10/09/2022
थोडी शाब्दिक गंमत....
एक वेलांटी सरकली,
पिताकडून पतीकडे आली;
एक ईकार बदलला,
नवरेचे नवरी झाले;
एक काना सरकला,
रामचे रमा झाले;
दोन काना जोडले,
शरदचे शारदा झाले;
एक मात्रा सरकली,
खेरचे खरे झाले;
एक अक्षर घटले,
आठवलेचे आठले झाले;
एक अक्षर बदलले, अन्
मालूची शालू झाली,
कर्वेचे बर्वे झाले,
अत्रेचे छत्रे झाले,
गानुचे भानु झाले,
कानडेचे रानडे झाले
लग्नानंतर नांवच उलटे केले,
निलिमाचे मालिनी झाले;
पदोन्नती झाली,
प्रधानचे राजे झाले,
राणेचे रावराणे झाले,
देसाईचे सरदेसाई झाले,
अष्टपुत्रेचे दशपुत्रे झाले;
झुरळाला भिणारी ती,
दैवयोगाने वाघमारे झाली;
लेकराला कुरवाळीत ती,
पुढे लेकुरवाळी झाली;
एक पिढी सरकली,
सुनेची सासू झाली!