01/04/2022
चला हिमशिखरांच्या सान्निध्यात...
*नमस्कार साहस प्रेमींनो,*
नगाधीराज हिमालयाच्या कुशीत वसलेलं मनाली हे नितांत सुंदर गांव.
हिमाचल प्रदेशातील हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अनेक सुंदर ट्रेकिंग मोहिमांचा पायथाच आहे.
*पिरपंजाल आणि झंस्कार* या पर्वत रांगांचे दूरदर्शन घेत काही अविस्मरणीय ट्रेक गेली अनेक वर्षे आम्ही आयोजित करत आहोत.
सर्वांना झेपेल आणि हिमशिखरांच्या सान्निध्यात घेऊन जाणारा *फा-कोंडा* हा ट्रेक आम्ही यंदाच्या वर्षी देखिल आयोजित केला आहे.
हा फक्त ट्रेक नसून विद्यार्थी वर्गासाठी *व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम* आहे असे आम्ही मानतो. निसर्ग आणि साहस यांची जोड घालत आखलेला हा कार्यक्रम मोठ्या मंडळींना देखिल तितकाच उपयुक्त आहे.
मी स्वतः या ग्रुपचे नेतृत्व करत असून माझ्या हिमालयातील ३६ वर्षांहून अधिक काळ भटकंतीच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा असे नम्र आवाहन आहे.
फक्त एकच बॅच असल्याने आपण आपला सहभाग शक्य तितक्या लवकर नोंदवावा म्हणजे कमी खर्चातील विमान प्रवासाचा आपल्याला लाभ घेता येईल.
अगदी सहकुटुंब करता येईल अशा या ट्रेकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण महितीपत्रकात दिलेल्या नंबरवर आमच्याशी केव्हांही संपर्क साधू शकता.
*आपले*
*मिलिंद देशपांडे*
*विवेक देशपांडे*
🧗♀️🙏🙏🧗♀️
🌹🌹🌹🌹