Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development

  • Home
  • India
  • Dharni
  • Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development

Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development, Panchayat Samiti Road, Civil Line, Dharni.

Melghatian Foundation/ Nisarga Agro Forestry, Tourism &TechNet pvt.ltd.is a company established for agro forestry, agro tourism & networking of farmers for profitable farming...

https://youtube.com/watch?v=cZ_Fr9rASPc&feature=shMelghatian- The Taste of Wild Melghat.. Do come join with us to enjoy ...
30/08/2023

https://youtube.com/watch?v=cZ_Fr9rASPc&feature=sh

Melghatian- The Taste of Wild Melghat..

Do come join with us to enjoy wild vegetables of Melghat region..

Created by Dhananjay Geeta Sunil & Vandna a villagers of Makhala Eco village of Melghat

"मेळघाटातील 12 आश्रमशाळे च्या 1500 विद्यार्थ्यांना 'बारावी नंतरच्या वेगळ्या वाटा'  या विषयाचे मार्गदर्शन.."" मेळघाटातील ...
25/12/2022

"मेळघाटातील 12 आश्रमशाळे च्या 1500 विद्यार्थ्यांना 'बारावी नंतरच्या वेगळ्या वाटा' या विषयाचे मार्गदर्शन.."

" मेळघाटातील ग्रासरूट लीडर विद्यार्थ्यांची एकलव्य मेलघाट शिक्षण यात्रा संपन्न"

"रंगभवन धारणी येथे IIT, TISS येथील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात समारोप झाला. मेळघाटातील रेंगु सामाजिक जन कल्याण संस्था धारणी चे श्रीराम जयराम भिलावेकर, तसेच मेलघाटीयन फौंडेशन सादराबाडी च्या डायरेक्टर गिता बेलपत्रे यांनी विशेष सहकार्य केले."

गरजू , वंचित घटक आणि आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देशातील व विदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देणे ग्रासरूट लीडरशिप उभी करणे आणि यासाठी करावी लागणारी तयारी करणे. तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजना अंमलात आणून गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात घेण्याचे कार्य तसेच विविध परीक्षांची सुचिबद्ध पूर्व तयारी करायचे मार्गदर्शन, नामांकित फेलोशिप मार्गदर्शन निशुल्क देने इत्यादी कामे एकलव्य ग्रासरूट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट फौंडेशन कडून केले जाते..

एकलव्य फौंडेशन च्या मार्गदर्शनात मेळघाटातील 40 पेक्षा जास्त विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई, हैद्राबाद, तुळजापूर, गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल, स्कॉलरशिप विविध योजना तसेच विविध अधिकारी लोकांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात एकलव्य फौंडेशन पुढाकार घेत आहे..

"एकलव्य मेलघाट शिक्षण यात्रे साठी ग्रासरूट लीडर म्हणून टाटा इन्स्टिट्यूट चे किशोर बेठेकर व प्रकाश शेंडे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे संदीप भुसुम, प्रिया दारसिमबे, निर्मला कासदेकर तसेच पुणे विद्यापीठातील आबासाहेव गरवारे कॉजेज मधून जैवविविधता विषयात मास्टर्स केलेले श्री धंनजय सायरे यांनी या फिरत्या मेलघाट शिक्षण यात्रेत सहभाग घेतला होता. 3 दुचाकी घेऊन चिलाटी,डोमा, कुटंगा, हरीसाल, टेंब्रुसोंडा, चिखली, ढाकरमल, भोकरबर्डी राणीगाव, सुसरदा, बिजूधावडी, टेम्बली या 12 आश्रमशाळा ना भेटी देऊन 2500 किलोमीटर प्रवास केला. हा प्रवास खडतर असा थंडीचे दिवसात, मेळघाटातील रस्त्यावरून पूर्ण केला."

या प्रवासात मेलघाटीयन फौंडेशन सांद्राराबाडी, मेळघाट मित्र चिलाटी, संपूर्ण बांबूं केंद्र- लवादा, निसर्ग संरक्षण संस्था बोरी या संस्थांनी आणि आश्रमशाळे तील मुख्याध्यापक शिक्षकांनी, गावातील पोलीस पाटील लोकांनी जेवणाची राहण्याची सोय केली..
रंगभवन धारणी येथे प्रा. अविनाश शिर्के प्राचार्य सावित्रीबाई ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ, "आदिवासी भागातील मुलं, आजचे शिक्षण आणि पालक" या विषयावर मार्गदर्शन केले. आय आय टी मुंबई येथून श्री ओंकार गुहा, नागपूर येथील सोलार कंपनी चे माहिती तंत्रज्ञान विषयाचे इंजिनियर श्री सचिन कुंबलपुरी तसेच पाणी फौंडेशन चे वैभव नायसे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश घाडगे यांनी मार्गदर्शन केले.
मेलघाट शिक्षण यात्रे साठी रिसोर्स पर्सन म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर, श्री अभय चंदेल यांनी "वन विभागातील नोकरी आणि शिक्षणाच्या संधी" याचे मार्गदर्शन केले..

