Sahyadri Eco Tour

  • Home
  • Sahyadri Eco Tour

Sahyadri Eco Tour Wildlife Tours Management with Adventures Sports..

Like the this page for Wildlife Tours and Adventure sport like Rock Climbing, Rappelling, valley Crossing, Rafting, Paragliding.....
We update our Trips & Tours on the same page just watch all events and join Thrill of SAHYADRI...

01/11/2022

धुक्यात हरवलेला किल्ले रांगणा.
जिल्हा कोल्हापुर.

किल्ले रांगणा कोल्हापूर जिल्हयातील एक दुर्गम किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.

छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे.

गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो.

20/01/2022

Mudagad Fort Trek coming soon..

15/11/2021

Every Sunday new Trek

15/11/2021

Trek in Western Ghat

15/11/2021
18/03/2021

सेंट मेरीज आयलँड आणि दुर्मिळ अद्भुत अश्नीस्तंभ..!

©उमाकांत चव्हाण.

कर्नाटकातल्या उडपी मध्ये फेमस असलेल्या बीचपैकी एक बीच म्हणजे "मालपे". या बीच पासून साधारणता पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजे "सेंट मेरीज आयलँड".
पंचकोनी, षटकोनी, सप्तकोणी, अष्टकोणी उभ्या कातळ यांनी बनलेला हा सुंदर आयलँड पाहताक्षणी आपल्या नजरेत भरतो. या खडकांना 'अश्नीस्तंभ', 'ज्वेलरॉक' किंवा 'कॉलम्नर रॉक' म्हंटलं जात.

संपूर्ण भारतात अशा प्रकारचं असलेलं हे एकमेव बेट आपल्याला पाहायला मिळतं आणि याचमुळे भारतातील "जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने" २००१ मध्ये या बेटांना "नॅशनल जिओग्राफीकल मोनोमेंट्स" म्हणून दर्जा दिला आहे.

उडपीच्या बस स्थानकापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर मालपे बीच आहे इथून साधारणता शंभर ते दोनशे रुपये देऊन तुम्हाला सेंट मेरीज आयलँडला जाण्याकरिता बोटी मिळतात. या बोटी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू असतात, परंतु २० ते ३० लोक भरल्याशिवाय या पुढं जात नाहीत. त्यामुळे शक्यतो सुट्टीचा दिवस व चार नंतरचा वेळ काढूनच या ठिकाणी जावे म्हणजे संध्याकाळच्या सूर्यास्त पाहता येतो. बेटावर वस्ती नसल्यामुळे खाण्यापिण्याचे साहित्य व पाणी आपल्या सोबत घेऊन जाणे चांगले. मालपे पासून साधारण अर्ध्या तासाच्या सफरी नंतर आपण या बेटावर पोहोचतो.

१४९८ मध्ये वास्को-द-गामा प्रथमता या बेटावर पोहोचला आणि मदर मेरीच्या नावावरून या बेटाला त्याने सेंट मेरीज असं नाव दिलं असं मानलं जातं. बेटावर खुरटी झुडुपे असून नारळाची झाडे देखील खूप आहेत, याच मुळे या बेटाला *कोकनॉट आयलँड* देखील म्हणतात. हे बेट साधारणता २४ ते २५ एकरांवर पसरलेले असून आजूबाजूला लहान-मोठ्या बेसाल्ट खडकांचे हे अश्नी स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात.

या अश्नीस्तम्भा प्रमाणेच अजून एक वैशिष्ट्य या बेटांचे आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे या बेटांवर कुठल्याही प्रकारची माती नाहीये किंवा वाळू नाहीये, त्याऐवजी हे संपूर्ण बेट शिंपल्यांनी भरलेल आहे. बेटाच्या सर्व ठिकाणी आणि जिथे वाळू असते तिथे आपल्याला शिंपल्यांचा खचच्या खच दिसतो जे आपल्याला सहजासहजी कोणत्याही बेटावर किंवा किनाऱ्यावर आढळत नाही.
पृथ्वीच्या भूगर्भातील लाव्हारसामुळे दख्खनचे पठार निर्माण झाली त्याच वेळी या संस्थांची निर्मिती झाली असं मानलं जातं.

या बेटाचा संपूर्ण व्हिडीओ पाहण्याकरिता खालील लिंक वापरा..
Life in wildlife Umakant Chavan

https://youtu.be/AJXBZG_spoU

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Eco Tour posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Eco Tour:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share