंगला जायचं म्हणजे तसं अगदी जिवावरच येत होत, पण नाही नाही करता करता एक छोटासा ट्रेक झालाच. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो आणि तिथूनच माझ्या दोन भावां सोबत म्हणजेच विजय दादा आणि राहूल सोबत घोसाळगडाची भटकंती करून घेतली. [ 459 more words ]
https://goraikarmavletrekkers.wordpress.com/2019/12/29/ghosalgad/

घोसाळगड तारीख – २६ मे २०१७, शुक्रवार.उंची ८५०जवळचे गाव – घोसाळेठिकाण-  रोहा, रायगड, महाराष्ट्र. तर आता या वर्षी एवढ्....

Vijaydurga Fort,Dist. Sindhudurg, Maharashtra.Vijaydurg, which literally means "Victory Fort",(Eastern Gibraltar Fort ca...
23/12/2019

Vijaydurga Fort,
Dist. Sindhudurg, Maharashtra.

Vijaydurg, which literally means "Victory Fort",
(Eastern Gibraltar Fort called by British)

आपल्या घरात बसून राहिलो तरी गरम होते,पण एक मिनटं विचार करा त्याच वेळी आपला शेतकरी भर उना तानात शेतात राबतोय ते ही आपल्या...
26/04/2019

आपल्या घरात बसून राहिलो तरी गरम होते,
पण एक मिनटं विचार करा त्याच वेळी आपला शेतकरी भर उना तानात शेतात राबतोय ते ही आपल्या दोन वेळेचं आन मिळावं म्हणून...
आणि आपण काय करतोय फक्त एक दिवस साजरा करतो त्या साठी तो ही एक status अपलोड करून !!

हिचं का आपली परतफेड ???


maharashtra






.
of.maharashtra@maharashtra_desha

.clicks

आमच्या हातात धागेदोरे नाहीत की, गळ्यात ताईत नाही, आमचा रूबाब यातच...!!!  #राजमुद्रा
16/03/2019

आमच्या हातात धागेदोरे नाहीत की, गळ्यात ताईत नाही, आमचा रूबाब यातच...!!! #राजमुद्रा

उमरठ, पोलादपूर.Umrath, Poladpur.पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याला गाडी वळवताच पुढे गेल्यावर डाव्या हाताला "नरवीर तानाजी मालु...
24/02/2019

उमरठ, पोलादपूर.
Umrath, Poladpur.

पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याला गाडी वळवताच पुढे गेल्यावर डाव्या हाताला "नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी असलेला" द्वार दिसलाच, कोणताही वेळेचा विचार न करता नकळतच गाडी आत वळली गेली आणि आम्ही थेट पोचलो ते ११-१२ किमी वर असणाऱ्या उमरठे या ऐतिहासिक गावात!

- विशाल अडखळे.


कुंभळे गावचा नागदेव.सुट्टीत गावी असलो की लहानपणी मोठी आई आम्हाला गोष्टी सांगायची त्यात एक गोष्ट मनात घर करून राहीली ती क...
30/12/2018

कुंभळे गावचा नागदेव.

सुट्टीत गावी असलो की लहानपणी मोठी आई आम्हाला गोष्टी सांगायची त्यात एक गोष्ट मनात घर करून राहीली ती कुंभळे गावच्या नागदेवाची.

गोष्ट अशी की जुन्या काळात पंचक्रोशीत जर कोणा एखाद्याला साप चावला तर त्याला या कुंभळे गावाच्या नागदेवाच्या भल्या मोठ्या वारूळात नेऊन एकट्याला ठेवले जाई, मग वारूळातून भला मोठा नागदेव बाहेर येई आणि त्या माणसाच्या शरीरातील विष बाहेर काढी.

ही गोष्ट कायम माझ्या मनात घर करून राहिली आणि माझ्या जिज्ञासू वृत्तीला तो वारूळ प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लागली. शेवटी योग आला तो भावाची लग्नपत्रीका त्या गावात वाटण्याच्या हेतूने.

