कोकण एक स्वप्ननगरी

कोकण एक स्वप्ननगरी गाव माझ कोकण दोस्ता एकदा पाहून जा वरदान निसर्गाचे काय असतंएकवेळ अनुभवून जा !!
(185)

06/09/2024
श्रावणात काय भाजी करू हा प्रश्नच नको पूर्ण महिन्याचा मेनू 😀😀
03/08/2024

श्रावणात काय भाजी करू हा प्रश्नच नको पूर्ण महिन्याचा मेनू 😀😀

08/02/2024

*विषय: तरच चिपळूण मेमू रोज सुटेल*
येत्या रविवारपासून चिपळूण साठी पनवेल वरून विशेष मेमू दर रविवारी सुटणार आहे. ही रेल्वे गाडी पुढे रत्नागिरीला जाऊन रत्नागिरी वरून परतीच्या प्रवासाला पनवेलला येणार आहे. सदर गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे रविवारी रात्री चाकरमनी कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस ला जे प्रवासी उभ्याने प्रवास करत मुंबईला येतात त्यांच्यासाठी सुखदायी आरामदायी प्रवास व्हावा म्हणून हंगामी स्वरूपात सुरू केलेली आहे.
परंतु हीच गाडी जर तुम्हाला कायमस्वरूपी हवी असेल आणि रोज सोडावी अशी वाटत असेल तर त्याला पर्याय एकच आहे पनवेल वरून चिपळूण पर्यंत सर्वांनी तिकीट काढावे मध्ये कुठचेही तिकीट काढू नये. जेणेकरून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ही गाडी कायमस्वरूपी सोडता येईल तसेच रेल्वेलाही त्यापासून तोटा सहन करावा लागणार नाही. मग तुम्ही कोणत्याही स्टेशनला उतरा परंतु तिकीट चिपळूण पर्यंत काढा जास्तीत जास्त वीस पंचवीस रुपये जास्त जातील परंतु 45 रुपयाची ही गाडी तुम्हाला रोज चिपळूण पर्यंत सुखाने प्रवास करता येईल यासाठी सुरू केलेली आहे. तसेच परतीच्या प्रवासाला रोज संध्याकाळी रत्नागिरी वरून सुटणार आहे.
हे आवाहन करण्या मागचे कारण म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीला थांबत नव्हती नंतर ट्रायल बेसिसला ती गाडी सावंतवाडीला थांबवण्यात आली. सुरुवातीला तीन महिने मग सहा महिने असे करता करता ती गाडी कायम सावंतवाडीला थांबू लागले त्याचे कारण म्हणजे कणकवली आणि कुडाळ येथे उतरणाऱ्या प्रवाशांना मी आवाहन केले होते की कणकवली कुडाळ तिकीट रिझर्वेशन न करता 25 रुपये जास्त देऊन सावंतवाडी पर्यंत तिकीट रिझर्वेशन करा त्यामुळे सावंतवाडीचा कोटा कणकवली कुडाळच्या प्रवाशांनी वाढवला आणि त्या प्रवांशामुळेच ही गाडी सावंतवाडीला कायम थांबवावी लागली.
त्याचप्रमाणे आपण चिपळूण मेमूचे तिकीट थेट चिपळूण पर्यंत काढावे व आठवड्यातून एकदा मुद्दाम चिपळूण पर्यंत प्रवास करून किंवा मध्ये उतरून प्रवास करून या गाडीचा प्रतिसाद वाढवावा असे मी जाहीर आवाहन करीत आहे जास्तीत जास्त हा मेसेज सर्व ग्रुप वर फिरला पाहिजे व चिपळूण मेमू कायमची रोज सुटली पाहिजे.
आपला
सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर
संस्थापक सदस्य कोकण रेल्वे
सल्लागार अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना
940 41 356 19

07/12/2023

कोकणात अशी क्वचित देवस्थाने आहेत. जिथे अशी आर्त हाक देऊन गाऱ्हानी केली जातात. ना कुठचा मोठेपणा ना गाजावाजा ना कसली आशा. फक्त साखर ठेऊन आयुषसाठी उपयुक्त असं घरात शांतता. भावांडमध्ये एकोपा आणि जेव्हा संकटात हाक मारू तेव्हा साथीला उभी रहा अशी विनवणी करताना.

देवी-झोलाई देवी, मिर्लेवाडी, खेड

व्हिडीओ क्रेडिट - आकाश जाधव, महाड

16/09/2023

मुंबई-रत्नागिरी एसटी भाडं ५३०, पण खासगी बसवाले उकळतात २५००, 🙁

15/09/2023

कोकण आणि पंगतीचे श्लोक.

ही परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी...

गणेश उत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वे द्वारे एकूण ३१२ विशेष फेऱ्या👇 (२०२२ च्या २९४ फेऱ्यापेक्षा १८ फेऱ्या जास्त).३१२ पैकी...
09/09/2023

गणेश उत्सवासाठी मध्य व पश्चिम रेल्वे द्वारे एकूण ३१२ विशेष फेऱ्या👇 (२०२२ च्या २९४ फेऱ्यापेक्षा १८ फेऱ्या जास्त).
३१२ पैकी मध्य रेल्वेच्या २४४ फेऱ्या यामध्ये-
१५० आरक्षित फेऱ्या
९४ अनारक्षित फेऱ्या.
(२०२२ च्या ३२ अनारक्षित फेऱ्या पेक्षा ६२ अनारक्षित फेऱ्या जास्त).
Credit: Central Railway

आपोआप डोळ्यात पाणी आलं.या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात.जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...इर...
22/07/2023

आपोआप डोळ्यात पाणी आलं.
या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात.
जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली...इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी.
कोसळलेल्या दरडीखाली त्यांची गाय गेली.
त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔
निसर्ग वाचवला पाहिजे...आपल्या चुकीची शिक्षा या निष्पाप माणसांसोबत मुक्या जनावरांना पण भेटत आहे.

