Amazing Ahmednagar

Amazing Ahmednagar This Page is about Historic Ahmednagar which will show the Qualities of Ahmednagar have & Historic

Sopanrao cha Vada kaunala Pahije.??
12/06/2017

Sopanrao cha Vada kaunala Pahije.??

आज  ्थापना_दिवस की आप सभी अहमदनगर वासी को 527 वा साल की हार्दिक शुभेछा।आमचा हक्काच्या  #अहमदनगर। 💪 👊 💪✌
28/05/2017

आज ्थापना_दिवस की आप सभी अहमदनगर वासी को 527 वा साल की हार्दिक शुभेछा।

आमचा हक्काच्या #अहमदनगर। 💪 👊 💪✌

We Love AHMEDNAGAR,कारण,   शिवरायांच्या स्वराज्याची बिजे आमच्या याच अहमदनगरमधे रूजलेली आहेत.   याच शहरात मालोजीराजे, लखु...
19/05/2017

We Love AHMEDNAGAR,

कारण,
शिवरायांच्या स्वराज्याची बिजे आमच्या याच अहमदनगरमधे रूजलेली आहेत.
याच शहरात मालोजीराजे, लखुजीराजे, शहाजीराजे यांचे कार्यकर्तृत्व बहरले त्याचेच पुढे स्वराज्यात रूपांतर झाले.
..याच अहमदनगरने जगाला स्वराज्यप्रेरणा दिली
म्हणून We love Ahmednagar, Maharashtra

अहमदनगर, १६ शतकातल जगातील 3 समृद्ध शहरांपैकी एक शहर! शहराची स्थापना अहमदशाह ने केली हि गोष्ट जरी सत्य असली तरी शहराचा आण...
19/05/2017

