Abhishri Travels, Aurangabad

Abhishri Travels, Aurangabad its pure tourism...updates for new tour packages, all about domestic and international destinations, along with Air Booking.
(1)

ABHSHRI is the travel company taking care of tourism loving people. giving altogether endless exciting experiences, Organizing FIX departures and FIT - GROUP tours, in India & Abroad ! PROMOTION OF AURANGABAD TOURISM is on agenda.

" दिंडी "देशांतर्गत पर्यटनात धार्मिक पर्यटन कायम टॉप वर, दोन प्रकार :  एक तर देवालय - देव दर्शनआणि दुसरे - एखादी यात्रा,...
25/01/2024

" दिंडी "
देशांतर्गत पर्यटनात धार्मिक पर्यटन
कायम टॉप वर,
दोन प्रकार : एक तर देवालय - देव दर्शन
आणि दुसरे - एखादी यात्रा, उत्सव किंवा प्रवचन, याग.
अशा आयोजनाचं स्वरूप एकदम निराळं.
शिवाय सहल खर्च नियंत्रित ठेऊन पुरेशा
सुविधा हे जास्त महत्वाचं.

धार्मिक पर्यटन नुसती तीर्थ यात्रा नाही,
तर त्यातही वैशिष्टय जपता येतं.
हे लक्षात घेऊन काही खास धार्मिक स्थळांचे दर्शन " अभिश्री " तर्फे सुरू केले यासाठी धार्मिक पर्यटनाची " दिंडी " सुरू केली. यातून पहिल्याच वर्षी छोट्या तीर्थ यात्रांसोबत भारताचे चार धाम यात्रा केली ( द्वारका, रामेश्वर, बद्रीनाथ आणि जगन्नाथ पुरी) पाठोपाठ केरळ आणि कर्नाटक मंदीर टूर आणि हे वाढत गेलं. यात गेल्या वर्षी वाराणसी अयोध्या, उज्जैन इंदूर, ही भर. गोव्यात टेम्पल टूर केला. " दिंडी " चं स्वरूप जरी तीर्थ यात्रा असलं तरी याला खास अभिश्री टच देऊन value addition हा लक्षणीय भाग.
आजच्या राष्ट्रीय पर्यटन दिनी " दिंडी " ची पोस्ट
दिंडीचे नवे टूर यावर्षी , छोटे छोटे तीन चार दिवसांचे.
तुम्हाला नक्कीच आवडतील.
पर्यटन प्रेमी मित्रांना शुभेच्छा !
- Sarang Takalkar

Ajanta and Ellora World heritage sites ...Grps r coming and rocks r singing
31/12/2023

Ajanta and Ellora
World heritage sites ...
Grps r coming and rocks r singing

31/12/2023
Winter calling...Vacations
18/10/2023

Winter calling...
Vacations

winter - diwali vacations B O O K I N G   O N fixed departure dates --soon !call - 098231 16141
11/07/2023

winter - diwali vacations
B O O K I N G O N
fixed departure dates --soon !
call - 098231 16141

वेगवेगळ्या डेस्टिनेशन ला आपले पर्यटक असावेतत्यांचा टूर मजेत सुरू असावा..व्यवस्था चोख असावीआणि फोन कॉल्स मधून त्यांचे आनं...
07/05/2023

वेगवेगळ्या डेस्टिनेशन ला आपले पर्यटक असावेत
त्यांचा टूर मजेत सुरू असावा..व्यवस्था चोख असावी
आणि फोन कॉल्स मधून त्यांचे आनंदाचे गाणे ऐकू यावे. यासारखे समाधान नसते.
आयोजक म्हणून आणखीन काय हवे ?
▪️
सध्या उत्तरेत काश्मीर, नैनीताल आणि इकडे दक्षिणेत केरळ व कूर्ग असे अभिश्री टूर्सचे " एफ अँड एफ" ( फॅमिली अँड फ्रेंड्स) पॅकेजेस सुरू आहेत. टूर मधून पर्यटकांचे फोन येतच असतात. क्वचितच व्यवस्थेबाबत तक्रार येते. बहुतांश वेळी कॉम्पलिमेंट्सचे कॉल आणि रिसॉर्ट्स, हॉटेल्स, निसर्ग असा सर्वांगीण वर्णनाचा फोन येतो. तेव्हा खरंच समाधान वाटतं, की चला ! आपल्या विश्वासावर एवढी मंडळी जातात, त्यांच्या पर्यटनाचा आनंद कायम रहावा यासाठी आपण केलेलं नियोजन चुकलं नाही.
▪️
प्रवासाची मानसिकता आणि सेवा क्षेत्र कसे असते हे ठाऊक असेल तर पर्यटक सहसा नाराज होत नाही.
त्याच्या आनंदाचं मोल नसलं तरी त्याने मोजलेल्या पैशाचं मोल नक्कीच आहे. त्याचा परतावा त्याला मिळालाच पाहिजे...
सारंग टाकळकर/ अभिश्री ट्रॅव्हल्स

