Kokan Ashtagar कोकण अष्टागर

  • Home
  • Kokan Ashtagar कोकण अष्टागर

Kokan Ashtagar कोकण अष्टागर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kokan Ashtagar कोकण अष्टागर, Tourist Information Center, .

26/04/2024

Copy Paste

आमच्या एक अगदी जवळच्या परिचीत काकिर्डे वहिनी आहेत त्यांचा नातू जिवघेण्या आजारातून अगदी सहीसलामत बरा झाला, त्याची पत्रिका दाखवली तेंव्हा ज्योतिषाने वाचण्याची आशा कमीच सांगितली होती
दृष्ट लागेल असं कुटूंब तर दृष्ट लागलीच असं काही जण खरच मनापासून हळहळत म्हणायचे
त्यांच्याकडेही श्री कृष्णसरस्वती स्वामी महाराजांचीच उपासना चालते मग त्यातल्याच कोणीतरी नातू बरा होईपर्यंत पिंपळा समोर रोज एकशे एक दिवे लावायला सांगितले त्यात मेख अशी की दोन सेकंद तरी सगळेच्या सगळे दिवे एकसाथ तेवत राहयला हवेत
घरात नातू सोडून तीन माणसं.मुलगा सुट्टी घेऊन किती दिवस घरात बसणार?आणि अंथरुणावर असलेल्या नातवा जवळ सुनेला थांबणं अपरिहार्य
आजींबरोबर पिंपळापाशी जाणार कोण?
पण तरी आजी मोठ्या धीराच्या
एकशे एक दिव्याची तयारी त्या घरी करून निघायच्या पण दिव्याची तेवणारी ज्योत बरोबर कशी नेणार? ती तर तिथे गेल्यावरच प्रज्वलीत व्हायला हवी शिवाय एक महत्वाची अट . हे सोपस्कार करताना मनात नकारात्मक विचार येऊ द्ययचे नाहीत , निराश व्हायचं नाही सगळे दिवे तेवत राही पर्यंत प्रामाणीक प्रयत्न करीत राहयचं
म्हातारी मोठी जिद्दीची, पंचाहत्तरीच्या पुढची पण सगळी सामुग्री घेऊन पिंपळासमोर ठिय्या देऊन बसायची , कधी सहज सगळं पार पडायचं आणि कधी जीव मेटाकुटीस यायचा अशी थोडी थोडकी नाही दोन अडीच वर्ष झाली.
पण या दोन अडीच वर्षात काय फरक पडला माहितिये?
सुरुवातीला म्हातारी एकटी होती
मग एक दोघं काँलेजची मुलं म्हातारीची धडपड बघून तिच्या मदतीला आली मग आणखी काहीजण धावले, मग उद्या कधी येणार? परवा कुणाकुणाला वेळ आहे? मग आणखी कोणाला जमेल ? असं करत करत हा ताफा उभा राहिला कितीदा रस्त्यावरचे फिरते फेरीवाले सुद्धा काही देणं घेणं नसताना काकिर्डे आजींच्या मदतीला अगदी श्रद्धेने आलेले आम्ही बघितलेत
आता त्यांचा नातू पूर्ण बरा झालाय, फक्त अजून काही दिवस जंतू संसर्ग होण्यापासून काळजी घ्यायची आहे
आजी म्हणतात पूर्वी गावजेवण घालायची पद्धत होती ना तशी हा पूर्ण बरा झालाकी दिवस ठरवून मी त्या पिंपळाची पूजा घालणार आहे ,आणि त्या निमित्ताने गावजेवणच ठेवणार आहे
कोण कसं कोणाच्या रुपात मदत करून गेलं मला माहीत नाही
तसच कोण कुणाच्या रुपात जेऊन जाईल हे ही मला माहीत नाही
खरच तो दिवस लवकर येउदेत
मला तर अत्तापासूनच त्या पिंपळा भोवती मंडप घातलेला दिसायला लागलाय ...
चं गो

23/04/2024

सगळं कसं जुळून आलंय.....