रायगड जिल्ह्यात तळा तालुक्यात प्रसिद्ध कुडालेणीच्या जवळच निसर्गाच्या सानिध्यातले कुंभळे हे छोटसं गाव आहे. गुगल मॕपच्या नजरकैदेतून सुटलेल्या या गावाच्या वेशीपाशीच पुरातन काळातलं नागदेवाचं मोठ्ठं वारूळ आहे आणि त्या वारूळात भला मोठा नागदेव अजुनही अस्तित्वात आहे अशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे. प्रत्यक्ष जाऊन हे मंदिर पाहिले असता तिथे आता प्रशस्त मंदिराचे कामकाज चालू आहे. मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानातून खास कारागीर आले आहेत. मंदिरात पुरातन काळातली पाच दगडी शिल्पे आहेत. त्यातल्या दोन दगडी शिल्पांवर तांब्याचे मुखवटे बसवण्यात आले आहेत.

पोहचण्याच्या वाटा :-

१) मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर या गावी उतरून १४ किमी वरील तळा तालुक्यात एसटीने किंवा टमटमने यावे. इंदापूर तळासाठी एसटीची तसेच शेअरींग टमटमची सोय दर अर्धा-एक तासाने असते. तळातून रोवळा एसटी बसची सोय आहे तसेच रोवळ्यापर्यंत शेअरींग टमटम आहेत. तिथून पुढे ५-६ किमी वर असणाऱ्या कुंभळा या गावी जायला डाव्या हाताला फाटा फुटतो. तिथून पुढे उजव्या हाताला जाणारा रस्ता हा वरळ गावात जातो आणि डाव्या हाताचा रस्ता कुंभळे या गावी जातो.

२) मुंबई सेंट्रल वरून रात्री १०.३० वा रोवळा एसटी बसने शेवटच्या रोवळा या गावी उतरावे. रोवळा गावातून ५-६ किमी असणाऱ्या कुंभळा या गावी यावे.

३) तळा तालुक्यातून म्हसळा एसटीने कुंभळा-वरळ फाट्यावर यावे.

जवळचे पाहण्यासारखी ठिकाणे -
१) तळेगड
२) कुडा लेणी
३) मुरूड जंजिरा
४) घोसाळगड
५) दिवेआगार
६) हरिहरेश्वर

- विशाल अडखळे.
३०-१२-२०१८ @ Tala, Maharashtra, India

किल्ले अशेरीगड.१ डिसेंबर २०१८.सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास... गावातल्या वाघदेवाच्या छप्परवजा मंदिरातला रात्रीचा मुक्का...
07/12/2018

किल्ले अशेरीगड.
१ डिसेंबर २०१८.

सुसाट निघालेला रात्रीचा प्रवास... गावातल्या वाघदेवाच्या छप्परवजा मंदिरातला रात्रीचा मुक्काम... कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री ३.०० वा. शेकोटीसाठी केलेली धावपळ... कोपऱ्यात न झोपण्यासाठी सिद्धूची उडालेली धांदल... सकाळचा मस्त कोरा करकरीत वाफाळलेला चहा... गड चढताना यशनी पावलोपावली मारलेल्या बैठका... मी थकलोच नाही हे दाखवून देण्यासाठी गौरवने केलेली कलाकारी... "भाय मी थकलो नाही रे फक्त पाय दुखतायत!" या dialogue मारून सगळ्यांचा पिकलेलेला हश्या... डोळ्यांत साठवलेले किल्ल्याचे सौंदर्य... झाडाखाली कातळावर आडवे पडून समोरचा नयनमनोहर डोंगर-दऱ्याचे सुख घेत केलेला आराम म्हणजे Duplex पलंगही त्यासमोर वाटेल फिका... पुन्हा परतीचा प्रवास... गावातल्या कुडाच्या भिंतीच्या घरात वारली चित्रकलेच्या सानिध्यात उरकलेले पोटभर जेवण... आणि पुन्हा घोड्यांवर स्वार होऊन ७५ च्या Nonstop speed ने गाठलेली मुंबई!
गोराईकर मावळे ट्रेकर्स (GMT) सोबत अविस्मरणीय अनुभवाची शिदोरी घेऊन पुन्हा नव्या दमाने आता Office ची सुरवात!

