05/08/2019
Booking Open Now
#सृजन_यात्रा_२०१९_कोकण_विशेष
कोकण म्हणजे महाराष्ट्राचे अस्सल निसर्ग सौंदर्य. किनारपट्टीचे लाभलेले वरदान सोबत साद घालणाऱ्या अनोख्या वाटा. तिथली लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती, निसर्ग सौंदर्य, ग्रामीण जीवन हे सगळं नाविन्यपूर्ण आहे. यासोबतच कोकणात सुरू असणारी सामाजिक कामे, या दृष्टीनेही कोकण इतर महाराष्ट्रासाठी अनोखा वाटतो.
सृजन यात्रा या प्रवास यज्ञाचे यंदाचे ६ वे पर्व. या प्रवासाचा हेतू तरुणाईला सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व व त्यांनी केलेली कामे यांचा परिचय व्हावा, त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपली आयुष्य घडवावी हा आहे. या प्रेरणादायी प्रवासामध्ये यापूर्वी तरुणाईसोबत महाराष्ट्र समजून घेताना दरवर्षी वेगळा मार्ग निवडला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मेळघाट, खान्देश या भागातील ३७ सामाजिक संस्था, ४३ सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व यांना भेटी देताना पाच वर्षात एकूण ८००० किमीचा केलेल्या प्रवासातून आतापर्यत २६६ इतकी समविचारी तरुणाई सोबत जोडली गेली. या नाविन्याच्या शोधामुळे समाज कार्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा देऊ शकलो, याचा आनंद होतोय.
यंदा सृजन यात्रा
कोकण विशेष २०१९
चे आयोजन करीत आहोत.
दि. ९ ते १३ नोव्हे २०१९
या कालावधीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील निवडक सामाजिक संस्था, रोल मॉडेल यांना भेटण्याची संधी याद्वारे उपलब्ध आहे. यामध्ये खालील व्यक्ती/संस्था याचा सहभाग असेल:
🔸 मा. श्री. इंद्रजीत देशमुख (काकाजी), शिवम प्रतिष्ठान, कराड
🔸 सनराईज कँडल्स, महाबळेश्वर : श्री. भावेशजी भाटिया
🔸 स्वदेस फाउंडेशन, महाड - रायगड
🔸 स्नेहज्योती अंध विद्यालाय, घराडी ता. मंडणगड - रत्नागिरी
🔸 श्री. दिलीप व सौ. पौर्णिमा कुलकर्णी (जेष्ठ पर्यावरण तज्ञ व लेखक) कुडावळे, ता. दापोली - रत्नागिरी
🔸 सह्याद्री निसर्ग मित्रमंडळ, चिपळूण आणि कासव मित्र मंडळ, आंजर्ले
- श्री. मोहन उपाध्ये व इतर
🔸
🔸 लोकसाधना ट्रस्ट, चिखलगाव ता. दापोली - श्री. राजाभाऊ व सौ. रेणूताई दांडेकर (ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, लेखिका)
🔸 प्राचीन कोकण संग्रहालय, गणपतीपुळे
🔸 Helpers Of The Handicapped - स्वप्ननागरी पुनर्वसन केंद्र, मोरे-कुडाळ श्रीमती नसीमाताई हुरजूक
🔸 भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारप - कुडाळ, सिंधुदुर्ग - श्री. प्रसादजी देवधर
यासोबत समुद्रकिनारी राहण्याची, कोकणची खाद्यसंस्कृती व ग्रामीण लोकजीवन अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
सृजन यात्रा नाव नोंदणी (Registration)
• Online Registration साठी-
खलील लिंक वर क्लीक करा
http://www.sewayog.org/srujanyatra/registration.aspx
सृजन यात्रा नाव नोंदणी मधील आँनलाईन अर्ज भरुन Send करु शकता. (यात्रींनी दिलेल्या ईमेल वर अर्जाची काँपी मिळेल ती यात्रेला येताना सोबत घेवून येणे)
किंवा
• Offline Registration-
वरील आँनलाईन अर्जासोबत उजवीकडे Download offline form या आँप्शनवर क्लिक करुन नावनोंदणी अर्ज Download करुन घेणे. अर्जावरील सूचनेनुसार भरुन तो पाठविता येवू शकतो.
नावनोंदणी अंतिम दिनांक- 15 ऑक्टोबर 2019
सृजन यात्रा हा फक्त प्रवास नसून नाविन्याचा शोध आहे, चाकोरी बाहेर जावून आयुष्य जगण्याची संधी आहे. सेवायोग संस्था प्रामुख्याने ग्रामीण विकासामध्ये काम करीत असून संस्थेविषयी व त्यांच्या उपक्रमाविषयी माहिती www.sewayog.org
या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
सृजन यात्रा माहितीपट (Documentary) यू ट्युब वरः
सृजन यात्रा 2017- (मेळघाट)- https://youtu.be/k_Nm1UUOhWI
सृजन यात्रा 2016 –(विदर्भ विशेष)- https://youtu.be/piAUg_QulYI
सृजन यात्रा 2015- https://youtu.be/IFZ69Va_hsU
अधिक माहितीसाठी संपर्कः
8484848063
8484848062
7350002145
9834073266
#समाजभान_जपणारी_तरुणाई