Ignited Journey

  • Home
  • Ignited Journey

Ignited Journey Fort..Historical and spectacular places..study tours..seashore..Adventure. Lets ignite your inner soul Passionately.
(4)

@द्रोणा डिफेन्स अकॅडमी, खोपेगाव पाटी, पेठ, लातूर.
18/02/2024

@द्रोणा डिफेन्स अकॅडमी, खोपेगाव पाटी, पेठ, लातूर.

मां की मेहनत रंग लाई...मागचे काही वर्ष घरचं शेत दुसऱ्यांना करण्यासाठी दिलेलं यावर्षी मात्र घरीच करायचं ठरवलं आणि मला गाव...
26/01/2024

मां की मेहनत रंग लाई...

मागचे काही वर्ष घरचं शेत दुसऱ्यांना करण्यासाठी दिलेलं यावर्षी मात्र घरीच करायचं ठरवलं आणि मला गावात, शेताकडं जास्त करमतं असं म्हणत आईने शहरातून काढता पाय घेतला. आईने आपल्यासोबतच राहावं असं खूप वाटतं पण इथे शहरात आईला जास्त करमत नाही. त्यामुळं आपल्याला जास्त आग्रह करता येत नाही.

तसं आईचं आता भरपूर वय झालं आहे त्यामुळे आता आईनं फक्त बसुन राहावं, देव धर्म करावं, इकडे-तिकडे फिरत राहावं पण आईचं आधीपासून काम केलेलं शरीर असल्यामुळे तिला बसून राहु वाटत नाही. त्यामूळे आई शेतात जास्त रमते अन् शेतात ती काही ना काही करत असते. त्याचाच परिणाम वर्षीचे दोन्ही सिझन खूप छान आले आहेत..🍀🌿🍀🌿

माये, तुझ्या अपार कष्टाला तोड नाही.
म्हणून तर शेती बहरायला वेळ लागत नाही...

I💛you आई❣️

चांगले अनुभव आपण नेहमी शेअर करत असतो. सोबतच  #कडवट अनुभवही शेअर केले पाहिजेत. त्यातूनही काही शिकायला मिळू शकतं, म्हणूनच ...
12/08/2023

चांगले अनुभव आपण नेहमी शेअर करत असतो. सोबतच #कडवट अनुभवही शेअर केले पाहिजेत.
त्यातूनही काही शिकायला मिळू शकतं, म्हणूनच केलेला हा लेखनप्रपंच…
—————————————————

महाविद्यालयीन काळात लॅपटॉपची गरज भासू लागली आणि तो घ्यायचं असं ठरलं आणि सुरु झाली त्यासाठी लागणाऱ्या पैश्यांची जमवाजमव.

मग थोडे घरून घेतलेले पैसे, थोडे कॉलेज करताना (पार्ट टाईम) जॉबमधून मिळवलेले पैसे त्यातुन घेतलेला हा माझा पहिला आवडता लॅपटॉप होता.

अनेक वर्षांच्या वापरादरम्यान तो माझा कमी आणि माझ्या मित्रांचाच जास्त असं बघणाऱ्यांना वाटायचं इतका तो मित्रांकडे असायचा पण अनेक वर्षानंतर तो एका दिवशी मित्राच्या रूमवरुन चोरीला गेला.

Laptop गेल्याचं दुःख होतंच त्यापेक्षा जास्त दुःख झालं ते म्हणजे, त्या लॅपटॉप मध्ये मी अनेक वर्षांपासून जमवलेला Data होता. तसेच ज्या पुस्तकाच्या लेखनाचे मी काम करत होतो त्याची टिपणं, संदर्भ, ड्राफ्ट्स, रेकॉर्डिंग्स हे सर्व त्यासोबत गेलेलं. सोबतच स्पर्धा परीक्षा तसेच SSB मुलाखतीच्या तयारीसाठी जमा केलेले इलेक्ट्रॉनिक माध्यमातील साहित्य व विविध संस्थांच्या माध्यमातुन देशभर फिरत असताना मित्रमंडळींकडून जमवलेला Data गेल्याचं जास्त दुःख झालं होतं.

त्यानंतर अनेक दिवस अजिबात करमत नव्हतं. राहून राहून लॅपटॉपमधील त्या गेलेल्या Data ची आठवण यायची. Laptop नाही पण किमान त्यातील Data तरी चोरणाऱ्याने परत करावा असं उगीच वाटून जायचं..आपल्याला भले वाटो चोरांनी चोरीतही नैतिकता पाळावी पन ते थोडंच शक्य असतं.

त्यात त्यावेळी असं समजलेलं की, पुण्यात चोरीला गेलेली वस्तू जुन्या बाजारात/चोर बाजारात विक्रीला येते. त्यामुळे laptop गेल्यानंतर ह्या बाजारात माझ्या अनेक चकरा झाल्या पन तिथेही लॅपटॉपचा पत्ता काही लागला नाही. त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे Back up ठेवण्याची सवय. त्यामुळे थोडाफार Data (तेव्हा कमी GB चे PD असायचे) पेन ड्राइव मध्ये आणि थोडाफार मित्राच्या लॅपटॉप मध्ये बॅकअप म्हणून ठेवल्यामुळे तो तरी राहिला पन शेकडो GB Data गेला तो गेलाच!

बरं त्यानंतर Laptop ची सुद्धा कामं होतील म्हणून मी ipad घेतला पन लॅपटॉप लॅपटॉप असतो हे मात्र जाणवलं. पुढे चालून iphone घेतला, Four wheeler घेतली मात्र आजही Laptop घेणे काही जमले नाही. त्याचं कारण मला असं वाटतंय की, एकदा एखादी वस्तू आपल्याकडून गेली की, ती पुन्हा आपल्याकडे परत येणे/घेणे अवघड असते.

Address


Telephone

9021296777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ignited Journey posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ignited Journey:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share