एक सहकारी सारस्वत
एक सहकारी कणकवली, सिंधुदुर्गचा
दोघेही Hotelier
त्यामुळे सारखी त्यांच्या फील्ड related चर्चा
मला मात्र उगाच जुन्या आठवणी छळतात,
जुन्या आठवणी जेवढ्या विसरायचा प्रयत्न करतोय तेवढ्या आठवणी मागे लागत आहेत.

19/04/2024

कोकण उन्हाळ्यातील तापमानामध्ये दिवसेंदिवस विदर्भासोबत स्पर्धा करायला लागलंय. पूर्वी अमसीच्या अलिबाग - पेण रोडवर बहुतांश भागात गर्द झाडी होती. त्यामुळे duchakivarpravas करताना आत्ता इतका उन्हाचा त्रास होत नसे. शहरीकरण, बिल्डर लॉबीचे हौसिंग प्रोजेक्ट्स आणि l फाजील उद्योग आणि त्यासाठी वृक्षतोड, जमिनीचे औद्योगिक प्रयोजनासाठी रूपांतरण, रस्ते विकासामध्ये नष्ट केली जाणारी झाडे या मानव निर्मित कारणांमुळे कोकण तापतंय. लहान असताना सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी लागणाऱ्या बातम्यांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान सांगीतलं जायचं. त्यावेळी मुंबईचे तापमान ३२-३४ अंश सेल्सिअस नोंदवलं जात असे. राज्यात सर्वाधिक तापमान नेहमी चंद्रपूर ४०-४२ असायचं. पण आज काल कोकणात तापमान ४० अंशापर्यंत पोहोचू लागलंय. आपण याबाबतीत विदर्भाला मागे टाकू की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य जनता यामुळे चिंताग्रस्त आहे. पण तिच्या हातात काहीच नाही. ज्याच्या हे सगळं नियंत्रित करणं हातात आहे त्यांना त्यांच्या लक्झरीयस एसी गाड्यांच्या गडद काचांमधून बाहेरचं दिसत नाही आणि जाणवत ही नाही. खरोखर आज हजारो एकर जमिनी बिगर शेती करायची गरज आहे का? सामान्य जनतेला याची गरज नाही पण धनदांडगे, राजकीय नेते त्यांचे कार्यकर्ते यांचे अस्तित्वच या जमिनीच्या होणाऱ्या व्यवहारांवर अवलंबून आहे. पुढील काही वर्षात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोडीशी जागाही शिल्लक राहणार नाही की ज्याच्यावर सामान्य माणूस शेती किंवा इतर लागवड करू शकेल. सगळे औद्योगिक, रासायनिक प्रकल्प, हौसिंग प्रोजेक्ट्स कोकणाच्या माथी मारायचे आणि कोकणचं वाळवंट करून टाकायचा चंग बांधला आहे या लॉबीने. सामान्य जनतेला हे नको आहे. तिला हा होणारा विनाश बघवत नाही. पण जनता हतबल आहे. कारण रक्षकच भक्षक बनलेत. ज्यांनी हे सगळं वाचविण्यासाठी कायदे, नियम बनविण्याची गरज आहे तेच हा विनाश करण्यात अग्रेसर आहेत.
रायगड जिल्हा जात्यात आहे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग सुपात आहेत. हे असच सुरू राहिलं तर भविष्यात "आज अलिबाग/रत्नागिरी/कणकवली/सावंतवाडी येथे सर्वाधिक तापमान नोंदलं गेलं" असं ऐकायला लागलं तर त्यात विशेष काही वाटणार नाही. ही वेळ सुधारणेची आहे. नाही तर कोकण भकास झालेला उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय हातात काही राहणार नाही.
अमित जोशी, अलिबाग.

