Unaad Bhatkanti Trekkers

  • Home
  • Unaad Bhatkanti Trekkers

Unaad Bhatkanti Trekkers Aim of "Unaad Bhatkanti" is not only to arrange A treking events and Picnic event But More than tha
(10)

ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल न होता अविस्मरणीय अनुभवातून अनेकविध गोष्टींची माहिती देणारा छंद व्हावा, गीरीदुर्गांमागे दडलेला आपला वैभवशाली इतिहास जाणावा.
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद

्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!!!"
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि. त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य. तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली. त्याच्या अटिव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो ! रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा !सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात ! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात. आणि मग जो आवास घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्रि सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी.दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात,
"आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊं हं ! तोपर्यंत वाट पाहा !"
रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात.दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच शूर आहेत !सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याहि. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत.प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थवणी ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखें नाही का होत ?कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही.मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, गंगा यमुनांची. सह्याद्रि हा सहस्त्रगंगाधर आहे.मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते ! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. कांही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते.मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत. मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.
राजा शिवछत्रपति :- बाबासाहेब पुरंदरे

Nature's shower is free 🚿🌿
25/08/2024

Nature's shower is free 🚿🌿

अप्रतिम चित्रपट..👌👌आपल्या कुटुंबासमवेत अवश्य पाहा..❤️🚩Randeep Hooda 🙌🙌❤️❤️
25/03/2024

अप्रतिम चित्रपट..👌👌

आपल्या कुटुंबासमवेत अवश्य पाहा..❤️🚩

Randeep Hooda 🙌🙌❤️❤️

ऊन सावल्यांचा खेळ....⛰️💕
03/09/2023

ऊन सावल्यांचा खेळ....⛰️💕

आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महारा...
15/11/2022

आज बाबासाहेब पुरंदरेंचा पहिला स्मृतिदिन. आयुष्याची १०० वर्ष ते एकच ध्यास घेऊन जगले, तो ध्यास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

बाबासाहेबांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकताना त्यातली उत्कटता मनाला भिडायची, जसं लतादीदींचं गाणं आर्त वाटतं तशीच ही अनुभूती असायची. ही उत्कटता, आर्तता ही एका जन्मात येऊ शकत नाही. बाबासाहेबांची छत्रपती शिवाजी महाराजांवरची भक्ती ही अनेक जन्मांची असणार. ही श्रद्धाच त्यांच्या आयुष्याची ताकद ठरली.

छत्रपती शिवाजी महाराज हा विचार घराघरात पोहचवणं हेच जगणं मानणाऱ्या बाबासाहेबांना हयातीतच नको तो मनस्ताप झेलावा लागला, पण त्यावर त्यांनी अवाक्षर काढलं नाही. आज बाबासाहेब आपल्यात नाहीत. 'ह्या सम होणे नाही', असं आपण सहजपणे म्हणतो, खरंच बाबासाहेब पुरंदरेंसारखा 'शिव'भक्त होणे नाही, पण त्याच वेळेला असं देखील वाटतं माझ्या पिढीचं ठीक आहे पण पुढच्या पिढ्याना अस्सल आणि उत्तुंग व्यक्तिमत्व कशी बघायला मिळणार?

असो, काळ हेच त्यावरचं उत्तर आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या स्मृतिदिनी, त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.

राज ठाकरे

आज कार्तिकी एकादशी..श्रीमंत बाबासाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण.. 💐🙏🏻
04/11/2022

आज कार्तिकी एकादशी..
श्रीमंत बाबासाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण.. 💐🙏🏻

श्री भवानी देवी - किल्ले प्रतापगड शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा...!!!
29/09/2022

श्री भवानी देवी - किल्ले प्रतापगड

शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा...!!!

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे। ।बुद्धी-शक्तीच्या अफाट संगमाला नम्रतेची ज...
16/04/2022

सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे। ।

बुद्धी-शक्तीच्या अफाट संगमाला नम्रतेची जोड मिळते तेव्हा चिरंजीवित्व प्राप्त होतं..!! चैत्र पौर्णिमा , हनुमान जयंती .

सुरगडावरील मारुतीराया...🙏

गडांचा राजा.... 🚩
14/03/2022

गडांचा राजा.... 🚩

आमची चिमुकली आयुष्यं समृद्ध करायला देवाने दिलेल्या देणग्या. न मागता दिल्या होत्या आणि न सांगता परत नेल्या. - पु. ल.यांपै...
07/02/2022

आमची चिमुकली आयुष्यं समृद्ध करायला देवाने दिलेल्या देणग्या.
न मागता दिल्या होत्या आणि न सांगता परत नेल्या. - पु. ल.

यांपैकी आम्हाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा थोड्या वेळासाठी का होईना सहवास लाभला,त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. त्यांनी आम्हां दोन्ही भावांच्या पाठीवर हात ठेवला. आम्हांला आशीर्वाद दिला. याबाबतीत आम्ही स्वतः ला खूप भाग्यवान समजतो.
पण लता दीदीना मात्र काही भेटता आले नाही. अखेर स्वप्न ते स्वप्नच राहिले.