धन्यवाद...

धंनजय सायरे-
डायरेक्टर- मेलघाटीयन फौंडेशन...
प्रेसिडेंट - निसर्गा इन्स्टिट्यूट..
गिता बेलपत्रे
डायरेक्टर- मेलघाटीयन फौंडेशन.
मेंबर- विशाखा समिती- मेलघाट टायगर रिसर्व तथा प्रादेशिक वन विभाग

https://youtu.be/DqlYuQziyLAमी कांतारा दुसऱ्यांदा पहिला आज नागपुरात..अप्रतिम कलाकृती आहे..या चित्रपटातील शेवटचा सिन अप्र...
10/11/2022

https://youtu.be/DqlYuQziyLA

मी कांतारा दुसऱ्यांदा पहिला आज नागपुरात..
अप्रतिम कलाकृती आहे..
या चित्रपटातील शेवटचा सिन अप्रतिम आहे.
सर्व वन विभागातील अधिकारी श्रद्धेने विश्वासाने कांतारा देवतेचे हात हातात घेतात.. वन संवर्धना साठी वने व वन्यजीव संवर्धना साठी वन विभागा सोबत स्थानिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मेळघाटात अंगार मुक्त जंगल अभियाना साठी Nisarga-निसर्गा Foundation च्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न आहे. मेळघाटात पारंपरिक होळी पंचायत मध्ये अंगार मुक्त जंगला विषयी चर्चा व्हावी. यासाठी वन अधिकारी कर्मचारी लोकांनी त्यांचा युनिफॉर्म न घालता डोक्याला दुपट्टा बांधून आपल्या घरगुती पेहरावात पंचायती चर्चेत एक त्या गावातील नागरिक होऊन सहभाग घ्यावा. गावाच्या ग्रामसेवक, कृषिसेवक, तलाठी, शिक्षक, रोजगार सेवक, पोलीस पाटील, सरपंच यांनाही निमंत्रित करावे.. यातून गावातील लोक एकत्र येउन अनेक समस्येवर माध्यमार्ग निघतील, कुठे कायमचा उपाय होईल.
आणि यातूनच जंगल संवर्धन होईल..
सर्व वन विभागातील कर्मचारी अधिकारी लोकांनी अवश्य पहा असा सिनेमा, अप्रतिम कलाकृती..

*कांतारा : मनावर गारूड करणारा थरारक अनुभव*
हा लेख माझे मित्र संजय सोनटक्के यांनी लिहिलाय..

मूळ कन्नड भाषेत निर्माण झालेला *कांतारा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघीतला आणि कांताराचा भाग झाल्याचा थरारक अनुभव घेतला.*

*'कांतारा' म्हणजे लोकदैवताचे जंगल विशाल देवराई सारखे.* लोक आणि जंगल यांचा पारंपरिक ऋणानुबंध आणि या ऋणानुबंधातून निसर्गाप्रती आदरभाव निर्माण होत जगभरातील आदिम जनजीवनावर लोकदैवतांचे महत्वाचे स्थान आणि संबंधित परंपरा आजही घट्ट रूजलेल्या दिसतात.

कांतारा सिनेमाची गोष्ट तशी साधी सरळ आहे. लोककथा, राजा प्रजा संबंध आणि वर्तमानातील जंगल खाते, वनकायदे, लोकांचे जगण्याचे अधिकार, सत्ता संपत्ती पिपासू पिढीच्या वृती, फसवणूक आणि लोकदेवाच्या परंपरा मानून होणारा लोकांचा जंगल आणि स्वअस्तीत्वाचा जीवनसंघर्ष कांतारा सिनेमात अतिशय प्रभावीपणे ऋषभ शेट्टी आणि सहकलाकारांनी सादर केली आहे. निसर्ग आणि मानवाच्या सहसंबधाची आणि मानवी संघर्षाची कहाणी , *लोकपरंपरा आणि जंगल यावरील कथाबीज कन्नड भाषेत निर्माण होत जागतिक पातळीवर प्रेक्षकांना खिळवून ठेवते यातच कांतारा चे यश सामावलेले आहे.*

व्यावसायिक पातळीवर कांतारा यशस्वी झाला आहेच. परंतु प्रेक्षकांना परंपरा जंगल लोकजीवनाची थरारक अनुभुती देत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर गारूड करीत आहे. लोकपरंपरा जपून स्थानिक लोकांच्या सहकार्यातूनच जंगल संवर्धन आणि मानवी अस्तित्व समृद्ध होऊ शकते हा संदेश देण्यात हा सिनेमा यशस्वी ठरतो. कथाबीज, संवाद, संगीत आणि अभिनय सर्व बाजूंनी कांतारा आपली छाप उमटवत आहे. *कांताराचा थरार थिएटरमध्ये जाऊन अवश्य पाहिला पाहिजे.*

*©लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के*
*लोकसहजीवन मिशन*
*२५ आक्टोंबर २०२२*|९८२२४६९४९५

Happy Independence Day to all...  We are firstly Indian Celebrating Azadi kaa Amrit Mahotsav..We are Melghatian, celebra...
14/08/2022

Happy Independence Day to all...


