12/04/2024
#थायलंड अनुभव कथन
भाग 1 - फुकेट
नमस्कार मित्रांनो
नुकतेच ऐक अविस्मरणीय सहलीतून परतलो फुकेट -क्राबी - -पटाय्या - बँकॉक
8 रात्र 9 दिवसाच्या या सहलीमध्ये खूप सूंदर असा अनुभव आला. 2 एप्रिल ला आम्ही मुंबई मधून फुकेट साठी निघालो. निघताना मनात खूप विचार होते मी नेहमी लोकांना सांगायचो अनेकांना पाठवले सुद्धा पण लोकांचं विचार मनात घर करत होता बँकॉक पटाय्या तेपण जोडीने कसं काय?
सुरवात झाली फुकेट पासून फुकेट ला पोहचलो हॉटेल ला चेक इन केलं हॉटेल स्टाफ यांची वागणूक हॉटेल चे परिसर सर्व ऐक नंबर. पहिला दिवस फ्री होता. संध्याकाळी आम्ही फुकेट वॉकिंग स्ट्रीट पटोन्ग बीच ला पोहचलो europian तसेच भारतीय अश्या अनेक संस्कृती तिथे अनुभवल्या. तसें व्हेज खाणाऱ्याचे वांदे होतात असे लोकांचे सार्वजनिक मत पण थायलंडमध्ये कुठेच व्हेज जेवणाला अडचण नाही हे आम्ही अनुभवले खूप छान शाकाहारी भारतीय ब्रँड असलेले हॉटेल सर्वत्र बघायला मिळतात. आवर्जून सांगावे तर स्वामीनारायण मानणारे गोविंद हॉटेल इथे तर जेवताना हॉटेल च्या बाहेर चप्पल काढायला सांगितलं जे आपल्या संस्कृती चे दर्शन घडवत होते. शुद्ध सात्विक जेवनाचा आनंद आणि तेपण थायलंड मध्ये वा क्या बात है.
दुसऱ्या दिवशी सकाळी phi phi आयलंड साठी निघालो जे फुकेट पासून क्राबी पर्यंत पसरले आहे फेरी ने मध्यभागी गेल्यावर आयलंड वर बोट थांबते ते डोळ्याचे पारणें फेडणारे दृश्य निळेशार पाणी ज्याच्या तुन तळ दिसतो हे सर्व अनुभव सुखद करणारेच. दुपारी तिथेच जेवण करून हॉटेल् ला परतलो.
पुढचा दिवस आला सकाळी फुकेट सिटी टूर साठी निघालो युरोपीयन देशाची झलक असणाऱ्या old टॉऊन मध्ये आम्ही शॉपिंग साठी फिरत होतो तेथील स्वच्छता सूंदर नियोजित रस्ते ऐक ही हॉर्न न ऐकू येणारे रस्ते अश्या विविध गोष्टीने नटलेले हे शहर ऐक वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. दुपारी आम्ही प्रसिद्ध टायगर किंगडम ला भेट दिली जिथे बेंगोल टायगर व अजून अनेक वाघाच्या प्रजाती आहेत. जिथे आपल्या वाघासोबत बसून फोटो काढण्याचा थरारक अनुभव मिळतो. तसेच थायलंड मध्ये बुद्धीजम आहे खूप सुंदर असे भगवान गौतम बुद्ध यांचे मंदिर आणि तिथल्या कलाकृती हे सर्व मिश्र अनुभव तेपण एकच सहलमध्ये.
फिरणं म्हणजे फक्त एन्जॉय नाही तर विविध संस्कृती चा अनुभव विचारांची देवाण घेवाण चांगल्या गोष्टी शिकणे आणि अमलात आणणे हे सर्व अनुभव फक्त सहलीतच होऊ शकत.
अश्या खूप गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच आम्हाला कनेक्ट राहा