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली..😔🙏

१५ ऑगस्ट , २६ जानेवारी , भारत पाक क्रिकेट सामना हे दिवस सोडून इतर दिवशी ही आपल्या कर्तव्याची जाण असलेल्या , फक्त तनानेच ...
26/01/2022

१५ ऑगस्ट , २६ जानेवारी , भारत पाक क्रिकेट सामना हे दिवस सोडून इतर दिवशी ही आपल्या कर्तव्याची जाण असलेल्या , फक्त तनानेच नाही तर मनाने ही भारतीय असलेल्या सर्व सुजाण नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....🇮🇳🇮🇳

देशाच्या स्वातंत्र्याकरिता विश्वाचे दार  ठोठावणारे भारतमातेचे सुपुत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज  जयंती....विनम्र अ...
23/01/2022

देशाच्या स्वातंत्र्याकरिता विश्वाचे दार ठोठावणारे भारतमातेचे सुपुत्र नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती....विनम्र अभिवादन..वंदे मातरम... !!!!

 #स्वातंत्र्यलढा_व_रा_स्व_संघ !खालील छायाचित्रात ज्या वृद्ध स्त्री दिसत आहेत त्या आहेत श्रीमती अंबिकाबाई दांडेकर !जेष्ठ ...
15/01/2022

#स्वातंत्र्यलढा_व_रा_स्व_संघ !

खालील छायाचित्रात ज्या वृद्ध स्त्री दिसत आहेत त्या आहेत श्रीमती अंबिकाबाई दांडेकर !

जेष्ठ लेखक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक श्री गो नि दांडेकर ह्यांची आई !

अंबिकाबाई ह्यांनी देश स्वतंत्र होण्याआधीच्या ' जंगल सत्याग्रहात ' भाग घेतला होता . माझ्या वाचनानुसार आणि आठवते आहे त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार ह्यांनीही जंगल सत्याग्रहात भाग घेतला होता आणि त्या वेळेस कारागृहात असतांनाच त्यांनी सरसंघचालक पदाची धुरा डॉ ल वा परांजपे ह्यांना सोपवली होती .

देश स्वतंत्र झाल्यावर अंबिकाबाई ह्यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहात सुद्धा भाग घेतला होता . त्यावेळी त्यांच्या सहकारी होत्या पंडित महादेवशास्त्री जोशी ह्यांच्या पत्नी सौ .सुधाताई जोशी ! त्या सत्याग्रहात रा स्व सं आणि जनसंघाच्या लोकांनी उघड उघड भाग घेतला होताच .

पण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी संघ ही हिंदूंचे रक्षण करण्यासाठी काम करणारी संघटना होती . त्यामुळे कोणत्याही कारणाने ब्रिटिश सरकारच्या नजरेत भरून त्यांना आपल्याविरुद्ध कारवाई करायची संधीच द्यायची नाही असे संघाचे धोरण होते . त्यामुळे उघड उघड ते कोणत्याही स्वातंत्र्य चळवळीत सामील होत नसत . पण आतून ते जे देशाच्या हितार्थ काम करायचे ते गुपचूप करत .

कित्येक मोठ्या क्रांतिकारक कारवायांमध्ये त्यांचा समावेश असेच .

ह्या कामी ते इतकी गुप्तता बाळगत की ब्रिटिश गुप्तचर आणि युरोपियन गुप्तचर संघटनेने लिहून ठेवले आहे - ' संघाच्या वरच्या लोकांच्या बैठकीत जे ठरते त्याचा थांगपत्ता कोणालाच लागू शकत नाही ' !

ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या पक्षांच्या मध्यवर्ती कार्यकारणीत सुद्धा आपले हेर नेमणारे ब्रिटिश संघाबद्दल मात्र संघाच्या बाबतीत आपले अपयश लिहून ठेवतात ह्याकडे मुद्दाम लक्ष द्यावे .

( अशा आपल्याविरुद्ध लढणाऱ्या विरोधी पक्षांच्या कार्यकारणीतील ब्रिटिश हेरांचा उल्लेख जेष्ठ कम्युनिष्ठ विचारवंत व इतिहासकार डॉ य दि फडके ह्यांनीच त्यांच्या पुस्तकात केला आहे . )

अंबिकाबाई ह्या माहेरच्या आवळसकर ! पुणे जिल्ह्यातील आवळस हे गाव 1924 च्या आसपासच मुळशीच्या धरणाच्या पाण्याखाली गेले आहे .

स्त्रियांचा पहिला सत्याग्रह किंवा भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्यात आणण्याचे श्रेय आपण नेहमी महात्मा गांधी ह्यांना देतो .

पण भारतातील स्त्रियांचा पहिल्या सत्याग्रहाचे श्रेय हे एका मराठी माणसाचे आहे ! स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचे जेष्ठ सहकारी व मित्र सेनापती बापट ह्यांचे !

