23/11/2017
एक दिवसाचा मस्त पिकनिक स्पॉट - लोणी काळभोर व कदमवाकवस्ती, ( ता. हवेली , पुणे - सोलापूर महामार्गावर )
ONE DAY PICNIC SPOT - LONI KALBHOR & KADAM WAKWASTI. (Tal - Haveli, On Pune - Solapur road.
Contact : sai varun tours & travel
Dhani velnakar nagar
pune -411009
------------------------------------------------------------------------
पुणे शहरापासून अंदाजे 17 किलोमीटर अंतरावर.
या ठिकाणी असलेली वैशिष्ट्ये.
1) पक्षी निरीक्षण केंद्र. --
पुणे - सोलापूर महामार्गावरील हडपसरच्या पुढे कवडीपाट येथे एक टोलनाका आहे. त्याच्या जवळच मुळा मूठा नदीकाठावर हे कवडी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. जगभरातील वेगवेगळ्या जातींचे अनेक पक्षी येथे येतात. देशभरातून अनेक पक्षी निरीक्षक येथे येत असतात.
2) राजबाग.
नटश्रेष्ठ राजकपूर यांचा पूर्वीचा बंगला येथे आहे. आता या ठिकाणी प्रा. विश्वनाथ कराड यांच्या महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( एम. आय. टी. ) या संस्थेने अतिशय सुंदर व भव्यदिव्य शैक्षणिक संकुल उभे केले आहे. त्या बरोबरच हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचे पूतळ्यांचे राजकपूर मेमोरियल आवर्जून पाहण्यासारखे आहे. तेथील गेटवर तशी कल्पना देऊन व तिकीट काढून हे पूतळे पाहता येतात.
3 ) तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय. ---
पुणे - सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत डोंगराच्या कुशीत तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय आहे. स्वर्गवासी महंत 1008 देविपुरी महाराज धूंदीबाबा यांच्या प्रचंड कष्टातून व प्रयत्नातून हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र उभे राहिले आहे. या ठिकाणी सन 1984 व 1996 साली देविपुरी महाराजांनी सपादकोटी गायत्री महायज्ञ आयोजित केले होते. तब्बल पंधरा - दिवस चाललेल्या या यज्ञांसाठी हिंदू धर्मात प्रसिद्ध असलेल्या चारही पीठांचे शंकराचार्य उपस्थित होते. निसर्गाने नटलेला हा परिसर अत्यंत सुंदर आहे. झाडे, तलाव, शांतता व देखणा निसर्ग अत्यंत मनमोहक आहे. आता या ठिकाणी वन विभागानेही पिकनिक स्पॉट बनविण्यासाठी काम सुरू केले आहे.
4 ) मनाली हाॅटेल & वाॅटर पार्क
पुणे - सोलापूर महामार्गावर सुंदर अशा हाॅटेल व वाॅटर पार्कचा आनंद आपण घेऊ शकता.
5) हाॅटेल संस्कृती
पुणे - सोलापूर महामार्गावर वाकवस्ती येथे या हाॅटेल मध्ये राजस्थानी पद्धतीचे शाकाहारी जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता.
6) श्री क्षेत्र थेऊर -
लोणी काळभोर पासून 6 किलोमीटर अंतरावर अष्टविनायक पैकी एक असलेल्या चिंतामणीचे ( गणपती ) मंदिर आहे.
एकदा नक्की या. आमच्या गावाला.
कुटुंबासह व मित्र परिवार सह.
कसे वाटले गाव ते ही सांगा.