16/06/2016
एकदा अकबर राजाच्या सभेमध्ये बिरबल बोलत असतो, आणि राजा हातावर अत्तर लावत बसलेला असतो, त्या बाटली मधून अत्तराचा एक थेंब सिंहासनावर पडतो, राजा घाईघाईने तो थेंब बोटानी टिपायला जातो पण ते अत्तर कापडात मुरते...
राजा पटकन भानावर येऊन बिरबल कडे बघतो, तर बिरबल राजाच्या कंजुषीकडे पाहून गालातल्या गालात हसत असतो, दरबारातली लोकं पण राजाकडे पाहून हसत असतात, राजाला लाजल्यासारखे होते, आणि अपमानास्पद हि वाटते. हळू हळू हि बातमी पूर्ण राज्यात पसरते...
मग एक दिवशी राजा अकबर त्याचा शिपायाला सांगून पाण्याचा हौद रिकामा करून तो पूर्ण हौद अत्तराने भरायला सांगतो, आणि राज्यात दवंडी पेटवतो, कि जितके पाहिजे तितके अत्तर लोकांनी घेऊन जावे....
राज्यातील सर्वजण बाटल्या भरून भरून अत्तर नेत असतात, आणि राजाला धन्यवाद म्हणत असतात....
ते राजा पाहत असतो, आणि एकीकडे बिरबल गप्प उभा असतो, राजाला समजते कि बिरबल लाईनीवर आला.... मग राजा बिरबल जवळ ऐटीत जाऊन म्हणतो,
"देखा बिरबल कितना बडा दिल है मेरा, देखो लोकं मुझे कितनी दुवाए दे रहे हैं, क्या तुमने आजतक कभी किसी भी राज्य के राजा ने ऐसा करते हुए देखा है?"
त्यावर बिरबल एका वाक्यात उत्तर देतो-
"बुंद से गई वोह हौद से नही आती"
म्हणजे एका थेंबाने जी इज्जत गेली ती इज्जत हौद भरूनही नाही परत येणार....
त्यामुळे आपले काम करताना पण भान ठेवा, कारण आपले मिळवलेले नाव एकदा खराब झाले कि ते परत मिळवणे कठीण असते.... कठीण काय अशक्यच.... हा डाग कुठलीही वोशिंग पावडर नाही काढू शकत....
गोष्टी वाचत जा, मला तर नेहमी वाटते कि या म्हणा किंवा पंचतंत्र च्या गोष्टी म्हणा...अशा ज्या गोष्टी आहेत त्या
लहान मुलांसोबत मोठ्यांनीहि जास्त वाचल्या पाहिजेत... कारण यातून जो बोध मिळतो तो लहानमुले पटकन नाही घेऊ शकत... आणि लहानपणपासूनच त्यांच्य कानावर या गोष्टी पडल्या कि मोठं झाल्यावर अजून पटकन समजतात.....
वाचाल तर वाचाल....