मुळशीच्या सत्याग्रहात स्त्रियांनी पहील्यांदा भाग घेतला . मराठा व महार जातीच्या स्त्रियांनी त्या लढ्यात सेनापती बापट ह्यांच्या नेतृत्वाखाली भाग घेतला होता .

ह्या सगळ्या मुळशीच्या लढ्याच्या इतिहासावरच गो नि दांडेकर ह्यांनी एक कादंबरी लिहिली आहे ( पवनाकाठचा धोंडी ) आणि त्यावर एक चित्रपट सुद्धा आहे .

काल गो नि दांडेकर व त्यांच्या मातोश्री ह्यांचा हा फोटो बघण्यात आला आणि हे सगळे आठवले .

अजून बरेच आहे पण ते नंतर कधीतरी !

© डॉ सुबोध नाईक

( हा लेख लेखकाच्या नावासहच शेयर करावा )

सह्याद्री - पहिलं आणि अखेरचं प्रेम..⛰️❤️जागतिक डोंगर दिनाच्या शुभेच्छा... ⛰️🚩Happy International Mountain Day
11/12/2021

सह्याद्री - पहिलं आणि अखेरचं प्रेम..⛰️❤️

जागतिक डोंगर दिनाच्या शुभेच्छा... ⛰️🚩

Happy International Mountain Day

भारतमातेच्या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली..💐😔वंदे मातरम..
08/12/2021

भारतमातेच्या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली..💐😔

वंदे मातरम..

' जाणता राजा ' चा प्रवास...🚩https://www.esakal.com/saptarang/malojirao-shirole-writes-about-babasaheb-purandare-ras98
19/11/2021

' जाणता राजा ' चा प्रवास...🚩

https://www.esakal.com/saptarang/malojirao-shirole-writes-about-babasaheb-purandare-ras98

पहाटे मला बाबासाहेबांनी झोपेतून उठवले आणि म्हणाले, ‘‘त्या झुंजार बुरुजाच्या इथे जा आणि पटकन अंघोळ करून या.’ बुरु.....

महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज ठाकरेंनी  वाहिली अनोखी श्रद्धांजली...🙏🙏
16/11/2021

महाराष्ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज ठाकरेंनी वाहिली अनोखी श्रद्धांजली...🙏🙏

गो.नी. दांडेकरांनी सांगितलेली एक आठवण...महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो.बाहेर धो धो पाऊस सुरु होता.पाख...
15/11/2021

गो.नी. दांडेकरांनी सांगितलेली एक आठवण...

महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो.बाहेर धो धो पाऊस सुरु होता.पाखरंही आडोसा धरुन बसलेली. खिडकीतुन आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो. इतक्यात एवढ्या जीवघेण्या पावसात सायकल मारत चाललेला एकजण दिसला.विचारच करीत होतो इतक्यात चेहरा दिसला.तसाच धडपडत बसमधुन खाली उतरलो,धावतच जावुन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले अन विचारले हे काय.? या प्रलयपावसात कुठुन आलात आणि कुठं निघालात.? चिंब भिजलेला,काकडलेला तो तरुण म्हणाला..

आप्पा..प्रतापगडावरुन हडपांचा सांगावा आला. शिवकालीन पत्र सापडलय लगेच या,निघालो..बससाठी पैसे नव्हते,सायकल मिळाली,लगेच निघालो पुण्यावरुन..!

आप्पांनी त्या तरुणाला कडकडुन मिठी मारली..कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यातल पाणीच थांबेना.
तो तरुण म्हणजे आ.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे..!! 🙏

मी विद्वान नाही, पंडित नाही. साहित्यिक नाही. बुद्धिवंत नाही. इतिहाससंशोधकही नाही. इतिहासकार नाही. भाष्यकार नाही. जो काही...
15/11/2021

मी विद्वान नाही, पंडित नाही. साहित्यिक नाही. बुद्धिवंत नाही. इतिहाससंशोधकही नाही. इतिहासकार नाही. भाष्यकार नाही. जो काही आहे, तो गावरान मऱ्हाठी सरस्वती भक्तांच्या केळीच्या पानावरचं, त्यांच्या जेवणातून उरलेल्या चार शिताभातांवरून गुजराण करणारा येसकर आहे. लेखक म्हणून पुस्तकावर माझं स्वतःचं नावही छापण्याची माझी इच्छा नव्हती. खरोखर आजही नाही. कुठं कुठं जीवनात निरुपाय होतच असतो. माझाही इथं निरुपाय झाला. कित्येक काव्ये आणि बखरी कुणी लिहिल्या हे संशोधकांनाही सापडत नाही. माझीही तशीच इच्छा होती.
(राजा शिवछत्रपती)
तलवारीसारखी धारदार लेखणी, तोफेसारखी धडाडती वाणी आज अखेरचा श्वास घेऊन थांबली... काय लिहावे...
शिवशाहिरांना भावपूर्ण श्रद्धांजली..🌸🌺🙏

Address


Telephone

8082048198

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unaad Bhatkanti Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unaad Bhatkanti Trekkers:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Travel Agency?

Share