मुंबईकरांनो आज आपल्या कोकणाला आपली गरज आहे ।। एक जुटीने जमुया आणि आपला स्वर्गीय कोकण वाचवूय।आज १८ जुलै रोजी आझाद मैदान व...
17/07/2023

मुंबईकरांनो आज आपल्या कोकणाला आपली गरज आहे ।। एक जुटीने जमुया आणि आपला स्वर्गीय कोकण वाचवूय।

आज १८ जुलै रोजी आझाद मैदान वर मोर्चा आणि धरणे आंदोलन । ठीक सकाळी ११ वाजता।

जुन्या काळातील मापन पद्धती आणि अडगळीत गेलेले काही मराठी शब्द आणि परिमाणे.. ----------------------------------१) पायली म्...
01/06/2023

जुन्या काळातील मापन पद्धती आणि अडगळीत गेलेले काही मराठी शब्द आणि परिमाणे..
----------------------------------
१) पायली म्हणजे चार शेर म्हणजे सात किलो.
२) अर्धा पायली (आडसरी) म्हणजे दोन शेर म्हणजे साडे तीन किलो.
३) एक शेर म्हणजे अंदाजे दोन किलो.
४) मापट म्हणजे अर्धा शेर म्हणजे साधारण एक किलो.
५) चिपट म्हणजे पाव शेर म्हणजे साधारण अर्धा किलो. (५०० ग्राम)
६) कोळव म्हणजे पाव किलो. (२५० ग्राम )
७) निळव म्हणजे आतपाव. ( १२५ ग्राम )
८) चिळव म्हणजे छटाक. (५० ग्राम )

मुंबईतल्या घरातील देव्हाऱ्यातल्या तांब्यावरच्या नारळाला कोंब आला तर त्याची व्यवस्थित देखभाल करुन... .. तो जीव धरलेला कों...
19/05/2023

मुंबईतल्या घरातील देव्हाऱ्यातल्या तांब्यावरच्या नारळाला कोंब आला तर त्याची व्यवस्थित देखभाल करुन...
.. तो जीव धरलेला कोंब, व्यवस्थित बांधून, ४५०-५०० किलोमीटर लांबवरील आपल्या गावाला १२/१५ तासांचा प्रवास करून घेऊन जाणारा,...
.. अख्ख्या भावकीशी लढून मिळालेल्या गुंठाभर जागेत त्या झाडाची मायेने, प्रेमाने, आपुलकीने लागवड करणारा...

निसर्गालाच देव मानणारा भोळा-भाबडा कोकणी माणूस, कधीतरी स्वत:ची वृक्षसंपदा बेचिराख व्हावी म्हणून रिफायनरी सारख्या विषारी प्रकल्पाला पाठिंबा देईल का?

एकच जिद्द रिफायनरी रद्द ✊आम्हीं आहोत त्या परिस्थिती सुखी आहोत, रिफायनरी वैगरे अशे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून आमच्या क...
28/04/2023

एकच जिद्द रिफायनरी रद्द ✊
आम्हीं आहोत त्या परिस्थिती सुखी आहोत, रिफायनरी वैगरे अशे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून आमच्या कोकण स्वर्गाचा नरक बनवू नका..🙏

#रिफायनरीविरोध

रिफायनरी हटवा, कोकण वाचवा

तुम्हाला काय वाटत?
31/01/2023

तुम्हाला काय वाटत?

आपण ते जगायचंय म्हणतानाही जगु शकत नाहि. 🥰
28/01/2023

आपण ते जगायचंय म्हणतानाही जगु शकत नाहि. 🥰

22/01/2023

कोकणातील कबड्डी

कोकणातील लग्नाचे वऱ्हाड 🥰
22/01/2023

कोकणातील लग्नाचे वऱ्हाड 🥰

आज्येच्या हातचा चुलिवरचा जेवाण कोणाक आवाडता?
15/01/2023

आज्येच्या हातचा चुलिवरचा जेवाण कोणाक आवाडता?

आजची सकाळची देवीची पुजा संपन्न झाल्यानंतर दुर्गादेवीचा जवळुन काढलेला एक अप्रतिम फोटो 💐श्री दुर्गादेवी मंदिर...." वरचा पा...
14/01/2023

आजची सकाळची देवीची पुजा संपन्न झाल्यानंतर दुर्गादेवीचा जवळुन काढलेला एक अप्रतिम फोटो 💐

श्री दुर्गादेवी मंदिर...." वरचा पाट , गुहागर "
आभार पोच..... श्री दुर्गादेवी देवस्थान , " गुहागर "

Address

Chiplun
410605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण एक स्वप्ननगरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby travel agencies


Other Tourist Information Centers in Chiplun

Show All