We are firstly Indian Celebrating Azadi kaa Amrit Mahotsav..
We are Melghatian, celebrating










चला महा वन 'शेती' च्या महा श्रमदानाला...धुऱ्या वरील/ बांधावरील वन शेतीचे फायदे शेतकऱ्यांना मिळवून द्यायला.. समजून घ्यायल...
03/07/2022

चला महा वन 'शेती' च्या महा श्रमदानाला...

धुऱ्या वरील/ बांधावरील वन शेतीचे फायदे शेतकऱ्यांना मिळवून द्यायला.. समजून घ्यायला चला...

रोजगार हमी योजनेतून सामाजिक वनीकरण विभागाच्या शेतीच्या बांधावर वृक्षलागवड (वनशेती) या कामातून होणारे फायदे..1 हेक्टर ला 100 झाडे आणि वृक्ष संगोपणा साठी रोजगार मिळणार..

1) कोरडवाहू शेती, ओलित शेती, अल्पभूधारक शेती असलेला कोणताही शेतकरी स्वतःच्या शेतीच्या बांधावर झाड लागवडी साठी रोजगार मिळेल म्हणून आणि भविष्यात उत्पादन देणारे झाड निर्माण होतील म्हणून सहभागी होईल.

2) जैविक कीड नियंत्रण, मृदा जल संधारण, मातीचा सेंद्रिय कर्ब, भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.

3) विविध वृक्ष लागवडीमुळे शेती भोवती ही एक जैवविविधतेने समृध्द अशी परिसंस्था निर्माण होईल. सेंद्रिय कर्ब रुपी खत देणाऱ्या झाडांमुळे रासायनिक खते देण्याची गरज कमी होत जाईल.

4) बांधावर असणाऱ्या झाडीमुळे अनावश्यक जातीचे तण वाढणार नाही. संख्येने 98% असलेल्या मित्र किडीच्या जीवन चक्राला उपयोगी होईल.. त्यातून आपोआप शत्रूकिडी चे नियंत्रण होईल. कीटकनाशके वापर कमी होईल.

5) बांधावर च्या वृक्षलागवडी ने शेतात बाकीची पिके घेता येईल. सोबत औषधी वेली ची लागवड बांधावर करता येईल..(मेळघाट चे मौजीलाल काका 3 एकरात 38-40 प्रकारची पिके घेतात. अधिक माहिती साठी पानी फौंडेशन ची ' पगार देणारं शेत ' ही फिल्म पहावी.)

6) मेळघाट सारख्या भागात वनावरचे अवलंबन कमी होईल. मानव वन्यजीव/ वन विभाग संघर्ष कमी होईल.

7)वनशेती उपचारातून मोठ्या प्रमाणात वन आच्छादन क्षेत्र वाढण्यास मदत होईल.

https://youtu.be/n1fGUIgXN3E

https://youtu.be/qQ9-4nEWa10

धन्यवाद..

धंनजय सायरे

वनशेती अभ्यासक - मेळघाट क्षेत्र
डायरेक्टर- निसर्गा फौंडेशन
प्रणेता -अंगार मुक्त जंगल अभियान- मेळघाट
"पगार देणारे शेत" या फिल्म करिता सहाय्यक दिग्दर्शक- पानी फौंडेशन टीम
मो.9075716392, 9422759392

13/06/2022
13/06/2022
13/06/2022
वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, स्वयंसेवक, शिक्षण आणि मी.....2 ऑक्टोबर 2001  रोजी गांधी जयंती निमित्य संस्थेची स्थापन...
02/10/2019

वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, स्वयंसेवक, शिक्षण आणि मी.....

2 ऑक्टोबर 2001 रोजी गांधी जयंती निमित्य संस्थेची स्थापना झाली होती. त्या निमित्य आज स्थापना दिवस होता. त्याकरिता आज या सोहळ्याचा भाग होता आले..
पानी फौंडेशन, निसर्गा इन्स्टिट्यूट चा प्रतिनिधी म्हणून आज सहभागी झालो यांचा आनंद झाला.. चंद्रपूर येथील सच्चे स्वयंसेवक कार्यकर्ते ग्रीन वॉरिअर श्री बंडू धोतरे यांचे अनुभव ऐकले. भारावून गेलो..