19/04/2024

Copy Paste
आमच्या मावशी कडे निळ्या डोळ्यांचा एक बोका होता. तो तेवीस वर्ष जगला.भारी लोभस होता. बोललेलं, सांगितलेलं, आणि बजावलेलं त्याला सगळं कळायचं. पण मुळातच गुणी होता.आमच्या नातेवाईकात फार कमी लोक आहेत ज्यांचा पन्ना बरोबर फोटो नाही.
बहुतेक लग्न कार्यात त्याने हजेरी लावली होती. केशव दादाच्या लग्नात तो गिरगावातल्या कार्यालयातून हरवला होता तर केवढा गहजब झाला होता. अमिताच्या माहेरच्या मंडळींना वाटलं होतं लहान मुलच हरवलं की काय?
तसा तो लहान मुला सारखाच होता. कशा वरून रुसेल आणि कशा मुळे खुश होईल,काही सांगता यायचं नाही.
उकडलेलं अंड जीव की प्राण, किशोर दादाचा शर्ट त्याच्या अंगावर चढवला की स्वारी खूश!मग त्याला आपण कोणी विशेष आहोत असं वाटायचं. मग त्याच्या 'म्यांव म्यांव' मधे सुद्धा एक रूबाब असायचा. शर्ट चढवलेला असताना उचललेला त्याला आवडायचं नाही. मग तो चित्कारून उसळी मारून खाली उतरायचा.मग ज्याने त्याला उचलण्या चा अगाऊ पणा केला असेल त्याला मावशी मनापासुन रागवायची. मग या बेट्याचं समाधान व्हायचं.
बोका असून त्याला दूध आवडायचं नाही, बशी बशी चहा मात्र दिवसातून दोनदा तीनदा किंवा घरात जितक्या वेळा चहा होईल तितक्या वेळा चालायचा.
मांदेळी आणि बांगडे हे दोन मासे आवडीने खायचा. त्यातही मावशी ने कुठेतरी वाचल्या नूसार त्याला बांगडे उकडून द्यायला सुरुवात केली ते तर त्याच्या साठी पक्वान्नच ठरलं. असे किती उकडलेले बांगडे त्याने आयुष्यभरात फस्त केले हे त्याला च माहित, कारण नातेवाईक सुद्धा घरातल्या लहान मुलाला खाऊ न्यावा तसा त्याच्या साठी बांगड्या चा वाटा घेऊन यायचे.
जेवायला तो शब्दशः डायनिंग टेबलावरच बसायचा. झोपायला मात्र त्याला त्याची जून्या गोधडीची घडीच लागायची. मावशी दिड दोन महिन्यांनी त्याची गोधडी धुवायला काढायची, ते दोन तीन दिवस त्याचे अगदी बेचैनीत जायचे. मग त्या दिवसातले पन्ना चे किस्से हा नातेवाईकांत चर्चेचा विषय ठरायचा.
माणसात जशी माणूसघाणी लोकं असतात तसा पन्ना मार्जार योनीत येऊन मांजरघाणा होता. किंवा इतकं माणसात राहिल्या वर तो स्वतः ला मार्जार योनीतला समजत नव्हता.
खिडकीत बसल्यावर त्याची तंद्री लागायची. तेव्हा काका त्याला "अहो मांजरेकर "अशी हाक मारायचे. सगळे हसल्यावर त्याची तंद्री भंग पावायची
तेव्हा घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून टी व्ही बघायची पद्धत होती तेव्हा हे महाशय कुणा ना कुणाच्या मांडीवर पहुडलेले असायचे.पण हसण्याची लकेर उठली तर लगेच सावध होऊन कान टवकारून टी व्ही कडे बघायचे. त्याचा अविर्भाव बघून पून्हा हास्या ची लकेर पसरायची.
दुपारच्या वेळी मावशी पन्ना ला बाहेर जाऊ द्यायची नाही. कारण दूपारी सामसूम असायची. मावशी म्हणायची कोणी माझ्या लेकराला बकोटीला मारून नेलं तर कळणार ही नाही!म्हणून त्याला बजावलं होतं की सह्याद्री वरची दामीनी ही मालिका संपल्या शिवाय बाहेर जायचं नाव काढायचं नाही."तर पठ्ठ्या दामीनी संपल्या बरोबर आळोखे पिळोखे देऊन आपण बाहेर जात असल्याची वर्दी द्यायचा.
तसा तो घरातून बाहेर जातच नसे. दिवसातून तीन वेळा तो बाहेर जायचा त्यातली सकाळ ची फेरी मोठी असायची. म्हणजे दोन हाका मारल्या शिवाय तो यायचा नाही. बाकी दोन फेऱ्या म्हणजे मधली सुट्टी आणि पाणी प्यायची सुट्टी.
केशवदादा पन्ना ला ग्राउंड वर घेऊन गेला की तो येईपर्यंत मावशीचा जीव नुस्ता खाली वर व्हायचा
त्याने जाऊ नये म्हणून मावशी केवढी अमिषं दाखवायची. पण तो बधायचा नाही. त्याला गेम कळतो. असं केशवदादाचं ठाम मत होतं.काकांबरोबर बागकाम करायलाही पन्नाला खूप आवडायचं. तो असला की काकांना सतत बोलत रहावं लागायचं काॅमेंट्री सुरू असायची. "आता आपण वाळकी पानं बाजूला करूया,आता पाणी घालूया"
हा पठ्ठ्या फक्त संमतीदर्शक गुरकायचा
काका घरात गेल्याशिवाय तो घरात जायचा नाही
पण मावशी गेली तेव्हा तिच्या अंतयात्रे बरोबर बाहेर पडलेला पन्ना गायबच झाला. खूप शोधला, हाका मारल्या पण आठ दिवस तो घरा कडे परतलाच नाही.
आणि एका तिन्हीसांजेला तो रोडावलेल्या अवस्थेत परतला. त्याला ओळखणं कठीण गेलं.
त्याला लगेच बशी भर चहा दिला. त्याने तोंड लावलं पण फार पिववलं नाही त्याच्याच्यानी.
त्याची गोधडी ची चौपदरी तशीच जागेवर होती त्या वर जाऊन तो अगतिक होऊन लवंडला.
कसे बसे एक दोन दिवस काढले. मावशीच्या दिवस कार्याला सगळे नातेवाईक घरीच होते. पण कुणाचा निरोप न घेता तो रात्री झोपेतच गेला.
चं गो

