25/12/2022
"मेळघाटातील 12 आश्रमशाळे च्या 1500 विद्यार्थ्यांना 'बारावी नंतरच्या वेगळ्या वाटा' या विषयाचे मार्गदर्शन.."
" मेळघाटातील ग्रासरूट लीडर विद्यार्थ्यांची एकलव्य मेलघाट शिक्षण यात्रा संपन्न"
"रंगभवन धारणी येथे IIT, TISS येथील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात समारोप झाला. मेळघाटातील रेंगु सामाजिक जन कल्याण संस्था धारणी चे श्रीराम जयराम भिलावेकर, तसेच मेलघाटीयन फौंडेशन सादराबाडी च्या डायरेक्टर गिता बेलपत्रे यांनी विशेष सहकार्य केले."
गरजू , वंचित घटक आणि आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देशातील व विदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देणे ग्रासरूट लीडरशिप उभी करणे आणि यासाठी करावी लागणारी तयारी करणे. तसेच वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक योजना अंमलात आणून गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात घेण्याचे कार्य तसेच विविध परीक्षांची सुचिबद्ध पूर्व तयारी करायचे मार्गदर्शन, नामांकित फेलोशिप मार्गदर्शन निशुल्क देने इत्यादी कामे एकलव्य ग्रासरूट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट फौंडेशन कडून केले जाते..
एकलव्य फौंडेशन च्या मार्गदर्शनात मेळघाटातील 40 पेक्षा जास्त विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई, हैद्राबाद, तुळजापूर, गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल, स्कॉलरशिप विविध योजना तसेच विविध अधिकारी लोकांकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात एकलव्य फौंडेशन पुढाकार घेत आहे..
"एकलव्य मेलघाट शिक्षण यात्रे साठी ग्रासरूट लीडर म्हणून टाटा इन्स्टिट्यूट चे किशोर बेठेकर व प्रकाश शेंडे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे संदीप भुसुम, प्रिया दारसिमबे, निर्मला कासदेकर तसेच पुणे विद्यापीठातील आबासाहेव गरवारे कॉजेज मधून जैवविविधता विषयात मास्टर्स केलेले श्री धंनजय सायरे यांनी या फिरत्या मेलघाट शिक्षण यात्रेत सहभाग घेतला होता. 3 दुचाकी घेऊन चिलाटी,डोमा, कुटंगा, हरीसाल, टेंब्रुसोंडा, चिखली, ढाकरमल, भोकरबर्डी राणीगाव, सुसरदा, बिजूधावडी, टेम्बली या 12 आश्रमशाळा ना भेटी देऊन 2500 किलोमीटर प्रवास केला. हा प्रवास खडतर असा थंडीचे दिवसात, मेळघाटातील रस्त्यावरून पूर्ण केला."
या प्रवासात मेलघाटीयन फौंडेशन सांद्राराबाडी, मेळघाट मित्र चिलाटी, संपूर्ण बांबूं केंद्र- लवादा, निसर्ग संरक्षण संस्था बोरी या संस्थांनी आणि आश्रमशाळे तील मुख्याध्यापक शिक्षकांनी, गावातील पोलीस पाटील लोकांनी जेवणाची राहण्याची सोय केली..
रंगभवन धारणी येथे प्रा. अविनाश शिर्के प्राचार्य सावित्रीबाई ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ, "आदिवासी भागातील मुलं, आजचे शिक्षण आणि पालक" या विषयावर मार्गदर्शन केले. आय आय टी मुंबई येथून श्री ओंकार गुहा, नागपूर येथील सोलार कंपनी चे माहिती तंत्रज्ञान विषयाचे इंजिनियर श्री सचिन कुंबलपुरी तसेच पाणी फौंडेशन चे वैभव नायसे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश घाडगे यांनी मार्गदर्शन केले.
मेलघाट शिक्षण यात्रे साठी रिसोर्स पर्सन म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर, श्री अभय चंदेल यांनी "वन विभागातील नोकरी आणि शिक्षणाच्या संधी" याचे मार्गदर्शन केले..
धन्यवाद...
धंनजय सायरे-
डायरेक्टर- मेलघाटीयन फौंडेशन...
प्रेसिडेंट - निसर्गा इन्स्टिट्यूट..
गिता बेलपत्रे
डायरेक्टर- मेलघाटीयन फौंडेशन.
मेंबर- विशाखा समिती- मेलघाट टायगर रिसर्व तथा प्रादेशिक वन विभाग