16/05/2024
उत्तराखंड येथिल चारधाम यात्रेचे पूर्ण नियोजन धेपळले
असंख्य भाविक रात्र बस मध्ये काढत आहेत, पैश्या पायी पैसा जातोय आणि मानसिक व शारीरिक त्रास वाढतोय,
आम्ही ही चारधाम यात्रा सुरू करून 30 वर्षाचा कालावधी उलटला , पण असे ढिसाळ नियोजन , होणारी वाहतूक कोंडी व इतका त्रास कधी बघितला नाही ,
येथील भौगोलिक स्थिती व अरुंद रस्ते बघता ही यात्रा कठीण मानली जाते, असंख्य यात्रेकरू इथे दर्शन घेऊन जातात, ड्रॉइव्हर लोक त्यांचे कौशल्य पणाला लावून गाड्या चालवतात , कधी ही ट्राफिक जॅम झाले तर 1 किंवा 2 तासाच्या वर होत नव्हते, अरुंद रस्त्यातून गाड्या सफाई ने निघत होत्या, प्रशासन अतिशय व्यवस्थित व्यवस्था ठेवत होते, जिथे अरुंद रस्ता तिथे पोलीस तैनात असायचे व एक दोन गाड्या करून सोडायचे, पण ह्या वेळी वेगळेच नियोजन केले गेलेले दिसत आहे
हरिद्वार हुन राणा चट्टी हे 200 किमी अंतर , त्या रस्त्यात 5 ते 6 तास एकाच ठिकाणी म्हणजे 3 ठिकाणी वाहतूक थांबवून ठेवत आहे,
ह्या वेळी पण दर वर्षी च्या तुलनेत फक्त 10 ते 15%भाविक वाढले आहेत , पण प्रशासन फुगीर आकडा सांगत आहे,
जानकी चट्टी येथून पायी किंवा घोड्याने यात्रा चालू होते, येथे 1200 गाड्या एकाच वेळी पार्क होऊ शकतात अश्या पार्किंग व्यवस्था असतानाही पार्किंग ला जागा नाही अश्या कारणाने गाड्या मागेच उभ्या करतात, व आमचे वन वे ट्राफिक आहे असे सांगतात, एकदा खालून गाड्या सोडल्या की त्या वर जानकी चट्टी इथे 35 किमी पोहचायला 2 तास लागतात, मग वरून गाड्या सोडणार त्या खाली यायला 2 तास, एका वेळी 200 गाड्या सोडतात, मग यात्रेकरूंना 12 तास कमीत कमी रस्त्यावर थांबावे लागते,
जे लोक हॉटेल बुक करून येत आहेत ते हॉटेल पर्यंत ही पोहचू शकत नाही, अक्षरशः समोर 10 किमी अंतरावर हॉटेल आहे, लोक विनंती करतात की हॉटेल ला तरी जाऊ द्या पण हे एकच लाईन मध्ये उभे राहा नाहीतर मागे जाऊन दुसरे हॉटेल बघा,
अरुंद रस्त्याचे कारण देत आहेत, ह्यांना ह्या वेळी अरुंद रस्ते आठवत आहेत, इतके वर्षा पासून हेच रस्ते आहेत, आता तरी मोठे झाले, मग ह्या वेळी काशी ट्राफिक जॅम होत आहे,
यात्रा 10% ने वाढली, पण प्रशासनाने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायला सांगितले, पण ते न चेक करायला कोणी नाही , त्याचा फायदा घेत अनेक लोक बिना रजिस्ट्रेशन यात्रेत आले,
दुसरे असे की कॅपेसिटी नसताना प्रशासनाने ऑफ लाईन रजिस्ट्रेशन चालू केले, मग ते कुठल्याही तारखेचे असेल तरीही यात्रेकरू निघाले करण अडवायला कोणी नाही,
हेच हाल प्रत्येक धाम ला आहे, मी आज यामुनोत्री ला आहे म्हणून इथलेच लिहिले
पुढे यात्रेला येणाऱ्या भाविकांनी
सगळा विचार करून यात्रेला यावे, अन्यथा नंतर कधी यावे
सगळं बघितल्यावर असे दिसते की प्रशासनाला यात्रा चालवायची नाही ये
मंगेश कपोते
हेरंब ट्रॅव्हल ,