26/04/2024
Copy Paste
आमच्या एक अगदी जवळच्या परिचीत काकिर्डे वहिनी आहेत त्यांचा नातू जिवघेण्या आजारातून अगदी सहीसलामत बरा झाला, त्याची पत्रिका दाखवली तेंव्हा ज्योतिषाने वाचण्याची आशा कमीच सांगितली होती
दृष्ट लागेल असं कुटूंब तर दृष्ट लागलीच असं काही जण खरच मनापासून हळहळत म्हणायचे
त्यांच्याकडेही श्री कृष्णसरस्वती स्वामी महाराजांचीच उपासना चालते मग त्यातल्याच कोणीतरी नातू बरा होईपर्यंत पिंपळा समोर रोज एकशे एक दिवे लावायला सांगितले त्यात मेख अशी की दोन सेकंद तरी सगळेच्या सगळे दिवे एकसाथ तेवत राहयला हवेत
घरात नातू सोडून तीन माणसं.मुलगा सुट्टी घेऊन किती दिवस घरात बसणार?आणि अंथरुणावर असलेल्या नातवा जवळ सुनेला थांबणं अपरिहार्य
आजींबरोबर पिंपळापाशी जाणार कोण?
पण तरी आजी मोठ्या धीराच्या
एकशे एक दिव्याची तयारी त्या घरी करून निघायच्या पण दिव्याची तेवणारी ज्योत बरोबर कशी नेणार? ती तर तिथे गेल्यावरच प्रज्वलीत व्हायला हवी शिवाय एक महत्वाची अट . हे सोपस्कार करताना मनात नकारात्मक विचार येऊ द्ययचे नाहीत , निराश व्हायचं नाही सगळे दिवे तेवत राही पर्यंत प्रामाणीक प्रयत्न करीत राहयचं
म्हातारी मोठी जिद्दीची, पंचाहत्तरीच्या पुढची पण सगळी सामुग्री घेऊन पिंपळासमोर ठिय्या देऊन बसायची , कधी सहज सगळं पार पडायचं आणि कधी जीव मेटाकुटीस यायचा अशी थोडी थोडकी नाही दोन अडीच वर्ष झाली.
पण या दोन अडीच वर्षात काय फरक पडला माहितिये?
सुरुवातीला म्हातारी एकटी होती
मग एक दोघं काँलेजची मुलं म्हातारीची धडपड बघून तिच्या मदतीला आली मग आणखी काहीजण धावले, मग उद्या कधी येणार? परवा कुणाकुणाला वेळ आहे? मग आणखी कोणाला जमेल ? असं करत करत हा ताफा उभा राहिला कितीदा रस्त्यावरचे फिरते फेरीवाले सुद्धा काही देणं घेणं नसताना काकिर्डे आजींच्या मदतीला अगदी श्रद्धेने आलेले आम्ही बघितलेत
आता त्यांचा नातू पूर्ण बरा झालाय, फक्त अजून काही दिवस जंतू संसर्ग होण्यापासून काळजी घ्यायची आहे
आजी म्हणतात पूर्वी गावजेवण घालायची पद्धत होती ना तशी हा पूर्ण बरा झालाकी दिवस ठरवून मी त्या पिंपळाची पूजा घालणार आहे ,आणि त्या निमित्ताने गावजेवणच ठेवणार आहे
कोण कसं कोणाच्या रुपात मदत करून गेलं मला माहीत नाही
तसच कोण कुणाच्या रुपात जेऊन जाईल हे ही मला माहीत नाही
खरच तो दिवस लवकर येउदेत
मला तर अत्तापासूनच त्या पिंपळा भोवती मंडप घातलेला दिसायला लागलाय ...
चं गो