Natural Innocences
16/04/2024

Natural Innocences

आमचो कोकण माझा श्वास    #पर्यटन  #रायगड
12/04/2024

आमचो कोकण माझा श्वास #पर्यटन #रायगड

11/04/2024
https://youtu.be/aH42UF3B9zw
16/03/2024

https://youtu.be/aH42UF3B9zw

Kokan Shri Ram Utsav | Colours of Kokan | Kokan Festival | Kokan Sanskruti | Kokan Ganpati VisarjanYour Queries Colours of Kokan Kokan FestivalKokan Sanskrut...

https://youtu.be/sXieMybblao
08/03/2024

https://youtu.be/sXieMybblao

कोकणातील सुंदर बीच | Varsoli Beach | Alibag | Alibag Beachअलिबाग या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून, अगदी जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयाप...

02/03/2024

आज कामावर सोबत असणाऱ्या सोबत कणकवली पासून बांद्यापर्यांत चर्चा झाली. राजकारण, पर्यटन, दशावतारी मंडळ, भजनी मंडळ सगळं बोलून झालं. सुधीर कलिनगण आणि नेरुरची दशावतारी याबद्दल बरीच माहिती मिळाली. नारायण राणे, सतीश सावंत, संदेश पारकर, वैभव नाईक, केसरकर, विनायक राऊत सगळ्यांवर बोलणं झालं. देवगड किल्ल्यापासून मोती तलावापर्यंत सगळं बोलून झालं.
सिंधुदुर्गचा माणूस दिसला की माहेरचा माणूस भेटल्यासारखं react होतो आणि मग कुढत बसतो.
कोकणाने प्रत्येकच वेळी रडवायला पाहिजे असं आहे का? का नाही सोडत कोकण माझा पिच्छा? किती दिवस हे ओझं उराशी बाळगू? कधी सुटका होईल? मी जेवढं कोकणापासून दूर रहायचा प्रयत्न करतो तेवढं कोकण मला आठवणी देऊन रडवतं