यंगस्टर्स आजकाल चुझी झालेत, त्यांना अनोळखी ग्रुप मधून फिरायला फार आवडत नाही. स्वतंत्र टूर्स बरे वाटतात, एक दोन फॅमिलीज अ...
27/03/2023

यंगस्टर्स आजकाल चुझी झालेत, त्यांना अनोळखी ग्रुप मधून फिरायला फार आवडत नाही. स्वतंत्र टूर्स बरे वाटतात, एक दोन फॅमिलीज असले की कम्फर्ट वाटतं. ट्रॅव्हल वेबसाईट्स कडे मोर्चा वळतो. पण त्यात गोंधळात पडायला होतं. नेमकं काय pick करावं हे ठरत नाही. अशावेळी हॉलिडे प्लॅनर हक्काचा - विश्वासार्ह ठरतो आणि टूर सफल. असे अनेक पर्यटक
स्नेही येतात त्यांच्यासाठी कस्टमाईज्ड टूर्स !

नववर्षाचा आरंभ, नवी पालवी ! तोच विश्वास... नवा प्रवास - गुढी पाडवा शुभ चिंतन.
22/03/2023

नववर्षाचा आरंभ, नवी पालवी ! तोच विश्वास... नवा प्रवास - गुढी पाडवा शुभ चिंतन.

Happy HoliColors of tourism are hereEnjoy the tours with us
06/03/2023

Happy Holi
Colors of tourism are here
Enjoy the tours with us

Happy National Tourism DayWish you all the joyful tourism year head ! Kashmir to Andaman& Gujrat to 7 sisters All the wa...
25/01/2023

Happy National Tourism Day
Wish you all the joyful tourism year head !
Kashmir to Andaman
&
Gujrat to 7 sisters
All the way U wish
Abhishri Travels is here to cater
All tourism need !

नवा गोवा टूर ! आज सुरू झाला. खास आयोजन तिची स्पेस शोधताना ' ती 'आणि ' तिच्या ' मैत्रिणी.      #गोवा
21/01/2023

नवा गोवा टूर !
आज सुरू झाला.
खास आयोजन
तिची स्पेस शोधताना ' ती '
आणि ' तिच्या ' मैत्रिणी.

#गोवा

एक नवा ग्रुप केरळ कन्याकुमारी टूर करून परत ! यंदाचा केरळ सिझन संपताना ..केरळ मोहक तेवढेच समाधानकारककेरळ निसर्ग संपन्न ते...
21/12/2022

एक नवा ग्रुप
केरळ कन्याकुमारी टूर करून परत !
यंदाचा केरळ सिझन संपताना ..
केरळ मोहक तेवढेच समाधानकारक
केरळ निसर्ग संपन्न तेवढेच धार्मिक
केरळ टूर करून नुकतेच परतलेले पर्यटक.

Poovar island sunset ! Nature speaks with colors ....
03/12/2022

Poovar island sunset !
Nature speaks with colors ....

Kerala 3rd group of this winter seasonSuccessfully completed the tour
03/12/2022

Kerala 3rd group of this winter season
Successfully completed the tour

Abhishri Kerala tourThird trip in this season..Travelers faith is our strength !by all means
10/11/2022

Abhishri Kerala tour
Third trip in this season..
Travelers faith is our strength !
by all means

धन्यवाद ! विश्वास आणि अभिश्री हे समीकरण पुन्हा सार्थ ठरवत या सीझनचा पहिला केरळ फिक्स्ड डिपार्चर ( १० नोव्हेंबर ) सीट्स फ...
17/10/2022

धन्यवाद !
विश्वास आणि अभिश्री हे समीकरण
पुन्हा सार्थ ठरवत या सीझनचा पहिला
केरळ फिक्स्ड डिपार्चर ( १० नोव्हेंबर )
सीट्स फुल ! आणि बघता बघता दुसरा देखील ...
**
दुसरा केरळ टूर - ( २२ नोव्हेंबर- २ डिसेंबर )
गुरुवायूर - मुन्नार- थेक्कडी- अलेप्पी,
त्रिवेंद्रम-कन्याकुमारी- मदुराई - रामेश्वरम
मोजक्या सीट्स.