अहमदनगर, १६ शतकातल जगातील 3 समृद्ध शहरांपैकी एक शहर! शहराची स्थापना अहमदशाह ने केली हि गोष्ट जरी सत्य असली तरी शहराचा आणि जिल्ह्याचा इतिहास हा त्या आधीपासूनचा जुन्या काळातील एक लॅन्ड पोर्ट (जुन्या काळातील एक दळणवळण वाह्तुकीमधला थांबा). शहरातील व्यापाराला पोषक वातावरण त्यामुळच तयार झाल असाव. पुढे अहमदशाह ने शहर स्थापना करून शहराला एका उंचीवर नेऊन ठेवल. आजही त्या वैभवातील वास्तू त्याची साक्ष देतात. आपण एवढ्या समृद्ध शहराला नाव ठेवण्यात वेळ घालवण्या पेक्षा त्याच्या विकासला भर घातली तर जास्त उपयोगी होईल अस माझ माझ्या शहराबद्दल मत आहे. शहरातील राजकारणी आणि तथाकथित श्रेष्ठींना एवढच म्हणण आहे एकदा तुमच्या चारचाकी मधून बाहेर पडा आणि माझ्या नगरची अवस्था बघा! मी लहानपणापासून सगळ राजकारण उड्डाणपुला पाशी चालू होऊन तिथच बंद पडलेले पाहिलंय. ना शिक्षण क्षेत्रात, ना पर्यटन क्षेत्रात, ना इंडस्ट्रीज मध्ये कुठेच माझ शहर प्रगतीपथावर नाहीये. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे एकच रस्ते, लाईट, पाणी... शहरातील आहे त्या वास्तू पाडून ठेवायच्या आणि त्या जागांवर नुसतेच कागदोपत्री प्लॅन टाकून ठेवायचे. किती दिवस चालणार अस? शहरातील सगळा तरुण वर्ग पुण्याच्या दिशेने धावतोय आणि राजकारण अर्थकारणाकडे धावतंय. का माझ्या शहरात एकच नवनीत भाई बार्शीकर जन्माला आले. त्यांच्या नंतर जणू विकास खुंटला कि काय माझ्या शहराचा! लहानपणी शहरातील सिद्धी बाग, नेहरू पुतळा (अप्पू हत्ती), अश्या ठिकाणी आनंदाने सगळे जायचो आज मात्र फक्त नावापुरत्या या वास्तू आणि परिसर शिल्लक आहेत. अनेक लहानपणीच्या मित्रांना नगरमध्ये राहायची इच्छा आहे परंतु संधी निर्माण न होऊ शकल्यामुळ इतर शहरांमध्ये आई वडिलांना सोडून जाव लागत. १०० किलोमीटर वर असलेले पुणे शहर २० वर्षात मेट्रो सिटी चा पल्ला गाठू शकत मग माझ शहर अजूनही तिथेच का? शहराचं नाव बद्ण्यापेक्षा शहर विकासाकड लक्ष द्याव. आणि जर इतक्या वर्ष्यांची ओळख त्या नावाने आहे तर मग नवीन नाव का? आज या मार्केटिंग च्या जमान्यात establish brand सोडून दुसर्या नावाचा अट्टाहास करण्यापेक्षा; शहर विकास करून एक ideal city म्हणून जगासमोर जायला काहीच हरकत नसावी.
या शहरात अनेक लोक उदा. मा. कै. शाहू मोडक, मा. कै. सदाशिव अमरापूरकर, मा. कै. नवनीत भाई बार्शीकर, मा. पोपटराव पवार, मा. प्रमोद कांबळे, मा. नरेंद्र फिरोदिया, , असे अनेक लोक शहराच नाव जगाच्या कानाकोपर्यात नेलंय अथवा नेण्याची धडपड करताना आजही दिसतात हि गोष्ट राजकारण्यांना का नाही जमत? माझ कोण एका व्यक्तीबद्दल दुमत नाहीये किंवा रागपण नाहीये. मला जे प्रश्न पडलेत ते सगळ्या सामान्य माणसाला पडलेले प्रश्न आहेत. हे सर्वं काही बिनबोभाट बोलतोय असा पण नाहीये. मागचे 3 वर्ष या सर्वं गोष्टीवर अभ्यास करून हे सर्वं काही बोलतोय. तीन वर्षापूर्वी मुंबई – पुण्यात जाऊन आरामात आयुष्य जगाव असा विचार आम्हा मित्रामध्ये आलेला पण नंतर आम्ही ठरवलं सगळे मिळून शहरासाठी काहीतरी करायचं आणि सगळे नगर मध्ये एकत्र आलो. विकासाच्या दृष्टीने काही तुरळक पाऊले उचलली आहेत. त्यातीलच एक मा. नरेंद्र फिरोदिया यांच्या सहकार्याने अहमदनगर महाकरंडक असो अथवा महावीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य असो. शहर विकासाचे तीन वर्षातील मेहनत करून तयार केलेले प्रोजेक्ट देखील यामध्ये आहेत. शहरात काम करताना सत्ता किंवा पॉवर याचा वेळोवेळी जाणवलेला आभास असो. कोणी कितीही विरोध केला तो राजकीय हेतूने असो अथवा अजून दुसर्या उद्देशाने पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही हे तितकच निश्चित. काम सगळ्यांना बरोबर घेऊन करायची इच्छा आहे. पण वेळेला जे येतील ते अथवा जे येणार नाहीत त्यांना सोडून काम चालू ठेवणार. अहमदनगर शहर विकासासाठी काही पूर्ववत तयारी करून आपण सगळेच शहर विकासाच्या या मोहिमेत उभे राहिलो तर नक्की नगर शहर २०२० पर्यंत एका नव्या दिशेने वाटचाल करेल यात शंका नाही. अहमदनगर रेव्होल्युशन मुव्हमेंट या चळवळीची सुरवात आपण करूयात. माझ्या शहरासाठी, आपल्या शहरासाठी एक पाऊल सगळे पुढ येऊ. शहर विकासाची काही सूत्र साथीला घेऊन आपण आपला प्रवास चालू केला तर नक्कीच हे शहर लवकरच प्रगतीपथावर येईल. मागील तीन वर्षात केलेल्या काही गोष्टीची सुसूत्रता एका नव्या दिशेने शहराला घेऊन जाईल. त्यापैकी काही मुख्य मुद्दे या लेखात आवर्जून नमूद करतो.
1. Ahmednagar Tourism Development
2. Ahmednagar Educational Development
3. Ahmednagar Industrialisation
4. Ahmendagar Cultural Development
5. Green City, Clean City
6. Seena River Development
7. Ahmednagar City Development
या काही ठळक मुद्द्यांना घेऊन आगामी काळात आपण सर्वं एकजुटीने जर काम केल तर नक्कीच हे शहर म्हातार्याचं शहर म्हणायची वेळ आपल्यावर येणार नाही. या शहरात राहणारे अथवा इथून दुसर्या शहरात गेलेले सगळी आपली माणस नक्कीच या विकासाला हातभार लाऊ शकतात. राजकारणी लोकांना एवढीच विनंती कि त्यांनी त्यांची इच्छाशक्ती जर या चळवळीला लावली तर नक्कीच आपल शहर जगातील एक समृद्ध शहर होण्यास वेळ लागणार नाही. शहराच नाव राम नगर करण्या आधी इथे रामराज्य अणुयात. या लेखाद्वारे कोणाचेही इगो अथवा मन दुखावण्याचा कोणताही उद्देश नाही. या उपक्रमासाठी आपल्या सूचना, मदत, हातभार, सदिच्छा कृपया कमेंट्स मध्ये अथवा खाली देलेल्या मो. नंबर वर अथवा इ मेल वर कळवा. सर्वांच्या सहकार्याने लवकरच एका नव्या क्रांतीला सुरवात होईल. पोस्ट आवडल्यास share करावी हि विनंती...
आपला नगरकर
अॅड. पुष्कर तांबोळी Adv Pushkar Tamboli
कार्यकर्ता अहमदनगर रेव्होल्युशन मुव्हमेंट.
९९२१२०७०००
[email protected]

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amazing Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share