12/02/2024

१२ फेब्रुवारी २००७ याच दिवशी १७ वर्षांपूर्वी

१६ वा वर्धापन दिन

06/02/2024

रविवारची रिलॅक्स सकाळ आणि मिसळ - वडापाव

नोकिया मोबाईलची ही जबरदस्त फीचर्स ज्यांनी अनुभवली ते खरे भाग्यवान. जेव्हा भारतामध्ये नवीनच मोबाईल  बाजारात आला होता.आमच्...
02/02/2024

नोकिया मोबाईलची ही जबरदस्त फीचर्स ज्यांनी अनुभवली ते खरे भाग्यवान. जेव्हा भारतामध्ये नवीनच मोबाईल बाजारात आला होता.

आमच्या तारुण्यात याच मोबाईलने आमच्या प्रेम कहाण्या फुलवल्या, रुजवल्या. Snake गेम खेळत तासनतास केलेला टाईमपास, रात्र रात्र जागून FM वर ऐकलेली गाणी आणि Ringtone Composer मधून compose केलेल्या ringtone. सगळेच धमाल.

त्यावेळी घरी सकाळ पेपर यात असे आणि सकाळच्या गुरुवारच्या पुरवणीमध्ये दर गुरुवारी एका नवीन बॉलिवूड गाण्याचे ringtone composition येत असे. त्यावेळी गुरुवारची आतुरतेने वाट बघायचो. दर गुरुवारी एक ringtone तयार केली जायची. संपूर्ण ringtone compose केल्यावर play करायला गेल्यावर काही तरी चूक झाली हे समजून येत असे. मग पुन्हा नव्याने compose करायची ringtone. त्याकाळी एसएमएस द्वारे ringtone सेंड करता येत असे.

कालांतराने नोकिया ने मोबाईल मध्येच FM che फीचर आणले. रेडिओ मिरची, रेडिओ सिटी ही स्टेशन्स खूप लोकप्रिय होती. त्याच काळी चायना मेड एफएम किट चे पेव फुटले होते. खिशात मावणारे बोटभर FM players प्रत्येकाकडे असत. नोकिया गुलाबी रंगाचा आता मॉडेल नंबर आठवत नाही जो पाहिले एफएम फोन बाजारात आणला गेला. त्या काळी रिचार्ज व्हाउचरने रिचार्ज होत असे. त्या काळी BSNL ही सरकारी दूरसंचार कंपनी अस्तित्वात होती. या गुलाबी मोबाईलचे BSNL चे रिचार्ज या मोबाईलवर होत नसे. मग या मोबाईलचे सिम कार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये इन्सर्ट करून हे रिचार्ज करावे लागे.

मोबाईल कॉल महाग असल्याने बरीचशी कामे मिस कॉल वर होत असत. आम्ही मित्र घरून निघालो की मिस कॉल देतो मग तू पण निघ असे संकेत द्यायचो.

काय होते ते दिवस. आजकालच्या तरुणाईला मोबाईल व्हाउचर ने केलेले रिचार्ज, BSNL, MOBILE RINGTONE COMPOSER, PORTABLE FM PLAYER याबद्दल कल्पनाही नसेल. पण आमच्या पिढीने ते अनुभवलं आहे. यानंतर मल्टिमीडिया येत गेले. त्यातही नोकियचा 6600 हा फोन विशेष लक्षात राहण्यासारख. डब्बा फोन म्हणून याला हिणवलं जात असले तरी याचे फीचर जबरदस्त होते. पहिल्यांदाच स्पिकरफोन, VGA camera, मल्टिमीडिया ringtone, Symbian ऑपरेटिंग सिस्टम वर चालणारा असलेला हा मल्टिमीडिया फोन.

गेले ते Android अगोदरचे सोनेरी दिवस..,.

अमित जोशी, अलिबाग
८३९८५७१५७५

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan Ashtagar कोकण अष्टागर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share