26/03/2015
The bowler bowls it, Batsman strikes it and the ball goes out of the boundary line.
If we think about this incident, there is something very special about it.
The ball is bowled or stroked, there is energy in it.
Well, there is a difference though.
When the bowler bowls it, he does it so with a 'destructive' intention of getting the batsman out.
The batsman however, has a positive approach towards it. He just gives a direction to ball and gets Runs out of it.
The energy remains the same, the intention changes the results and the meaning of the energy.
I am talking about cricket, because we all are currently in a cricket fever.
We have something really important thing from History to learn from this example.
The Deshmukhs, Patils and all such authorities in our society were fighting with each other, using their energies to gain something for self.
Ch. Shivaji Maharaj just used their energies for a good Cause & the 'Swarajya' was established.
In short, we can say that, Ch. Shivaji maharaj was a very good Energy Channelizer.
गोलंदाज चेंडू टाकतो... फलंदाज तो टोलावतो आणि तो चेंडू सीमापार जातो..
नीट विचार केला तर या घटनेत एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे.
चेंडू फेकला जाणे आणि टोलावला जाणे दोन्ही क्रियांमध्ये ऊर्जा आहेच..
फरक एवढाच की, गोलंदाज जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा तो आपली ऊर्जा फलंदाजाला बाद करण्यासाठी म्हणजेच एक प्रकारे 'विघातक' गोष्टीसाठी वापरतो..
फलंदाज तीच ऊर्जा फक्त 'योग्य दिशेने' वळवतो आणि त्यातून 'धावा जमवतो'. म्हणजेच एक प्रकारे 'विधायक' कामासाठी आपली ऊर्जा वापरतो..
ऊर्जा तीच.. पण दिशा बदलली की तिचे परिणाम आणि अर्थ दोन्ही बदलतात...
हे उदाहरण देण्याचं कारण, सध्या क्रिकेटचा ताप चढलाय लोकांना...
यावरुन इतिहासात शिकण्यासारखी गोष्ट सांगतो...
देशमुख म्हणा, पाटील म्हणा किंवा आणखी जे कोणी मिरासदार होते ते म्हणा..
सर्वजण आधीपासूनच लढत होते.. आधीपासूनच आपापली ऊर्जा खर्ची घालतच होते.. वतन मिळवीतच होते..
शिवरायांनी त्यांची हीच ऊर्जा पाहिली आणि तिला योग्य दिशा दिली... आणि त्या उर्जेतून 'स्वराज्य' उभं राहिलं...
थोडक्यात काय, शिवराय हे एक उत्तम 'Energy channelizer' होते...
#शिवराय