- विशाल अडखळे.
GMT
@ Asherigad

एरवी काळी कुट्ट असलेली रात्र चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने न्हाऊन निघालीय...  October Heat सरून हलकीच हिवाळ्याची चाहुल सुरू...
23/10/2018

एरवी काळी कुट्ट असलेली रात्र चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने न्हाऊन निघालीय... October Heat सरून हलकीच हिवाळ्याची चाहुल सुरू... रातकिडेही चंद्राच्या प्रकाशात आता गपगार झालेत... चांदण्या प्रकाशात मस्त एका निवांत ठिकाणी लावलेला Camp! धडपड चाललीय आता रात्रीची चुल मांडायची... चांदण्यांची मैफिली जमलीय आणि आता त्यात आमची भर!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

@ Mahuli Fort Trek

01/10/2018
रानमेवा.
01/10/2018

रानमेवा.

जिजाऊंच्या स्वप्नपूर्तीचा, शिवरायांच्या कर्तव्यपूर्तीचा,स्वराज्यातील रयतेच्या अभिमानवृद्धीचा दिवस..!! #शिवराज्याभिषेक #श...
06/06/2018

जिजाऊंच्या स्वप्नपूर्तीचा, शिवरायांच्या कर्तव्यपूर्तीचा,
स्वराज्यातील रयतेच्या अभिमानवृद्धीचा दिवस..!!
#शिवराज्याभिषेक
#शिवराज्याभिषेकदिन

कपडे तसे माखलेले, किचिंतसे अजिर्ण होऊन फाटलेले सुध्दा, पण दिवसभर अपार मेहनत केल्याची साक्ष देत होते. माझ्या एका फोटोने ल...
01/06/2018

कपडे तसे माखलेले, किचिंतसे अजिर्ण होऊन फाटलेले सुध्दा, पण दिवसभर अपार मेहनत केल्याची साक्ष देत होते. माझ्या एका फोटोने लांबूनच त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

त्याला घाई दिवसभर गोळा केलेले काजू, करवंद, जांभळे बाजारात लवकरात लवकर पोचवायची आणि मला घाई त्याला फोटोत टिपायची!

एका फोटोची किंमत काय ती आज जाणली!

Presented by
27/03/2018

Presented by


मरणाला घाबरणारे खुप बघीतले,मरणाला न घाबरणारेही खुप बघीतले...पण...मरणालाच घाबरवणारा एकच बगीतलाय...शिवशंभू!               ...
21/03/2018

मरणाला घाबरणारे खुप बघीतले,
मरणाला न घाबरणारेही खुप बघीतले...
पण...
मरणालाच घाबरवणारा एकच बगीतलाय...

शिवशंभू!


Good Evening friends
13/03/2018

Good Evening friends

वसंताच्या आगमनासाठीवृक्ष नटले आहेत.जुनी पानॆ गळुनी नवी पालवी मिरवीत आहॆत,रंग-बरंगी रंगाची उधळण करीत आहॆत,जुनॆ नकॊ तॆ हॊळ...
01/03/2018

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत.
जुनी पानॆ गळुनी नवी पालवी मिरवीत आहॆत,
रंग-बरंगी रंगाची उधळण करीत आहॆत,
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकुन तुम्हीही,
या जिवनाच्या रंगा-रंगात रंगुन जा... !!!

!! गोराईकर मावळे ट्रेकर्स कडून तूम्हास हॊळीच्या कलरफुल शुभॆच्छा!!😊🙏🏻

स्वराज्याचे तोरण... किल्ले तोरणा.
27/02/2018

स्वराज्याचे तोरण... किल्ले तोरणा.

Every Sunset Is An Opportunity To Reset
22/02/2018

Every Sunset Is An Opportunity To Reset

सर्वांना शिवाजयंतीच्या शुभेच्छा!
19/02/2018

सर्वांना शिवाजयंतीच्या शुभेच्छा!

18/02/2018

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Dharm : Goraikar Mavle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra Dharm : Goraikar Mavle:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share