देशांतर्गत पर्यटनाला सर्वोत्तम राज्य कोणतं ?असं जर कुणी मला विचारलं तर नि: संशयपणे मी सांगेन की केरळ !--केरळ ! निसर्गाची...
22/08/2022

देशांतर्गत पर्यटनाला
सर्वोत्तम राज्य कोणतं ?
असं जर कुणी मला विचारलं तर
नि: संशयपणे मी सांगेन की केरळ !
--
केरळ ! निसर्गाची इतकी विविध रूपं
इथे बघायला मिळतात की
बघणारा थक्क होतो.. हिरवाईने नटलेल्या या प्रदेशात फिरण्याचा आनंद काही औरच. अप्रतिम समुद्र किनारे, फेसाळते धबधबे, चहाचे मळे, जंगल, बॅक वॉटर्स आणि अनेक देवस्थानं. फिरताना सोबतीला असतो मसाल्यांचा दरवळ.
या नयनरम्य प्रदेशात फिरायचं तर इथल्या मातीचा गंध आणि इथल्या कलेचा रंग माहिती असणे गरजेचं. कथकली सारखी नृत्य कला अनुभवणं आणि कलरीपायट्टु ही प्राचीन मार्शल आर्ट बघणं सुद्धा एक छानसा अनुभव असतो. मुन्नारच्या चहा मळ्यांच्या सानिध्यात आपण रमलेले असताना पेरियरचे जंगल खुणावते आणि तिथले स्पाईस प्लांटेशन आपल्याला ओढून नेतात. बॅक वॉटर्स मध्ये बोटिंगची अनुभूती तर अविस्मरणीयच ! जून मध्ये झालेल्या दोन्ही मान्सून स्पेशल टूरमध्ये या सगळ्यांचा अनुभव पर्यटकांनी घेतला.
केरळ मधील मुन्नार, पेरियार -थेकडी, अलेप्पी -कुमारकोम आणि पुढे जाताना आपण प्रेमात पडतो ते नवीन डेस्टीशन जटायू पार्कच्या. त्रिवेंद्रम च्या अलीकडे ४०-४५ किलोमीटर अंतरावर असलेले जटायू पार्क म्हणजे एक भव्य असे जिथे २०० फूट लांबीचा आणि दीडशे फूट रुंद दगडात कोरलेला जटायू ! रॉक थीम नेचर पार्क म्हणून या स्थळाचे आकर्षण मोठे आहे. ७० फूट उंचीचे हे स्क्लप्चर लक्षणीय आहे. हे केरळ मधील तसे नवे आणि मॅनमेड टुरिजम. हे बघावे असेच.
तीन वर्षपूर्वी एका छोट्या ग्रुपला हे सुचवले तर त्यांनी आधी नाही म्हटले आणि शेवटी कन्व्हिन्स झाले. मग तिथे पोहोचताच त्यांनी फोन कॉल्स, फोटो याचा एवढा मारा माझ्यावर केला .. अक्षरश: वेड लावणारे हे ठिकाण.
कोवलम चा समुद्र किनारा आणि त्रिवेंद्रम चे पद्मनाभ मंदिर नक्कीच समाविष्ट केले पाहिजे. वेळ असेल तर तिथून पुढे जवळच असलेल्या कन्याकुमारी ला जाऊन स्वामी विवेकानंद स्मारकाचे दर्शन तर घेतले पाहिजे.
या सगळ्या वैविध्यामुळे मला केरळ कायम मोहित करते. केरळचा खास पाहुणचार आणि आदरातिथ्य भारावून टाकणारे. केरळला जायचे आणि तिथल्या व्यंजनांचा आस्वाद घ्यायचा नाही असं कसं होईल. व्हेज - नॉनव्हेज चा मिलाफ असणारे पदार्थ चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारे.. आधीच हे राज्य मसाल्यांसाठी परिचित यामुळे प्रत्येक पदार्थ हा स्वादिष्टच ! केरळ मधल्या मिश्र संस्कृतीचे दर्शन पदार्थांमध्ये हमखास बघायला मिळते. मूळ केरळी सोबत मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने व्हरायटी फूड इथे मिळतं. मसाल्यांचा आणि नारळाचा भरपूर वापर हे वैशिष्ट्य. फिश, रेड मीट किंवा व्हेज मध्ये तांदुळाचा वापर अधिक. भाताचे अनेक प्रकार आणि इडली, डोसा, पुट्टु, इत्यादी चाखणे हे केरळला गेल्यावर ओघाने येतेच..
अशा विविधांगी केरळच्या दोन सहली दिवाळीनंतर निघतायत. तुम्ही येऊ शकता.. केरळ च्या कस्टमाइज्ड टूर्स तर कधीही करू शकता..कॉल किंवा व्हॉट्स अप वर संपर्क करा आणि केरळचे मोहक रुप बघा ...रसिकतेने !
- सारंग टाकळकर (अभिश्री ट्रॅव्हल्स)
9823116141

औरंगाबाद – आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त५ ते १५ ऑगस्ट दरम्यान अजिंठा – वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आ...
04/08/2022

औरंगाबाद – आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्त
५ ते १५ ऑगस्ट दरम्यान अजिंठा – वेरुळ लेणी, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि औरंगाबाद लेणी या वारसा स्थळांसाठी प्रवेश शुल्क न आकारण्याचा निर्णय केंद्रीय पुरातत्व विभागाने घेतला आहे.

Address

29 , Shreya Nagar, Auramgabad
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Saturday 11am - 9pm

Telephone

+919823116141

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishri Travels, Aurangabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhishri Travels, Aurangabad:

Videos

Share

Category