08/09/2018
https://www.youtube.com/channel/UCLIjR8xTqkjvpCgSNtRB37A?view_as=subscriber
गोराई क्रीक जवळ वसलेले हेच ते विपश्यना केंद्र.
विश्व विपश्यना पॅगोडा, ग्लोबल विपश्यना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपश्यना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट असतात, तर डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या ५ हजाराच्या वर असते. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपश्यनापॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.
एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून, भूकंपरोधक आहे.
--------------------------------------