या प्रसंगी आयुष्यातील भूतकाळात डोकावून पाहतांना शिक्षणा चे दिवस आठवतात.. स्वयंसेवक म्हणून घडतांना पुस्तके कायम सोबत होती.. एक होता कार्व्हर ने 'शिक्षण घेतांना काम करण्याची संधी सोडू नका' ही शिकवण रुजवली आणि प्रख्यात लेखक श्री चितमपल्ली यांचे पुस्तकांनी वने वन्यजीव, पर्यावरण, निसर्ग या विषयात रुची निर्माण केली.. आणि अमरावतीला आलो..शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे प्रवेश झाला. 'इकोफ्रेंड' या वनस्पती शास्त्र विभाग च्या संकल्पना दोरकर सरां कडून समजून घेतांना सुरवात झाली..पुढे मधुभाऊ घारड यांची वनराई लायब्ररी ची B.Sc पर्यावरण पूर्ण होत पर्यंत 4 वर्ष सुटली नाही. तिथे पर्यावरण क्षेत्रातील 20000 पुस्तके त्यातील मी जवळपास 650 पुस्तके वाचली .अगदी हॉटेल मध्ये काम करतांना कुणी ग्राहक नसेल तर वाचून काढायचो.. चार वाजता कॉलेज मधून निघालो की वनराई मग हॉटेल असा मी सायकल ने जायचो..

अशात महाविद्यालयीन शिक्षण चालूच होते..प्रथम वर्षात वन्य जीव सप्ताहाची प्रश्न मंजुषा CCF श्री नितिन काकोडकर यांचे हस्ते पुरस्कार आणि पर्यावरण विभागचे डॉ इंगोले मॅडम, काकडे मॅडम, बूटे सर यांचे कौतुकाने प्रोत्साहन मिळाले..

अमरावती विद्यापीठाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक समजून इथूनच डॉ जयंत वडतकर यांचा परिचय झाला. वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था शी परिचय झाला.. आणि सुरू झाला एक स्वयंसेवक म्हणून प्रवास...
पुस्तकांनी शिकवलं होत "आपल्या क्षेत्रातील दिग्गजांशी मैत्री करा, त्यांचे जीवन समजून घ्या, त्यांचे सोबत कामाचा अनुभव घ्या..तुमचं जीवन आपोआप घडेल.."
मातीचे गणपती बसवा पर्यावरणाशी बंधीलको दाखवा, प्राणिगणना, पक्षी निरीक्षण, वन भ्रमंती, पर्यावरण संमेलन अशा खूप कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून कामे केली.. सोबत शिक्षण ही सुरू होते.. महाविद्यालयात डिग्री भेटली पण या साऱ्या अनुभवातून जगण्याची दिशा मिळाली...
बी.एस्सी, एम.एस्सी- जैवविविधता (अपूर्ण) एम.ए. ग्रामीण विकास (सध्या शिकत आहे) या सोबत सृजन चे श्री अजय डोळके यांचे मार्गदर्शनात ग्रॅज्युएट व्हॉलंटीअर फेलोशिप, मग नोकरीचे अनुभव रूरल कम्युन्स, पर्यावरण शिक्षण केंद्र- पुणे, पानी फौंडेशन- मुंबई असे अनुभव घेत आयुष्य अजून समृद्ध झाले.

नुकताच निसर्गा इन्स्टिट्यूट ची स्थापना, आणि आता निसर्गा ऍग्रो फॉरेस्ट्री टेक नेट प्रा.लि. या कंपनी स्थापने कडे पाऊल टाकले आहे..
डॉ जयंत वडतकर, डॉ गजानन वाघ, यांचे बरोबर फिरतांना ज्या मेळघाटात वन संपदेने मोहित केले होते, तिथल्याच एका समविचारी, सामाजिक भान असलेल्या मुलीशी लग्न करून आता इकडे मेळघाट मध्ये स्थायिक होऊन वन संपदेचे संवर्धना साठी आयुष्यभर काम प्रेरणा ही "स्वयंसेवक" म्हणून केलेल्या कामाची पावती आहे..

आपण जो कोणता विषय शिकत आहोत त्या साठी "स्वयंसेवक होणे" ही शिक्षणा बरोबरची एक आयुष्य घडवण्याची संधी होय..
असे मला वाटते..

धंनजय सायरे
एक स्वयंसेवक
वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती..

Address

Panchayat Samiti Road, Civil Line
Dharni
NOZIP

Telephone

+919075716392

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Melghatian Foundation- For Sustainable Economic & Ecological Development:

Share